लैययययय भारी गवि.
खुप वेगळ्या प्रकारचे लेख लिहितात तुम्ही.
तुम्हाला IAF ची काही माहीती असेल तर त्या बद्दल सुद्धा वाचायला आवडेल.
सुखोई, मिग, मिराज, सुर्यकिरण फक्त नाव ऐकुन आहोत.
एअरफोर्स बेसवर (सिव्हिल एअरलाईन ऑपरेशन्समधे) दीडेक वर्ष काम केलंय. तेव्हा या सर्वांशी जवळून संबंध आला.
बघू, जमतंय का त्याविषयी काही..मुळात ते वाचनीय व्हायला पायजेल..
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!
बापरे काही खर नाही तुमच्या मित्रांचे.
..................
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..
आणि
"मित्रांचे"? ... "काही खरे नाही?"
संदर्भ लागेना झालाय ताई..
थँक्स..
बादवे, VT-CMS असं माझ्या त्या सी-१५२ एअरक्राफ्टचं रजिस्ट्रेशन होतं.
म्हणून कॉल साईन व्हिक्टर टँगो, चार्ली माईक सिएरा (इंटरनॅशनल फोनेटिक्स प्रमाणे).
प्रत्यक्षात इतकी मोठी साईन प्रत्येक वेळी कोणी म्हणत नाहीत.
V-MS इतका पार्ट घेऊन व्हिक्टर माईक सिएरा म्हणतात..
हे कदाचित तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल..तरीही उगीच..
मी या सगळ्यातून फार पूर्वी गेलोय. तेव्हा मी सगळे पेपर पास केले होते. ते त्यावेळी तरी खूप अवघड असायचे. ८०% पासिंग मार्क्स होते आणि बरेचजण तिथेच अडकायचे. आता सुलभ झाली असेल असे वाटतं.
आर टी आर (रेडिओटेलेफोनी - एअरो) लायसेन्स ही त्यासाठी (कमर्शियल लायसेन्ससाठी) लागतं. त्याची परीक्षा प्रत्येक वेळी बदलत्या ठिकाणी (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई) असायची. त्यात दोन स्टेप्स असून तिथे पास होणे हे सी.ए. होण्यासारखं अवघड होतं.
अजूनही आहे. म्हणून अनेक ट्राय मारून आणि चारीधाम हिंडून निराश झालेली पोरं यू के ला जाऊन (सोपी) परीक्षा देऊन ते लायसेन्स घेऊन येत असत. यू के चं इकडे मान्य आहे. परीक्षा मात्र दसपट सोपी आहे.
मी सुदैवाने सर्वच बाबतीत इथेच आणि पहिल्या प्रयत्नातच पास झालो. पण पुढे या फिल्डला इतके वाईट दिवस आले की ज्याचे नाव ते.
आता जोरात आहे म्हणेपर्यंत कोसळायला लागतं हे फिल्ड. इकॉनॉमी खूप सेन्सिटिव्ह आहे एअरलाईन बिझनेसची.
कोर्स पूर्ण होईपर्यंत गणितं बदलून जातात.
पूर्वी कमर्शियल लायसेन्स ५-६ लाखात होऊन जायचं. आता वीस लाख +
लगेच नाही लागली नोकरी तर आपल्या खर्चाने ते लायसन्स जिवंत ठेवायला लागतं. क्लबमधेउड्डाण करत राहून..
मध्यमवर्गाचे काम नव्हे.
....
स्टुडंट पायलट लायसन्स:
(आता ही परीक्षा क्लबचे चीफ इन्स्ट्रक्टरच घेतात आणि लायसेन्स फ्लाईंग क्लबमधेच मिळतं. तोंडी परीक्षा किंवा लेखी, अॅज पर चीफ्'स चॉईस. कॉकपिट चेक (बसता येणे, सर्व उपकरणांपर्यंत हातपाय पोचणे इ.)
|
|
प्रायव्हेट पायलट लायसन्स:
-मेडिकल एक्झाम, पॅअनेलिस्ट डॉक्टरपैकी एकाकडून
-पीपीएलचे पेपर्स
अ)एअर नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन्स (कायदे) यांचा कंबाईन्ड पेपर. (८०% ला पास)
ब) टेक्निकल (जनरल आणि स्पेसिफिक [उडवत असलेल्या मॉडेलचा]असे दोन पेपर) (८०% ला पास)
क) एफ आर टी ओ एल (रेडिओचे लायसेन्स्. हल्ली परीक्षा क्लबमधेच होते.)
ड)पन्नास तास उड्डाण. (सी १५२, सी १७२, पुष्पक, पायपर अॅझ्टेक किंवा तत्सम विमाने क्लब्जमधे असतात.)
ई)तीस तास (लेटेस्ट चेक करावे लागेल) एकट्याने उड्डाण. (सोलो)
फ)किमान दोन क्रॉसकंट्री उड्डाणे आणि आपला मूळ एअरपोर्ट सोडून दुसर्या एअरपोर्ट वर दोन फुलस्टॉप लँडिंग)
ग) प्रत्यक्ष फ्लाईंगची टेस्ट (स्टॉल्स, रिकव्हरी आणी इतर मॅनूव्हर्स)
|
|
कमर्शियल पायलट लायसन्स
अ) सीपीएलचे पेपर्स एअर नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन्स (कायदे) यांचे सेपरेट पेपर्स (८०% ला पास) टेक्निकल - जनरल आणि स्पेसिफिक दोन पेपर्स
ब) आर टी आर (रेडिओ लायसेन्स) वायरलेस प्लॅनिंग अँड को-ओर्डिनेशन विन्ग (दिल्ली) यांकडून.
क)पीपीएलच्याच पुढे एकूण १५० तास उड्डाण. (पूर्वी भारतात २५० आवश्यक होते)
ड) क्रॉस कंट्री, नाईट फ्लाईंग आणि इन्स्ट्रुमेंट फ्लाईंग (डोळ्यावर हूड लावून पूर्ण कॉकपिट इन्स्ट्रुमेंटस वर विसंबून फ्लाईंग, यांचे ठराविक तास)
ई) फ्लाईंग टेस्ट.
फ) उच्च दर्जाची मेडिकल टेस्ट (दिल्ली किंवा बेंगलोरच्या एरोस्पेस मेडिसिनच्या स्पेशल फॅसिलिटीत जाऊन्..प्रदीर्घ आणि अवघड..)
|
|
मग बेसिक ट्रेनी पायलट्च्या नोकरीचा शोध. हल्ली मिळते असे ऐकतो.
न मिळाल्यास स्वखर्चाने लायसन्स करंट ठेवणे. कार लायसन्ससारखं हे वीस वर्षं चालू राहात नाही. ते व्हॅलिड ठेवण्यासाठी ठराविक फ्लाईंग अवर्स दर वर्षी / सर्व लायसेन्स रिन्यू करत राहणे/ सर्व मेडिकल्स अद्ययावत करत राहणे..
आणि नोकरीत नंबर लागावा म्हणून अॅडिशनल मल्टिइन्जिन रेटिंग (किमान आवश्यक फ्लाईंग करून, प्रॉपेलरवाले बीचक्राफ्ट पायपर सेनेका आपल्या देशात किंवा एकदम जेट - बोईंग / एअरबस ( अर्थात परदेशात..) रेटिंगचा छाप आपल्या बेसिक सी पी एल वर मिळवणे या सर्वांची रनिंग कॉस्ट फार आहे.
हुश्श दमलो टाईप करून..
मी आज कार चालवतानाही स्पीडोमीटर, इंजिन टेम्परेचर गेज आणि ऑइल इंडिकेटर आळीपाळीनं बघत राहतो..वेडं साहस करत नाही..
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!
'मी' आजही देश चालविताना 2G स्पेक्ट्रम, CWG, आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार, जागतिक भ्रष्टाचार इंडिकेटर यांच्याकडे ढुंकूनही बघण्याचे वेड साहस करत नाही....
माय हायकमांड बिलीव्ह मी..!!
गगनविहारी यानी 'गगनविहारी' (च) हे नाव ब्लॉग सदस्यत्वासाठी का घेतले त्या मागील इतिहास या धाग्यामध्ये सापडतो. आज ते 'हवा हवाई' करीत आहेत की नाही याची कल्पना नाही पण मनाने ते त्या विश्वात किती रमले आहेत याची झकास प्रचिती त्यांच्या शब्दाशद्बातून येते. मला तर ते 'पायलट' पेक्षा त्या क्षेत्रातील एक चांगले 'लेक्चरर' वाटतात. इंग्रजी विषयाच्या पाचापैकी एकाच निष्णात लेक्चररची आम्ही आतुरतेने वर्गात वाट पाहात असे, इतके सुंदर प्रभुत्व होते त्यांचे इंग्रजी कवितेवर....असे वाटायचे की आता 'बेल' होऊच नये....कविता का शिकलो ते कवितेमुळे की त्या लेक्चररमुळे असे वाटे...त्याच चालीवर श्री.गगनविहारी यांच्यी लेखनीची जादू भासते....अगदी त्यांनी वाचकाला त्या गगनसफरीवर नेले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये.
लुधियानाच्या सिव्हिल एरोड्रमशी अॅफिलिएशन असलेल्या लुधियाना अॅव्हिएशन क्लबमध्ये तुमच्यासारखाच एक मनोज बात्रा नावाचा माझा मित्र होता. तो SPL आणि PPL दोन्ही प्रमाणपत्रे ए ग्रेडमध्ये मिळवूनही आम्हा मित्रांना पार्टी द्यायला तयार नव्हता...म्हणायचा..."सालो, मन्ने फिक्र है CPL की, और क्रॉस कंट्री टेस्ट की....और तुम लोग बात कर रहे हो ओपनर की !" ~ त्यावेळी हे क्रॉस कंट्री काय समजले नव्हते....पुढे मनोजही ससेक्सला गेला व तो विषयही राहिला.
शक्य झाल्यास या पायलट करीअरमधील क्रॉस कंट्री ट्रेंनिंगवरही थोडक्यात माहिती मिळावी...ग.विं.कडून.
इन्द्रा
(जाताजाता : तुमची सध्याची जी "स्वाक्षरी" ची Signature आहे...तीऐवजी ती "माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी" जास्त सूट होते तुम्हाला...!!)
मी पीपीएल वरच थांबलो.
नंतर एअरलाईनमधेच ऑपरेशन मॅनेजर टाईप नोकर्या केल्या.
तेव्हा इन्डस्ट्रीचे वाईट दिवस होते.
आता खूप वर्षे दुसर्याच फिल्डमधे आहे. आता तर मेडिकलही पास होईन की नाही शंका आहे.
रिन्यू करायचं आहे पी पी एल्..छंद म्हणून फ्लाईंगसाठी .. बघू.
झकास लेख, गगनविहारी-जी!
सांगलीत एक ’काव्यविहारी’ नावाचे कवी आमच्या आजोबांच्या वाड्यात रहायचे. त्यांचे खरे नांव बहुदा ’गद्रे’ असे होते!
तुमच्या ’टोपणनाव’वरून त्यांची आठवण झाली.
मजा आली वाजायला.
एकदम कडक आहे हा अनुभव. आम्ही च्यायला, दुचाकीच्या परवान्यासाठीची परिक्षा देताना आरटीओसमोर फाफललो, विमानाची तर काय अवघड गोष्ट असते राव! :)
लेख आवडला, वाचायचा कसातरी राहुन गेला होता. अजुन वाचायला, माहीती करुन घ्यायला नक्कीच आवडेल त्यासाठी पुलेशु.
इतक्या सगळ्या परीक्षांतुन, सगळे व्याप सांभाळून, तसेच खर्चिक मेळ घालुन - पायलेटला मिळणारे मानधन तुम्हाला योग्य वाटते का?
प्रतिक्रिया
झक्कास!
लैययययय भारी गवि. खुप वेगळ्या
एअरफोर्स बेसवर (सिव्हिल
आरे वाह्..मग तर लिहाच. होईल
मस्त हो गवि.
माय पॅसेंजर्स बिलीव्ह
माय पॅसेंजर्स बिलीव्ह
संस्कृत व्याकरण.....
केले.. धन्यवाद..
अत्युत्तम अनुभव! रोमांच उभे
हा खरी गवि टच. साला स्वतः
वेगळा आणि सुंदर लेख ...
वा,
थँक्स.. बादवे, VT-CMS असं
केवळ झक्कास!
मी या सगळ्यातून फार पूर्वी
धन्यवाद, हे चांगलेच आहे पण
स्टुडंट पायलट लायसन्स: (आता
छान लिहीलय. काहीतरी वेगळ.
लेख नेहमीप्रमाणेच
(विषय दिलेला नाही)
सही.. मस्तच लेख..
अतिसत्य... कथा नव्हे.. घटना,
gr8
दिलदारपणा आवडला.... लेखन तर
खूप धन्यवाद बिपिनजी..
गगनविहार....!!
मी पीपीएल वरच थांबलो. नंतर
झकास........
अतिशय रोमांचकारी व चित्रदर्शी
+१००
जबरा
मस्त
लै भारी
थरारक अनुभव
झक्कास!
नो डाऊट
छान लिहिलय.
अप्रतिम
वा!
झकास
लेख आवड्या साहेबजी
कडक !! (आर.टी.ओ. पास) शाहरुख
झकास लेख
सुरेख लेख
.
ते महत्वाचं नाही..त्याच्यामधे
मस्तच
सही रे भिडू..
लेख आवडला