✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आला थंडीचा महिना

ट
टारझन यांनी
Wed, 12/08/2010 - 12:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17785 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

सुधारलं रे पोरगं सुधारलं!

अवलिया
Wed, 12/08/2010 - 12:49 नवीन
सुधारलं रे पोरगं सुधारलं!
  • Log in or register to post comments

कोणी विषयाला धरुन का

टारझन
Wed, 12/08/2010 - 13:05 नवीन
कोणी विषयाला धरुन का प्रतिसाद देत नाहीये ? नान्याचा एक reply सुद्धा subject ला धरुन नसतो. हो आता तुम्ही तुमचे कसले ते आंदोलन करत असाल तर ... - पर्ल हार्बर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

टारझन साहेब, आपण ज्या

अवलिया
Wed, 12/08/2010 - 13:22 नवीन
टारझन साहेब, आपण ज्या पद्धतीने आपली मते सुस्पष्ट व ठामपणे मांडता ते पाहुन कौतुक वाटते. आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. लिट्ल बॉय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काय ती चर्चा इथे करा म्हणजे

शिल्पा ब
गुरुवार, 12/09/2010 - 07:23 नवीन
काय ती चर्चा इथे करा म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कडक लेख रे टार्‍या !!

सुहास..
Wed, 12/08/2010 - 20:29 नवीन
थंडीच्या दिवसातल्या काही आठवणी, त्यातल्या त्यात पुण्याच्या गुलाबी थंडीतल्या !! हॉटेलात असताना,शिवाजीनगर ला बारा-एक वाजता कामावरुन परतलो की होळकर ब्रिजवरुन घरी न जाता मुद्दामुन स्टेशनला जायच.सायकल थेट स्टेशनच्या मागल्या बाजुला असलेल्या पुलाखाली. लिंबाच्या झाडाखाली, अण्णाच्या काळवंडलेल्या टपरीसमोर वाफाळलेल्या चहाचा पहिला घोट घेताना मस्त फील यायचा. वर एक छोटी फोर-स्केयर !! सकाळच्या शिफ्टला असताना शाळेत चाललेले,रंगबेरंगी स्वेटर्स घातलेल्या टिन-एजर पोर-पोरी, लहान-लहान मुले आजही आठवतात.पहाट मार्गी लागल्यासारखी वाटायची. कॉलेजचा तर रंगच गुलाबी असायचा. पुढे 'माझी बेवडेबाजी' च्या पहिल्या पर्वात असाच डि-मेलो किंवा अश्विनीवर जायचा योग यायचा. संध्याकाळच्या गारव्यात रम,गम आणि हम मध्ये वेळेचा थांगपत्ता लागायचा नाही . गाडी चालविताना हाताची बोटे देखील गारवठायची. पण त्यातही मजा वाटायची. आजही मला थंडी वाजते,पण ती एसीची. त्यात काय मजा ! बंगलोरात काल बर्फ पडला, पण आम्ही होतो आमच्या खुराड्यात (पुण्यात असतो तर गाडीला किक मारली असती अन...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सुपर लाईक. !

टारझन
Wed, 12/08/2010 - 21:53 नवीन
सुपर लाईक. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सहमत

स्मिता.
गुरुवार, 12/09/2010 - 10:49 नवीन
लेख मस्त झालाय. शाळेच्या दिवसातल्या आणि विशेषकरून इंजिनियरिंगच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. ते एम. सी. सी. चे फॅड आमच्याकडे पण होतं. रविवारची सकाळची मस्त साखरझोप सोडून शाळेत जायचो चरफडत... आणि इंजिनियरिंगच्या डिसेंबरातल्या परीक्षा तर पुण्याच्या थंडीत स्वेटर घालून, दुलई पांघरून आणि चहा पिताना झोप काढत अभ्यास करून दिल्या आहेत :) ------------------------------------------------- अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!! काय सांगताय काय? मला कसं नाही कळलं ते? कुठल्या भागात? म्हणा आम्ही पण खुराड्यातच होतो, त्यामुळे नसेल लक्षात आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अवांतर : बंगलोरात काल बर्फ

टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 10:54 नवीन
अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!!
हो मंग !! आपले सुहास.. राव रात्रीच्या पार्टीसाठी सायकल वरुन बर्फ घेऊन चालले होते , स्पिडब्रेकर वरुन पडले .. तसा बर्फ पण पडला !! सुहास..राव चु.भु.द्या.घ्या. सर्व मायबाप वाचकांचे आभार . सविताच्या अपेक्षा पुर्ण करु न शकल्याचे शल्य बोचत राहिल ! पुढच्या लेखात अपेक्षा पुर्ण करु असे आश्वासन देऊन आभारप्रदर्शन संपवतो. - ( पांढरी शाई म्हंटलं की ह्यांनी हायलाईट करुन पाहिलंच पाहिजे .. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

का करे

नरेशकुमार
Fri, 12/10/2010 - 06:23 नवीन
-( का करे, आदत से मजबूर हय )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अर्ध्या भारताने पाहिले असेल !

सुहास..
गुरुवार, 12/09/2010 - 13:47 नवीन
बंगलोरात काल बर्फ पडला???!!! >>> चिन्नास्वामीला भारत वि. किवीजच्या फट्याक करून चाललेल्या मॅचमध्ये अर्ध्या भारताने पाहिले असेल ते !! @टार्‍या !! हा हा हा पार्टी नाही, प्यार्टी ! प्यार्टी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

लय भारी.....

नन्दादीप
Wed, 12/08/2010 - 12:58 नवीन
>>>>त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . हा..हा.. हा......भारी......
  • Log in or register to post comments

'कडक' लेखन रे टारबा. एकदम

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/08/2010 - 13:01 नवीन
'कडक' लेखन रे टारबा. एकदम जुने दिवस आठवुन गेले :)
  • Log in or register to post comments

पुण्यातली थंडी हा आमचा पण वीक

गवि
Wed, 12/08/2010 - 13:03 नवीन
पुण्यातली थंडी हा आमचा पण वीक पॉईंट. डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो. अत्यंत वाचनीय लेख.
  • Log in or register to post comments

डोळे बंद ठेवूनही पुण्यात

विजुभाऊ
Wed, 12/08/2010 - 13:31 नवीन
डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो. बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुमचे अगदी बर्रोब्बर आहे

चिंतामणी
Wed, 12/08/2010 - 14:47 नवीन
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते. पुण्यातील कुठल्या भागात आहोत. पण अख्या मुंबईत ह्या पेक्षा भारी वास येत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कल्याण ते CST सकाळी लोकल ने

स्पा
Wed, 12/08/2010 - 16:03 नवीन
कल्याण ते CST सकाळी लोकल ने प्रवास केला , तर रेल्वे रुळांच्या दुतर्फी "खो खो" चे महा भव्य सामने भरलेले दिसतात ..................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

एक दुरुस्ती हे मुंबैत

मृत्युन्जय
Wed, 12/08/2010 - 17:54 नवीन
एक दुरुस्ती हे मुंबैत जागोजागी दिसते. गोदीमार्गे फोर्ट कडे गेलात तरी खाडीच्या बाजुने हेच दृष्य दिसते. आजुबाजुला मिठाचे ढीग देखील दिसतात. म्हणजे पांढरे ढीग असतात. माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बोला बोला..

गवि
Wed, 12/08/2010 - 17:57 नवीन
कोणी मुंबईला भिकार म्हटलं की आपण दहा भिकार म्हणावं.. मुंबईविषयी अभिमान बाळगलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मुंबईकर होण्यासाठी ही अटच नाहीये मुळी. ती अट पुण्याला..तिथे अभिमान पाहिजे.. - पु.ल. देशपांडे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

. मला अगदी हेच आठवत होतं

मृत्युन्जय
Wed, 12/08/2010 - 18:03 नवीन
:). मला अगदी हेच आठवत होतं लिहिताना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे लाख बोललात !! अशा चर्चा

सूड
Wed, 12/08/2010 - 19:12 नवीन
हे लाख बोललात !! Image removed. अशा चर्चा सुरु झाल्या की हे वाक्य आठवतंच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माझा असा समज आहे की ते मीठ

स्पा
Wed, 12/08/2010 - 21:12 नवीन
माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हो ना

तिमा
Wed, 12/08/2010 - 19:24 नवीन
आणि त्यांना आपण खो ही देऊ शकत नाही. आमच्या मुंबईत फक्त दोनच वास येतात. एकतर सेंटचा किंवा गुवाचा. पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वासांसि जीर्णानि...

नंदन
गुरुवार, 12/09/2010 - 01:13 नवीन
>>> पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत --- 'वासां'सि जीर्णानि यथा विहाय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बर्रोब्बर आहे पुण्यात काही

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/08/2010 - 18:10 नवीन
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
सहमत आहे. पुण्याबाहेरुन आलेल्या काही लोकांमुळे झालय बघा हे सगळे :) येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित :) गेला बाजार गुजरातेत तरी जावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

येवढा त्रास असुन हे लोक अजुन

स्पा
Wed, 12/08/2010 - 21:14 नवीन
येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित गेला बाजार गुजरातेत तरी जावे फक्त हगायला काश्मिरात? राव रास महाग पडेल हो............ त्यापेक्षा लोकल कामंच बर......... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा

विजुभाऊ
गुरुवार, 12/09/2010 - 10:55 नवीन
अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा नाक मुरडायचे नाही असा दंडक आहे की काय? असो. आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत. अवांतर : पुण्यात हल्ली पुरुषानी अंगभर सोने मिरवायची फ्याशन बोकाळली आहे. ( सहज पहायला जावा संगमवाडीत व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ही भिष्मप्रतीज्ञा आहे का?

चिंतामणी
गुरुवार, 12/09/2010 - 13:37 नवीन
आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत. ही भीष्मप्रतीज्ञा आहे का? की अणेकजन दरवर्षी "सिग्रेट" अन "दारू" सोडायचे ठरवात (आनी फेल होतात) तसला संकल्प आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

<<<व्होल्वो जेथून सुटतात तेथे

शिल्पा ब
गुरुवार, 12/09/2010 - 13:40 नवीन
<<<व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात ) महाभारतातली फ्याशन परत आणत असतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मस्त

sneharani
Wed, 12/08/2010 - 13:04 नवीन
मस्त लिहल आहेस. बालपणीच्या बर्याच आठवणी जाग्या झाल्या विशेषतः खोबरेल तेलाची! :)
  • Log in or register to post comments

कंसातल्या कुरकुरीत

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 13:06 नवीन
कंसातल्या कुरकुरीत शेंगदाण्यांमुळे लेखाचा चिवडा लई चटकदार झाला आहे. :) त्यातही "वातावरणिक अवांतरगिरी" वगैरे शब्द खरपूस भाजलेल्या खोबर्‍यासारखे. (हा चिवडा खाऊन वायूप्रदूषण होणार नाही हे नक्की). अजून लिहा. -(हिवाळा आवडणारा) गारझन
  • Log in or register to post comments

मस्त

नितिन थत्ते
Wed, 12/08/2010 - 13:06 नवीन
मस्त लेख. (आमच्या आवडत्या पावसाळ्याला नावे ठेवल्याबद्दल णिषेध).
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

बेसनलाडू
Wed, 12/08/2010 - 13:22 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छान

गणपा
Wed, 12/08/2010 - 13:11 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments

उत्तम.

मृत्युन्जय
Wed, 12/08/2010 - 13:22 नवीन
उत्तम.
  • Log in or register to post comments

मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/08/2010 - 13:22 नवीन
मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा स्ट्राँगपॉइंट आहे. परत एकदा सिद्ध केलंस. आमची शाळा सकाळी ७.१५ ला असायची. त्याकाळी मुंबईत पहाटे थंडी असायची. शाळेत जाताना रस्ताभर तोंडातून वाफा काढत जायचं. शाळेच्या एका बाजूला काही गावठी अशी घरं होती. त्यात एक गोठा होता. शेणाच्या गवर्‍या टाकून केलेली शेकोटी रात्रभर जळून मग नुस्ता धूर ओकत बसलेली असायची. तो धूर आणि थंडीमुळे आलेलं धुकं यामुळे सगळं वातावरण अगदी गूढ वाटायचं. त्यात परत सकाळी पहिला तास मास पीटीचा असायचा बरेच वेळा. शाळेत जाताना घातलेला स्वेटर काढून टाकायची पाळी यायची पीटीची धावपळ करून. एकदम फ्रेश वाटायचं. थोडा मोठा झाल्यावर माळव्यातली थंडी बघायचा योग आला २-३ वर्षं. (एकदा अलाहाबादची पण बघितली.) त्या साईडला थंडी हा स्पेशल खाऊपिऊचा मोसम. अंधार लवकर. मग बाहेर पडायचे. सराफ्यात जाऊन हादडायचे. सावकाश घरी येऊन मग गप्पा हाणून झोपायचे. जेवण झाले की थंडी जास्त वाजते आणि पोटातून वाजते हे ज्ञान तेव्हाच मिळाले. आम्ही जेवायला बसायच्या आधी (दुपारीही) गाद्या / दुलया जय्यत तयारी करायचो. जेवण झाले रे झाले की मी आणि ताई डायरेक्ट दुलईखाली. आई बिचारी बेसिक मिनिमम झाकपाक करून मग यायची दुलईच्या आत. तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला. स्वर्गच होता तो. मग पुढे आखातातली थंडी बघितली. नुसती बघितली नाही तर चांगली हाडात जाऊन पोचली. उत्तर आखातात (सौदी / कुवेत) वगैरे भागात थंडी मजबूत. त्यात परत सन्नाट वारे. वाळूची / धूळीची वादळं. हे वादळ केवळ अनुभवायचा प्रकार आहे. सगळी घरं / कार्यालयं एसी असल्यामुळे अगदी हवाबंद असायची. पण त्यातूनही धूळ आत यायची आणि दिवसातून २-३ वेळा घर साफ करायला लागायचं. सतत वाहणारी जोरदार हवा त्या लहान फटीतूनही रामसेचित्रपटासारखा आवाज करत घुसत असायची. थंडीचे कपडे नीट असे त्याचवेळी वापरले जास्त. बोचरी थंडी. माळव्याच्या थंडीपेक्षा वेगळीच. माळव्यातली थंडी गुलाबी, सुखकारक. आखातातली मात्र एकदम त्रासदायक. अवांतर: माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या नात्यातल्या एका पोक्त बाईंनी 'उन्हाळ्यात अजिबात लग्न करू नकोस, थंडीचा मौसमच पाहिजे' असे बजावून सांगितले आणि मी ते अगदी मनापासून अंमलात आणले... त्या बाई आता आपल्यात नाहीत पण माझा दुवा कायमचा घेऊन आहेत. ;)
  • Log in or register to post comments

