✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व्हिक्टर माईक सिएरा..

ग
गवि यांनी
Fri, 11/26/2010 - 11:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13725 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

झक्कास!

पियुशा
Fri, 11/26/2010 - 12:00 नवीन
झक्कास!
  • Log in or register to post comments

लैययययय भारी गवि. खुप वेगळ्या

Dhananjay Borgaonkar
Fri, 11/26/2010 - 12:12 नवीन
लैययययय भारी गवि. खुप वेगळ्या प्रकारचे लेख लिहितात तुम्ही. तुम्हाला IAF ची काही माहीती असेल तर त्या बद्दल सुद्धा वाचायला आवडेल. सुखोई, मिग, मिराज, सुर्यकिरण फक्त नाव ऐकुन आहोत.
  • Log in or register to post comments

एअरफोर्स बेसवर (सिव्हिल

गवि
Fri, 11/26/2010 - 12:17 नवीन
एअरफोर्स बेसवर (सिव्हिल एअरलाईन ऑपरेशन्समधे) दीडेक वर्ष काम केलंय. तेव्हा या सर्वांशी जवळून संबंध आला. बघू, जमतंय का त्याविषयी काही..मुळात ते वाचनीय व्हायला पायजेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

आरे वाह्..मग तर लिहाच. होईल

Dhananjay Borgaonkar
Fri, 11/26/2010 - 12:22 नवीन
आरे वाह्..मग तर लिहाच. होईल आपोआप वाचनीय. भारतीय बनावटीची विमान, रशियन बनावट, फ्रान्स बनावट सगळ्यांबद्दल लिहा. बरीच माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त हो गवि.

मृत्युन्जय
Fri, 11/26/2010 - 12:16 नवीन
मस्त हो गवि.
  • Log in or register to post comments

माय पॅसेंजर्स बिलीव्ह

जागु
Fri, 11/26/2010 - 12:19 नवीन
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!! बापरे काही खर नाही तुमच्या मित्रांचे.
  • Log in or register to post comments

माय पॅसेंजर्स बिलीव्ह

गवि
Fri, 11/26/2010 - 12:24 नवीन
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!! बापरे काही खर नाही तुमच्या मित्रांचे. .................. माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी.. आणि "मित्रांचे"? ... "काही खरे नाही?" संदर्भ लागेना झालाय ताई..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

संस्कृत व्याकरण.....

सुधीर काळे
Fri, 11/26/2010 - 16:35 नवीन
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति.. पाहिजे! 'भवंति' हे अनेकवचनी रूप आहे. 'अनर्थः' हे एकवचनी आहे व 'अनर्था:' हे अनेकवचनी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

केले.. धन्यवाद..

गवि
Fri, 11/26/2010 - 16:50 नवीन
केले.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अत्युत्तम अनुभव! रोमांच उभे

नगरीनिरंजन
Fri, 11/26/2010 - 12:25 नवीन
अत्युत्तम अनुभव! रोमांच उभे राहिले अंगावर. गाडी चालवतानाही फाटणारे आम्ही विमानाच्या गोष्टी ऐकूनच/वाचूनच थरारतो. :-)
  • Log in or register to post comments

हा खरी गवि टच. साला स्वतः

विजुभाऊ
गुरुवार, 10/24/2013 - 19:36 नवीन
हा खरी गवि टच. साला स्वतः जगला असावा असा ल्हितो हा माणूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वेगळा आणि सुंदर लेख ...

गणेशा
Fri, 11/26/2010 - 12:25 नवीन
वेगळा आणि सुंदर लेख ... "वेड साहस करत नाही.." हे वाक्य ही खुप आवडले
  • Log in or register to post comments

वा,

स्वाती दिनेश
Fri, 11/26/2010 - 12:34 नवीन
व्हिक्टर माइक सिएरा आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments

थँक्स.. बादवे, VT-CMS असं

गवि
Fri, 11/26/2010 - 12:39 नवीन
थँक्स.. बादवे, VT-CMS असं माझ्या त्या सी-१५२ एअरक्राफ्टचं रजिस्ट्रेशन होतं. म्हणून कॉल साईन व्हिक्टर टँगो, चार्ली माईक सिएरा (इंटरनॅशनल फोनेटिक्स प्रमाणे). प्रत्यक्षात इतकी मोठी साईन प्रत्येक वेळी कोणी म्हणत नाहीत. V-MS इतका पार्ट घेऊन व्हिक्टर माईक सिएरा म्हणतात.. हे कदाचित तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल..तरीही उगीच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

केवळ झक्कास!

