चोरटा मुरारी - गौळण
चोरटा मुरारी - गौळण
शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
सांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥
शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥
यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
पकडाया जाता, होतो फ़रारी
चव हा चाखी, ओठ हा माखी
टांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥
व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥३॥
गंगाधर मुटे
............................................................
१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण
...........................................................
वा! मस्तच!
मस्तच वाटले गीत गायला .. आताच
सुंदर आहे गवळण! खिडकी हा
धन्यवाद
निषेध
घ्या उठाव.
गंगाधर सायेब दिलपे मत लेयो.
मागच्या ही गौळणीत ' अरविंद'
धन्यवाद.
गौळण छानच! पण द्वारकेचा
खरेय