किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका
कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!!
जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
अनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!!
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!
शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही
भगत-बापुंना माहित नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय ...!!
.
.
गंगाधर मुटे
......*.......*......*......*......*......*.......*......*......*......
इसम = व्यक्ती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3080
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त ...
हॅहॅहॅहॅहॅहॅहॅ
स्वाभिमान नावाचा इसम,
सुंदर
सुंदर
शॉलिट्ट...
जबरा!
जळजळीत अंजन
मनोबळ वाढविल्याबद्दल
धारदार सुरीसारखी थंड आणि
भारी
अगदी अस्सल 'सावजी' कविता
सावजी म्हन्जे काय ? आनि
In reply to अगदी अस्सल 'सावजी' कविता by सुधीर काळे
सावजी चिकन
In reply to सावजी म्हन्जे काय ? आनि by नरेशकुमार
आभार.
झणझणीत!!! अतिशय रोखठोक आहे
सहमत आहे
In reply to झणझणीत!!! अतिशय रोखठोक आहे by प्राजु
नेहमीप्रमाणेच, मनापासून
मातोश्री
व्वा.....! एकदम दमदार
मस्त कविता.
सोलिड