यशोधरा
Fri, 11/26/2010 - 12:52 नवीन
केवळ झक्कास! गवि, पायलट कोर्सबद्दल सविस्तर माहिती लिहाल का?
  • Log in or register to post comments

मी या सगळ्यातून फार पूर्वी

गवि
Fri, 11/26/2010 - 13:07 नवीन
मी या सगळ्यातून फार पूर्वी गेलोय. तेव्हा मी सगळे पेपर पास केले होते. ते त्यावेळी तरी खूप अवघड असायचे. ८०% पासिंग मार्क्स होते आणि बरेचजण तिथेच अडकायचे. आता सुलभ झाली असेल असे वाटतं. आर टी आर (रेडिओटेलेफोनी - एअरो) लायसेन्स ही त्यासाठी (कमर्शियल लायसेन्ससाठी) लागतं. त्याची परीक्षा प्रत्येक वेळी बदलत्या ठिकाणी (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई) असायची. त्यात दोन स्टेप्स असून तिथे पास होणे हे सी.ए. होण्यासारखं अवघड होतं. अजूनही आहे. म्हणून अनेक ट्राय मारून आणि चारीधाम हिंडून निराश झालेली पोरं यू के ला जाऊन (सोपी) परीक्षा देऊन ते लायसेन्स घेऊन येत असत. यू के चं इकडे मान्य आहे. परीक्षा मात्र दसपट सोपी आहे. मी सुदैवाने सर्वच बाबतीत इथेच आणि पहिल्या प्रयत्नातच पास झालो. पण पुढे या फिल्डला इतके वाईट दिवस आले की ज्याचे नाव ते. आता जोरात आहे म्हणेपर्यंत कोसळायला लागतं हे फिल्ड. इकॉनॉमी खूप सेन्सिटिव्ह आहे एअरलाईन बिझनेसची. कोर्स पूर्ण होईपर्यंत गणितं बदलून जातात. पूर्वी कमर्शियल लायसेन्स ५-६ लाखात होऊन जायचं. आता वीस लाख + लगेच नाही लागली नोकरी तर आपल्या खर्चाने ते लायसन्स जिवंत ठेवायला लागतं. क्लबमधेउड्डाण करत राहून.. मध्यमवर्गाचे काम नव्हे. ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद, हे चांगलेच आहे पण

यशोधरा
Fri, 11/26/2010 - 13:38 नवीन
धन्यवाद, हे चांगलेच आहे पण असे नाही. सगळी माहिती. कोर्स करण्यासाठी काय पात्रता हवी? शिक्षण किती हवं? किती काळाचा कोर्स आहे? वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्टुडंट पायलट लायसन्स: (आता

गवि
Fri, 11/26/2010 - 14:34 नवीन
स्टुडंट पायलट लायसन्स: (आता ही परीक्षा क्लबचे चीफ इन्स्ट्रक्टरच घेतात आणि लायसेन्स फ्लाईंग क्लबमधेच मिळतं. तोंडी परीक्षा किंवा लेखी, अ‍ॅज पर चीफ्'स चॉईस. कॉकपिट चेक (बसता येणे, सर्व उपकरणांपर्यंत हातपाय पोचणे इ.) | | प्रायव्हेट पायलट लायसन्स: -मेडिकल एक्झाम, पॅअनेलिस्ट डॉक्टरपैकी एकाकडून -पीपीएलचे पेपर्स अ)एअर नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन्स (कायदे) यांचा कंबाईन्ड पेपर. (८०% ला पास) ब) टेक्निकल (जनरल आणि स्पेसिफिक [उडवत असलेल्या मॉडेलचा]असे दोन पेपर) (८०% ला पास) क) एफ आर टी ओ एल (रेडिओचे लायसेन्स्. हल्ली परीक्षा क्लबमधेच होते.) ड)पन्नास तास उड्डाण. (सी १५२, सी १७२, पुष्पक, पायपर अ‍ॅझ्टेक किंवा तत्सम विमाने क्लब्जमधे असतात.) ई)तीस तास (लेटेस्ट चेक करावे लागेल) एकट्याने उड्डाण. (सोलो) फ)किमान दोन क्रॉसकंट्री उड्डाणे आणि आपला मूळ एअरपोर्ट सोडून दुसर्‍या एअरपोर्ट वर दोन फुलस्टॉप लँडिंग) ग) प्रत्यक्ष फ्लाईंगची टेस्ट (स्टॉल्स, रिकव्हरी आणी इतर मॅनूव्हर्स) | | कमर्शियल पायलट लायसन्स अ) सीपीएलचे पेपर्स एअर नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन्स (कायदे) यांचे सेपरेट पेपर्स (८०% ला पास) टेक्निकल - जनरल आणि स्पेसिफिक दोन पेपर्स ब) आर टी आर (रेडिओ लायसेन्स) वायरलेस प्लॅनिंग अँड को-ओर्डिनेशन विन्ग (दिल्ली) यांकडून. क)पीपीएलच्याच पुढे एकूण १५० तास उड्डाण. (पूर्वी भारतात २५० आवश्यक होते) ड) क्रॉस कंट्री, नाईट फ्लाईंग आणि इन्स्ट्रुमेंट फ्लाईंग (डोळ्यावर हूड लावून पूर्ण कॉकपिट इन्स्ट्रुमेंटस वर विसंबून फ्लाईंग, यांचे ठराविक तास) ई) फ्लाईंग टेस्ट. फ) उच्च दर्जाची मेडिकल टेस्ट (दिल्ली किंवा बेंगलोरच्या एरोस्पेस मेडिसिनच्या स्पेशल फॅसिलिटीत जाऊन्..प्रदीर्घ आणि अवघड..) | | मग बेसिक ट्रेनी पायलट्च्या नोकरीचा शोध. हल्ली मिळते असे ऐकतो. न मिळाल्यास स्वखर्चाने लायसन्स करंट ठेवणे. कार लायसन्ससारखं हे वीस वर्षं चालू राहात नाही. ते व्हॅलिड ठेवण्यासाठी ठराविक फ्लाईंग अवर्स दर वर्षी / सर्व लायसेन्स रिन्यू करत राहणे/ सर्व मेडिकल्स अद्ययावत करत राहणे.. आणि नोकरीत नंबर लागावा म्हणून अ‍ॅडिशनल मल्टिइन्जिन रेटिंग (किमान आवश्यक फ्लाईंग करून, प्रॉपेलरवाले बीचक्राफ्ट पायपर सेनेका आपल्या देशात किंवा एकदम जेट - बोईंग / एअरबस ( अर्थात परदेशात..) रेटिंगचा छाप आपल्या बेसिक सी पी एल वर मिळवणे या सर्वांची रनिंग कॉस्ट फार आहे. हुश्श दमलो टाईप करून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान लिहीलय. काहीतरी वेगळ.

स्पंदना
Fri, 11/26/2010 - 12:45 नवीन
छान लिहीलय. काहीतरी वेगळ.
  • Log in or register to post comments

लेख नेहमीप्रमाणेच

गांधीवादी
Fri, 11/26/2010 - 13:03 नवीन
लेख नेहमीप्रमाणेच मजेदार. अवांतर :
मी आज कार चालवतानाही स्पीडोमीटर, इंजिन टेम्परेचर गेज आणि ऑइल इंडिकेटर आळीपाळीनं बघत राहतो..वेडं साहस करत नाही.. माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!
'मी' आजही देश चालविताना 2G स्पेक्ट्रम, CWG, आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार, जागतिक भ्रष्टाचार इंडिकेटर यांच्याकडे ढुंकूनही बघण्याचे वेड साहस करत नाही.... माय हायकमांड बिलीव्ह मी..!!
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

गवि
Fri, 11/26/2010 - 13:09 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

सही.. मस्तच लेख..

Pearl
Fri, 11/26/2010 - 13:24 नवीन
सही.. मस्तच लेख. १दम इन्टरेस्टिंग. वाचायला सुरु केला की सम्पुर्ण वाचल्याशिवाय थांबावेसे वाटत नाही इतका उत्कंठावर्धक. सत्यकथा आहे ना?
  • Log in or register to post comments

अतिसत्य... कथा नव्हे.. घटना,

गवि
Fri, 11/26/2010 - 13:28 नवीन
अतिसत्य... कथा नव्हे.. घटना, अनुभव.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

gr8

Pearl
Fri, 11/26/2010 - 13:37 नवीन
wow. thats gr8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दिलदारपणा आवडला.... लेखन तर

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/26/2010 - 13:25 नवीन
दिलदारपणा आवडला.... लेखन तर झक्कासच!
  • Log in or register to post comments

खूप धन्यवाद बिपिनजी..

