Skip to main content

अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...

लेखक अवलिया यांनी रविवार, 28/11/2010 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
खरोखर जी गोष्ट स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या करायला हवी होती ती निदान ६० वर्षांनी का होईना केली आहे. अंदमानमधील माहिती पुस्तकातुन विनायक दामोदर सावरकर हे नाव काढुन टाकले आहे. http://www.esakal.com/esakal/20101126/5636616269938258697.htm ह्याबद्दल आम्ही मायबाप सरकारचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने आमच्या काही मागण्या आहेत १) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे २) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी ३)तिथला तो तथाकथित तुरुंग जमीनदोस्त करुन तिथे शेळीपालन केंद्र व बोकड पैदास केंद्र चालु करावे ४) भारतातील इतिहासाच्या पुस्तकातुन सावरकर तसेच इतर सर्व क्रांतीकारक ( खरे तर हे स्वतःच्याच फायद्यासाठी लढले, पण आव मात्र देशप्रेमाचा !) यांची नावे काढुन टाकावीत. थोडक्यात इतिहासाचे पुनर्लेखन करावे ५) भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवावा. मागच्या सर्व खुणा पुसुन टाकाव्या. त्यासाठी रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे ६) शनीवार वाडा जमीनदोस्त करावा या व अशाच अनेक मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी आमची इच्छा आहे

वाचने 14196
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

सकाळीच वाचलेले आणि फेसबुक स्टेटसला डकवलेले 'If pro is the opposite of con, is progress the opposite of congress? (Richard Lederer)' हे वाक्य आठवले.

'If pro is the opposite of con, is progress the opposite of congress? आवडले.

.........त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला नाही...... घोटाळा हा झाला की सावरकर विज्ञननिष्ट होते हे खरे पण दुर्दैवाने त्यांचा हिदुत्ववाद विज्ञाननिष्ट तत्त्वावर आधारीत नव्हता. समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही. हा विरोधाभास समजला नाही तर सावरकर समजणे कठीण.

In reply to by अविनाश कदम

सावरकर विज्ञननिष्ट होते हे खरे पण दुर्दैवाने त्यांचा हिदुत्ववाद विज्ञाननिष्ट तत्त्वावर आधारीत नव्हता
मग नक्की कशावर आधारलेला होता? स्पष्टीकरण केल्यास चांगले होईल.
समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही.
हीच तर मोठी गफलत आहे ना.कारण हिंदू धर्म म्हणजे काय याची एक व्याख्या नाही. विविध आचारविचारांचे, रूढीपरंपरांचे लोक एकाच वेळी हिंदू असू शकतात. म्हणजे उपास,पूजाअर्चा, श्राध्दपक्ष आणि विविध कर्मकांडे करणारे पण हिंदूच आणि माझ्यासारखे कर्मकांडामध्ये विश्वास न ठेवणारेही हिंदूच. सिध्दीविनायकाची पूजा करणारे पण हिंदूच आणि मरिआईची पूजा करणारे आदिवासी पण हिंदूच. ख्रिस्ती लोकांमध्ये येशू ख्रिस्त आपल्या पापांकरता क्रुसावर चढला हे मान्य नसेल तर तो मनुष्य ख्रिस्ती असू शकत नाही कारण तो ख्रिस्ती धर्माचा मूळ विश्वास आहे.पण हिंदूंमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी केली अथवा केली नाही तर तो मनुष्य हिंदू नाही. अर्थात यात काहीही वावगे नाही. मी वैयक्तिक पातळीवर याच aproach चे समर्थन करतो. पण यातून होते काय की हिंदू म्हणजे नक्की कोण आणि हिंदुत्व म्हणजे नक्की काय याची स्पष्ट व्याख्या करता येत नाही. तेव्हा या सगळ्या जंजाळात सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या म्हणजे "दक्षिणेतील समुद्रापासून उत्तरेतील हिमालयापर्यंत पसरलेल्या या भारत देशाला जो आपली पित्रुभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू". त्या अर्थाचा संस्कृत श्लोकही आहे. आणि त्यापुढे जाऊन हिंदूंनी विज्ञान हाच धर्म मानावा असे त्यांचे मत. म्हणजे कर्मकांडांना फाट्यावर मारावे.सावरकरांची सत्यनारायण पूजा, गाईची पूजा यावरील मते तर प्रसिध्दच आहेत आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधील विचार भल्याभल्यांची भंबेरी उडवतील असेच आहेत. तरीही सर्वसमावेशक हिंदू परंपरेप्रमाणे एकाही देवाची मूर्तीस्वरूपात पूजा केली नाही, एकही कर्मकांड केले नाही,विज्ञानालाच धर्म मानले तरी असे करणारा सुध्दा हिंदू म्हणूनच स्वत:ला म्हणवून घेऊ शकतो आणि विज्ञाननिष्ठ लोक दिसले तर विटाळ होऊन अंघोळ करणारे सुध्दा हिंदूच. तेव्हा "समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही" असे म्हणताना कोणते "हिंदुत्व" तुम्हाला अपेक्षित आहे? कारण या वाक्यातच मुळात विसंगती वाटते.

In reply to by क्लिंटन

एक लक्षात घेतले पाहिजे कि हिंदू धर्म इतरांसारखा कोता नाही...अमुक एक केले कि मी हिंदू असे किंवा उलटे असे नाही.. ज्या काही रूढी, कर्मकांडे आहेत ती त्या त्या समूहाने स्वतःची रोजी रोटी चालू राहावी म्हणून सुरु केलेत असे जाणवते. अमुक एकाच देवाची पूजा करा, अमकेच कपडे करा...इतर देवांची पूजा केली तर धर्मातून बाहेर हे प्रकार आपल्यात नाहीत..हिंदू धर्म खूप ओपन आहे... अभ्यासू माझे म्हणणे कदाचित व्यवस्थित मांडू शकतील.

In reply to by अविनाश कदम

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०) 'हिंदू' शब्दाची उत्पत्ती ... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५) हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६) हिंदू शब्दाची व्याख्या आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५) सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४) हिंदुधर्म 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३) स्वा.सावरकरांचे विचार समजुन घेण्यासाठी समग्र सावरकर वाङमय वाचावे असे मला वाटते.

In reply to by नितिन थत्ते

आणि हे पण... ;) स्वगतः पर्यावरण विषयात काम करता करता स्वतःचे प्रतिसाद पण रिसायकल/रियुज करता येऊ लागले आहेत... ;)

In reply to by विकास

आणि या "दुव्या"च्या खालचे प्रतिसादही वाचावे.

In reply to by डावखुरा

माझ्या आठवणीप्रमाणे "आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभू: पितृभू पुण्यभूश्चैव सरैव हिंदूरिती स्मृत:" चू.भू.दे.घे. पण श्लोकाचा अर्थ वर दिल्याप्रमाणेच आहे आणि ते जास्त महत्वाचे.

In reply to by क्लिंटन

हाच तो श्लोक आहे. मला वाटते सावरकरांनीच तो रचला होता. त्या संदर्भातील थोडक्यात प्रतिसाद येथे पाहू शकता...

In reply to by सुधीर काळे

तो श्लोक "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि" असा आहे अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ॥ असे राम लक्ष्मणाला म्हणतो..