शाळासुटल्या नंतर ते कॉलेज पर्यंत दर वर्षी आमचं शाळेतल्या मित्रांच टोळक एकत्र नव वर्ष साजर करायच. म्हणजे तेच त्या वयाला साजेसा धांगड-धींगा, नाच गाणी, माफक पेय पान.
नंतर नोकरी लागल्यावर (स्वत:चा पैसा खिशात खुळखुळायला लागल्या वर) जवळच महाबवळेश्वर /माथेरान/लोणावळा/खंडाळा अश्या ठिकाणी १-२ दिवसाच्या सहली काढायचो.
काही वर्षांनी देश सोडला मित्रांशी ताटातुट झाली. नववर्षाच सेलिब्रेशन एक इव्हेंट होउन राहीली. सगळ्या हॉटेल मध्ये हीलस्टेशन वर गर्दीच गर्दी. त्यामुळे बाहेर जाणं बंद झाल.
पुर्वी दुरदर्शन वर चांगले कार्यक्रम असायचे नव वर्षाच्या निमित्ताने. हल्ली ते ही बंद झालेत. आचरट पणाच दाखवतात.
आता कधी भारतात असलो तर घरच्यांसोबतच वेळ घालवतो. मस्त एखादी पेश्शल डिश बनवतो. चार चांगले गाणारे गळे असले तर गाण्यांचा डाव मांडतो. १२ वाजल्यावर मोबाईल खण-खणु लागतात. शुभेच्छांची देवाण घेवाण होते. आणि मग गप गुमान झोपुन जातो.
या वर्षीच अजुन काही ठरवल नाही. काही खास अपेक्षीतही नाही.
प्रतिक्रिया
ठीक आहे, आपण एवढा प्रेमाने
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
तर बायको पोरीला बाहेर घेऊन
In reply to ठीक आहे, आपण एवढा प्रेमाने by गांधीवादी
३१ डिसेंबर, वाढदिवस, सणवार
एकतर पिउन तर्राट होउन पडतो
रोज करतो ते, लोळतो.
जे रोज करतो तेच करनार,
हम्म हम्म
शाळासुटल्या नंतर ते कॉलेज
बीअर + बाकरवडी = धम्माल मजा
+१
In reply to बीअर + बाकरवडी = धम्माल मजा by कुळाचा_दीप
हे आमंत्रण आहे की प्रश्ण?