गवि
Fri, 11/26/2010 - 14:27 नवीन
खूप धन्यवाद बिपिनजी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

गगनविहार....!!

इन्द्र्राज पवार
Fri, 11/26/2010 - 13:44 नवीन
गगनविहारी यानी 'गगनविहारी' (च) हे नाव ब्लॉग सदस्यत्वासाठी का घेतले त्या मागील इतिहास या धाग्यामध्ये सापडतो. आज ते 'हवा हवाई' करीत आहेत की नाही याची कल्पना नाही पण मनाने ते त्या विश्वात किती रमले आहेत याची झकास प्रचिती त्यांच्या शब्दाशद्बातून येते. मला तर ते 'पायलट' पेक्षा त्या क्षेत्रातील एक चांगले 'लेक्चरर' वाटतात. इंग्रजी विषयाच्या पाचापैकी एकाच निष्णात लेक्चररची आम्ही आतुरतेने वर्गात वाट पाहात असे, इतके सुंदर प्रभुत्व होते त्यांचे इंग्रजी कवितेवर....असे वाटायचे की आता 'बेल' होऊच नये....कविता का शिकलो ते कवितेमुळे की त्या लेक्चररमुळे असे वाटे...त्याच चालीवर श्री.गगनविहारी यांच्यी लेखनीची जादू भासते....अगदी त्यांनी वाचकाला त्या गगनसफरीवर नेले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये. लुधियानाच्या सिव्हिल एरोड्रमशी अ‍ॅफिलिएशन असलेल्या लुधियाना अ‍ॅव्हिएशन क्लबमध्ये तुमच्यासारखाच एक मनोज बात्रा नावाचा माझा मित्र होता. तो SPL आणि PPL दोन्ही प्रमाणपत्रे ए ग्रेडमध्ये मिळवूनही आम्हा मित्रांना पार्टी द्यायला तयार नव्हता...म्हणायचा..."सालो, मन्ने फिक्र है CPL की, और क्रॉस कंट्री टेस्ट की....और तुम लोग बात कर रहे हो ओपनर की !" ~ त्यावेळी हे क्रॉस कंट्री काय समजले नव्हते....पुढे मनोजही ससेक्सला गेला व तो विषयही राहिला. शक्य झाल्यास या पायलट करीअरमधील क्रॉस कंट्री ट्रेंनिंगवरही थोडक्यात माहिती मिळावी...ग.विं.कडून. इन्द्रा (जाताजाता : तुमची सध्याची जी "स्वाक्षरी" ची Signature आहे...तीऐवजी ती "माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी" जास्त सूट होते तुम्हाला...!!)
  • Log in or register to post comments

मी पीपीएल वरच थांबलो. नंतर

गवि
Fri, 11/26/2010 - 14:11 नवीन
मी पीपीएल वरच थांबलो. नंतर एअरलाईनमधेच ऑपरेशन मॅनेजर टाईप नोकर्‍या केल्या. तेव्हा इन्डस्ट्रीचे वाईट दिवस होते. आता खूप वर्षे दुसर्‍याच फिल्डमधे आहे. आता तर मेडिकलही पास होईन की नाही शंका आहे. रिन्यू करायचं आहे पी पी एल्..छंद म्हणून फ्लाईंगसाठी .. बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

झकास........

सविता
Fri, 11/26/2010 - 13:49 नवीन
झकास........
  • Log in or register to post comments

अतिशय रोमांचकारी व चित्रदर्शी

इंटरनेटस्नेही
Fri, 11/26/2010 - 14:08 नवीन
अतिशय रोमांचकारी व चित्रदर्शी वर्णन.. आवडले! असेच लेखन येऊ देत, मिपा तुमच्या लेखनाने समृध्द होत आहे!
  • Log in or register to post comments

+१००

चिगो
Sat, 11/27/2010 - 13:26 नवीन
खुप मस्त... एकदम बढीया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

