किनारा
लेखनविषय:
काव्यरस
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा,
तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा
मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा.
अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा.
वनवास या सुखाचा मी विरहात साहीला,
स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला,
माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा,
दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा.
होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती,
लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती,
नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता,
ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता.
होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची,
गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची,
आली प्रचंड भरती मग उधान सागराला,
गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.
वाचने
1939
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
खूपच छान !
होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची,
गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची,
आली प्रचंड भरती मग उधान सागराला,
गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.
सुरेख कविता .
धन्यवाद मनीषा.
अतिषय सुंदर काव्य ..
आवडले मनापासुन
धन्यवाद
कविता आवडली. गोंडस व काहीशा एकसुरी प्रेमकाव्यांपेक्षा जिवंत शृंगाराच्या अनुभवाचं चित्रण केलेलं आहे. असेच धीटपणे विषय हाताळत राहा.
वृत्तावर थोडी मेहेनत घेतली तर नादमयता वाढून या कवितेला अधिक बहार येईल.
In reply to छान by राजेश घासकडवी
"वृत्तावर थोडी मेहेनत घेतली तर नादमयता वाढून या कवितेला अधिक बहार येईल."
अगदी मनापासुन मान्य, वृत्त शाळेत असताना, ऑप्शनला टाकले होते, आता शिकायला लागेल....
हा विषय मांडायचा बराच काळ मनात होत, थोडासा संकोच होता.. पण शेवटी धाडस केल.
In reply to छान by राजेश घासकडवी
(सहमत)बेसनलाडू
In reply to छान by राजेश घासकडवी
वृतांची माहीती अंतरजालावर मीळेल का?
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा..