Skip to main content

यातील कोणता ईंग्रजी शब्द तुम्ही जास्त वापरता?

लेखक pramanik
Published on गुरुवार, 11/11/2010

याद्या 1739
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

goddamn, fcuk, hell, असे फक्त स्लँगच वापरतो जास्त. :D ह्यावरुन तुम्ही कोणता तौलानिक अभ्यासाचा लेख लिहिणार?

In reply to by सूड

पुर्वी जेंव्हा चाळीत रहात असे आणि सकाळी सकाळी रांग लावावी लागत असे तेंव्हा................... मी (बाहेरुन काकुळतीस येउन): अरे tension आले आहे! आतुन (खेकसल्याचा स्वर) : काय problem आहे? मी (आर्जवी स्वरात) : खुप pressure आले आहे! आतुन (उपकारक हुंकार) : ok,ok मी (आतील इसम बाहेर आल्यावर) : sorry,thank you,bye

In reply to by अडगळ

cheers! (काही वेळा, खरंतर अनेक वेळा thank you ऐवजी cheers म्हणते)

प्रेशर आले असेल तर प्रेशर वापरतो, प्रेशरच्या ठिकाण मोकळं नसेल तर मग टेन्शन येते. मग मी जाउन विचारतो काय प्रॉब्लेम आहे, सकारात्मक उत्तर आली की ओके ओके म्हणतो, प्रॉब्लेम कळला नाही तर सॉरी म्हणतो, प्रॉब्लेम सुटला तर थँक यु म्हणतो, आत जायची संधी मिळाली की बाय म्हणतो ... पण जर का संधी नाही मिळाली तर... असो ते वरती कौलात नसल्याने इतर!

वैताग येणारे लोक अन लिखाण दिसले कि " गप बसा जरा" थोडक्यात " बी क्वाएट" हे वापरते....आजकाल फारच वापरावे लागतेय :-(

सॉरी, थँक्यू, बाय ला मत दिले आहे. त्याशिवाय हाय आणि हॅलो पण म्हणते पण तो पर्याय नाहीये दिलेला. त्यासाठी इतर.

फ आणि शि वरून चालू होणारे उच्चार असलेले दोन इंग्रजी शब्द जास्त वापरले जातात. त्यामुळे 'इतर' ला मत दिले आहे. (शिवराळ)बेसनलाडू

हा कौल पाहून शब्द मोजून मापून वापरावे असे जाणकार म्हणतात त्याचे महत्त्व कळले. 'मोजून', 'मापून' शब्द वापरले की कोणता शब्द जास्त वापरतो याचे उत्तर अचूक देता येते. :) तसे नसल्याने इतर या पर्यायाला मत दिले आहे. :)

ऍक्चुली ह्यापैकी मी कोणताच शब्द जास्त युझ नाही करत.

सध्याचा आमचा हॉट शब्दः 'आय लव यू..' सकाळ-संध्याकाळ-रात्र.. पारायण करावे लागते.. नाहीतर शब्दांनी मारली जाते..