प्रणयपुष्करिणी
"पास आओ ना, ए जाने दो ना...छुओ ना छुओ ना देखो छुओ ना छुओ ना...छुओ ना...प्यासे होंठों की जो कहानी हैं...पास आके तुम्हे सुनानी हैं....ये बातें मैं न कर पाऊंगी, पास न आना मर जाऊंगी..."
अहाहा, काय सुंदर गाणे आहे हे! निळाशार आसमंत, देखणा ॠषि कपूर, मादक डिंपल, आरडीचं तितकच मादक संगीत...अवघ्या ३-४ मिनिटांत शृंगार रसाचा चषकच जणू कलंडून प्रेक्षकांना चिंब भिजवतो. हा झाला रुपेरी पडद्यावरचा प्रणय. प्रत्यक्षात मात्र अशी शृंगारदेवतेची आराधना कुणी केली असेल की नाही शंकाच आहे किंवा कुणी असतीलही रोमँटिक उत्साही तर त्यांनी चार भिंतींच्या आणि एका छताच्या आड असे शृंगाररसपान केले असेल. माझ्यासारख्या यःकश्चित पदार्थाने असल्या काव्यमय शृंगाररसपानाचे सोहळे आतापर्यंत फक्त चित्रपटातच पाहिले होते. अर्थात आता असा शृंगार आपल्या हिंदी चित्रपटांमधून हद्दपार झालेला आहे हा मुद्दा अलाहिदा. आता जमाना आहे खुल्लमखुल्ला प्रेम करण्याचा. खुल्लमखुल्ला म्हणजे अगदी चारचौघात आणि ते देखील कमीत कमी कपड्यात अंगप्रत्यंगाला घुसळत प्रेमाची आरोळी ठोकण्याचा जमाना आहे हा. मग या जमान्यात आपले वास्तवातले प्रेमवीर तरी मागे कसे राहतील?
काही दिवसांपूर्वी शनिवारवाडा आणि सारसबाग अशा दोन 'जगप्रसिद्ध' ठिकाणी जाणे झाले. पुण्यातल्या सगळी ठिकाणे जगप्रसिद्ध असतात यात शंकाच नाही. हा झाला पुणेरी बाणा; पण दस्तूरखुद्द हा पुणेरी बाणाच जगप्रसिद्ध असल्याने पुण्यातले सगळे (ठिकाणे, रस्ते, माणसे, कुत्रे, बीआरटी, बालेवाडी स्टेडियम, बारामती इत्यादी पासून सिंहगड, पर्वती, पत्र्या मारुती, जिलब्या मारुती, दगडूशेठ, फर्ग्युसन कॉलेज, नू. म. वि., स. प., तुळशीबाग, कचराडेपो, मुळा-मुठा, चितळे, गाडगीळ इत्यादी पर्यंत सगळे), किंवा पुण्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी (आयटी, ऑटोमोबाईल, नदीपात्रातले बांधकाम, पेशवे, टिळक) किंवा पुण्याशी दुरूनही संबंध नसणार्या गोष्टी (वाहतूकीची शिस्त, चांगले रस्ते, शुद्ध हवा, स्वच्छ नद्या इत्यादी) असे सगळेच जगप्रसिद्ध असते. असो.
सारसबागेतल्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेतल्यावर आम्ही बागेत फेरफटका मारत होतो. चतुर्थीची गर्दी होती. सकाळची दहाच्या आसपासची वेळ होती. बर्यापैकी ऊन होते. तापलेले ऊन, भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले देऊळ आणि नेहमीसारखीच लगबगीची सकाळ असे कोरडे वातवरण असतांनाही काही तरुण हृदयांमध्ये मात्र वसंत अगदी बहरात आलेला होता. बागेच्या हिरवळीवर, कट्ट्यांवर आणि जिथे थोडा एकांत मिळू शकेल अशा सगळ्या जागांवर या प्रेमवीरांनी अतिक्रमण करून ठेवले होते. बरं, अतिक्रमण केले तरी हरकत नाही पण हे प्रेमवीर बर्याच पायर्या पुढे जाऊन स्पर्शसुखाची अक्षरशः दिवाळी साजरी करत होते. आणि ती ही कुठलाच विधिनिषेध न बाळगता! आम्ही (म्हणजे मी आणि माझी बायको; हो, उगीच गैरसमज नको!) अगदी अंग चोरून चालत होतो. एका अशाच स्पर्शसुखात लीन झालेल्या युगुलासमोरून जातांना मात्र आम्हालाच लाज वाटली. साधारणपणे एखादा पापभिरु माणूस आपल्याच हक्काच्या बायकोसोबत आपल्याच अंधार केलेल्या आणि सगळी दारे, खिडक्या घट्ट बंद केलेल्या बेडरूममध्ये ज्या प्रकारचे वर्तन करण्याआधी कमीत कमी दोन वेळा विचार करेल आणि मग विचार करून ताबडतोब 'पाणी पिऊन येतो' असे म्हणून बेडरूमच्या बाहेर जाईल त्या प्रकारचे वर्तन त्या युगुलामधला नायक बिनदिक्कतपणे करत होता; आणि त्याची नायिका त्याला अजिबात अडकाठी करत नव्हती. आम्ही खाली माना घालून समोरून शक्य तितक्या लवकर सटकलो. पुढे काही वेगळे चित्र होते अशातला भाग नाही. बदल होते ते फक्त चेहर्यांचे, आवेगातल्या तीव्रतेचे आणि पद्धतींचे!
शनिवारवाड्यात शिरल्यानंतर उजव्या हाताला खालच्या बाजूस मोठे डेरेदार वृक्ष आहेत. थोडा वेळ आम्ही तिथे विसावलो. वरच्या बाजूला तटबंदीवरून टेहळणी करण्यासाठीचा रस्ता आहे. खाली एका झाडाच्या कट्ट्यावर बसलो न बसलो तोच आमची नजर वर गेली. तटबंदीच्या कठड्यावर बसलेले एक युगुल प्रेमरसात चिंब भिजून बेभान झाले होते. आम्ही नुकताच पेशव्यांचा वंशवृक्ष वाचून त्याविषयी बोलत बसलो होतो.
"पेशव्यांचे मूळपुरुष बाळाजी विश्वनाथ होते हे मला माहितच नव्हतं...आणि..आणि मस्तानीला देखील मुले झाली होती...आणि...अरे, काय करतायत हे...अरे, ती मस्तानी नाही रे..."
"हो ना, मला ही माहित नव्हतं. मस्तानी खूप सुंदर होती म्हणे...संपलं का?" बायकोने विचारलं.
उकाडा जाणवत असल्याने मी माझ्या शर्टाच्या बाह्या वर करत होतो. माझं आणि बायकोचं आईसक्रीम बायकोच्या हातात दिलं होतं. बाह्या वर करून मग आईसक्रीम घेऊ असा मी विचार करत होतो. बायको खाली नजर लावून बसली होती.
"नाही अजून...करतोय..."
"इतका वेळ?"
"हो मग, कॉटनचा कपडा लवकर वळत नाही..."
"काय? कपडे काढताय की काय आता?"
"मी कशाला कपडे काढू? इतका नाहीये उकाडा."
"अहो, तुम्हाला नाही म्हटलं मी; त्यांच्याबद्दल बोलत होते..."
"कोण ते? ओह, अच्छा अच्छा...त्यांचं चालूच आहे. ते मरू दे, केळकर संग्रहालयातला मस्तानीमहाल काय सुंदर होता ना? ....बरी आहे तशी... हो ना?"
"अहो हे आईसक्रीम आहे, मस्तानी नाही. पेशव्यांची पण नाही आणि कावरेंची पण नाही."
"मी मस्तानीबद्दल बोलत नाहीये गं....वितळलं...."
"वितळणारच...आगीजवळ लोणी ठेवलं तर वितळणारच ना? चला बरं इथून. दुसरीकडे जाऊ."
"अगं मी आईसक्रीमबद्दल बोलतोय....ती पुष्करिणी किती सुंदर असेल नाही? पेशवे त्या पुष्करिणीकडे बघत बघत भोजनाचा आस्वाद घेत असत...अरे आवरा यांना....अरे लग्नानंतर काही ठेवाल की नाही?..."
"तुम्हाला कशाला त्यांच्या लग्नाची चिंता....ती पुष्करिणी गंजली आता...इतकी वर्षं झालीत. आता चालणार ही नाही कदाचित..."
"गंजणारच...आणि खरी पुष्करिणी तर वर थुई-थुई नाचते आहे...चला जाऊ घरी...जातांना जेलुसिल घ्यायची आठवण ठेव. अॅसिडिटी झालीये खूप...करपट ढेकर येतायत..."
शेवटी तिथून आम्ही निघालो. जिकडे बघावं तिकडे असे हे रोमँटिक सिनेमे जोरात चालू होते. काहीतर चक्क 'ए' सर्टिफिकेट घेऊन सुरु होते की काय अशी शंका मनाला चाटून गेली. शनिवारवाड्यात प्रवेशाआधी ज्यादा शुल्क भरून असे सर्टिफिकेट देत असतील असे एक क्षणभर वाटून गेले. काही लोकं जे खरच शनिवारवाड्याचा इतिहास जाणून घ्यायचा या सात्विक हेतूने आले होते ते बिचारे ओशाळे होत होते.
आपल्या इथे सार्वजनिक बागा म्हणजे प्रेम करण्याची हक्काची जागा असे समीकरणच झालेले आहे जणू. जसं मोठे क्रीडासोहळे किंवा मोठी शासकीय कंत्राटे म्हणजे राजकारण्यांची हक्काची कुरणे झालेली आहेत तसंच काहीसं हे आहे. राजकारण्यांचं कसं असतं; जनतेने कितीही आरोप केले, न्यायालयाने कितीही कान उपटले तरी आम्ही निर्लज्जपणा आणि खूर्ची सोडणार नाही, तसच या युगुलांचं असतं. कुणी बघा, लाजा, किंवा बघू नका, आम्ही आमच्या प्रेमाच्या पुष्करिणी खुलेआम जिवंत ठेवणार. क्या सही, क्या गलत, दुनिया गेली तेल लावत!!!
याद्या
8665
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
असे उघड्यावर अस्ले प्रदर्शन
१००% सहमत.....
१००% सहमत.....
असं काहीही नाही!!
ध्येय
In reply to असं काहीही नाही!! by सूर्यपुत्र
काही अत्यंत किळसवाणे प्रतिसाद
मचाक..
In reply to काही अत्यंत किळसवाणे प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to काही अत्यंत किळसवाणे प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
मचाक.......!!!
हल्ली...
In reply to मचाक.......!!! by आम्हाघरीधन
तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात
नान्या....
In reply to तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात by अवलिया
तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात
In reply to तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात by अवलिया
बाकी शिल्लक महाराष्ट्रानं
In reply to तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात by यकु
बाकी शिल्लक महाराष्ट्रानं
In reply to बाकी शिल्लक महाराष्ट्रानं by विजुभाऊ
खिलाफ नाही
In reply to तुम्ही पुढाकार घेऊन पुण्यात by अवलिया
अश्या सिन्सबद्धल त्यामधील
हाहाहा!
In reply to अश्या सिन्सबद्धल त्यामधील by मराठे
एकदम मजेशीर
In reply to अश्या सिन्सबद्धल त्यामधील by मराठे
काही न बोलता पॉपकॉर्न वगैरे
In reply to अश्या सिन्सबद्धल त्यामधील by मराठे
ई काय त्यात....पिच्चरच्या
In reply to काही न बोलता पॉपकॉर्न वगैरे by रेवती
हो तर... काही वर्षांपुर्वी
In reply to ई काय त्यात....पिच्चरच्या by शिल्पा ब
हाहाहा
In reply to हो तर... काही वर्षांपुर्वी by सविता
तरी सांगत होतो डान्रावला
In reply to हो तर... काही वर्षांपुर्वी by सविता
होंडा सिटी, डान्राव,
In reply to तरी सांगत होतो डान्रावला by अवलिया
मुन्नाभाई फॉर्म्युला झकास
In reply to अश्या सिन्सबद्धल त्यामधील by मराठे
वैयक्तिक प्रश्न
In reply to अश्या सिन्सबद्धल त्यामधील by मराठे
लंडनच्या कुठल्याशा बागेत
लाज
In reply to लंडनच्या कुठल्याशा बागेत by विंजिनेर
<<कुणाला बाईकवर पाठ आणि कंबर
In reply to लाज by समीरसूर
हा हा हा कसं असतं अमृत स्वतः
In reply to <<कुणाला बाईकवर पाठ आणि कंबर by शिल्पा ब
: : ईश्श गडे!!!
In reply to हा हा हा कसं असतं अमृत स्वतः by अवलिया
हाहाहा...
In reply to <<कुणाला बाईकवर पाठ आणि कंबर by शिल्पा ब
..जातांना जेलुसिल घ्यायची
जोपर्ञंत मला चाण्स मिळत नाही
७ च्या आत घरात
पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व
पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व
In reply to पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व by इंटरनेटस्नेही
लॅपटॉप वरुन इंटरनेट कनेक्शन
In reply to पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व by परिकथेतील राजकुमार
असेच म्हणणार होतो पण
In reply to पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व by परिकथेतील राजकुमार
मि तर बोल्तो, टोपी पन द्यायला
In reply to असेच म्हणणार होतो पण by नगरीनिरंजन
जरुर पण...
In reply to मि तर बोल्तो, टोपी पन द्यायला by नरेशकुमार
आवरा ...
In reply to पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व by इंटरनेटस्नेही
'प्रेम कक्ष' ...
In reply to पुणे शहरात तसेच राज्यभर सर्व by इंटरनेटस्नेही
दुसरी बाजु ...
तुम्हीच मांडा तुमची बाजु...
In reply to दुसरी बाजु ... by छोटा डॉन
नंतर ...
In reply to तुम्हीच मांडा तुमची बाजु... by अवलिया
सहमत.
In reply to दुसरी बाजु ... by छोटा डॉन
पण इन जनरल शारिरीक जवळीक ही
In reply to दुसरी बाजु ... by छोटा डॉन
पूर्वीच्या काळी (.पूर्वी
In reply to पण इन जनरल शारिरीक जवळीक ही by राजेश घासकडवी
तक्रार नाही
In reply to पण इन जनरल शारिरीक जवळीक ही by राजेश घासकडवी
बंधनांना विरोध नाही...
In reply to तक्रार नाही by समीरसूर
कल्पना आवड्ली(आयडिया)
आपली लहान मुले बरोबर असताना
मग त्यांना खरे काय ते सांगुन
In reply to आपली लहान मुले बरोबर असताना by रेवती