छान

प्रदीप
Wed, 12/08/2010 - 19:21 नवीन
लेखावरील तसाच तालेवार प्रतिसाद. दोन्ही आवडले.
तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला.
ह्यावरून आचार्य अत्र्यांच्या एका विनोदाची आठवण झाली. 'मोरूची मावशी' मधील एक पात्र 'लंडनमधील थंडी' विषयी वर्णन काहीसे असे करते: ' अहो, थंडी, थंडी म्हणजे किती असावी? नुसता शब्द तोंडातून बाहेर पडला रे पडला की त्याचे बर्फ झालेच समजा!'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद हो दा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/08/2010 - 20:35 नवीन
धन्यवाद हो दा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

क्लास

दिपक
Wed, 12/08/2010 - 13:24 नवीन
क्लास लेख !! थंडीसारखा बोचरे चिमटे काढुन हसवणरा तसाच शेकोटीसारखा आठवणींच्या मायेची ऊब देणारा.
  • Log in or register to post comments

छान लेख ...

छोटा डॉन
Wed, 12/08/2010 - 13:26 नवीन
मस्त लेख आहे रे टारबा, साला थंडीची आम्हाला एकच गोष्ट वारंवार आठवते ती म्हणजे रोज सकाळी झोपेतुन उठताना 'अजुन अर्धा तास झोपलो असतो तरी चालल' ही इच्छा होते. तुमच्या त्या शेकोट्या वगैरे सगळे मान्य असले तरी निवांत झोपुन राहण्यासारखे सुख कशातच नाही ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

छान लेख !!

सूड
Wed, 12/08/2010 - 13:33 नवीन
छान लेख !!
  • Log in or register to post comments

गेले ते दिवस , राहिल्या त्या

योगेश सुदाम शिन्दे
Wed, 12/08/2010 - 13:35 नवीन
गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ... इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात... सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय... हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु... तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...
  • Log in or register to post comments

छान लेख !!

सूड
Wed, 12/08/2010 - 13:35 नवीन
छान लेख !!
  • Log in or register to post comments

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ...

योगेश सुदाम शिन्दे
Wed, 12/08/2010 - 13:38 नवीन
गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ... इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात... सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय... हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु... तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...
  • Log in or register to post comments

हा लेख

आत्मशून्य
Wed, 12/08/2010 - 14:33 नवीन
जबराट झाला....
  • Log in or register to post comments

हा लेख

आत्मशून्य
Wed, 12/08/2010 - 14:34 नवीन
जबराट झाला.... आणी हो तूम्हल पण णमस्कार्स
  • Log in or register to post comments

लेख आवडला, मस्त आहे. टारझन

इंटरनेटस्नेही
Wed, 12/08/2010 - 14:53 नवीन
लेख आवडला, मस्त आहे. टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही. हा प्रतिसाद देताना मी केलेलं शीघ्र काव्य: तु थंडी मी वोडका, तु संधी, मी चान्स मारु का? ;) - (महाकवि) इंटेश.
  • Log in or register to post comments

>>टारझन यांचा हात

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 15:30 नवीन
>>टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही. सहमत आहे. विशेषतः "एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची." असं वर्णन केल्यावर तर त्यांचा हात कोणीही धरणार नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

=)) =)) =))

इंटरनेटस्नेही
Wed, 12/08/2010 - 16:08 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हात धरु शकणार नाही..

आमोद शिंदे
Wed, 12/08/2010 - 21:42 नवीन
सहमत आहे. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणून इच्छीतो की हातच काय, टारझन ह्यांचे कशातच कुणीही काहीही धरू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

शिंद्यानु ...

टारझन
Wed, 12/08/2010 - 22:00 नवीन
अरे अरे भरेल ... ...... भंर्रलं .. सांगत होतो जास्त पुढं नगं जाऊस ...लवकर धु .. नैतं वाळेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा