Skip to main content

नातं

लेखक शुचि यांनी गुरुवार, 16/12/2010 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
******काल्पनिक कथावस्तू/मुक्तक****** ______________________________________________________ अधून मधून आम्ही भेटत असतो. आताशा तो मला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागला आहे कारण जितक्या वेळा आम्ही भेटतो तितक्या वेळा त्याची ओळख पटते तर कधी नव्याने होते. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे की माझं काही त्याच्यापासून लपून कसं रहात नाही? त्याचे भेदक डोळे नीर्विकारपणे माझा ठाव घेतात. मिश्किल कुठला! वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता. नवर्‍याला न सांगता गुपचूप त्याला भेटायचं हे थोडं माझ्याकरता अवघडच होतं पण आम्ही जमवतो.त्याला भेटलं की, इतर वेळी शब्द शोधणारी मी, खूप गप्पा मारते, हसते. हो, तो मला हसवतोच मुळी. आणि मी हसत असले की, चष्मा नाकावर घसरवून, नाना पाटेकरसारखा डिट्टो, चष्म्याच्या वरून माझं हसणं लक्षपूर्वक पहातो. आता इतक्या वर्षानंतर माझ्या हसण्यात इतक्या बारकाईने पहाण्यासारखं त्याला काय आढळतं? पण त्याचं हेच "अटेन्शन" मला खूप आवडतं. मग मी त्याला गर्वाने विचारते "असा काय बघतोयस? कधी पाहीलं नाहीस का मला हसताना?" आणि तो म्हणतो ..... तो काही म्हणतच नाही... करतो!! वेल.... त्याच्याही अनेक आवडी आहेत अणि मुख्य म्हणजे आमच्या आवडी अगदी भिन्न आहेत. जसं त्याला मासे पाळण्याचा छंद आहे, भरभर लांबवर चालत जाण्याचाही - एकटं बरं का. त्याला वॉकला जाताना कोणी म्हणजे कोणी बरोबर चालत नाही. रोज, नियमित कितीतरी मैल रपेट करून तो येतो. माशांच्या टँकमधील पाणी वेळेत बदलणं, माशांना खाद्य घालणं, सुंदर शिंपल्यांनी टँक सजवणं हे त्याचे आवडीचे उद्योग. आमची भेट प्रथम झाली ती पुस्तकांच्या दुकानात. ब्लेस दॅट शॉप. रॅकवरील एकच पुस्तक त्याने आणि मी एकाच वेळी दोन बाजूंनी धरून खेचले. आता आठवत नाही कोणतं पुस्तक होतं ते पण "लोकल" विभागातील होते. पुस्तकाच्या निमित्ताने जी ओळख झाली ती आम्ही जोपासली. माझ्याकडून आधी अधिक पुढाकार घेतला गेला. मग पुढे सवय होत गेली. मला पहील्यांदा खूप गिल्टी वाटे पण मी पुढेपुढे निर्ढावले.असो. तो बॅचलर आहे. त्याचा निर्णय! त्याच्यामध्ये सर्व गुणच गुण आहेत असे नाही. तो एक नंबरचा हेड्स्ट्राँग आणि प्रसंगी कमालीचा सरकॅस्टीक आहे. बट इट सुट्स मी फाईन. कामाच्या वेळी तो मला बिलकुल एंटरटेन करत नाही. ह्म्म दॅट हर्ट्स. इट हर्ट्स माय इगो. पण त्याची हीच एकाग्रता सर्व बाबतीत असते, हे कौतुकास्पद आहे. त्याला त्याच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. पण मी देखील तशीच असल्याने आमचे जमते. आमची मैत्री आहे. आमच्यात आकर्षण आहेच आहे. पण शिवाय आम्ही निर्णय घेतला आहे खूष रहाण्याचा. जे मला विवाहात मिळत नाही ते या विवाहबाह्य नात्यातून मिळवण्याचा. लग्नातून फक्त शारीरीक सुखाची अपेक्षा नसते. मैत्री, साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार आदि अनेक गोष्टी अपेक्षीत असतात. हेच जर लग्नातून मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तर दुसर्‍या नात्यातून ते मिळवायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकाला लग्न उधळून देता येईलच असे नाही. सो फार सो गुड. कुढत / रडत स्वतःची प्रतारणा करत जगण्यापेक्षा मी नवर्‍याशी प्रतारणा करून जगणं स्वीकारलं आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13860
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

लेखात दाखविलेल्या अप्रामाणिक वृत्तीचे समर्थन करण्याचा हेतू कुठेही नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे. जेव्हा एखादं लग्नं टिकलेलं असतं तेव्हा कुठेतरी बारीक, रेशमी धाग्याच्या जीवावर ते तगलेलं असतं मग तो धागा मूल असो वा कधीकाळी नवर्‍याने केलेलं बायकोचं किंवा व्हाईसे व्हर्सा आजरपण असो. माझं स्पष्ट मत हे आहे की - लग्नाच्या बाहेर (शारीरीक) संबंध ठेवायचे असतील तर सरळ नवर्‍याची परवानगी घ्यावी जी की ९९% केसेस मध्ये मिळणार नाही अथवा मग घटस्फोट घेऊन काय ती स्वातंत्र्याची इच्छा पुरवावी. पण कल्पनेमध्ये आपल्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य असतं आणि वरील मुक्तक हा केवळ कल्पनाविलास च आहे. समाजात किती लोक वरील बाईप्रमाणे वागतात त्याचा मला अजीबात अंदाज नाही ना जाणून घ्यायची इच्छा. पण काल अतिशय उद्विग्न मनोवस्थेमध्ये हे मुक्तक सुचले आणि मी ते लिहून काढले. आय फेल्ट ग्रेट आफ्टर धिस!!! मी यावर विश्वास ठेवते की गर्तेत कोसळायला प्रयत्न करावे लागत नाहीत पण आपण गर्तेत कोसळू नये, आपले अधःपतन होऊ नये , मिळालेली एखादी गोष्ट टिकावी याकरता मात्र सातत्याने प्रयत्न करावे लागतात मग ते लग्न का असेना. रोपाला नख लावणं सोपं असतं पण त्याला जपणं हे कठीण काम असतं. हे गाणं या संदर्भात आठवतं - I beg your pardon, I never promised you a rose garden. Along with the sunshine, There's gotta be a little rain sometimes.

In reply to by शुचि

चांगल केलत. काहीही चुकल नाही. तुमचा कल्पनाविलास हे तुमच राज्य! संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा. you needed to vent out and u did it. तुम्हाला बरं वाटल ना, झाल मग. प्रतिक्रिया मनावर घेऊ नकात. आणि इतका बोल्ड विषय हँडल केलात तोही इतक्या सुंदररित्या त्याचच कौतुक वाटत.

In reply to by रन्गराव

संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा तुम्ही त्या लोकांना ओळखत नसताना आणि काहीही पुरावे नसताना त्यांनी सज्जनपणाचा मुखवटा चढवलाय आणि भोंदू आहेत असे बिनबुडाचे आरोप कशाला करता ? लेख कल्पनाविलासावर आहे हे सगळ्यांना माहिती आहेच, लोक प्रत्यक्षात घडणार्‍या/ घडू शकणार्‍या गोष्टींबद्दल बोलत आहेत. समजत नसेल तर विचारा आधी.

आता पुढच्या लेखात त्यानी विवाहित पुरुषानी दुसर्‍या विवाहित स्त्रीयाना कसे पटवावे ह्याबद्दल फॅण्टसी लिहावी अशी विनंती करतो.कारण अश्या लेखाची खुप आवश्यकता आहे.