लेख आवडला,
पण परिस्थिती काही वेगळी आहे आज. प्रामाणिक राहून दोन घटका सुद्धा राहू शकत नाही माणूस.
परमपूज्य रिमोटचे खेळणे देशाशी प्रामाणिक नाही. बाकी त्याची पिल्लावळ बद्दल बोलायलाच नको.
आज,
जगातून जवळ जवळ हद्दपार होत असेलेला गुण,
ज्याच्या अंगी असेल त्याचाच नाश करणारा गुण,
आजच्या युगातील सर्वात मोठा दुर्गुण : प्रामाणिकपणा.
धन्यवाद,
भारत माझा देश आहे, हि सर्व भारत मातेची मुले आहेत, म्हणून सर्व माझे बंधू भगिनी आहेत अशी निदान मी तरी शप्पथ घेतलेली मला आठवते.
(कृपया वैयक्तिक घेऊ नये हि नम्र विनंती)
आणि काय हो, कुटुंब म्हणजे काय आपली बायका पोरेच का ? प्रामाणिक राहायचंच असेल तर संपूर्ण जगाशीच राहू ना. काय हरकत आहे का ? मूळ लेख मला आवडलाच, पण त्याच्या मधील भावना केवळ आपली मुले आणि आपल्या बायका इतपतच का मर्यादित ठेवायच्या ?
असो, हे माझे वियाक्तिक विचार आहेत. इतरांनी असे वागलेच पाहिजे असा हट्ट नाही.
आणि काय हो, कुटुंब म्हणजे काय आपली बायका पोरेच का ? प्रामाणिक राहायचंच असेल तर संपूर्ण जगाशीच राहू ना. काय हरकत आहे का ?
आपली बायकापोरं, आपली भावंडं, एकंदरीत आपलं कुटुंब यांच्याशी इतर सामान्य समाजापेक्षा अधिक जवळिकीने वागण्याची, त्यांच्यासाठी प्राणार्पणालाही तयार असण्याची प्रवृत्ती सजीवामंध्ये दिसते. हे उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आपल्यात घोटवलेलं आहे. इथे वाचा.
परुळेकरांच्या विचारांशी सहमत आहे. मुलांना प्रामाणिक पणे सांगणं चांगलं. अर्थात लेखामध्ये दिलेल्या उदाहराणांवरून ही मुले १३ -१४ वर्षांपेक्षा मोठी असावी असा अंदाज. त्याप्रमाणे त्यांना बर्यापैकी समज आलेली असते हे पटतं. त्यांच्यात होणार्या/होऊ लागलेल्या / झालेल्या बदलांमुळे आपण मोठे होत आहोत अशी भावना हळुहळु मनात येऊ लागलेली असते.
या काळात पालकांचे आजार, किंवा इतर, आजवर न सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्याने त्यांना परिस्थिती ची जाणीव चांगल्या प्रकारे होऊ शकते असं वाटतं. उलट अशा गोष्टी लपवल्या तरी कधी ना कधी सत्य समोरे येतेच, पण मग त्यावेळी ते पचवणे नक्कीच अवघड जाऊ शकते.
संपूर्णतः मान्य.
सर्वच विषय सहजपणे सांगता येतील असं नाही. पण गोष्टी सांगायला हव्यात जमतील तशा. शक्यतो तशाच्या तशा.
मग बाहेर जाऊन त्यांनी ते ज्ञान चार लोकांत दाखवलं (दाखवणारच..!!) आणि आपली सो कॉल्ड छी थू झाली (हे भलतं ज्ञान खुद्द बापाने शिकवलं असल्या लहान वयात? काय आचरट आहेत पालक..) तर ते कणखरपणाने घ्यावं. ही मनाची तयारी आधीपासूनच हवी. तिथे उदास होऊ नये.
मी कसा आलो? विचारलं तर काय सांगावं ? जसंच्या तसं शक्यतो?
"पोटातून.."
मग पोटात कसा गेलो.. ? वगैरे "कॉन्सीक्वेन्शियल डॅमेजेस :-) " उत्तरात कव्हर करता येतील का?
सर्वांनाच विचारतो.
प्रतिक्रिया
मस्त लेख ! आवडला !
मलाही
१००% सहमत.
लेख आवडला, पण परिस्थिती काही
इतरांशी नाही तर स्वतःच्याच
धन्यवाद, भारत माझा देश आहे,
आणि काय हो, कुटुंब म्हणजे काय
<<<सर्व माझे बंधू भगिनी आहेत
+१
परुळेकरांच्या विचारांशी सहमत
संपूर्णतः मान्य.सर्वच विषय