कोणी विषयाला धरुन का प्रतिसाद देत नाहीये ?
नान्याचा एक reply सुद्धा subject ला धरुन नसतो. हो आता तुम्ही तुमचे कसले ते आंदोलन करत असाल तर ...
- पर्ल हार्बर
थंडीच्या दिवसातल्या काही आठवणी, त्यातल्या त्यात पुण्याच्या गुलाबी थंडीतल्या !!
हॉटेलात असताना,शिवाजीनगर ला बारा-एक वाजता कामावरुन परतलो की होळकर ब्रिजवरुन घरी न जाता मुद्दामुन स्टेशनला जायच.सायकल थेट स्टेशनच्या मागल्या बाजुला असलेल्या पुलाखाली. लिंबाच्या झाडाखाली, अण्णाच्या काळवंडलेल्या टपरीसमोर वाफाळलेल्या चहाचा पहिला घोट घेताना मस्त फील यायचा. वर एक छोटी फोर-स्केयर !!
सकाळच्या शिफ्टला असताना शाळेत चाललेले,रंगबेरंगी स्वेटर्स घातलेल्या टिन-एजर पोर-पोरी, लहान-लहान मुले आजही आठवतात.पहाट मार्गी लागल्यासारखी वाटायची. कॉलेजचा तर रंगच गुलाबी असायचा.
पुढे 'माझी बेवडेबाजी' च्या पहिल्या पर्वात असाच डि-मेलो किंवा अश्विनीवर जायचा योग यायचा. संध्याकाळच्या गारव्यात रम,गम आणि हम मध्ये वेळेचा थांगपत्ता लागायचा नाही . गाडी चालविताना हाताची बोटे देखील गारवठायची. पण त्यातही मजा वाटायची.
आजही मला थंडी वाजते,पण ती एसीची. त्यात काय मजा !
बंगलोरात काल बर्फ पडला, पण आम्ही होतो आमच्या खुराड्यात (पुण्यात असतो तर गाडीला किक मारली असती अन...)
लेख मस्त झालाय. शाळेच्या दिवसातल्या आणि विशेषकरून इंजिनियरिंगच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या.
ते एम. सी. सी. चे फॅड आमच्याकडे पण होतं. रविवारची सकाळची मस्त साखरझोप सोडून शाळेत जायचो चरफडत...
आणि इंजिनियरिंगच्या डिसेंबरातल्या परीक्षा तर पुण्याच्या थंडीत स्वेटर घालून, दुलई पांघरून आणि चहा पिताना झोप काढत अभ्यास करून दिल्या आहेत :)
-------------------------------------------------
अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!!
काय सांगताय काय? मला कसं नाही कळलं ते? कुठल्या भागात?
म्हणा आम्ही पण खुराड्यातच होतो, त्यामुळे नसेल लक्षात आलं.
हो मंग !! आपले सुहास.. राव रात्रीच्या पार्टीसाठी सायकल वरुन बर्फ घेऊन चालले होते , स्पिडब्रेकर वरुन पडले .. तसा बर्फ पण पडला !!
सुहास..राव चु.भु.द्या.घ्या.
सर्व मायबाप वाचकांचे आभार . सविताच्या अपेक्षा पुर्ण करु न शकल्याचे शल्य बोचत राहिल ! पुढच्या लेखात अपेक्षा पुर्ण करु असे आश्वासन देऊन आभारप्रदर्शन संपवतो.
- ( पांढरी शाई म्हंटलं की ह्यांनी हायलाईट करुन पाहिलंच पाहिजे .. )
बंगलोरात काल बर्फ पडला???!!! >>>
चिन्नास्वामीला भारत वि. किवीजच्या फट्याक करून चाललेल्या मॅचमध्ये अर्ध्या भारताने पाहिले असेल ते !!
@टार्या !!
हा हा हा
पार्टी नाही, प्यार्टी ! प्यार्टी !
डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो.
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
पुण्यातील कुठल्या भागात आहोत. पण अख्या मुंबईत ह्या पेक्षा भारी वास येत असतो.
एक दुरुस्ती हे मुंबैत जागोजागी दिसते. गोदीमार्गे फोर्ट कडे गेलात तरी खाडीच्या बाजुने हेच दृष्य दिसते. आजुबाजुला मिठाचे ढीग देखील दिसतात. म्हणजे पांढरे ढीग असतात. माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या.
कोणी मुंबईला भिकार म्हटलं की आपण दहा भिकार म्हणावं..
मुंबईविषयी अभिमान बाळगलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मुंबईकर होण्यासाठी ही अटच नाहीये मुळी. ती अट पुण्याला..तिथे अभिमान पाहिजे..
- पु.ल. देशपांडे.
;)
आणि त्यांना आपण खो ही देऊ शकत नाही.
आमच्या मुंबईत फक्त दोनच वास येतात. एकतर सेंटचा किंवा गुवाचा. पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत.
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
सहमत आहे.
पुण्याबाहेरुन आलेल्या काही लोकांमुळे झालय बघा हे सगळे :) येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित :) गेला बाजार गुजरातेत तरी जावे.
येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित गेला बाजार गुजरातेत तरी जावे
फक्त हगायला काश्मिरात?
राव रास महाग पडेल हो............
त्यापेक्षा लोकल कामंच बर......... ;)
अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा नाक मुरडायचे नाही असा दंडक आहे की काय?
असो.
आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत.
अवांतर : पुण्यात हल्ली पुरुषानी अंगभर सोने मिरवायची फ्याशन बोकाळली आहे. ( सहज पहायला जावा संगमवाडीत व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात )
आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत.
ही भीष्मप्रतीज्ञा आहे का? की अणेकजन दरवर्षी "सिग्रेट" अन "दारू" सोडायचे ठरवात (आनी फेल होतात) तसला संकल्प आहे?
कंसातल्या कुरकुरीत शेंगदाण्यांमुळे लेखाचा चिवडा लई चटकदार झाला आहे. :)
त्यातही "वातावरणिक अवांतरगिरी" वगैरे शब्द खरपूस भाजलेल्या खोबर्यासारखे. (हा चिवडा खाऊन वायूप्रदूषण होणार नाही हे नक्की).
अजून लिहा.
-(हिवाळा आवडणारा) गारझन
मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा स्ट्राँगपॉइंट आहे. परत एकदा सिद्ध केलंस.
आमची शाळा सकाळी ७.१५ ला असायची. त्याकाळी मुंबईत पहाटे थंडी असायची. शाळेत जाताना रस्ताभर तोंडातून वाफा काढत जायचं. शाळेच्या एका बाजूला काही गावठी अशी घरं होती. त्यात एक गोठा होता. शेणाच्या गवर्या टाकून केलेली शेकोटी रात्रभर जळून मग नुस्ता धूर ओकत बसलेली असायची. तो धूर आणि थंडीमुळे आलेलं धुकं यामुळे सगळं वातावरण अगदी गूढ वाटायचं. त्यात परत सकाळी पहिला तास मास पीटीचा असायचा बरेच वेळा. शाळेत जाताना घातलेला स्वेटर काढून टाकायची पाळी यायची पीटीची धावपळ करून. एकदम फ्रेश वाटायचं.
थोडा मोठा झाल्यावर माळव्यातली थंडी बघायचा योग आला २-३ वर्षं. (एकदा अलाहाबादची पण बघितली.) त्या साईडला थंडी हा स्पेशल खाऊपिऊचा मोसम. अंधार लवकर. मग बाहेर पडायचे. सराफ्यात जाऊन हादडायचे. सावकाश घरी येऊन मग गप्पा हाणून झोपायचे. जेवण झाले की थंडी जास्त वाजते आणि पोटातून वाजते हे ज्ञान तेव्हाच मिळाले. आम्ही जेवायला बसायच्या आधी (दुपारीही) गाद्या / दुलया जय्यत तयारी करायचो. जेवण झाले रे झाले की मी आणि ताई डायरेक्ट दुलईखाली. आई बिचारी बेसिक मिनिमम झाकपाक करून मग यायची दुलईच्या आत. तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला. स्वर्गच होता तो.
मग पुढे आखातातली थंडी बघितली. नुसती बघितली नाही तर चांगली हाडात जाऊन पोचली. उत्तर आखातात (सौदी / कुवेत) वगैरे भागात थंडी मजबूत. त्यात परत सन्नाट वारे. वाळूची / धूळीची वादळं. हे वादळ केवळ अनुभवायचा प्रकार आहे. सगळी घरं / कार्यालयं एसी असल्यामुळे अगदी हवाबंद असायची. पण त्यातूनही धूळ आत यायची आणि दिवसातून २-३ वेळा घर साफ करायला लागायचं. सतत वाहणारी जोरदार हवा त्या लहान फटीतूनही रामसेचित्रपटासारखा आवाज करत घुसत असायची. थंडीचे कपडे नीट असे त्याचवेळी वापरले जास्त. बोचरी थंडी. माळव्याच्या थंडीपेक्षा वेगळीच. माळव्यातली थंडी गुलाबी, सुखकारक. आखातातली मात्र एकदम त्रासदायक.
अवांतर: माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या नात्यातल्या एका पोक्त बाईंनी 'उन्हाळ्यात अजिबात लग्न करू नकोस, थंडीचा मौसमच पाहिजे' असे बजावून सांगितले आणि मी ते अगदी मनापासून अंमलात आणले... त्या बाई आता आपल्यात नाहीत पण माझा दुवा कायमचा घेऊन आहेत. ;)
तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला.
ह्यावरून आचार्य अत्र्यांच्या एका विनोदाची आठवण झाली. 'मोरूची मावशी' मधील एक पात्र 'लंडनमधील थंडी' विषयी वर्णन काहीसे असे करते: ' अहो, थंडी, थंडी म्हणजे किती असावी? नुसता शब्द तोंडातून बाहेर पडला रे पडला की त्याचे बर्फ झालेच समजा!'
मस्त लेख आहे रे टारबा,
साला थंडीची आम्हाला एकच गोष्ट वारंवार आठवते ती म्हणजे रोज सकाळी झोपेतुन उठताना 'अजुन अर्धा तास झोपलो असतो तरी चालल' ही इच्छा होते.
तुमच्या त्या शेकोट्या वगैरे सगळे मान्य असले तरी निवांत झोपुन राहण्यासारखे सुख कशातच नाही ;)
- छोटा डॉन
गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ...
इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात...
सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय...
हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु...
तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...
गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ...
इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात...
सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय...
हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु...
तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...
लेख आवडला, मस्त आहे. टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही.
हा प्रतिसाद देताना मी केलेलं शीघ्र काव्य:
तु थंडी मी वोडका,
तु संधी, मी चान्स मारु का? ;)
-
(महाकवि) इंटेश.
>>टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही.
सहमत आहे.
विशेषतः "एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची." असं वर्णन केल्यावर तर त्यांचा हात कोणीही धरणार नाही. ;-)
प्रतिक्रिया
सुधारलं रे पोरगं सुधारलं!
कोणी विषयाला धरुन का
टारझन साहेब, आपण ज्या
काय ती चर्चा इथे करा म्हणजे
कडक लेख रे टार्या !!
सुपर लाईक. !
सहमत
अवांतर : बंगलोरात काल बर्फ
का करे
अर्ध्या भारताने पाहिले असेल !
लय भारी.....
'कडक' लेखन रे टारबा. एकदम
पुण्यातली थंडी हा आमचा पण वीक
डोळे बंद ठेवूनही पुण्यात
तुमचे अगदी बर्रोब्बर आहे
कल्याण ते CST सकाळी लोकल ने
एक दुरुस्ती हे मुंबैत
बोला बोला..
. मला अगदी हेच आठवत होतं
हे लाख बोललात !! अशा चर्चा
माझा असा समज आहे की ते मीठ
हो ना
वासांसि जीर्णानि...
बर्रोब्बर आहे पुण्यात काही
येवढा त्रास असुन हे लोक अजुन
अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा
ही भिष्मप्रतीज्ञा आहे का?
<<<व्होल्वो जेथून सुटतात तेथे
मस्त
कंसातल्या कुरकुरीत
मस्त
हेच म्हणतो
छान
उत्तम.
मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा
छान
धन्यवाद हो दा!!!
क्लास
छान लेख ...
छान लेख !!
गेले ते दिवस , राहिल्या त्या
छान लेख !!
गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ...
हा लेख
हा लेख
लेख आवडला, मस्त आहे. टारझन
>>टारझन यांचा हात
=)) =)) =))
हात धरु शकणार नाही..
शिंद्यानु ...