Skip to main content

प्रणयपुष्करिणी

प्रणयपुष्करिणी

Published on 02/12/2010 - 15:26 प्रकाशित मुखपृष्ठ
"पास आओ ना, ए जाने दो ना...छुओ ना छुओ ना देखो छुओ ना छुओ ना...छुओ ना...प्यासे होंठों की जो कहानी हैं...पास आके तुम्हे सुनानी हैं....ये बातें मैं न कर पाऊंगी, पास न आना मर जाऊंगी..." अहाहा, काय सुंदर गाणे आहे हे! निळाशार आसमंत, देखणा ॠषि कपूर, मादक डिंपल, आरडीचं तितकच मादक संगीत...अवघ्या ३-४ मिनिटांत शृंगार रसाचा चषकच जणू कलंडून प्रेक्षकांना चिंब भिजवतो. हा झाला रुपेरी पडद्यावरचा प्रणय. प्रत्यक्षात मात्र अशी शृंगारदेवतेची आराधना कुणी केली असेल की नाही शंकाच आहे किंवा कुणी असतीलही रोमँटिक उत्साही तर त्यांनी चार भिंतींच्या आणि एका छताच्या आड असे शृंगाररसपान केले असेल. माझ्यासारख्या यःकश्चित पदार्थाने असल्या काव्यमय शृंगाररसपानाचे सोहळे आतापर्यंत फक्त चित्रपटातच पाहिले होते. अर्थात आता असा शृंगार आपल्या हिंदी चित्रपटांमधून हद्दपार झालेला आहे हा मुद्दा अलाहिदा. आता जमाना आहे खुल्लमखुल्ला प्रेम करण्याचा. खुल्लमखुल्ला म्हणजे अगदी चारचौघात आणि ते देखील कमीत कमी कपड्यात अंगप्रत्यंगाला घुसळत प्रेमाची आरोळी ठोकण्याचा जमाना आहे हा. मग या जमान्यात आपले वास्तवातले प्रेमवीर तरी मागे कसे राहतील? काही दिवसांपूर्वी शनिवारवाडा आणि सारसबाग अशा दोन 'जगप्रसिद्ध' ठिकाणी जाणे झाले. पुण्यातल्या सगळी ठिकाणे जगप्रसिद्ध असतात यात शंकाच नाही. हा झाला पुणेरी बाणा; पण दस्तूरखुद्द हा पुणेरी बाणाच जगप्रसिद्ध असल्याने पुण्यातले सगळे (ठिकाणे, रस्ते, माणसे, कुत्रे, बीआरटी, बालेवाडी स्टेडियम, बारामती इत्यादी पासून सिंहगड, पर्वती, पत्र्या मारुती, जिलब्या मारुती, दगडूशेठ, फर्ग्युसन कॉलेज, नू. म. वि., स. प., तुळशीबाग, कचराडेपो, मुळा-मुठा, चितळे, गाडगीळ इत्यादी पर्यंत सगळे), किंवा पुण्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी (आयटी, ऑटोमोबाईल, नदीपात्रातले बांधकाम, पेशवे, टिळक) किंवा पुण्याशी दुरूनही संबंध नसणार्‍या गोष्टी (वाहतूकीची शिस्त, चांगले रस्ते, शुद्ध हवा, स्वच्छ नद्या इत्यादी) असे सगळेच जगप्रसिद्ध असते. असो. सारसबागेतल्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेतल्यावर आम्ही बागेत फेरफटका मारत होतो. चतुर्थीची गर्दी होती. सकाळची दहाच्या आसपासची वेळ होती. बर्‍यापैकी ऊन होते. तापलेले ऊन, भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले देऊळ आणि नेहमीसारखीच लगबगीची सकाळ असे कोरडे वातवरण असतांनाही काही तरुण हृदयांमध्ये मात्र वसंत अगदी बहरात आलेला होता. बागेच्या हिरवळीवर, कट्ट्यांवर आणि जिथे थोडा एकांत मिळू शकेल अशा सगळ्या जागांवर या प्रेमवीरांनी अतिक्रमण करून ठेवले होते. बरं, अतिक्रमण केले तरी हरकत नाही पण हे प्रेमवीर बर्‍याच पायर्‍या पुढे जाऊन स्पर्शसुखाची अक्षरशः दिवाळी साजरी करत होते. आणि ती ही कुठलाच विधिनिषेध न बाळगता! आम्ही (म्हणजे मी आणि माझी बायको; हो, उगीच गैरसमज नको!) अगदी अंग चोरून चालत होतो. एका अशाच स्पर्शसुखात लीन झालेल्या युगुलासमोरून जातांना मात्र आम्हालाच लाज वाटली. साधारणपणे एखादा पापभिरु माणूस आपल्याच हक्काच्या बायकोसोबत आपल्याच अंधार केलेल्या आणि सगळी दारे, खिडक्या घट्ट बंद केलेल्या बेडरूममध्ये ज्या प्रकारचे वर्तन करण्याआधी कमीत कमी दोन वेळा विचार करेल आणि मग विचार करून ताबडतोब 'पाणी पिऊन येतो' असे म्हणून बेडरूमच्या बाहेर जाईल त्या प्रकारचे वर्तन त्या युगुलामधला नायक बिनदिक्कतपणे करत होता; आणि त्याची नायिका त्याला अजिबात अडकाठी करत नव्हती. आम्ही खाली माना घालून समोरून शक्य तितक्या लवकर सटकलो. पुढे काही वेगळे चित्र होते अशातला भाग नाही. बदल होते ते फक्त चेहर्‍यांचे, आवेगातल्या तीव्रतेचे आणि पद्धतींचे! शनिवारवाड्यात शिरल्यानंतर उजव्या हाताला खालच्या बाजूस मोठे डेरेदार वृक्ष आहेत. थोडा वेळ आम्ही तिथे विसावलो. वरच्या बाजूला तटबंदीवरून टेहळणी करण्यासाठीचा रस्ता आहे. खाली एका झाडाच्या कट्ट्यावर बसलो न बसलो तोच आमची नजर वर गेली. तटबंदीच्या कठड्यावर बसलेले एक युगुल प्रेमरसात चिंब भिजून बेभान झाले होते. आम्ही नुकताच पेशव्यांचा वंशवृक्ष वाचून त्याविषयी बोलत बसलो होतो. "पेशव्यांचे मूळपुरुष बाळाजी विश्वनाथ होते हे मला माहितच नव्हतं...आणि..आणि मस्तानीला देखील मुले झाली होती...आणि...अरे, काय करतायत हे...अरे, ती मस्तानी नाही रे..." "हो ना, मला ही माहित नव्हतं. मस्तानी खूप सुंदर होती म्हणे...संपलं का?" बायकोने विचारलं. उकाडा जाणवत असल्याने मी माझ्या शर्टाच्या बाह्या वर करत होतो. माझं आणि बायकोचं आईसक्रीम बायकोच्या हातात दिलं होतं. बाह्या वर करून मग आईसक्रीम घेऊ असा मी विचार करत होतो. बायको खाली नजर लावून बसली होती. "नाही अजून...करतोय..." "इतका वेळ?" "हो मग, कॉटनचा कपडा लवकर वळत नाही..." "काय? कपडे काढताय की काय आता?" "मी कशाला कपडे काढू? इतका नाहीये उकाडा." "अहो, तुम्हाला नाही म्हटलं मी; त्यांच्याबद्दल बोलत होते..." "कोण ते? ओह, अच्छा अच्छा...त्यांचं चालूच आहे. ते मरू दे, केळकर संग्रहालयातला मस्तानीमहाल काय सुंदर होता ना? ....बरी आहे तशी... हो ना?" "अहो हे आईसक्रीम आहे, मस्तानी नाही. पेशव्यांची पण नाही आणि कावरेंची पण नाही." "मी मस्तानीबद्दल बोलत नाहीये गं....वितळलं...." "वितळणारच...आगीजवळ लोणी ठेवलं तर वितळणारच ना? चला बरं इथून. दुसरीकडे जाऊ." "अगं मी आईसक्रीमबद्दल बोलतोय....ती पुष्करिणी किती सुंदर असेल नाही? पेशवे त्या पुष्करिणीकडे बघत बघत भोजनाचा आस्वाद घेत असत...अरे आवरा यांना....अरे लग्नानंतर काही ठेवाल की नाही?..." "तुम्हाला कशाला त्यांच्या लग्नाची चिंता....ती पुष्करिणी गंजली आता...इतकी वर्षं झालीत. आता चालणार ही नाही कदाचित..." "गंजणारच...आणि खरी पुष्करिणी तर वर थुई-थुई नाचते आहे...चला जाऊ घरी...जातांना जेलुसिल घ्यायची आठवण ठेव. अ‍ॅसिडिटी झालीये खूप...करपट ढेकर येतायत..." शेवटी तिथून आम्ही निघालो. जिकडे बघावं तिकडे असे हे रोमँटिक सिनेमे जोरात चालू होते. काहीतर चक्क 'ए' सर्टिफिकेट घेऊन सुरु होते की काय अशी शंका मनाला चाटून गेली. शनिवारवाड्यात प्रवेशाआधी ज्यादा शुल्क भरून असे सर्टिफिकेट देत असतील असे एक क्षणभर वाटून गेले. काही लोकं जे खरच शनिवारवाड्याचा इतिहास जाणून घ्यायचा या सात्विक हेतूने आले होते ते बिचारे ओशाळे होत होते. आपल्या इथे सार्वजनिक बागा म्हणजे प्रेम करण्याची हक्काची जागा असे समीकरणच झालेले आहे जणू. जसं मोठे क्रीडासोहळे किंवा मोठी शासकीय कंत्राटे म्हणजे राजकारण्यांची हक्काची कुरणे झालेली आहेत तसंच काहीसं हे आहे. राजकारण्यांचं कसं असतं; जनतेने कितीही आरोप केले, न्यायालयाने कितीही कान उपटले तरी आम्ही निर्लज्जपणा आणि खूर्ची सोडणार नाही, तसच या युगुलांचं असतं. कुणी बघा, लाजा, किंवा बघू नका, आम्ही आमच्या प्रेमाच्या पुष्करिणी खुलेआम जिवंत ठेवणार. क्या सही, क्या गलत, दुनिया गेली तेल लावत!!!

याद्या 8665
प्रतिक्रिया 55
असे उघड्यावर अस्ले प्रदर्शन करणार्यांची खुप कीव येते. नशिब तुम्ही पुण्यात फिरला.. मुंबईत तर यापुढचे सिन असतात .. बरेच वाईट वाटते सार्वजनिक ठिकाणी असले चित्र पाहुन, तारतम्य सोडुन वागणारी लोक पाहिली की कीव वाटते त्यांची

>>>>नशिब तुम्ही पुण्यात फिरला.. >>>>मुंबईत तर यापुढचे सिन असतात .. १००% सहमत..... पण तुम्हाला मुलिन्चे मुखदर्शन झाले का हो??? नाही म्हणायला पुण्यातील मुली ह्या बाबतीत जागरूक असतात हो. (घरातून बाहेर पडताना ""त्वचेच्या काळजी साठी"" म्हणून त्या फड्का बान्धतात म्हणे...!!!) आमच्या मुंबईत या....मग तुम्हाला लेख लिहिण पण जमणार नाही. शिव..शिव...शिव...!!!

>>>नाही म्हणायला पुण्यातील मुली ह्या बाबतीत जागरूक असतात हो. (घरातून बाहेर पडताना ""त्वचेच्या काळजी साठी"" म्हणून त्या फड्का बान्धतात म्हणे...!!!) तोन्डावर हो........

मी पुण्यात सर्व वेळी आणि वरील सर्व ठिकाणी फिरलेलो आहे... काही वेळा मुद्दाम "असे" काही दिसतंय का हे पहायला गेलो आहे, पण... मला असे काहीही दिसलेलं नाहीये!!!!!

In reply to by सूर्यपुत्र

ध्येय नीट ठेवले की दिसते असले सारे. :-) पुण्यातच काय, सगळ्या शहरातल्या बागांमध्ये असे चित्र हमखास दिसते. सारसबागेत सकाळी १०-१०:३० वाजता किंवा संध्याकाळी ६ च्या सुमारास मागच्या बाजूला जाऊन बघा. तुमची इच्छा पूर्ण होईल.

मचाक.......!!! राठी मुले/ मुली तशी फार चांगली हो... चावट पणा करतात थोडासा त्यात त्यांची कसली आहे चुक... ट्टा जागोजागी असतो तसा त्यांचा ही आहे.

In reply to by आम्हाघरीधन

हल्ली महागाई फार वाढल्यामुळे येतात काही जणं "रस्त्यावर," त्याला ते तरी काय करणार.......

तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात एक लव्हर्स पार्क तयार करा आणि मग सारस बाग वगैरे ठिकाणी कुणी दिसले तर तक्रार करा. च्यामारी त्यांचा विचार करा राव कुणी...... सारा जमाना उनके खिलाफ है! ;)

In reply to by अवलिया

तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात एक लव्हर्स पार्क तयार करा आणि मग सारस बाग वगैरे ठिकाणी कुणी दिसले तर तक्रार करा. च्यामारी त्यांचा विचार करा राव कुणी...... सारा जमाना उनके खिलाफ है!
अवलियांच्या स्तुत्य एवं चिंत्य विचाराशी फुल्टू सहमत!!! पण फक्त पुण्यातच? कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिक आणि बाकी शिल्लक महाराष्ट्रानं घोडी मारलीत का ?

In reply to by विजुभाऊ

बाकी शिल्लक महाराष्ट्रानं घोडी मारलीत का ? त्यानी त्यासाठी पुण्यात यावे.
पण पुण्यात फक्त गाढवांनाच मार मिळतो ना ?

In reply to by अवलिया

कुणी त्यांच्या खिलाफ नाही. मी देखील नाही. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो हे तरी त्यांनी लक्षात ठेवायला हवे असे वाटते. बाकी त्यांच्या या कृत्यांना विरोध असा मी केलेला नाहीये. :-) लव्हर्स पार्क ही आयडीया चांगली आहे. पार्टनरशिपमध्ये सुरु करु आणि सोबत गजाआड जाऊ. ;-)

अश्या सिन्सबद्धल त्यामधील नायक नायिकांचा राग येणे आणि मॉरल पोलिसिंग मधली सीमारेषा अगदी नाजूक आहे. ज्याप्रमाणे असले चाळे सार्वजनिक ठिकाणी करणार्‍या मुला-मुलींचा राग येतो त्याच प्रमाणे अश्या मुला-मुलींना पकडून मार देणारे तथाकथित संस्कृती-संरक्षकांबद्धल देखिल येतो. उपाय म्हणून जर एखाद्या वेळी अश्या अस्थानी कोणी युगुल नको ते उद्योग करत असेल तर सरळ त्यांच्या समोर फतकल मांडून बसावं. जर शक्य असेल तर आणखी दोघा तिघांना जमवावं. काही न बोलता पॉपकॉर्न वगैरे खात सिनेमा बघत असल्याच्या थाटात त्यांच्या लीला बघत बसावं. थोड्या वेळाने जर त्यांना शरम येउन तेच अशा ठिकाणाहून जातिल (मुन्नाभाई फॉर्म्युला).

In reply to by मराठे

काही न बोलता पॉपकॉर्न वगैरे खात सिनेमा बघत असल्याच्या थाटात त्यांच्या लीला बघत बसावं. ईऽऽ गं बाई!

In reply to by रेवती

ई काय त्यात....पिच्चरच्या ऐवजी लाइव शो बघायला सांगताहेत ते.. बाकी हा उपाय एखादवेळी ब्याक्फायर पण होऊ शकतो हि शक्यता आहेच..

In reply to by शिल्पा ब

हो तर... काही वर्षांपुर्वी आम्ही सर्व मैत्रिणी मिळून मला वाटतं निगडीच्या जवळ कुठले ते पार्क आहे तिकडे गेलो होतो... (अप्पूघर का?) आम्ही आमच्या फेरफटक्यानंतर.... एका कट्ट्यावर बसलो होतो..... सहज शेजार च्या झुडुपांकडे लक्ष गेले.... पलिकडे थोड्या माळरानासारख्या भागात एका जोडीचे एकदम आवेगात "चुम्माचाटी" चालू होते.... एकमेकींना... "बापरे...ते बघ..." असे हसत हसत खुणावत असताना...त्यातल्या हिरो चे आमच्या कडे लक्ष गेले... आणि तो जणू चेकाळलाच.... अगदी आम्हाला अजून "डिट्टेल व्ह्यू" दिसेल असे त्याचे प्रकार सुरू झाले..... थोड्या वेळाने आम्हाला च ओशाळल्यासारखे झाले म्हणून आम्ही तिथून हलायला लागलो.... तर मागून त्याने आवाज दिला... "हेल्लो...."... आमचा चालण्याचा वेग अजून वाढला.... मागून दोघांचाही खिदळण्याचा आवाज आला... करणार्‍यांना लाज नाही.... बघणार्‍यांनाच वाटायला लागली!!!!!!

In reply to by सविता

असतात असे काही महाभाग. त्यांना असल्या खाजगी गोष्टींचे जाहीर प्रदर्शन करण्याची फार हौस असते. ती हौस विकृती या पातळीवर गेली की मग एमएमएस, फोटो काढून मित्रांना दाखवणे, इंटरनेटवर प्रकाशित करणे इथे येऊन आयुष्याची वाट लावून जाते. :-)

In reply to by मराठे

बरोबर आहे. राग येतो पण तो बहुधा निरुपयोगी असतो. हा प्रश्न वैयक्तिक आहे. कुणाला सार्वजनिक जागेत काय आणि कुठल्या मर्यादेपर्यंत करायचे आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण किमान लोकलज्जा पाळण्यास हरकत नसावी. हातात हात घेणे, गळ्यात (मागून) हात टाकणे इथपर्यंत ठीक आहे पण त्यापुढचे कदाचित काही लोकांना किळसवाणे वाटू शकते. माझ्या ओळखीचे एक काका एकदा बँकेत गेले होते. एक मुलगी मागून आखूड आणि कमालीचा तंग टी-शर्ट घालून बसली होती. तिच्या कमरेजवळचा भाग बराच उघडा पडला होता. त्या काकांनी तिला 'तुझे आई-बाबा तुला व्यवस्थित बसतील असे कपडे देत नाहीत का?' असा प्रश्न अगदी निरागसपणे विचारला होता. त्या मुलीची आई देखील सोबत होती. आई खूप खजील झाली. त्या काकांसोबत माझे वडील होते; त्यांनी हा किस्सा सांगीतला. शेवटी फॅशन आणि अ‍ॅसेट्स दाखवण्याची खुमखुमी या वेगळ्या गोष्टी आहेत. आजकाल बर्‍याच मुलींचा/बायकांचा दुपट्टा फक्त गळ्याशी असतो. त्याचा इंटेण्डेड युज कधीच हद्दपार झालेला आहे. मग दुपट्टा घालायचाच कशाला? आपल्या देशात जिथे भावना दडपून ठेवण्याची परंपरा आहे; 'परस्त्री मातेसमान' वगैरे निरर्थक तत्वे जिथे खोट्या आणि तकलादू आधारांवर रुजतात; 'मानलेला भाऊ, मानलेली बहीण' असली तद्दन फिल्मी नाती पोसली जातात, तिथे जर वेडीवाकडी वस्त्रप्रावरणे घालून जर शरीराचे प्रदर्शन मांडले तर ते बघायला, चाखायला, चवीने लाळ गाळत त्याची चर्चा करायला कमी गिर्‍हाईके मिळणार आहेत का? आमच्या कार्यालयात एक मुलगी असेच खूप 'आकर्षक' कपडे घालून येत असे. शुक्रवारी तर तिला आपण पामेला अँडरसन आहोत असे अगदी ठामपणे वाटत असे. छाती अगदी पुढे करून चालणे, गुढग्यापर्यंतचे ड्रेस घालणे, लो-नेक टॉप्स घालणे वगैरे सगळी थेरं ती शुक्रवारी करत असे. साहजिकच लांडगे चेकाळत आणि अधाशी नजरेने तिला बघत असत. एकदा ती जात असतांना कुणीतरी "इसको लगा डाला, तो लाईफ झिंगालाला..." अशी शेरेबाजी केल्याचे स्मरते. चूक कोणाची? अर्थात दोघांची!

लंडनच्या कुठल्याशा बागेत म्हणे अशाच्य उम्ननी अवस्थेत हरवलेल्या दोन अस्वलांचा एक पुतळा आहे. पुण्यातसुद्धा असा एखादा पुतळा असायला हरकत नाही. बाकी, समीरराव, मला एक सांगा, त्या जोडप्यांना भर बागेत पाप्या घेताना लाज वाटत नव्हती तर तुम्हाला बघायची का बरं वाटावी?

In reply to by विंजिनेर

सुरुवातीला तितकंस काही वाटत नाही पण नंतर 'अ‍ॅडव्हांन्स्ड' स्टेजला हे सोहळे गेल्यानंतर एक अस्वस्थता वाटायला लागते. मग तिथून उठून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेवटी लाज ही पण एक सब्जेक्टीव भावना आहे. कुणाला मुलींशी बोलतांना देखील लाज वाटते तर कुणाला बाईकवर पाठ आणि कंबर उघडी टाकून फिरतांना देखील अभिमान वाटतो. :-)

In reply to by समीरसूर

कुणाला बाईकवर पाठ आणि कंबर उघडी टाकून फिरतांना देखील अभिमान वाटतो. Smile अन त्या उघड्या कंबरा अन पाठ बघायला तुम्हाला कसे वाटते? नाही म्हणजे बघितल्याशिवाय त्या उघड्या का कशा ते कळणार नाही असे आपले मला वाटले ;)

In reply to by शिल्पा ब

अहो, लक्षवेधक काही असलं तर लक्ष जाणारच ना! मग भले ते लक्षवेधक चांगले असो की वाईट. :-) माणसाचे लक्ष गुलाबाच्या फुलाकडे जाते तसेच रस्त्यात पडलेल्या शेणाकडे देखील जाते. :-) कसे वाटते हा प्रश्न जरा अवघड आहे. बळजबरीने कुणी काजूकतली तोंडात कोंबली तरी इच्छा नसतांना खाल्ली म्हणून ती कडू थोडीच होणार आहे.... ;-)

अशा वेळेस मला फक्त '७ च्या आत घरात' ची आठवण होते, ...आणि तोंड कडू होते.

पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व पार्क्स, बस व रेल्वे स्थानके या ठिकाणी 'प्रेम कक्ष' या नावाने बंद दोन व्यक्तींसाठी क्युबिकल तयार व्हायला हवेत ज्यात इंटरनेट कनेक्शन सहित लॅपटॉप व टिश्यु पेपर्सची सोय अल्पदरात व्हायला हवी. शासनाला महसुलही मिळेल आणि प्रेमी जीवांची सोय देखील होईल. - एकनाथ फणसे.

In reply to by इंटरनेटस्नेही

पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व पार्क्स, बस व रेल्वे स्थानके या ठिकाणी 'प्रेम कक्ष' या नावाने बंद दोन व्यक्तींसाठी क्युबिकल तयार व्हायला हवेत ज्यात इंटरनेट कनेक्शन सहित लॅपटॉप टिश्यु पेपर्सची सोय अल्पदरात व्हायला हवी. शासनाला महसुलही मिळेल आणि प्रेमी जीवांची सोय देखील होईल.
च्यायला दोन लोक (इथे भिन्नलींगी गृहीत धरले आहे) एका क्युबिकलमध्ये असताना देखिल त्यांना जर लॅपटॉप आणि टिश्युची गरज पडणार असेल तर अशा फोकलीच्यांना पहिले लाथा घालुन हाकलले पाहिजे ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

लॅपटॉप वरुन इंटरनेट कनेक्शन च्या मदतिने हरिकथा ऐकुन/बघुन डॉल्यात पानि आले तर डॉल्यातले पानि पुसायला टिश्यु पेपर नको का राव ?

In reply to by इंटरनेटस्नेही

आवरा ... चर्चेचा सुर काय आहे ते पाहुन प्रतिसाद द्यावेत अशी सुज्ञ अपेक्षा आहे. उगाच काहीही उपाय सुचवायचे म्हणुन जर प्रतिसाद अश्लिलपणाकडे आणि असभ्य भाषेकडे झुकत असतील तर योग्य दखल घेतली जाईल. निदान जे व्यवस्थित आणि सभ्यपणे आपला मुद्दा मांडत आहेत त्यांना अडचण ठरु नये अशी अपेक्षा. सहकार्यासाठी आत्ताच आभार मानतो. :) - छोटा डॉन

समीरसुरराव जे म्हणत आहेत ते खरे आहे. आलेले बहुतेक प्रतिसादही सत्य परिस्थितीत मांडत आहेत, नो डाऊट तुमचे सर्वांचे बरोबर आहे. पण आता मला 'दुसरी बाजु' जाणुन घेण्यात रुची आहे. नक्की काय भावना असेल हो त्यांची उघड्यावर असे प्रदर्शन मांडण्यामागे ? काही अडचणी वगैरे ? मुंबईत तर म्हणे एका टिचभर खोलीत २-३ कुटुंबे ( म्हणजे आई-बाप, नवरा बायको, मुलं ) वगैरे रहात असतात, मग तिथे कसे 'मॅनेज' होणार ? सगळेच कपल्स केवळ 'मज्जा मारायला' करत असतील असे वाटत नाहीत, काही ना काही मजबुरी असावी. त्याबद्दल कुणाचे काही मत किंवा माहिती आहे का ? वर काही प्रतिसादात आल्याने काहीजण मुद्दाम निर्लज्जपणे जास्तच करतात हा मुद्दा मला मान्य. पण इन जनरल शारिरीक जवळीक ही प्रत्येकवेळेस चुकीचीच असते का ? होय / नाही ह्या उत्तराशी संलग्न अशी लिमिट्स कोण ठरवणार ? हे नियम किंवा लाजलज्जा ही परिस्थीतीप्रमाणे ठरवावी की एकच सरसकट नियम ठरवावा ? काही मुद्दे येऊद्यात, मी अजुन भर घालेन. :) तरी बागा, किल्ले वगैरे सोडुन तुम्ही बरीच ठिकाणे मिस्स करत आहात हे जाताजाता सांगतो ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सहमत. काही ना काही मजबुरी असावी. may be तुम्ही जे लोक पाहिले/किंवा आपल्याला असे जे लोक दिसतात त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असू शकते. त्यापैकी कित्येकांकडे १ च खोलीत २/३ कुटूंबे असू शकतील.

In reply to by छोटा डॉन

पण इन जनरल शारिरीक जवळीक ही प्रत्येकवेळेस चुकीचीच असते का ? होय / नाही ह्या उत्तराशी संलग्न अशी लिमिट्स कोण ठरवणार ?
डानरावांशी सहमत. एकंदरीत भारतात शारीर आकर्षणाचं जाहीर प्रदर्शन करणं हे 'पाप' मानलं जातं. मी कुठेतरी वाचलं होतं की जर जाहीरपणे पतीपत्नींनी चुंबन घेतलं तरी पोलिस तुम्हाला कायद्याने अश्लील वर्तनासाठी तुरुंगात टाकू शकतात. (खात्रीलायक माहिती नाही, तेव्हा तज्ञांनी सुधारणा करावी) हातात हात घेण्याविषयी काय कायदा आहे माहीत नाही. पण किती जोडपी रस्त्यावरून चालताना एकमेकांच्या खांद्यावर किंवा कंबरेभोवती हात टाकून चालताना दिसतात? याचा अर्थ शारीरिक आकर्षण नसतंच का? मग लोकसंख्या कशी वाढते? नैसर्गिक ऊर्मींना नाकारायचं, दाबून टाकायचं आणि मग अशा ठिकाणी त्या वर येताना दिसल्या की तक्रार करायची यामागचं तर्कशास्त्र मला कळत नाही. या बाबतीतली एकंदरीतच सामाजिक बंधनं कमी झाली तर अधिक लोक अधिक सुखी होतील असं मला वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी (.पूर्वी म्हणजे साधारण ८०-१०० वर्षापूर्वी सुद्धा)अशी बंधने कमी होती असे काहीसे ऐकून आहे, खात्री नाही अन खरे असेल तर अभ्यासू उदा. देऊ शकतील..

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवीसाहेब, बरोबर आहे तुमचं. पण ही तक्रार नाही; एक निरीक्षण आहे फक्त. अर्थात त्यात थोडा तक्रारीचा सूर आहे हे खरे. :-) आणि असा कायदा आहे की नाही मला माहित नाही पण आपल्या इथली जी संस्कृती आहे, ज्या परंपरा आहेत, जे समज आहेत ते असे सहजासहजी हद्दपार होणार नाहीत. ते अगदी चुकीचेच आहेत असही नाही; त्यात तथ्य आहेच असे मला वाटते. आणि जोपर्यंत ते आपल्या समाजात आहेत (अजून तरी खूप खोलवर रुजलेले आहेत) तोपर्यंत इथल्या लोकांना त्यांना अनुसरूनच चालायला लागणार. मला जर माझी बहीण असले चाळे करतांना कुठे रस्त्यावर दिसली तर माझे पित्त खवळणारच. प्रत्येकाची रीअ‍ॅक्शन अशीच राहील. अगदी अमेरिकेत देखील कुठल्याही भावाची रीअ‍ॅक्शन संतापाचीच असेल. म्हणजेच मुळात माणसाच्या सभ्यतेच्या कल्पनेत सार्वजनिक ठिकाणी पुरुष आणि स्त्रियांनी असले वर्तन करायला नको हा विचार कुठेतरी असतोच, मग तो भारत असो किंवा अमेरिका. हजारो वर्षांपासून माणसाचा पशुत्वापासूनचा मनुष्यत्वापर्यंतचा प्रवास जो झाला असेल तो अशाच काही निरनिराळ्या संवेदना जागृत झाल्यामुळे झाला असणार. म्हणूनच उघड्यावर शौचास बसणे, कुणाच्या ताटातले अन्न हिसकावून घेणे इत्यादी रानटी वागण्यापासून मनुष्य आजवरचा प्रवास करू शकला आणि त्याला माणूसपण प्राप्त झाले. आणि समाजिक बंधनं कुठल्या बाबतीतली झुगारायची? महात्मा फुल्यांनी मुलींना शिकवायचे नाही हे सामाजिक बंधन झुगारले; डॉ. आंबेडकरांनी दलितांनी प्रगती करायची नाही या बंधनाला झुगारले; कर्व्यांनी मुलींच्या शिक्षणाला चालना मिळवून दिली, र. धो. कर्व्यांनी कुटुंब नियोजनाला होणारा विरोध झुगारला....अशी बरीच उदाहरणे आहेत जिथे बंधनं कमी होणे ही काळची गरज होती म्हणून ती बंधनं कमी होण्यासाठी लोकांनी जीवाचे रान केले आणि ती बंधनं खरच कमी झालीत. आता आपण ते बघतोच आहोत. पण काही विधायक कामासाठी बंधनं कमी होणं आणि आपले प्रेम चारचौघात जाहीर करण्यातली बंधनं कमी होणं यात जमीन-आसमानचा फरक आहे. बंधनं झुगारणं म्हणजे स्वैराचार नव्हे हे देखील इथे लक्षात घेतले पाहिजे. सभ्यतेच्या काही मर्यादा असतात आणि त्या पाळणे म्हणजे बंधनं नव्हेत. प्रेम करायला हरकत नाही. तुम्ही खाजगी जीवनात काहीही करा पण सार्वजनिक जीवनाच्या काही मर्यादा असतात त्या मात्र पाळाव्याच लागतात. हा नियम जगात सगळीकडेच लागू होतो. --समीर

In reply to by समीरसूर

तुमच्या मूळ लेखनाला विरोध नाही. मी तक्रार हा शब्द वापरला तो तुमच्या लेखनाला नसून एकंदरीत समाजाच्या प्रतिक्रियेला होता.
आणि समाजिक बंधनं कुठल्या बाबतीतली झुगारायची? ....
बंधनं पाळणं किंवा ती झुगारून बेताल वर्तन करावं असे दोनच पर्याय नाहीत. बंधनांना परंपरेचा इतिहास असतो, व या परंपरा एका क्षणात बदलू शकत नाहीत, किंबहुना क्रांती करून बदलूही नयेत असं माझं मत आहे. पण ज्या बंधनांचा इतर समाजाला कोणताही फायदा नाही, व ती बंधनं पाळणाऱ्यांना निव्वळ जाचच होतो अशी बंधनं निश्चितच शिथिल करावीत.
पण काही विधायक कामासाठी बंधनं कमी होणं आणि आपले प्रेम चारचौघात जाहीर करण्यातली बंधनं कमी होणं यात जमीन-आसमानचा फरक आहे.
प्रेम जाहीरपणे करण्याचं स्वातंत्र्य हे विधायक आहे असं मला वाटतं. यात शृंगाराचं जाहीर प्रदर्शन असं मी म्हणत नाही. माझा मुद्दा थोडा वेगळा होता. किती विवाहांच्या बाबतीत समाज असं म्हणतो 'हे बघा, लग्न हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तेव्हा काही महिने एकत्र राहून ट्राय करून पहा. नाही जमलं, काही हरकत नाही, दुसऱ्या कोणा व्यक्तीबरोबर राहून बघा.' अशी राजरोस राहाण्याची परवानगी सर्वसाधारण समाज देतो का? तशी दिली तर अनेक दुःखद विवाह टळतील. व एकंदरीत समाज अधिक सुधृढ होईल. कदाचित असं स्वातंत्र्य मिळालं तर बागांमध्ये दिसणाऱ्या रांगा कमी दिसतील. त्या रांगांमधल्या जोडप्यांमध्ये किती नवरा-बायको असावेत असा तुमचा अंदाज आहे हे मनापासून सांगा.