नमस्कार,
मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे.
सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो. आता गेल्या एप्रिल पासून मिसळपावचा सर्व व्याप मीच सांभाळतो.
एप्रिल मध्ये मिसळपाववर अत्यंत गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यातून मिसळपाव सुखरूप बाहेर पडलंय. त्यानंतर काही महिने छान गेले. मात्र पुन्हा दिवाळीच्या आधी काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याची दिसतेय.
आता या वळणावर काही गोष्टी स्पष्टच करायला हव्यात. म्हणून येथे लिहीत आहे.
१) मिसळपाव हे मराठीवर प्रेम करणार्यांनी मराठीवर प्रेमकरणार्यांसाठी आणी ज्यांना मराठीतून अभिव्यक्त होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सूरू केलेलं संकेतस्थळ आहे.
२) मिसळपाववर चालणार्या चर्चा, लेख आणि अन्य साहित्य प्रकार हे केवळ आपली मराठीतील अभिव्यक्ती, समान आवड असणार्या लोकांशी ओळख आणि छानसं, हलकं- फुलकं, कधी ठसका बसवणारं तर कधी मन हळवं करून देणारं असावं. लेख, प्रतिक्रिया, खरड कशीही असावी मात्र ती इतर कुण्या व्यक्ती, सदस्यं, संपादक यांचा अपमान करणारी, टर उडवणारी असू नये.
३) मिसळपाववर खूप काळापासून वावरतांना असं होणं स्वाभाविक आहे की काही लोकांच्या लेखनाची आवड निर्माण होते, काहींशी मैत्री होते तर काहींचे लेखन आवडत नाही. अश्या वेळी ज्यांच्याशी आपले सूर छान जुळतात त्यांच्याशी जवळीक निर्माण होणे उत्तमच मात्र कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्याधाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये.
४)ही सूचना जूण्या जाणत्या लोकांसाठी आहे की नवीन लोक नव्याने जेव्हा लिहायला लागतात तेव्हा बराच संकोच असतो. मराठीत लिहीता येईल की नाही पासून ते यावर लोक काय लिहीतील येथे पर्यंत गोंधळ नवीन लोकांच्या मनात असतो. कदाचीत आपण जेव्हा नव्याने आंतरजालावर लिहीते झालो तेव्हा आपली परिस्थिती सुध्दा अशीच होती. ते आठवून कृपया नवीन लिहीले झालेल्या सदस्यांना पहिल्याच लेखावर भंडावून सोडून त्यांने यापुढे लिहूच नये, असा प्रकार कृपया टाळावा.
५)यापुढे मिसळपाववर अधिकाधिक खेळीमिळीचे वातावरण राहील असा माझा प्रयत्न राहिल. तुम्हा सर्वांचे याकामी सहकार्य मिळावे ही विनंती. गेल्या काळात जरा बिघडलेल्या वातावरणाला जागेवर आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यामागची भावना समजून घ्या.
६)येथे एक बाब आवर्जून सांगाविशी वाटते की मिसळपावच्या संपादक मंडळास संपादनाचे संपुर्ण अधिकार आहेत. त्याबाबत त्यांनी कसलाही खुलासा देणे अपेक्षीत नाही. त्यांच्या बाबत काही अडचण असल्यास ती जाहीर न बोलता सरपंच किंवा नीलकांत या खात्यावर व्यक्तिगत निरोपातूनच कळवणे अपेक्षीत आहे. कुणीही उठसूठ संपादकांना लक्ष केलेले योग्य नाही. यापुढे असा प्रकार कृपया टाळावा.
७)नवीन सदस्यांनी येथे लिहीते व्हावे. मिसळपाव समजून घ्यावे. नवीन मित्र बनवावे. आणि काहीही अडचण आल्यास सरपंच किंवा नीलकांत या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवावे.
८) मिसळपावचे व्यवस्थापन, संपादक मंडळसदस्यं हे सर्व आपली आवड म्हणून मिसळपावसाठी काम करतात. त्यांच्या मुख्य कामातून आवर्जून वेळ काढून ते मिसळपाववर काम करतात. अश्यावेळी एखाद्या कामात झालेली दिरंगाई लक्षात यावी यासाठी हा संदर्भ पुन्हा एकदा लक्षात आणून देत आहे.
- (सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असलेला) नीलकांत
वाचने
125974
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !
ह्या सर्वाचा हेतू हाच की...
.
In reply to ह्या सर्वाचा हेतू हाच की... by नीलकांत
अॅड्याला माझे अनुमोदन.
In reply to . by आदिजोशी
माझी मेंबरशिप कृपया रद्द करा.
In reply to ह्या सर्वाचा हेतू हाच की... by नीलकांत
१०८
In reply to माझी मेंबरशिप कृपया रद्द करा. by भागो
माझी सुद्धा.
In reply to माझी मेंबरशिप कृपया रद्द करा. by भागो
कशाला रद्द करायची बुवा?
In reply to माझी सुद्धा. by कॉमी
खरडवहीत काहीतरी लिहिलेले होते
In reply to कशाला रद्द करायची बुवा? by गवि
काय झाले भागो आणी कॉमी??
In reply to माझी सुद्धा. by कॉमी
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to काय झाले भागो आणी कॉमी?? by अमरेंद्र बाहुबली
अर्रर्र....
In reply to माझी सुद्धा. by कॉमी
असे काही करू नका. जमेल तसे
In reply to अर्रर्र.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके
धन्यवाद!
अधिकृत स्पष्टीकरणाबद्दल
एकमेकां साह्य करू अवघे धरू
छान लिहिता तुम्ही निलाकांत!
धाग्याचे संदर्भ...!
पुन्हा तेच...
In reply to धाग्याचे संदर्भ...! by इन्द्र्राज पवार
चर्चेचे ठिकाण आणि औचित्याचा मुद्दा...!
In reply to पुन्हा तेच... by आमोद शिंदे
जाहीर वक्तव्ये
In reply to चर्चेचे ठिकाण आणि औचित्याचा मुद्दा...! by इन्द्र्राज पवार
त्याबद्दल खुलासा करतो की,
In reply to चर्चेचे ठिकाण आणि औचित्याचा मुद्दा...! by इन्द्र्राज पवार
पूर्णविराम द्यावा.
In reply to त्याबद्दल खुलासा करतो की, by आमोद शिंदे
ठीक आहे
In reply to पूर्णविराम द्यावा. by इन्द्र्राज पवार
उपमा
In reply to धाग्याचे संदर्भ...! by इन्द्र्राज पवार
आख्यायिका
In reply to उपमा by पंगा
प्रत्यक्षात असे काही झाले
In reply to आख्यायिका by प्रियाली
रोख
In reply to प्रत्यक्षात असे काही झाले by आमोद शिंदे
हॅहॅहॅ...म्हणजे संपादनाची
In reply to रोख by प्रियाली
असे...
In reply to हॅहॅहॅ...म्हणजे संपादनाची by आमोद शिंदे
थोडक्यात तुमचा ईंद्रा झाला
In reply to असे... by प्रियाली
नीलकांत, अतिशय समयोचित योग्य
सरपंच भावना पोहोचल्या. आमचे
नव्या म्हणजे या संकेतस्थळावर
नुसतेच लेखनास उत्तेजन देउ
नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट
In reply to नुसतेच लेखनास उत्तेजन देउ by Pain
औषधच भयावह होईल...!
In reply to नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट by गवि
अरे देवा..
In reply to औषधच भयावह होईल...! by इन्द्र्राज पवार
थोडासा गोंधळ...!!
In reply to अरे देवा.. by गवि
एकदम मान्य..
In reply to थोडासा गोंधळ...!! by इन्द्र्राज पवार
पेनोबांशी सहमत
In reply to नुसतेच लेखनास उत्तेजन देउ by Pain
त्यांच्या काही प्रतिक्रीया तर
In reply to पेनोबांशी सहमत by परिकथेतील राजकुमार
गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन
In reply to त्यांच्या काही प्रतिक्रीया तर by गवि
मुळात आमची "न्येमकी" गफलत
In reply to गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन by परिकथेतील राजकुमार
आपण सर्वच काही मलाच उद्देशून
In reply to मुळात आमची "न्येमकी" गफलत by गवि
हेहेहे.. सर्वच म्हणजे
In reply to आपण सर्वच काही मलाच उद्देशून by मृत्युन्जय
+१
In reply to पेनोबांशी सहमत by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
नीलकांत, उत्तम प्रकटन. तुझा
तुमची कार्यपद्धती आवडते.
चांगले आहे.
सहमत !
In reply to चांगले आहे. by नीधप
नीलकांत-जी, धन्यवाद!
एका हाताने टाळी वाजत नाही हेच
भावना पोचल्या ...
राजकुमार अगदी चांगल
मिपा खुप छान आहे !
मिपावरील स्वाक्षरीची सुविधा
मप॑आ खुपच छान आहे. मराथी
स्मशानवैराग्य...
सदस्यत्व रद्द करण्यासाठी
सदस्यत्व रद्द करण्यासाठी विनंती करायची काय आवश्यकता आहे?
In reply to सदस्यत्व रद्द करण्यासाठी by सुबोध खरे
इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत
In reply to सदस्यत्व रद्द करण्यासाठी by सुबोध खरे
दिलीप बिरुटे सर यांना
@जावा कोन आहे
In reply to दिलीप बिरुटे सर यांना by जावा फुल स्टॅक
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to दिलीप बिरुटे सर यांना by जावा फुल स्टॅक
मिसिंग जुने जाणते मिपाकर.
मिसिंग जुने जाणते मिपाकर.
In reply to मिसिंग जुने जाणते मिपाकर. by चौथा कोनाडा
नवे मिपाकर येत नाहीत.
नवे मिपाकर येणार नाहीत असे
In reply to नवे मिपाकर येत नाहीत. by कंजूस
प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खूप चांगले संपादक आहेत
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खूप चांगले संपादक आहेत by जावा फुल स्टॅक
तू भेटशी नव्याने.....