रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा,
तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा
मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा.
अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा.
वनवास या सुखाचा मी विरहात साहीला,
स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला,
माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा,
दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा.
होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती,
लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती,
नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता,
ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता.
होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची,
गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची,
आली प्रचंड भरती मग उधान सागराला,
गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1939
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा..
धन्यवाद
अतिषय सुंदर काव्य .. आवडले
धन्यवाद
छान
"वृत्तावर थोडी मेहेनत घेतली
In reply to छान by राजेश घासकडवी
असेच म्हणतो
In reply to छान by राजेश घासकडवी
वृतांची माहीती अंतरजालावर
In reply to छान by राजेश घासकडवी