✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारताला लष्करे तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांपेक्षा अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे. इति. युवराज.

ग
गांधीवादी यांनी
Sat, 12/18/2010 - 13:21  ·  लेख
लेख
अगदी नेहमीप्रमाणे **** तारे तोडण्यात प्रसिद्ध असलेले माननीय युवराज (भावी पंतप्रधान) यांनी भारतात/जगात हिंदूंना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे शतश: धन्यवाद. त्यांचे आभार मानावे तितके कमी. 'आज भारताला सर्वात मोठे धोका आहे तो केवळ हिंदू दहशतवाद्यानाकडून' असे सांगून त्यांनी हिंदूंची जी कानउघाडणी केलेली आहे ती नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. ज्यांना खोटे वाटते त्यांनी घराबाहेर येऊन बघावे, तर काय दिसते. प्रत्येक हिंदू आज हातात तलवार, मशीनगन घेऊन उभा असतो. रोज हजारो लोकं चौका-चौकात मारली जातात. रात्री ८ नंतर कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीत. कोणीही कोणाचाही कधीही कत्तल करू शकतो. आणि हे सर्व होत असताना या हिंदुना हे उघडपणे सांगण्याचे धैर्य कोणात नव्हते. ते असीम धैर्य एकटवून माननीय युवराज यांनी हिंदूंना कडू औषधच पाजले आहे. हे प्राशन करून हिंदूंनी लवकरात लवकर खाली दिले आहे त्याप्रमाणे वागावे. माझे समस्त हिंदूंना आवाहन आहे : १) बाबांनो पहिले हातातली शस्त्रे खाली ठेवा. सारे जग आपल्या हिंसेमुळे आपल्यावर थुंकते आहे. जगात आज 'हिंदू' असे उच्चारले तरी लगेच सुरक्षा रक्षकांच्या भुवया उंचावल्या जातात आणि आजूबाजूचे संशयित नजरेनं बघतात. बाबांनो अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदूंनो सुधारा, बंद करा हि हिंसा. २)कोणीही कुठेही समूहाने जाताना केवळ सर्व हिंदू मिळून जाऊ नका. कोणितर अजून एक-दोन दुसर्या धर्मातील बरोबर असू द्या, त्यामुळे आपण काही अघटीत करायला जात नाही आहात हे सिद्ध होऊ शकते. ३)इथे मिपावर सुद्धा केवळ हिंदुंऐवजी सर्व धर्मियांना सामील करून घ्या, नाहीतर एके दिवशी या मिपाला देखील एक दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे. ४)आपल्याकडील सर्व हत्यारे चाकू सुरे, तलवारी, (लेखणी सकट) जवळच्या पोलीस चौकीत जमा करा. ५)प्रत्येक मंदिरांमध्ये CCTV कॅमेरे बसवा. ६)आपल्या मुलांना केवळ धार्मिक ज्ञान न देता शालेय अभ्यासक्रमात देखील पाठवा. हिंदू दहशतवादामुळे देशाला अधिक धोका पण सगळेच हिंदी काही दहशतवादी नसतात आणि हे जगाच्या कानात ठणकावून सांगण्यासाठी आम्ही एक सिनेमा निर्मिती करण्याचे योजिले आहे. सिनेमाचे नाव असेल : my name is kulkarni* & I am not a terrorist. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- * हिंदूंमध्ये जे कोणते नाव प्रचीलीत असेल ते. जसे जोशी, पवार, चव्हाण, ठाकरे. वगेरे वगेरे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18463 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

हा हा,,, मस्त लेख. (बाकी त्या

बबलु
Sat, 12/18/2010 - 13:50 नवीन
हा हा,,, मस्त लेख. (बाकी त्या गांधी युवराजाच्या *** **).
  • Log in or register to post comments

:(

नितिन थत्ते
Sat, 12/18/2010 - 13:53 नवीन
लेखाच्या वाक्यावाक्यात इतका मूर्खपणा भरला आहे की काही प्रतिक्रिया देणे शक्य नाही. चालू द्या.
  • Log in or register to post comments

प्रश्न तुमचा माझा नाहीच मुळी, मला चिंता वाटते ती बाहेरच्यांची.

गांधीवादी
Sat, 12/18/2010 - 14:58 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या मताचा आदर आहे. (पण असेच युवराजांच्या मताचा आदर परदेशी लोक करू लागले तर ?) मला वाटते हे एक गंभीर प्रकरण आहे. राहुलने हे नक्कीच केवळ मतांसाठी केलेले नाही. कारण हे त्याने कुठे उघड स्वरुपात बोललेले नाही. जगभरात जिथे जिथे भारतीय वावरतात, तिथे तिथे हि बातमी पोहोचलेली असेल. तुम्हा आम्हाला इथली परिस्थिती काय आहे हे माहित असते, पण हजारो किलोमीटर लांब बसलेल्या परदेशी लोकांना काय माहित असणार ? ते तर असाच विचार करतील ना , 'यांचाच भावी पंतप्रधाना असे बोलतो आहे तर नक्की काहीतरी गंभीर असणार आहे'. लष्करे-तोयबा तर जगभरात कुप्रसिद्ध आहेच पण हिंदू दहशतवाद्यांना त्याच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचे काम या एक विधानाने केले आहे. इथून पुढे सारे जग हिंदुकडे सुद्धा त्या संशयित नजरेनं बघणार नाही याची काय खात्री. कारण हे वाक्य कोणी सामान्य व्यक्तीने म्हणलेले नाही. प्रश्न तुमचा माझा नाहीच मुळी, मला चिंता वाटते ती बाहेरच्यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पहिली गोष्ट म्हणजे आपण

