मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

३१ डिसेंबर च्या रात्री तुम्ही काय करता?

स्पा · · कौल

वाचने 3044 वाचनखूण प्रतिक्रिया 101

In reply to by टारझन

गांधीवादी 22/12/2010 - 13:17
ठीक आहे, आपण एवढा प्रेमाने आग्रहच करीत आहात, तर बायको पोरीला बाहेर घेऊन जाऊन एकेक घावन खाऊन येतो. अवांतर : आपण येणार का बरोबर ?

In reply to by गांधीवादी

टारझन 22/12/2010 - 13:20
तर बायको पोरीला बाहेर घेऊन जाऊन एकेक घावन खाऊन येतो.
ये हुई ना बात :) घावण खाण्यापेक्षा एखाद्या पेश्शल प्रसंगी सहकुटुंब असणं जास्त मजा देतं :)
अवांतर : आपण येणार का बरोबर ?
छे हो , तुमच्या अतिखाजगी वातावरणात आमच्या सारख्या त्रयस्थाने येणं बरं नाही :) पण सम ऑदर डे , जरुर :) (चहा-घावण प्रेमी) टारझन झिंदगी मुरब्बा है

अप्पा जोगळेकर 22/12/2010 - 08:41
एकतर पिउन तर्राट होउन पडतो नाहीतर गुमान झोपून जातो नेहमीसारखंच सक्काळी सक्काळी उठून आपल्या कानविंदेच्या कोर्टात खेळण्यासाठी. तू काय करणारेस या वेळी?

गणपा 22/12/2010 - 18:38
शाळासुटल्या नंतर ते कॉलेज पर्यंत दर वर्षी आमचं शाळेतल्या मित्रांच टोळक एकत्र नव वर्ष साजर करायच. म्हणजे तेच त्या वयाला साजेसा धांगड-धींगा, नाच गाणी, माफक पेय पान. नंतर नोकरी लागल्यावर (स्वत:चा पैसा खिशात खुळखुळायला लागल्या वर) जवळच महाबवळेश्वर /माथेरान/लोणावळा/खंडाळा अश्या ठिकाणी १-२ दिवसाच्या सहली काढायचो. काही वर्षांनी देश सोडला मित्रांशी ताटातुट झाली. नववर्षाच सेलिब्रेशन एक इव्हेंट होउन राहीली. सगळ्या हॉटेल मध्ये हीलस्टेशन वर गर्दीच गर्दी. त्यामुळे बाहेर जाणं बंद झाल. पुर्वी दुरदर्शन वर चांगले कार्यक्रम असायचे नव वर्षाच्या निमित्ताने. हल्ली ते ही बंद झालेत. आचरट पणाच दाखवतात. आता कधी भारतात असलो तर घरच्यांसोबतच वेळ घालवतो. मस्त एखादी पेश्शल डिश बनवतो. चार चांगले गाणारे गळे असले तर गाण्यांचा डाव मांडतो. १२ वाजल्यावर मोबाईल खण-खणु लागतात. शुभेच्छांची देवाण घेवाण होते. आणि मग गप गुमान झोपुन जातो. या वर्षीच अजुन काही ठरवल नाही. काही खास अपेक्षीतही नाही.

In reply to by कुळाचा_दीप

स्पा 27/12/2010 - 06:43
बीअर + बाकरवडी हे कॉम्बिनेशन तरी करायला हरकत नाही..... विस्की + अळूवडी किंवा रम/वोडका + थालीपीठ हे सुद्धा छान लागेल असं वाटतंय :) - गुळाचा_ढीग