Skip to main content

प्रवास मी एकटीच करते... (गीत)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... गुलाम जीवन खितपत मळले नाव माझी धारेत डळमळे कुठली नाही दिशाच ठावी गांव कोठले मला न कळले भाव भावनांचा बाजारी एकटीच मी दारोदारी विरक्त जीवन ईश्वर कोठे भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... - शब्दमेघ ... (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन ) हेल्प: चाल येथे सांगता येत नाहिये , तरीही राग थोडासा "दयाघना" गाण्यात वापरला आहे तसा आहे. रागाचे काही कळत नाही मला, पण मित्राने बंदिश गाताना तसे सांगितले म्हणुन ..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1314
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... छान नि छान लय. आवडली.!!