Skip to main content

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 26/11/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!! जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही अनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!! राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!! शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही ’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही भगत-बापुंना माहित नव्हते, अर्थ निघणार असाही मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय ...!! . . गंगाधर मुटे ......*.......*......*......*......*......*.......*......*......*...... इसम = व्यक्ती
लेखनविषय:

वाचने 3100
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

धारदार सुरीसारखी थंड आणि चरचरीत सत्य मांडणारी मस्त कविता. अगदी आतून उमटल्यासारखी सहज आणि लयबद्ध आहे. अजून येऊ द्या असे कसे म्हणू?

गंगाधर-जी, कविता हा आपला प्रांत नव्हे. क्वचितच मी कवितांच्या वाटेला जातो. पण यात Son of India चा ('भारतपुत्रा'चा) उल्लेख होता म्हणून कुतुहलाने ही कविता वाचली. अगदी अस्सल 'सावजी' कविता आहे! सुंदर!! (नागपुरात अनेक नकली 'सावजी' आहेत असे माझे नागपूरचे सहकारी मला म्हणतात!) उलटून गेल्या पिढ्या तरी, लाळ घोटणे सरत नाही स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलई-साय वा, वा! शेवटी एक प्रश्न पडतो: इथे 'पूतना'मावशी कोण?

In reply to by सुधीर काळे

सावजी म्हन्जे काय ? आनि 'सावजी' कविता म्हन्जे काय ? क्रुपया प्लिज. सान्गा.

In reply to by नरेशकुमार

सावजी चिकन फ़ारच तेज आणि तडकेदार असते, अशी ऐकीव माहीती आहे. तोच संदर्भ असावा बहूतेक. :) जाणकारच यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

नेहमीप्रमाणेच, मनापासून लिहिलेली आणि एकदम परफेक्ट.. तुमच्या कवितांमधे ताकदवान शब्द तर असतातच पण ओळी म्हणतानाही यमके, वृत्ते वगैरे एकदम मस्त चपखल असतात. ती वाघास दात नाही कविता अजून विसरलो नाही..

राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!! "मातोश्री"चे उत्तम वर्णन!