व्हिक्टर माईक सिएरा..
एक दोन दिवसांपूर्वीच (नवीन वर्ष सुरु व्हायला महिन्याहून जास्त असताना..) मला मिपावर डायरी भेट देण्यात आली. आमच्या हपीसात अजून क्लायंटसाठी डायर्या ऑर्डरही झाल्या नाहीयेत. ही एफिशियन्सी मिपामित्रांकडून आमच्या हपीसकडे कशी वळवावी याचा विचार करत होतो. पण आमच्या मिपामित्राने ही गंमत असून ती तशी चालतेच, आणि मी पोस्टे टाकत रहावीत अशी पोच मला दिल्याने मी आज पुन्हा एक कॉपी पोस्ट (स्वत:चीच टाकत आहे.)
कालच पोस्टे टाकणे बंद करत आहे असं म्हणूनही आज टाकतोय, यात प्रमुख उद्देश हा आहे की, मिपामित्राच्या या संदेशाचा स्वीकार मोकळेपणाने करून, आणि उगीच पराचा कावळा करुन आखडूपणा करण्याची माझी मनापासून इच्छा नाही हे दाखवणे आणि मिपा परिवाराचा सदस्य बनताना इथल्या गोष्टी समजून घेत जाणे.
परासाहेब..वाचा हेही आणि काढा मापं.. :-)
.......................................................................
"कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है.."
..मग झालंच सुरु ते सगळं.. ..
...परवा म्हणजे लिटरली परवा विमानात सीट आणि दीड वर्षाचं स्वमूल घट्ट पकडून बसलो होतो..
..खूप पूर्वी म्हणजे लिटरली खूप पूर्वी मी सेलम नावाच्या शहरात विमान उडवायला शिकलो होतो..
वैमानिक म्हणून नोकरी करण्यापर्यंत ते आलं नाही.. पण गाफील क्षणी सरकारनं चक्क मला प्रायव्हेट पायलट लायसेंस दिलं सुद्धा..
त्या वेळी विमान उडवणं हे एक वेड होतं.. छंद होता..आणि परिस्थितीनं मला त्यात करीअर करता आली नाही म्हणून त्यावेळी दुर्दैव ही वाटलं होतं..नुसती रिस्क असती तर घेतलीच असती.. घेतलीच होती..
..पण पैशाचं फार मोठ्ठं सोंग आणणं अशक्यच नव्हे तर मूर्खपणाचं असतं.. विशेषत: पैसे आई बापाचे असतात तेव्हा..आणि लो बजेट विमान प्रशिक्षण असं काही मजेशीर प्रकरण अस्तित्वात नसताना..
ते मरू दे.. पण खूप वर्षं इतरच फिल्डमधेनोकरी केल्यावर आता विचित्रपणे वाटतं की ही छान गोष्ट छान आठवण म्हणून राहिली आणि रोजचा कंपलसरी "जॉब" बनून गतरस (!!) झाली नाही हे बरंच..
एकट्यानं पहिल्यांदा विमान घेऊन उडणं म्हणजे "सोलो" ...
सोलो मिळणं म्हणजे प्रत्येक ट्रेनी पायलटचा मोक्ष क्षण..
पंधरा सोळा तास होतकरू शिक्षकांबरोबर उडून झाल्यावर मी "उपसोलो" झालो.. लिंबू टिंबू फ्लाईट इंस्ट्रक्टर बाजूला पडले आणि स्वत: म्हातारा मला सोलो चेकसाठी घेऊन जायला लागला..
म्हातारा खिडकीत बोटं घालून खाली बघत बसायचा.. आणि मला प्रसंगोपात्त मांडीवर फटके द्यायचा..
लहानशा जागेत इतर कुठे फटके देणं शक्य नव्हतं..
मी फ्लाईट कंट्रोल्स घट्ट पकडून बसायचो..स्ट्राँग होल्ड हवा..पाय ही रडर पेडलवर घट्ट रोवलेले.. एकच तारा समोर आणिक.....
..फटाक..
..म्हातारा माझ्या हातापायावर फटके मारायचा..आणि म्हणायचा "relax..लूज..व्हाय आर यू सो स्टिफ??"
"हँडल हर टेन्डरली.."
"हैव यू हँडल्ड अ सिक्स मंथ ओल्ड बेबी?? ट्रीट हर दॅट वे..!!"
बाळ हातातून निसटू नये इतकं घट्ट पकडायचं पण त्याच्या नाजुक अंगावर वळ पडतील इतकं घट्ट नाही..क्या बात है..
मधेच एकदा विक्षिप्त म्हातारा लांब कुठेतरी उडत उडत घेऊन गेला आणि मला डोळे बंद करायला लावले..
मग नुसतंच खूप उलटसुलट विमान उडवत राहिला..कोलांट्या मारल्यागत..नंतर म्हणतो कसा की आता डोळे उघड..
डोळे उघडले तर खाली मस्त हिरवागार सीन.. वा..!!
पण नाही.. माझं सुख तीन सेकंद टिकलं..
म्हातारा मला म्हणाला "नाऊ टेक मी बॅक टू एअरपोर्ट.."
मी ठार झालो.. मी कसलेच लँडमार्कस लक्षात ठेवले नव्हते..मी हरवलो होतो..
खूप अंदाजपंचे विमान हाकत एअरपोर्ट शोधायला लागलो..
खूप वेळानंतर धुरकट हवेतून लांबवर एक जमिनीचा भादरलेला पट्टा दिसला..
मी तोच रनवे असल्याचं प्रतिपादून तिकडे सरकू लागलो..
जवळ आल्यावर ती एक खाण किंवा फॅक्ट्री असल्याचं दिसलं..
म्हातारा चिडकट नजरेनं माझ्याकडे बघत बसला होता..
शेवटी मीच काहीतरी झापडिंग करून एअरपोर्ट शोधून काढला..खूप चेंगटपणानं..अर्ध्या एक तासानं..
"इफ द फ्युएल टँक वोज नॉट फुल , यू वुड हॅव डाईड टुडे.. !!"
म्हातारा शुभ वदला..
नंतर दोनच दिवसात म्हाताय्राला नवीन बाधा झाली..
पुन्हा दूर घेऊन गेला.. आणि पुन्हा मी खाली पसरलेला निसर्ग पाहण्यात गर्क झाल्याबरोब्बर अचानक त्यानं इंजिन बंद करून टाकलं.. मी फाटलो..
इग्निशन की काढून त्यानं शांतपणे खिशात टाकली..
म्हणाला.."इंजिन हँज फेल्ड..फ्लाय बॅक टू एअरपोर्ट.."
विमानाचं नाक झपाट्यानं जमिनीकडे झेपावायला लागलं..एकच इंजिनवालं छोटं विमान ते..
मला हादरलेला बघून त्यानं म्हटलं.."डू द एमर्जंसी चेक्स.."
मी मँन्युअलची पानं पालटू लागलो..राम राम राम..
म्हातारा म्हणाला.."विदाऊट इंजिन शी हॅज टर्न्ड इनटू अ ग्लायडर नाऊ..यू नीड टू कन्वर्ट युअर आल्टिट्युड़ इनटू डिस्ट्न्स..अँड यू मस्ट रीच एअरपोर्ट इन दैट डिस्ट्न्स..."
मग म्हाताय्रानं मला बाहेर बघायला सांगितलं..
जंगलातून कुठून तरी धूर वर येत होता..त्याच्या दिशेवरून वाय्राची दिशा कळली..
विमान कोसळायला सुरुवात झाली होती..आता त्या कोसळण्याचीच शक्ती वापरून मला कोसळण्यापासून वाचायचं होतं..
जीव वाचवण्याची वाट काढायला म्हाताय्रानं त्या दिवशी शिकवलं..
नंतर त्यानं मला सोलो ही दिला.. सोलो देण्याच्या दिवशी एअरपोर्टच्या वाटेवर त्यानं एका मंदिरात नमस्कार केला..(भयंकर जोखीम हो..!!)
थरथरत्या हातानं मी पायलट इन कमांड म्हणून पहिला फ्लाईट प्लॅन साईन केला..
प्रीफ़्लाईट चेक केला.. देह कॉकपिट च्या आत चढवला..
"सेलम ..विक्टर माईक सिएरा.."
"विक्टर माईक सिएरा..सेलम..गो अहेड.."
"सेलम.. विक्टर माईक सिएरा रिक्वेस्ट परमिशन फॉर सर्किट्स अँड लँडिंग ड्यूरेशन थ्री जीरो मिनिट्स..एन्ड्युरंस जीरो फोवर जीरो जीरो..वन ऑन बोर्ड.."
"विक्टर माईक सिएरा..सेलम..यू आर क्लीअर्ड फॉर सर्किट्स अँड लँडिंग..क्यू एन एच 1030..रनवे जीरो नाईनर..अलाईन रनवे अँड कॉल फॉर टेक ऑफ़.."
कधी रनवे वर आलो कळलंच नाही बाबा..
"विक्टर माईक सिएरा..सेलम..यू आर क्लीअर्ड फॉर टेक ऑफ़..क्यू एन एच 1030"
नंतर थ्रोटल आत दाबताना 108 BHP च्या लायकोमिंग इंजिनची ताकद हातात थरथरली..
टेक ऑफ़ नंतर ती ठरलेली टेकडी..खुणेची.. तिथे पोचेपर्यंत बरोब्बर हजार फूट चढून झालेले असतात..
..ती टेकडी आली की उजवीकडे वळायचं..
टेकडी आली तेव्हा आल्टिमीटर बघितला..
बाप्पा.. दोन हजार फूट चढलो इतक्यात ??
वळण्याची वेळ चुकली की..
च्यायला.. बरोबर.. म्हातारा नव्हता ना आज..वजन कमी झालं होतं..म्हणून...
आणि म्हातारा नाही म्हटल्यावर मी ही आत्ता आल्टिमीटर बघितला..? इतक्या वेळानं ?? बेफिकिरपणे..?
सतत बघत रहायला नको??
इथे माचोगिरीला जागा नाही..
".. देअर आर नो ओल्ड अँड बोल्ड पायलट्स.. द बोल्ड पायलट्स नेवर लिव्ह टू गेट ओल्ड.."
"..व्हेन देअर इज डाऊट देअर इज नो डाऊट.."
"युअर पॅसेंजर्स बिलीव्ह यू..."
"लुक एट द अल्टिमिटर..लुक एट द जायरो..लुक एट व्ही.ओ.आर..लुक एट कंपास..लुक एट ऑइल प्रेशर..लुक एट इंजिन टेंपरेचर..लुक एट होरायझन.."
नजर फिरत राहिली पाहिजे.. बी एलर्ट..
...आत्ता इंजिन बंद झालं तर कुठं उतरायचं? शेत ? नदी? मैदान..? बघत रहा.. बी एलर्ट कॅप्टन ..!!
म्हाताय्राची एकदम आठवण झाली..
मग पुढचं सर्व मस्त झालं..
विमान जमिनीजवळ येताना पडणाय्रा पोटातल्या खड्डयाच्या सूक्ष्म जजमेन्ट्वर लँडिंग केलं.. कापसागत.. अल्लाद..
इंजिन बंद केलं..उतरलो.. डोळे भरलेच होते..
इतर पोरांनी मला बाहेर काढून धुतलं.. कपडे फाडले.. जल्लोष केला..
म्हातारा विमानतळाच्या एप्रनवर येऊन उभा होता..
त्याचे पाय धरले..दुसरं काही सुचेना..
"नो नो.. डोंट शो युअर फीलिंग्स..कीप देम इन युअर हार्ट.." म्हातारा मला उठवत म्हणाला..
....
येस सर.!!
.....
येस सर.!!... मी आज कार चालवतानाही स्पीडोमीटर, इंजिन टेम्परेचर गेज आणि ऑइल इंडिकेटर आळीपाळीनं बघत राहतो..वेडं साहस करत नाही..
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झक्कास!
लैययययय भारी गवि. खुप वेगळ्या
एअरफोर्स बेसवर (सिव्हिल
आरे वाह्..मग तर लिहाच. होईल
मस्त हो गवि.
माय पॅसेंजर्स बिलीव्ह
माय पॅसेंजर्स बिलीव्ह
संस्कृत व्याकरण.....
केले.. धन्यवाद..
अत्युत्तम अनुभव! रोमांच उभे
हा खरी गवि टच. साला स्वतः
वेगळा आणि सुंदर लेख ...
वा,
थँक्स.. बादवे, VT-CMS असं
केवळ झक्कास!
मी या सगळ्यातून फार पूर्वी
धन्यवाद, हे चांगलेच आहे पण
स्टुडंट पायलट लायसन्स: (आता
छान लिहीलय. काहीतरी वेगळ.
लेख नेहमीप्रमाणेच
(विषय दिलेला नाही)
सही.. मस्तच लेख..
अतिसत्य... कथा नव्हे.. घटना,
gr8
दिलदारपणा आवडला.... लेखन तर
खूप धन्यवाद बिपिनजी..
गगनविहार....!!
मी पीपीएल वरच थांबलो. नंतर
झकास........
अतिशय रोमांचकारी व चित्रदर्शी
+१००
जबरा
मस्त
लै भारी
थरारक अनुभव
झक्कास!
नो डाऊट
छान लिहिलय.
अप्रतिम
वा!
झकास
लेख आवड्या साहेबजी
कडक !! (आर.टी.ओ. पास) शाहरुख
झकास लेख
सुरेख लेख
.
ते महत्वाचं नाही..त्याच्यामधे
मस्तच
सही रे भिडू..
लेख आवडला