नितिन थत्ते
Sat, 12/18/2010 - 15:08 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे आपण शीर्षकात जे वाक्य लिहिले आहे तेच मी वाचले आहे. पण लेखात मात्र तुम्ही ते "केवळ हिंदू दहशतवाद्यांकडून" असे बदलून लिहिले आहे. शिवाय शीर्षकातल्या वाक्याचा अर्थ परदेशी लोक आपण लिहिल्याप्रमाणे "रस्तोरस्ती हिंदू खून पाडत आहेत" वगैरे असा का घेतील? कारण शीर्षकातल्या वाक्यातून असे काहीच सूचित होत नाही. डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते. बाकी हिंदू संघटनांच्या दहशतवादी कारवाया आपल्या येथे आत्ता उघडकीस आल्या असतील. पण सी आय ए आदि लोकांना त्या आधीपासून माहिती असण्याची शक्यता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

>>शीर्षकातल्या वाक्याचा अर्थ

गांधीवादी
Sat, 12/18/2010 - 15:19 नवीन
>>शीर्षकातल्या वाक्याचा अर्थ परदेशी लोक आपण लिहिल्याप्रमाणे "रस्तोरस्ती हिंदू खून पाडत आहेत" वगैरे असा का घेतील? घेतील किंवा न घेतील. 'घेऊ शकत नाही' तसेच 'का घेऊ शकत नाहीत ?'. काहीही होऊ शकते. असेच होईल कोणी ठाम सांगू शकत नाही. पण शक्यतेची दारे खुली झाली (हे तर नक्की ?). बाकी ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कधी उघड झाल्या?

चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 15:28 नवीन
बाकी हिंदू संघटनांच्या दहशतवादी कारवाया आपल्या येथे आत्ता उघडकीस आल्या असतील कधी उघड झाल्या? निकाल लागला का मालेगाव केस चा? अजून त्या खटल्याचे कामकाज निट चालत नाही. कारण काय? सज्जड पुरावे आहेत ना तपास यंत्रणांकडे. मग अडचण काय आहे? एकदा दोषी ठरवा आणि अशी वाक्य लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कधी उघड झाल्या?

चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 15:28 नवीन
बाकी हिंदू संघटनांच्या दहशतवादी कारवाया आपल्या येथे आत्ता उघडकीस आल्या असतील कधी उघड झाल्या? निकाल लागला का मालेगाव केस चा? अजून त्या खटल्याचे कामकाज निट चालत नाही. कारण काय? सज्जड पुरावे आहेत ना तपास यंत्रणांकडे. मग अडचण काय आहे? एकदा दोषी ठरवा आणि अशी वाक्य लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आयला CIA लईच भारी दिसतय!

रन्गराव
Sat, 12/18/2010 - 16:17 नवीन
आयला CIA लईच भारी दिसतय! म्हणजे इथ बोंबलायाला आमच्या पोलिसांना नाय माहित आणि त्यांना माहिती पन झालं. आयला आजपसन मिपावर जरा सांभाळून रावा र पोरानू. नाय तर CIA, FBI, NSI आन ISI सगळे कुत्र्यासारख माग लागतील. संपादक मंड्ळात पन एक दोन CIA वाली घुसल्यात अस ऐकून हाय आम्ही ( संपादक मंड्ळाने ह. घेने) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>परदेशी लोक आपण

गांधीवादी
Sat, 12/18/2010 - 16:33 नवीन
>>परदेशी लोक आपण लिहिल्याप्रमाणे "रस्तोरस्ती हिंदू खून पाडत आहेत" वगैरे असा का घेतील? .................डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते. आपण एक प्रश्न विचारलात, आणि त्याचे उत्तर देखील आपणच देऊन टाकले. परदेशी लोकं (विशेष करून पाकिस्तानी) यांनी तर डोळ्यावर भारत द्वेषाचा चष्मा चढविलेला आहे, हे तर जगजाहीरच आहे. उद्या (देव न करो) अजून एखादा (पलीकडून) अतिरेकी हल्ला झाला आणि त्याबद्दल आपण पाकिस्तानला जाब विचारायला गेलो तर ते राहुल गांधीच्या 'या' विधानाची नक्कीच आठवण करून दिल्या शिवाय राहणार नाहीत. उलट उत्तर देतील कि 'पहिले तुमचे सावरा, मग आमच्याकडे बोट दाखवा'. शेवटी डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते. तसे त्यांनाही भारतात भलतेसलते दिसू लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

परदेशी लोकं (विशेष करून

अनामिका
Sun, 12/19/2010 - 11:46 नवीन
परदेशी लोकं (विशेष करून पाकिस्तानी) यांनी तर डोळ्यावर भारत द्वेषाचा चष्मा चढविलेला आहे, सहमत्.....पाकिस्तान्यांनी तर त्यांच्या नुकत्याच जन्माला आलेल्या पिढीला देखिल हेच विषमृत पाजलय ज्याचा अनुभव परवाच घेतलाय....अनुभव कथन लवकरच करेन.... केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान देणार्‍या इतक्या जुन्या पक्षाचे झालेले वैचारिक अधःपतन पाहून त्यांचे इहलोकी गेलेले नेते सुद्धा अशृ ढाळत असतील...... असल्या उथळ व्यक्तीला भावी युवराज म्हणुन पुढे आणणे हास्यास्पद तर आहेच पण हिंदुस्थानात केवळ राहुल गांधी एकदम हिरो सारखा दिसतो म्हणुन पंतप्रधानपदी असावा असे मत व्यक्त करणारे तथाकथित उच्चविद्याविभुषित व्यक्ती माझ्या माहितीत आहेत अशा लोकांच्या बुद्धीची किव करावी तितकी कमीच.... जय हिंद! जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते

सुधीर काळे
Tue, 12/21/2010 - 08:28 नवीन
डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते. आणि ढापणे चढवली कीं कांहींच दिसत नाहीं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का?

चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 16:38 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे आपण शीर्षकात जे वाक्य लिहिले आहे तेच मी वाचले आहे. पण लेखात मात्र तुम्ही ते "केवळ हिंदू दहशतवाद्यांकडून" असे बदलून लिहिले आहे. वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का? निळ्या अक्षरातील जोडणीवर टिचकी मारा. बातमीत शिर्षकात म्हणलेलेच वाक्य आहे. तेच गांधीवादींनी लिहीले आहे. . खाली सौम्य शब्दात लिहीले ही मात्र त्यांची चूक आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चिंतामणी कधी कळणार तुम्हाला

रन्गराव
Sat, 12/18/2010 - 16:49 नवीन
चिंतामणी कधी कळणार तुम्हाला -खेळ चालू झाल्या झाल्या हुकमी एक्का काढायचा नसतो. आता कुठ रंगात यायला सुरुवात झाली होती. कुणीही न बोलावता स्वतःच येवून आधी खेळ फालतू आहे म्हणणे. मग भाव खावून खेळायला तयार होने आणि खेळाचे एक मात्र चँपियन असल्याप्रमाणे खेळी. किती छान योजना आखली होती. पानी ओतलस त्यावर. कुठ फेडाल ही पापं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

लक्षात आलेले दिसत नाहीं साहेबांच्या!

सुधीर काळे
Tue, 12/21/2010 - 08:47 नवीन
चिंतामणीसाहेब, गंमत म्हणजे या बातमीबरोबर 'सकाळ'ने जे छायाचित्र छापले आहे त्यात राहुलजींनी चक्क 'उभे' गंध किंवा कुंकू लावले आहे! हे कसे काय बॉ? लक्षात आलेले दिसत नाहीं साहेबांच्या! पण या लेखाखाली आमच्या-तुमच्यासारख्यांचे जे प्रतिसाद आलेले आहेत ते खूपच वाचनीय आहेत. त्यातले कांहीं निवडक प्रतिसाद खाली देत आहे. आक्रस्ताळे प्रतिसाद मी निवडलेले नाहींत. हे पोर हिंदुना दहशतवादी समजते ह्याचात आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे? आजोबा, आई, हे काही भारतीय न्हवेत, आणि एकंदर कुटुंबातील वातावरण काही पारंपारिक नाही. पण लाजिरवाणी गोष्ट म्हणजे इतर काँग्रेसवाले ह्या अडाणी पोराला डोक्यावर घेउन नाचतात काय त्याचे जोडे उराशी घेउन कवटाळतात काय. On 18/12/2010 12:27 PM ravijambhulkar said: एकच विनंती आहे हिंदू आणि मुस्लीम बांधवांना कि तुम्ही आपापसात गोड राहा हे नालायक राजकारणीच आपल्यात भांडणे लावत असतात. ओ तमाशा पाहत राहतात On 18-12-2010 09:44 AM eknath said: अरे वाचवा रे ह्या देशाला नाहीतर या italian राजपुत्रासारखे नेतृत्व या देशाला खड्ड्यात घालेल ......यांना हिंदू संस्कृती ची जाण नाही आहे, जाणून बुजून विदेशी पोरग ते ............ खरच राहुल ला हिंदू संस्कृती जाणून घेण्याची गरज आहे .........हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना पोसून ह्यांना हिंदू दहशत वादी दिसताहेत ....खरच हे पाकिस्तान चे प्रेसिडेंट शोभतील ............. राजपुत्र वेडा वाया गेला, मुसलमानाचे आणि इतर धर्मिन्चे लाड करता करता स्वताच धर्म विसरला, त्यांना आपला धर्म तरी माहित आहे का? On 18/12/2010 09:26 AM sunil modak said: कुमार राहुल, आपल्या ह्या शोधाबद्दल आपल्याला नोबेल पारितोषिकच मिळायला हवे. खरच आपले ज्ञान , आपला अभ्यास, आपले चिंतन, आपली विचारसरणी हि अजोड आहे. एव्हड्या लहान वयात संपूर्ण देश पालथा घालून आणि तुफान अभ्यास करून आपण हि ज्ञान संपत्ती मिळवलीत त्याबद्दल आपले अभिनंदन. आम्हाला आपले उगाच वाटायचं कि शिवाजी, टिळक, सावरकर, आगरकर, सुभाषबाबू, नेताजी पालकर, भगत सिंघ, महात्मा गांधी, शाहू महाराज, वल्लभ भाई पटेल आणि अन्य अने तत्सम माणसे हि ह्या देशातील मोठी माणसे होऊन गेली म्हणून..... On 18/12/2010 09:04 AM avinash said: खर तर राहुल गांधीनी असे वारंवार बोलण्याची गरज आहे त्याशिवाय भारतीय जनता त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारेल असे वाटत नाही. त्यांना दिग्विजयसिंगांची शिकवणी चालूच ठेवा. लोकांची स्मरणशक्ती नसतेच त्यामुळे ते नक्कीच पंतप्रधान बनतील. आणि हो सोनिया बाईनी दुटपी बोलण्याचा हे धोरण राहुल ला चांगले शिकवले आहे. राहुल गांधी भावी पंतप्रधान्की जय हो.. On 18/12/2010 08:21 AM indian indian said: राहुल सारखे लोक देशाला विबक्त कराचे काम करतात .पण जर जे बिहारात झाले ते आता महाराष्ट्रात होणार सर्व देशात होणार जातीय राजकारण करणारांना आता घरी बसावे लागणार आहे कारण लोक आता काम पाहतात जात नाही जो काम करेल तोच राहील On 18/12/2010 07:25 AM vivek said: कुठल्या हिंदू दहशतवादाच्या गोष्टी करतोय हा. स्वताचे सरकार, CBI, कोर्ट असूनही एकही माणसाला मुद्देमालासकट पकडायचे सोडा पण मुद्दामून गोवूहि शकलेले नाहीयेत. सहिष्णुता आमच्या धर्माचा पाया आहे. दहशतवाद सोडा, वाईट संगतीत नुसते दिसलो तरी घरी कान्फाडून काढतील. धर्माची रचनाच पहा -प्रत्येकाला आपापल्या नुसार परामेश्वराची भक्ती करण्याची साधने आणि मार्ग उपलब्ध आहेत. कट्टर होण्याचा इथे संबंधाच नाहीये. राहुल गांधी सडक्या मेंदूचा आहे, उगाच शांतीप्रिय निधर्मी हिंदूंना बदनाम करतोय भिकारडा. नपुसक कॉंग्रेस असलेच आहे पण बिहारमध्ये xx मार खाऊनसुद्धा राहुलजींना अक्कल आलेली दिसत नाहीं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

सहमत

विकि
Sat, 12/18/2010 - 17:36 नवीन
थत्ते काकांनी लिहीलेल्या लेखाची चांगलीच थट्टा उडवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मी कुठे लेख लिहिला आहे? तो तर

नितिन थत्ते
Tue, 12/21/2010 - 10:06 नवीन
मी कुठे लेख लिहिला आहे? तो तर स्यूडोगांधीवादींनी लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि

कृपया संपादकांनी याची नोंद

गांधीवादी
Tue, 12/21/2010 - 10:51 नवीन
>>स्यूडोगांधीवादींनी लिहिला आहे. कृपया संपादकांनी याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुम्ही हिंदू असल्याने संपादक

अवलिया
Tue, 12/21/2010 - 15:46 नवीन
तुम्ही हिंदू असल्याने संपादक दखल घेतीलच असे नाही... भलत्या अपेक्षा ठेवु नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

तुम्ही हिंदू असल्याने संपादक

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/21/2010 - 15:57 नवीन
तुम्ही हिंदू असल्याने संपादक दखल घेतीलच असे नाही... भलत्या अपेक्षा ठेवु नका
मला हा प्रतिसाद धार्मिक विद्वेष पसरवणार वाटतो आहे. संपादक दखल घेतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तुम्हाला काय वाटते यावर

अवलिया
Tue, 12/21/2010 - 15:59 नवीन
तुम्हाला काय वाटते यावर संपादकांचे काम अवलंबुन नसते. संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुम्हाला काय वाटते यावर

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/21/2010 - 16:03 नवीन
तुम्हाला काय वाटते यावर संपादकांचे काम अवलंबुन नसते.
आम्ही गुडबुकातले आहोत. पुढे ?
संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे.
हेच काहीसे आमचे देखील मत असून आम्ही आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेतच. मात्र तुम्ही ह्या लेखाचे शिर्षक कसे योग्य आहे हे आपल्या कृतीतुन दाखवत आहात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>आम्ही गुडबुकातले आहोत.

अवलिया
Tue, 12/21/2010 - 16:06 नवीन
>>>आम्ही गुडबुकातले आहोत. पुढे ? पुलीस के साथ न दोस्ती अच्छी न दुश्मनी... -- देवानंद (जॉनी मेरा नाम) >>>>संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे. >>हेच काहीसे आमचे देखील मत असून आम्ही आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेतच. अभिनंदन... ! >>>मात्र तुम्ही ह्या लेखाचे शिर्षक कसे योग्य आहे हे आपल्या कृतीतुन दाखवत आहात असे वाटते. हॅ हॅ हॅ .... कस्चं कस्चं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

संपादकांन व्यनी करून आत्ता तर

गांधीवादी
Wed, 12/22/2010 - 06:35 नवीन
संपादकांन व्यनी करून आत्ता तर कुठे १२ तास झालेले आहेत, बघूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

All the best.

चिंतामणी
Wed, 12/22/2010 - 08:35 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

पण सगळेच हिंदी काही दहशतवादी

स्पा
Sat, 12/18/2010 - 13:53 नवीन
पण सगळेच हिंदी काही दहशतवादी नसतात आणि हे जगाच्या कानात ठणकावून सांगण्यासाठी आम्ही एक सिनेमा निर्मिती करण्याचे योजिले आहे. सिनेमाचे नाव असेल : my name is kulkarni* & I am not a terrorist. परा कडून चित्रपटाचे परीक्षण वाचायला आवडेल :)
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो..

योगी९००
Sat, 12/18/2010 - 13:58 नवीन
मा. राहूल गांधी (इथे मा. म्हणजे माननिय असे ही आपण समजू शकता), यांनी काहीच वेगळे बोलले नाही. फक्त वोट बॅकेसाठी त्यांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी असले विधान केले आहे. पण आपले भारतिय सुक्षिशित मुस्लिम बांधव हा त्याचा कावा समजूनच घेतीलच..
  • Log in or register to post comments

मला नाही वाटत. कारण ते

अवलिया
Sat, 12/18/2010 - 14:02 नवीन
मला नाही वाटत. कारण ते कुठल्या निवडणुक रॅलीमधे बोलत नव्हते तर एका देशाच्या राजदूताशी बोलत होते. म्हणजेच जर ते वाक्य विकिलिक्सतर्फे जाहिर झाले नसते तर ते नक्की काय बोलले हे जाहिर झाले नसते. जाहिर न होण्यासारख्या संभाषणातुन तथाकथित व्होटबॅंकेसाठी असे बोलले हा संशय फायदा कसा देता येईल? म्हणजेच ते त्यांच्या मनातलेच वाक्य असुन त्यात त्यांची हिंदूविरोधी भुमिका पुरेसी स्पष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

+१. कडक प्रतिसाद.

बबलु
Sat, 12/18/2010 - 14:04 नवीन
+१. कडक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+२

स्पा
Sat, 12/18/2010 - 14:05 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१

शिल्पा ब
Sat, 12/18/2010 - 14:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

करू द्यात हो असली स्टेटमेंटस

चिंतामणी
Sat, 12/18/2010 - 14:53 नवीन
फक्त वोट बॅकेसाठी त्यांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी असले विधान केले आहे. करू द्यात हो असली स्टेटमेंटस. बिहार निवडणुकीच्या वेळी राज ठाकर आणि इतर मराठी नेत्यांवर चिखलफेक केली. रा.स्व.संघाची तुलना सिमीशी केली. रेल्वेतुन बिहार ते मुंबई प्रवसाचा स्टंट केला. निकाल काय लागला माहीत आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

निषेध

क्लिंटन
Sat, 12/18/2010 - 14:11 नवीन
भारताला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवाद्यांकडून धोका जास्त आहे या खासदार आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस (युवराज किंवा भावी पंतप्रधान नव्हे) राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध. मूळ लेखात लिहिलेल्या इतर गोष्टी (सहा कलमी आवाहन आणि चित्रपटनिर्मिती) कोणतेही भाष्य करण्यासारख्या आहेत असे वाटत नाही तेव्हा त्यावर काही लिहित नाही. क्लिंटन
  • Log in or register to post comments

>>भारताला लष्कर-ए-तोयबापेक्षा

गांधीवादी
Sat, 12/18/2010 - 15:11 नवीन
>>भारताला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवाद्यांकडून धोका जास्त आहे या खासदार आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस (युवराज किंवा भावी पंतप्रधान नव्हे) राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध. अपेक्षित होते. >>मूळ लेखात लिहिलेल्या इतर गोष्टी (सहा कलमी आवाहन आणि चित्रपटनिर्मिती) कोणतेही भाष्य करण्यासारख्या आहेत असे वाटत नाही तेव्हा त्यावर काही लिहित नाही. आपल्याला माझे उपाय पटलेले नाहीत असे मानतो, मग ह्या लष्करे-तोयबा पेक्षा घातक असलेल्या हिंदू दशतावाद्यांना आळा घालण्याचा आपणच काहीतरी उपाय सुचवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

विषय

तिमा
Sun, 12/19/2010 - 11:10 नवीन
विषय महत्वाचा पण थिल्लरपणे हाताळलेला असल्यामुळे प्रतिसाद नाही. इथे चर्चा कशाला करत बसता, पुढच्या निवडणुकीला याचे उत्तर काँग्रेसला मिळणारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

सहमत! आता एकदाच पण कायमचे

अनामिका
Sun, 12/19/2010 - 11:38 नवीन
सहमत! आता एकदाच पण कायमचे लक्षात राहिल असे सणसणीत उत्तर देण्याची वेळ आलीच आहे. आणि एकगठ्ठा मतदान करुन काँग्रेसला व बगलबच्च्यांना त्यांची खरी जागा दाखवून द्यायलाच हवी...."अती झाल आणि हसु आल 'म्हणायची वेळ आणली आहे या मुर्खांनी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

>>आणि एकगठ्ठा मतदान करुन ****

गांधीवादी
Sun, 12/19/2010 - 18:01 नवीन
>>आणि एकगठ्ठा मतदान करुन **** व ******* त्यांची खरी जागा दाखवून द्यायलाच हवी.... सहमत. इतरत्र गुजराथ आणि बिहार येथे जसे कोन्ग्रेसच्या विरोधात जनतेला एक सक्षम पर्याय मिळाला, त्याचप्रमाणे इथे महाराष्ट्रात कोण असू शकेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

खर पाहता या प्रश्नाचे उत्तर

अनामिका
Sun, 12/19/2010 - 18:23 नवीन
खर पाहता या प्रश्नाचे उत्तर मी देखिल शोधायचा प्रयत्न करते आहे....विरोधीपक्ष म्हणून जी काही बांधलेली मोट सध्या उपलब्ध आहे त्यांच्यात स्वतःत देखिल एकवाक्यता नाही आणि एका पक्षा पासून फारकत घेवून वेगळी चुल मांडलेला दुसरा पक्ष अजून तरी बाल्यावस्थेत आहे व हे सगळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडया करण्यात धन्यता मानत आहेत....पण काँग्रेसला व त्याचेच प्रतिबिंब असलेल्या राष्ट्रवादीला पर्याय शोधायचाच झाला तर या समोर असलेल्या ३ पर्यायांमधूनच शोधावा लागेल्....बाहेरुन आयात तर कुणाला करता येणे शक्य नाही.....पण जर जनता जागरुक आहे हे लक्षात आले तर याच पर्यायांमधिल एखादा पर्याय महाराष्ट्राला एक सक्षम राज्यकर्ता व उत्तम शासक व शासन देऊ शकेल याची खात्री आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

म्हणजे

प्रदीप
Sun, 12/19/2010 - 18:36 नवीन
थोडक्यात असा पर्याय सध्या उपलब्ध नाही, इतकाच तो ह्या गोलमाल उत्तराचा मतितार्थ आहे. इतरस्त्र ह्याच धाग्यावर तुम्ही लिहीलेतः
केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....
निवडणूकांचा प्रश्न उमस्थित होतोच कसा हे समजले नाही. की १. (अ) अमेरीकन एम्बसीच्या पदाधिकार्‍याकडे जे काही बोलले जाईल ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर फुटेल अशी राहूल गांधींना शंका/खात्री होती (कॉन्स्पिरसी थेयरी) म्हणून (ब) निवडणूकांवर डोळा ठेऊन राहून गांधीने ते मूर्ख विधान केले असे तुम्हाला म्हणायचे आहे; किंवा २. राजकीय नेते जसे पुढला मागला कसलाही विचार न करता नुसती बेफाट वक्तव्ये करतात तसे तुम्ही येथे केले आहे (कोण जाणे तुम्हीही राजकीय नेत्या आहात किंवा त्या मार्गावर आहात?) ह्यांपैकी नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

श्री प्रदिप जय

अनामिका
Sun, 12/19/2010 - 19:55 नवीन
श्री प्रदिप जय महाराष्ट्र! बरोबरच आहे तुमच.... "केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली ". इथे थोडा मागचा संदर्भ देण्याची तसदी मी घ्यायला हवी होती...पण अंमळ माझच चुकल्.... येत्या काहि दिवसात अथवा महिन्यात तामिळनाडु ,पश्चिम बंगाल,या राज्यांमधे तर उत्तरप्रदेश सारखे मुस्लिममतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यात २०१२ला विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत्..या सगळ्यावर नजर ठेवूनच काँग्रेसने येऊ घातलेल्या निवडणु़कीत मुस्लिम मतदारांना खुष करण्यासाठी हि विखारी मोहिम फार आधी पासुन राबवली असावी...( नव्हे आहेच) याआधी देखिल राहुलने अश्या प्रकारची उथळ व बिनबुडाची विधाने केली आहेतच उदा: सिमी व संघ यांना एकाच पारड्यात तोलणे .....व अश्याच प्रकारची इतर अवास्तव विधाने राहुल यांच्या सुमार बुद्धीची चुणूकच दाखवतात..दिगविजयसिंग व चिदंबरम यांचे भगवा दहशतवाद या अनुशंगाने आलेले बेफाम वक्तव्य हा काँग्रेसच्या एका राजकिय षडयंत्राचाच भाग आहे.विकिलिक्स मार्फत झालेल्या एका खुलाश्यात काँग्रेसने २६/११चे देखिल राजकारणच केले आणि प्रसंगी काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी धर्माचे हिन राजकारण करत कुठल्याही थराला जाऊ शकते "हे सत्य देखिल बाहेर आले आहेच....राहुलच्या विधानाचा विकिलिक्सने केलेला खुलासा हा एक कर्मधर्म संयोग आहे इतकच.... ज्या प्रकारे सध्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत ते पाहता उद्या मध्यावधी निवडणु़का जाहिर झाल्याच तर नवल नक्कीच वाटणार नाही.....आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर सध्या महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या राज्यात ज्या प्रकारे भ्रष्टाचार बोकाळलाय ते पाहता बदल आवश्यक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ..आणि गांधीवादी यांनी पर्याय काय असेल ?असा प्रश्न विचारला म्हणुन केवळ मी असलेल्या पर्यांयांमधूनच तो निवडावा लागेल असे मत दिले...... अवांतर-आजच्या काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल विकिलिक्सने केलेल्या खुलाश्या बद्दल स्पष्टिकरण देणार असा होरा होता .पण सोयिस्कर रित्या मुख्य मुद्द्याला बगल देण्यात आली...बाकीचे प्रवचन खरे तर काँग्रेसने जनतेला देण्याची गरज नक्कीच नाही... काँग्रेसच्या करणी आणि कथनी मधे याआधी देखिल कधीच ताळमेळ नव्ह्ता आणि यापुढे देखिल असेल अशी अपेक्षा निदान माझी तरी नक्कीच नाही....आणि (कॉन्स्पिरसी थेयरी)बद्दलची शंका काँग्रेसजनांनाच होती मला असण्याचे कारण नाही...... आणि मी कुठ्ल्याही पक्षाची नेती वगैरे नक्कीच नाही. आणि तत्सम कुठल्या मार्गावरही नाही.............. ह्म्म! एका पक्षाची विचारसरणी अंगिकारते हे मात्र नक्की.....कारण गुलामगीरीचे जोखड मानेवर बाळगत ,गांधी घराण्याला जणू हा देश आंदण दिलाय आणि त्यांच्या शिवाय हिंदुस्थानाचे तारणकर्ते कुणी दुसरे राज्यकर्ते असू शकत नाही अश्या प्रकारची मानसिकता माझी नाही... जय हिंद! जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

प्रदीप काका

विकि
Tue, 12/21/2010 - 01:10 नवीन
मी तुमच्याशी सहमत आहे, मुळात तुम्ही ज्यांना हा प्रतिसाद लिहीला आहे त्यांनी राहूल गांधी द्वेषातून अगदी बाळबोध लिहीले आहे. त्या लेखिकेने असे लिहीले आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि राहूल गांधी काही कडव्या हिंदूना दहशतवादी म्हणाला म्हणजे मुस्लीम खूश होतील. असे लेखिकेने लिहीणे म्हणजे तिचे मुसलमान समुदायावर संशय घेणे असाच होत आहे. हे विधान राहूल वैयक्तिक किंवा राजकारणाने प्रेरीत असेलही पण त्याच्या विधानाने एखादा समाज आनंदीत होईल असे म्हणणे चुकिचे आहे. आणि कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे., आजवर त्यांना अनेकदा हरवण्याचे प्रयत्न झाले पण काही वर्षे सोडली तर तेच सत्तेत आहेत आणि यापुढे ही असणार. लोकांना काँग्रेसची सवय झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

+/-

नितिन थत्ते
Tue, 12/21/2010 - 07:41 नवीन
>>कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे., असहमत. त्यांना हरवायला जमत नाही हे बरोबर पण पर्याय नाही हे बरोबर नाही. गांधी द्वेषातून बाळबोध लिहिले आहे हेही बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि

मी नुसता राहुल गांधीच नव्हे

अनामिका
Tue, 12/21/2010 - 17:37 नवीन
"मी तुमच्याशी सहमत आहे, मुळात तुम्ही ज्यांना हा प्रतिसाद लिहीला आहे त्यांनी राहूल गांधी द्वेषातून अगदी बाळबोध लिहीले आहे." बरोबर आहे विकीराव मी नुसता राहुल गांधीच नव्हे संपुर्ण काँग्रेसपक्षाचा व त्यांच्या बकवास विचारसरणीचा द्वेष करते...आणि हे मी जाहिर पणे मान्य करते ...का काही हरकत आहे का तुमची? "त्या लेखिकेने असे लिहीले आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि राहूल गांधी काही कडव्या हिंदूना दहशतवादी म्हणाला म्हणजे मुस्लीम खूश होतील. असे लेखिकेने लिहीणे म्हणजे तिचे मुसलमान समुदायावर संशय घेणे असाच होत आहे. हे विधान राहूल वैयक्तिक किंवा राजकारणाने प्रेरीत असेलही पण त्याच्या विधानाने एखादा समाज आनंदीत होईल असे म्हणणे चुकिचे आहे." सुतावरुन स्वर्ग गाठण्याची खोड काही जात नाही काही माणसांची ....समस्त मुस्लिम समुदायावर संशय घेण्याची मानसिकता तुमची असु शकेल माझी असण्याचे कारण नाही......आणि मुख्य म्हणजे सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसपक्षाने मुस्लिम समुदायाचा निव्वळ स्वार्थासाठी वापरच केला आजतागायत हे सत्य आता त्या समाजाला देखिल कळून चुकलेय आणि त्याचा प्रत्यय गुजराथ,बिहारात काँग्रेसच्या झालेल्या पानीपता वरुन येतोच आहे...पुढे पण येईलच " आणि कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे., आजवर त्यांना अनेकदा हरवण्याचे प्रयत्न झाले पण काही वर्षे सोडली तर तेच सत्तेत आहेत आणि यापुढे ही असणार. लोकांना काँग्रेसची सवय झाली आहे" आजपर्यंत तुंम्हाला डाव्या विचारसरणीचे अर्थात कम्युनिस्ट समजत होते पण तुंम्ही देखिल शेवटी काँग्रेसची विचारसरणी मान्य केलीत ते बघुन अतिव दु:ख झाले. आता कम्युनिस्टांचे कसे होणार? ५७ वर्षे देशावर राज्य करुन ज्या घराण्याने या देशाला भ्रष्टाचाराची किड लावली आणि त्याच अनैतिक मार्गाने स्वत्:च्या व स्वपक्षाच्या तुंबड्या भरत हिंदुस्थानातील जनतेची लुट करत अब्जोकोटि रुपये गोळा केलेत .त्याच काळ्या पैशाच्या वापरातून निवडणूकांमधे झोपडपट्ट्यांमधून अशिक्षित व गरिब मतदारांना पैसा वाटून सत्तेत येण्याचा खेळ करणार्‍या घराण्याला हरवता येणे कुणालाच शक्य नाही....१२५ वर्षात केलेली लुट नक्कॉच मोजदाद करता येण्यासारखी नसेल नाही का?....बाकी पक्षांनी त्यांच्याच कडून धडे घेतलेत म्हणजे आज देशात ज्या काही समस्या निर्माण झाल्यात त्याला सर्वार्थाने काँग्रेसपक्षच जबाबदार आहे नाही का? पण तरिही आताची परिस्थिती पुर्वी सारखी नाही तेंव्हा लवकरच जनताच आता त्यांना घरी बसवेल......इतक लक्षात ठेवा....आणि काँग्रेसची सवय लोकांना नाही झाली पण तुंम्हास जरुर झाली आहे हे मात्र खरे...उगीच सगळ्यांना त्या मुर्ख राहूल सारख एका तागड्यात तोलू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि

मी काहीच बोललो नाही

विकि
Wed, 12/22/2010 - 00:17 नवीन
मुस्लिम मतदारांना खुष करण्यासाठी हि विखारी मोहिम फार आधी पासुन राबवली असावी...( नव्हे आहेच), हे वाक्य अनामिकाताईंनी लिहीले आहे. या ताईंनी लिहीलेल्या वाक्याचा काय अर्थ निघू शकतो तेच मी मांडले आहे.त्यांनी शेवटी "नव्हे आहेच " हे वाक्य अतिशय ठामपणे मांडले आहे. केवळ राहूल गांधींच्या बोलण्याने मुस्लीम समुदाय खुष होतील ही थिअरी कोणाची आहे, ताईं तुमचीच ना. असे असते तर नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (तुम्ही ते वर लिहीलेच आहेत पण ते कसे हे पटवून सांगत आहे) काँग्रेस सत्तेत आलीच असती,बिहार मधून तर काँग्रेस केव्हाच हद्दपार झाली आहे. कारण आताचा सत्ताधारी पक्ष लोकांपर्यंत पोहचला आहे,पण मला ताईंनी केलेल्या मुस्लीम द्वेषाबाबत तिव्र दुखः झाले. कारण केवळ माणूस म्हणून जगावे हे तत्व आम्ही स्विकारले आहे. एक लक्षात घ्या राजकारणात डावपेच हे करावेच लागतात. त्या शिवाय सत्ते येणे मुश्कील .शेवटी अंतिम उद्दीष्ट सत्ता . आणि परिवर्तन करायचे असेल तर त्याबाबत लोकांनी जागरूक राहीले पाहीजे. आणि लोक जे होतय ते पाहत राहीले म्हणूनच सत्ताधार्‍यांचे (यात विरोधकही आले) फावले. ते मालामाल झाले. अजून एक बुद्धीवादी मंडळी यांनी सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सामाजिक, कामगार चळवळी संपल्या आहेत. आज देशात एकतरी चळवळ गतिमान आहे का? तर नाही . मग दबावगट निर्माण होणार तरी कसे. यामुळेच सत्ताधार्‍यांवर अंकुश राहीला नाही आणि भ्रष्टाचार वाढला. देशात अगदी नगसेवकांपासून सारेच करोडपती आहेत(काही पक्ष सोडून) . आता पैसा फॅक्टर महत्वाचा आहे. जास्त पैसा जास्त मान. तुम्ही काँग्रेसचा द्वेष करता , पण का ते लिहीले नाहीत. आज जो भ्रष्टाचार बोकाळला आहे तो काही पक्ष सोडून सगळ्याच पक्षांत आहे. मग तुम्ही काँग्रेलाच का घेऊन बसलात. माझी हरकत याला आहे की तुमचा द्वेष तुम्ही पटवून दिला नाही. त्यामुळे मिपावरील थत्ते काकांसारख्या विद्वानांना वाईट वाटले असणार. केवळ द्वेष बुध्दीतून तुम्ही लिहीत सुटलात असे वाटले. आता तुम्ही विचार करा उदा. महाराष्ट्रात काँग्रेस परत एकदा सत्तेवर आली. तेव्हा सत्तेत येण्याजोगी परिस्थिती नव्हती पण विरोधी पक्ष कमजोर लोकांनी हातालाच कौल दिला. त्यानंतर लोकसभा निवडणूक विरोधक कमजोर परत संपुआ चे सरकार या गोष्टी हेच अधोरेखीत करतात की जनतेला माहीत आहे काँग्रेस शिवाय पर्याय नाही. विरोधक पण तेच करणार (अपवाद काही पक्षांचा)आहेत त्यापेक्षा हातच बरा. कारण हाताला राज्यकारभार करायचे माहीत आहे. जर विरोधक कमजोर असेल तर आपल्याला काँग्रेसला दोष देऊन फायदाच नाही. मुळात हे विरोधक लोकांमध्ये पोहचतच नाही आहेत, आणि तिथेच सत्त्ताधार्‍यांचे फावत आहे. आता तुम्ही कोणत्या विचारसरणीला जवळ करता ते मला माहीत नाही. मी काँग्रेस विचारसरणी मानली नाही , तर वस्तूस्थिती मांडली आहे. आणि ताईंनी त्याला विरोध केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

आपला प्रतिसाद आवडला

रणजित चितळे
गुरुवार, 12/23/2010 - 11:12 नवीन
अनामिका आपला सडेतोड प्रतिसाद खुप आवडला. बरीच लोक आपली मते उगाचच लपवुन ठेवतात. आपला प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका

मला

विकि
गुरुवार, 12/23/2010 - 11:22 नवीन
चितळेंचा प्रतिसाद आवडला. त्यांनी आपले मत लपवून ठेवले आणि लोकांवर घसरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

राहुल गांधीने मला तरी हे हिंदु विरोधी वक्यव्य केले असे वाटत नाही

वेताळ
Sat, 12/18/2010 - 14:12 नवीन
त्यानी हिंदु मुलतत्चवादी लोकांच्या मुळे हिंदु-मुस्लिम सहिष्णुतेला धोका आहे असे म्हटले आहे.त्यात बरेच तथ्य देखिल आहे.अमेरिकेचा मुस्लिम तिरस्कार आपल्या सारख्या सहिष्णुततावादी देशाला परवडणार नाही. कारण भारतात जवळ जवळ २० % मुस्लिम राहतात. हिंदु मुस्लिम सलोखा टिकला तर इथे दहशतवादाला थारा मिळणार नाही, हे त्याला सुचित करावयाचे होते असे मला वाटते. नाहीतर सनातनी सारख्या संस्था आपल्याच देशात सुतळी बॉम्ब फोडतच आहेत ना? मग नाकाला इतक्या मिरच्या झोंबण्याची काय गरज आहे.
  • Log in or register to post comments

वेताळ तुंम्ही

अनामिका
Sun, 12/19/2010 - 18:28 नवीन
वेताळ तुंम्ही सुद्धा?????????????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

us-embassy-cables

दिपक
Sat, 12/18/2010 - 14:21 नवीन
http://www.guardian.co.uk/world/us-embassy-cables-documents/219238
  • Log in or register to post comments

एरवी राहुल गांधी आवडला नसता

रन्गराव
Sat, 12/18/2010 - 14:59 नवीन
एरवी राहुल गांधी आवडला नसता पण आपण आजपासून फॅन त्याचे. हिंदुंमध्ये पन वेळ पडली तर हत्यार उचलायची हिंमत आहे हे मान्य केले. युवराजांनी प्रशस्तिपत्रक दिल्यावर आज जरा आत्मविश्वास वाढला! ;)
  • Log in or register to post comments

सर्वात आधी त्या लाचार प्रचार

गणपा
Sat, 12/18/2010 - 15:02 नवीन
सर्वात आधी त्या लाचार प्रचार माध्यमांरारखे त्याला 'युवराज' संबोधणे थांबवा. (भले मग ते उपरोधाने का लिहिलेल असेना.) एक वेळ त्या टीव्ही वाल्यांना तस संबोधण्यासाठी कदाचीत पैसे चारत असतील, पाण आपल्या कडुन का फुकाची प्रसिद्धी ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा