मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लढवय्यांचे वंशज

रम्या · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजच मिसळपाव वरील एका लेखात बहादूर शहा जफर यांच्या गजलींविषयी वाचलं. आमच्या अंगभूत स्वभावानुसार बहादूर शहा जफर यांच्या बद्दल इतर काही माहीती गुगलली. माहीती वाचता वाचता बहादूर शहा यांच्या वंशजा पर्यंत, सुलताना बेगम, पर्यंत पोहोचलो. चहाची टपरी चालवून अत्यंत गरीब परिस्थितीत राहणार्‍या सुलतानाबद्दल वाचून वाईट वाटलं. उत्सुकता आजूनच चाळवली. मराठी लढवय्ये तानाजी मालुसरे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मोरोपंत पिंगळे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज आत्ता काय करत असतील यांह्याबद्दल जालावर शोध घेतला असता एक माहीतीपुर्ण लेख वाचायला मिळाला. मिपा सदस्यांशी शेअर करावासा वाटला. http://hvk.org/articles/0909/83.html शिवरायांचे प्राण वाचवणार्‍या जिवा महालाचे वंशज अजुनही गरीब परिस्थित राहत आसल्याचे वाचून वाईट वाटले.

वाचने 7667 वाचनखूण प्रतिक्रिया 22

नगरीनिरंजन 21/12/2010 - 14:45
वाईट वाटण्याचे कारण समजले नाही. हे लोक त्या थोर आत्म्यांचे वंशज आहेत या कर्तृत्वाबद्दल सरकारने त्यांना पैसे द्यावेत असे सुचवायचे आहे काय? शिवरायांचे प्राण वाचवल्याबद्दल जिवा म्हालांचा योग्य तो सत्कार नक्कीच झाला असावा. त्यांच्या वंशजांचा त्यात काय हात?

In reply to by नगरीनिरंजन

रम्या 21/12/2010 - 14:54
बरोबर आहे. खरं म्हणजे वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. पण उगीचच वाईट वाटलं. पण गंमत म्हणजे गरीब असणार्‍या सगळ्यांच वंशजाचा सरकारनेच आपल्यासाठी काही तरी करावं असा काहीसा सुर दिसतो. :)

In reply to by नगरीनिरंजन

घाशीराम कोतवाल १.२ 21/12/2010 - 17:20
हो पण तोच जिवा महाला मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाच्या स्वारीच्या वेळेस छत्रपतींना सोडुन गेले व मोघलांना जावुन मिळाले असे ऐकुन आहे खरे वा खोटे ह्याबद्दल मिपावरील जाणकारांनी प्रकाश टाकावा

विजुभाऊ 21/12/2010 - 15:18
गरीब असणार्‍या वम्शजाम्साठी सरकारने काहितरी करावे म्हणजे नक्की काय करावे आणि कशासाठी करावे. ते वंशज गरीब राहिले ते त्यानी योग्य शिक्षण घेतले नाही , योग्य वयात योग्य नोकरी पाहिली नाही किंवा पूर्वजांच्या उज्वल कारकिर्दीत वर्तमानाच्या अंधाराचा विसर पडला असावा. मुघलांचे वंशजच षोधायचे तर ते नक्की किती अस्तील याचा मोघलानादेखील अम्दाज नसायचा. मोघलांच्या एकातरी बादशहाच्या आयांची नावे त्याना स्वतःलाच माहीत असतील याची सुद्धा खात्त्री नाही

In reply to by विजुभाऊ

गणपा 21/12/2010 - 17:48
सहमत.
ते वंशज गरीब राहिले ते त्यानी योग्य शिक्षण घेतले नाही , योग्य वयात योग्य नोकरी पाहिली नाही
पण मग हाच न्याय आरक्षणाबाबत का लावला जात नाही? तिकडे कसे सगळे दंड थोपटुन उभे रहातात.

In reply to by गणपा

विजुभाऊ 21/12/2010 - 18:08
पण मग हाच न्याय आरक्षणाबाबत का लावला जात नाही? आरक्षणासाठी " ज्याना पिढ्यान पिढ्या शिक्षणाची संधीच नाकारली " अशाना आरक्षण द्यावे असा निकश लावला होता. ज्या दलीताना रामायण कालापासून शिक्षण घेतले म्हणून कानात शिशाचा रस ओतून मारले गेल्याचे दाखले आहेत किंवा ज्यान समाजात मोकळे वावरण्यापासूनच वंचीत ठेवले गेले होते त्या लोकाना निदान समान पातळीवर येण्यासाठी आरक्षण दिले गेले. मुलगी आहे तिला शिकवून खर्च का करायचा असा विचार करणारा समाज अजूनही आस्तित्वात आहे. त्या समाजातील मुलीने शिकावे या साठी जर शिक्षण सवलती दिल्या गेल्या तर त्यात काय गैर आहे? काम न करता पूर्वजांच्या पराक्रमाच्या गप्पा हाणत स्वतःला थोर मानून आळशा सारखे रहाणे आणि पात्रता असूनही कष्ट करण्याची तयारी आसूनही शिक्षणाची संधी समाजाने नाकारणे या दोन गोष्टी एका तराजूत तोलून कसे चालेल. आरक्षणाचे चटके मला बसलेले आहेत. एके काळी आरक्षण कशाला या विषयावर मी तावातावाने वाद घालत असे. पण आज ती गोष्ट मला पटते

In reply to by विजुभाऊ

इन्द्र्राज पवार 22/12/2010 - 10:32
++ कित्येक दिवसांनी इतका चांगला प्रतिसाद वाचायला मिळाला. फार समाधान झाले आहे, विजुभाऊ. "....आरक्षणाचे चटके मला बसलेले आहेत....." यात मी देखील होतो...पण इकडे कॉलेज्/विद्यापीठाच्या व्यासपिठावरून वादविवाद स्पर्धेत तावातावाने गांधीजी, सावरकर, फुले, आंबेडकर, कर्वे, शाहू महाराज, पं.रमाबाई आणि तत्सम नेत्यांच्या या संदर्भातील मतांची बाजू घेऊन याच समाजातील एक वर्ग निव्वळ एका जातीत जन्माला आलेत म्हणून त्यांना शिक्षणाच्या संधी नाकारून त्याना आणखीनच गर्तेत लोटण्याच्या प्रयत्नाना विरोध करायचा (तशी बाजू मांडली म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेतेपदाचे शिल्डही स्वीकारायचे)....आणि नंतर पदव्या वगैरे सोपस्कार झाल्यावर नोकरीत 'त्यांना' आरक्षण ठेवले म्हणून शंख करायचा हा दुटप्पीपणा करणे म्हणजे त्या थोर नेत्यांच्या शिकवणीस वेळ येताच सोयीस्कररित्या बासनात बांधुन ठेवायचे असे होते.... हे लक्षात ठामपणे असल्याने कधीही आरक्षणाबाबत कोणत्याही निमित्ताने डावे मत मांडलेले नाही... वा सरकारच्या या संदर्भातील धोरणावर टीकाही केलेली नाही. त्यामुळेच असेल कदाचित की वरील प्रतिसाद वाचून आनंद झाला. बाकी या धाग्यातील प्रमुख विचाराबाबत बोलायचे झाल्यास ज्या पूर्वजाचे नावही धड लिहिता येणार नाही अशा आजच्या पिढीतील बाळकोबांनी रात्री खारे शेंगदाणे मटकावित "आमच्या खापरपणजोबानी महाराजांसाठी [चाल बदलून...'देशासाठी'] इतके केले आणि सरकार आमच्यासाठी काही करीत नाही..." ही जपमाळ सातत्याने ओढत बसणे हे नित्याचेच आहे. कुणीही त्या कण्हण्याकडे लक्ष देत नाही....देऊही नये. इन्द्रा

गणेशा 21/12/2010 - 17:34
माहिती शेअर केल्याबद्दल ..धन्यावाद. (कंपणीत साईट्स ब्लॉक असल्याने पाहु शकलो नाहि आता तरी नंतर आवर्जुन पाहिन .. ) बाकी ज्यांनी ज्यांनी देशासाठी .. स्वराज्यासाठी बलिदान दिले त्या सर्व थोर सेनानींना पुन्हा अभिवादन ... अवांतर : त्यांचे वंशज अजुनही गरिबीत आहेत हे वाचुन मला ही वाईट वाटले .. ते का गरीब राहिले याची वेगवेगळी कारणे असतील ही , आणि ते सगळे गरीब, सरकारकडुन अपेक्षा करत नसतील ही अशी आशा वाटते .. तरीही वाईट वाटले , कारण ते गरीब आहेत म्हणुन नाही , तर त्यांचा उत्कर्ष झालेला जास्त आवडला असता म्हणुन वाईट वाटले .. काहिंचे वंशज अमाप संपत्ती घेवून .. राजकारणातुन आपला हिसका दाखवताना पाहुन वाईट वाटते .. हे वाईट मागच्या पेक्षा जास्त वाटते .. कारण संपत्ती लुबाडुन ते आपल्याच पुर्वजांची बदनामी करत आहेत .. जे मानाने मिळाले असते .. तेच ओरभाडुन खाताना पाहुन मग लाज वाटते .. म्हणुन वाईट वाटते .. असो

योगी९०० 21/12/2010 - 17:51
मुकेश अंबानी यांनी धिरूभाईंकडून मिळालेली इस्टेट १० पटीने वाढवली..आपल्या श्रीधर फडके, मंगेशकर भावंडे यांनी वाडवडीलांकडून आलेल्या परंपरेला राखत किंवा त्यात भर टाकत स्वत:चे असे वेगळे नाव केले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. तसेच जर महाला/मालुसरे यांच्या नंतरच्या पिढीने त्या त्या काळानुसार पराक्रम करून घराण्याचे नाव राखले असते तर त्यांच्या वंशजावर ही वेळ आलीच नसती. आमच्या पुर्वजांनी काहीतरी दिव्य केले म्हणून सरकारनेच आमच्यासाठी काही तरी करावं म्हणणे चुकीचेच..त्या न्यायाने सुर्याजी पिसाळ वगैरे दगाबाज मंडळीच्या वंशजांना आज आपण वाळीत टाकावे की काय? (अजुन पर्यंत मी एकही महाला किंवा मालुसरे या आडनावाची व्यक्ती पाहिली किंवा ऐकली नाही. मालुसरे म्हटले की तानाजीच आठवतो).

In reply to by योगी९००

स्वाती२ 21/12/2010 - 19:10
+१ सहमत! माझे आतेभाऊ हे खंडो बल्लाळ चिटणिसांचे वंशज आहेत. पण ते या गोष्टीची जाहिरात करत फिरत नाहित. काळाची पावले ओळखून माझ्या आत्याने सर्वांना शिस्तीत वाढवले, शिक्षण दिले.एक भाऊ सैन्यात मेजर झाला बाकीचे डॉक्टरी/वकिली पेशात रमले. इतिहासातील थोर व्यक्तींनी जी काही कर्तबगारी गाजवली ती आपल्या वारसांना भारत सरकारने पुढे काही मदत करावी म्हणून थोडीच गाजवली होती?

In reply to by स्वाती२

>इतिहासातील थोर व्यक्तींनी जी काही कर्तबगारी गाजवली ती आपल्या वारसांना भारत सरकारने पुढे काही मदत करावी >म्हणून थोडीच गाजवली होती? --> बरोबर बोललात एकदम

In reply to by स्वाती२

योगी९०० 21/12/2010 - 20:11
इतिहासातील थोर व्यक्तींनी जी काही कर्तबगारी गाजवली ती आपल्या वारसांना भारत सरकारने पुढे काही मदत करावी म्हणून थोडीच गाजवली होती? एकदम बरोबर..

In reply to by योगी९००

३_१४ विक्षिप्त अदिती 22/12/2010 - 05:19
नगरीनिरंजन यांच्याशी सहमत. अवांतर:
(अजुन पर्यंत मी एकही महाला किंवा मालुसरे या आडनावाची व्यक्ती पाहिली किंवा ऐकली नाही. मालुसरे म्हटले की तानाजीच आठवतो).
आमच्या शेजार्‍यांकडे लक्ष्मीआजी कामाला यायची, तिचं आडनाव मालुसरे. तिचा नवरा लवकर गेला, पदरात तीन मुली मग चार घरी धुणी-भांडी केली. आमची शेजारची आजी भलतीच शिस्तीची! आजीकडून मिळणारा अर्धा पगार तिच्या नावे बँकेत रिकरिंग डीपॉझिटमधेच जायचा. लक्ष्मीआजीच्या मुली शिकल्या, बँकेत वगैरे चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागल्या. मुलींनी सांगितलं म्हणून इतर घरची कामं लक्ष्मीआजीने सोडली पण तिला होत होतं तोपर्यंत ती काम करायची ती फक्त याच घरामधे. अजूनही कधीमधी महिन्यातून एखादा शेजार्‍यांच्या घरी, सहज गप्पा मारायला चक्कर टाकते तेव्हा भेटली तर आजीची आठवण निघतेच. माझं अदिती नाव शेजारच्या आजीनेच ठेवलं आहे.

In reply to by योगी९००

रम्या 22/12/2010 - 09:11
>>अजुन पर्यंत मी एकही महाला किंवा मालुसरे या आडनावाची व्यक्ती पाहिली किंवा ऐकली नाही. मालुसरे म्हटले की तानाजीच आठव सिंहगडाच्या परिसरात मालुसरे नावाच्या कित्येक पिढ्या आहेत असं ऐकून आहे. तसेच जिवा महाला म्हणजे जिवा महाला सकपाळ. सकपाळ नावाची बरेच जण तुम्हाला माहित असती.

In reply to by रम्या

मैत्र 22/12/2010 - 11:18
माझ्या बरोबर दोन वर्ष मालुसरे आडनावाचा एक मुलगा काम करत होता. अजूनही तो पुण्यात उत्पादन क्षेत्रातल्या एका नामवंत कंपनीत काम करतो आहे. त्याच्या तानाजी मालुसरेंशी थेट नातेसंबंधाची मात्र काही माहिती नाही ... तसे माझेही आडनाव शहाण्यांशी / मुत्सद्यांशी संबंध जोडणारे आहे पण त्यांच्याशी आमच्या पूर्वजांचा काही नातेसंबंध किंवा संपर्क होता असा पुरावा काही नाही..

प्रियाली 21/12/2010 - 19:13
ऐतिहासिक व्यक्तिच्या कुटुंबांना सरकारने मदत करण्याची गरज नाही परंतु काही सेवाभावी संस्था, ज्ञाती, दानशूर व्यक्ती वगैरेंना त्यांना मदत करण्यात रस वाटत असल्यास ते या बाहेर आलेल्या बातमीमुळे या व्यक्तिंना मदत करणे सहजशक्य आहे.