जबरा

प्रमोद्_पुणे
Fri, 11/26/2010 - 14:19 नवीन
एकदम मस्त..
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Fri, 11/26/2010 - 14:28 नवीन
मस्त अनुभव कथन!!
  • Log in or register to post comments

लै भारी

सोत्रि
Fri, 11/26/2010 - 15:06 नवीन
खुपच सुरेख लेखन. तुमच्या शैलीचा 'पंखा' झालेला....
  • Log in or register to post comments

थरारक अनुभव

नंदू
Fri, 11/26/2010 - 16:04 नवीन
अजुन एक सुंदर लेख. हल्ली लॉग ऑन केल्यावर तुमचं काही नविन लिखाण आलंय का ते आधि बघतो.
  • Log in or register to post comments

झक्कास!

प्राजक्ता पवार
Fri, 11/26/2010 - 16:10 नवीन
छान लिहलय .
  • Log in or register to post comments

नो डाऊट

निशांत५
Fri, 11/26/2010 - 16:15 नवीन
"नो डाऊट" थरारक...........व्हेन देअर इज डाऊट देअर इज नो डाऊट.....रोमांच उभे राहिले अंगावर.
  • Log in or register to post comments

छान लिहिलय.

रेवती
Fri, 11/26/2010 - 19:05 नवीन
छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

विलासराव
Fri, 11/26/2010 - 23:02 नवीन
झालाय हा लेख. तुम्ही लिहा हो आम्ही आहोतच वाचायला.
  • Log in or register to post comments

वा!

मृदुला
Sat, 11/27/2010 - 04:43 नवीन
लेख आवडला. रोचक झाला आहे. स्वमूल आणि गतरस शब्द आवडले. :)
  • Log in or register to post comments

झकास

निनाद
Sat, 11/27/2010 - 05:38 नवीन
ब्लॉगवर आधीच वाचले होते पण तरीही वाचायला मस्त वाटले. चित्रदर्शी संवाद आणि वाचकाला अलगद फिरवून आणणारेआणणारे... आवडले!
  • Log in or register to post comments

लेख आवड्या साहेबजी

jaypal
Sat, 11/27/2010 - 10:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कडक !! (आर.टी.ओ. पास) शाहरुख

शाहरुख
Sat, 11/27/2010 - 11:29 नवीन
कडक !! (आर.टी.ओ. पास) शाहरुख
  • Log in or register to post comments

झकास लेख

सुधीर काळे
Sat, 11/27/2010 - 12:13 नवीन
झकास लेख, गगनविहारी-जी! सांगलीत एक ’काव्यविहारी’ नावाचे कवी आमच्या आजोबांच्या वाड्यात रहायचे. त्यांचे खरे नांव बहुदा ’गद्रे’ असे होते! तुमच्या ’टोपणनाव’वरून त्यांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

उल्हास
Sat, 11/27/2010 - 19:24 नवीन
वाचताना पण माझे पाय लटपटले लगे रहो
  • Log in or register to post comments

.

मी-सौरभ
Sun, 11/28/2010 - 23:17 नवीन
सही लेख... त्या म्हातार्‍याच नाव काय होत?
  • Log in or register to post comments

ते महत्वाचं नाही..त्याच्यामधे

गवि
Mon, 11/29/2010 - 13:07 नवीन
ते महत्वाचं नाही..त्याच्यामधे "गुरु" आहे. नाव देऊन त्याला असा मातीच्या माणसांत आणून काय करु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मस्तच

समीरसूर
Mon, 11/29/2010 - 13:05 नवीन
खूप सही लेख. आणि वेगळा विषय. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सही रे भिडू..

धमाल मुलगा
Mon, 11/29/2010 - 13:32 नवीन
मजा आली वाजायला. एकदम कडक आहे हा अनुभव. आम्ही च्यायला, दुचाकीच्या परवान्यासाठीची परिक्षा देताना आरटीओसमोर फाफललो, विमानाची तर काय अवघड गोष्ट असते राव! :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सखी
Mon, 11/29/2010 - 22:50 नवीन
लेख आवडला, वाचायचा कसातरी राहुन गेला होता. अजुन वाचायला, माहीती करुन घ्यायला नक्कीच आवडेल त्यासाठी पुलेशु. इतक्या सगळ्या परीक्षांतुन, सगळे व्याप सांभाळून, तसेच खर्चिक मेळ घालुन - पायलेटला मिळणारे मानधन तुम्हाला योग्य वाटते का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा