✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जख्ख अशी म्हातारी !!

प — प्रकाश१११, गुरुवार, 12/16/2010 - 13:59
जख्ख अशी म्हातारी कोयत्याच्या आकारची !! कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ? हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी बुबुळावरची राखाडी रंगाची साय खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ .... किती कुणास ठाऊक ? आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत पोरेबाळे आपल्याच फिकिरीत नातवाच्या काळजीत खंगून जातात म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून कधी सुटतेय म्हातारी वाट बघत बसतात ...!! वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ... थकून जातात गात्रे नि गात्रे .... म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत तिला कधी कधी आठवत असते नवरोबांनी गर्दीत एकांत शोधीत चिमटा काढलेला त्या आठवणीनी तिच्या अंगावर उठत असतो अजूनही एक कोवळा शहारा ...!! जुन्या जुन्या आठवणी एवढाच तिचा आधार तिच्या आठवणी असतात शेतावरच्या विहिरीवर पाणी भरताना गुणगुणल्याच्या ....... केस सुद्धा झडून गेलेत तरी आंबाडा घालते आवळ्यायेवढा असला तरी कधी त्यावर वेणी माळते ,....! संध्याकाळी मारुतीच्या देवळात जाते नातवाच्या खांद्यावर हात ठेवून चल म्हणते नातवंडे संकोचतात भयंकर ...! लाज वाटते त्यांना आजीची तिने ठेवलेल्या खांद्यावरच्या हाताची .....!! संध्याकाळी जपमाळ घेऊन बसते देवाजवळ नि कुठेतरी जाते हरवून स्वप्नात तिला ठळकपणे जाणवते आपल्याच पोरांच्या नजरेतील परकेपण ती बघत बसते आतल्या मनाने देवाचे घर ...!! तिची झालीय तयारी माहेरी जाण्याची ती त्याच स्वप्नात जाते हरवून नि डोळे घेते मिटून त्याच्या बोलावण्याची वाट पाहत ताटकळत कोंबडा देईल कधी बांग ? त्याची कधी होईल पहाट कुणास ठाऊक.... ??

प्रतिक्रिया द्या
1609 वाचन

💬 प्रतिसाद (6)

सुरेख!

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/16/2010 - 14:01 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

कविता डोळ्यासमोर चित्र उभे

गणेशा
गुरुवार, 12/16/2010 - 14:07 नवीन
कविता डोळ्यासमोर चित्र उभे करते आहे ... म्हतारी .. तीचे मन .. तीच्याबद्दलचे परकेपण पाहुन मन खिन्न होते ...
  • Log in or register to post comments

कविता आवडली. मला

अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 14:11 नवीन
कविता आवडली. मला दिर्घायुष्याचा शाप न मिळो अशी देवाजवळ प्रार्थना
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 12/16/2010 - 14:17 नवीन
मस्त कविता! आवडली.
  • Log in or register to post comments

सोडव रे आता... ,किती वाट

मदनबाण
गुरुवार, 12/16/2010 - 14:28 नवीन
सोडव रे आता... ,किती वाट बघतो आहेस ? ,का परि़क्षा घेतो आहेस ? असेच काहीसे शब्द या वॄद्ध लोकांच्या तोंडातुन निघताना ऐकाला मिळतात... :( असो... आपल्या कविता वाचनीय असतात.
  • Log in or register to post comments

+१

राघव
Sun, 12/19/2010 - 02:25 नवीन
असेच म्हणतो. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा