प्रकाश बजाज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुसखुशीत जाहीर पत्राचा परिचय!
प्रकाश बजाज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुसखुशीत जाहीर पत्राचा परिचय!
प्रकाश बजाज यांना कोण ओळखत नाहीं? मुंबई शिरकाणानंतर त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पहिल्या पत्राने ते स्वतः तर प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात तर आलेच पण त्यांनी "Word format" मध्ये लिहिलेल्या पत्राला खाली कुणीतरी जाणता-अजाणता ते टाइम्स ऑफ इंडिया चे सहसंपादक असल्याचे घुसवून दिले व त्यासाठी टाइम्सने त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरायची तयारी केली होती असे त्यांनीच मला सांगितले. त्यांना मी यापुढे pdf format मध्ये लिहीत जा असा सल्ला दिला तरीही हा पठ्ठ्या अजूनही Word format मध्येच लिहितो. आमची बर्यापैकी गट्टी जमली असून लवकरच आम्ही एकमेकांना भेटणार आहोत!
पहिल्या पत्रात त्यांनी "मी मुंबईचा शेकडों प्रवाशांसारखा लोकलने प्रवास करणारा एक छोटासा "मूषक" अशी स्वतःची ओळख करून देऊन सर्व राजकारण्यांची 'बिनपाण्याने' श्मश्रू केली होती. खाली दिलेले पत्र हे या मालिकेतील तिसरे पत्र आहे व पहिल्या पत्राइतकेच आपल्याला हसवता-हसवता आपले मन उद्विग्न करणारे आहे! (पहिली दोन पत्रे कुणाला वाचायची असल्यास मी ती इथे देऊ शकेन)
"१०० लोकांसाठी असलेल्या डब्यात ५०० माणसे कोंबलेल्या लोकलच्या डब्या"तून प्रवास करण्याचा कंटाळा आल्याची तक्रार करणारा हा एक छोटासा हा मूषक त्यांना म्हणतो कीं मला Congress मध्ये घ्या. पण Congress चे स्पेलिंग तो मूषक CON-GRACE असे करतो कारण काँग्रेसवाले सर्व CON करणार्यांना आपल्या पक्षात GRACEfully घेतात असे या 'उंदरा'ला वाटते! "माझा स्वभाव लोकांना गंडविण्याचा (CON करण्याचा) नसला तरी मी ते काम लगेच शिकेन" असे आत्मविश्वासपूर्वक आश्वासनही हा मूषक त्यांना देतो.
मग मी APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे स्वतंत्र वागणार नाही, नेमून दिल्यासारखा मी एक रबरी शिक्काच राहीन तरी मला राष्ट्रपती करा असा आग्रह मग तो धरतो! फक्त माझा पगार तिप्पट करा, माझ्या मुलाला काँग्रेसचे तिकीट द्या व माझ्या कुटुंबियांना बरोबर घेऊन परदेशी 'पिकनिक'ला जायला परवानगी द्या म्हणजे मग बाकी कांहीं नको अशी 'माफक' मागणीसुद्धा तो पंतप्रधानांना करतो.
"हे शक्य नसेल तर मला गृहमंत्री करा" असा आग्रह मग हा उंदीर धरतो. अतिरेक्यांचा हल्ला झाला तरी माझ्या कपड्यांच्या काळजीतच मी असेन अशी तो हमी देतो व राजीनामा द्यायला भाग पडल्यास "मला राज्यपाल करावे" असा हट्टही धरतो. "राज्यपाल होण्यासाठी लागणारी गांधी घराण्याशी असणारी एकनिष्ठता ही एकच अट माझ्याकडे आज नसली तरी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ती माझ्या रक्तात आपोआप खेळू लागेल" अशी हमीही तो देतो!
गृहमंत्रीपदही देण्यासारखे नसेल तर राष्ट्रकुल स्पर्धा भरविण्याचे काम तो मागतो. "मी हे काम पूर्ण्पणे लबाडीने करेन, टॉयलेट पेपर बाजारात मिळणार्या भावाच्या १००पट भावात खरेदी करून आपल्या पृष्ठभागाचीच नव्हे तर सार्या भारताची प्रतिमा "स्वच्छ" करण्यासाठी वापरण्याची हमीही तो देतो. शेवटी मला काँग्रेसमधून हाकलून दिल्यास मी खाल्लेले ७०,००० कोटी रुपये माझ्याकडून काढून घेऊ नयेत अशी विनंतीही तो पंतप्रधानांना करतो.
दिल्लीत नाहीं जमत? हरकत नाहीं! मला मग एकाद्या राज्यात महसूल मंत्री करा अशी गळ तो पंतप्रधानांना घालतो! गरीब मच्छीमारांसाठी राखून ठेवलेल्या भूखंडाचे दान श्रीमंत कंपन्यांना देऊन त्याचे श्रीखंड खायची त्याची तयारी आहे. "शंभरातले सत्तर मी खाईन व ३ रुपये गरीबांना देईन व बाकीचे कॉन-ग्रेस पक्षाच्या उन्नतीसाठी वापरेन" अशी हमीही तो देतो.
कॉन-ग्रेसमध्ये भरपूर खाबू लोक असल्यामुळे माझ्यासारख्या आणखी एका खाबूला जागा नाहीं? "पर्वा इल्ला साsssर!" मला पाठवा DMK कडे व द्या मला दळणवळण खाते. ८० टक्के जनता रोज जेमतेम १०० रु रोज मिळवत असली तरी मी त्यांना १७०,००० कोटी रुपये कसे "खायचे" ते शिकवीन अशी खात्री तो देतो. फक्त CBI (Congress Bureau of Investigation) विरोधी पक्षाच्या मंत्र्यांच्याच मागे लागेल याची तो खात्री मागतो.
हेही शक्य नाहीं? मग गरिबांसाठी राखीव असलेली जमीन तो मागतो व तिच्यावर१५ लाख रुपयात प्रशस्त सदनिका बांधून १ कोटी रुपयांना विकून मिळालेला फायदा स्वत:, राजकारणी व 'बाबू' लोकांत समानपणे वाटण्याची हमी तो देतो!
तेही शक्य नाहीं? मग आदर्श कॉलनीतील एक सदनिका तो मागतो. जर युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या विधवांसाठी असलेल्या सदनिका उच्चपदस्थ जनरल्सना देता येतात तर मग मी काय पाप केलंय असे तो विचारतो! तसेही शक्य नसल्यास "माझ्याशी कसलेल्ही नाते नसलेल्या माझ्या सासू"ला अशी सदनिका द्या असा आग्रह तो धरतो!
हेही शक्य नाहीं? मग मला कसलाही अधिकार नसलेले पंतप्रधानांचे पद तरी द्या असा हट्ट तो शेवटी धरतो! महात्मा गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रसिद्ध त्रिमूर्तीप्रमाणे मी कांहींही पहाणार नाही, ऐकणार नाही व बोलणार नाही अशी हमी देऊन तो म्हणतो कीं मी माझी मन व सदसद्विवेकबुद्धी कुलूपबंद करून ठेवेन व माझ्या चेल्यांना गरीबातल्या गरीबांना लुटायची मुभा देऊन माझी प्रतिमा लख्ख ठेवेन अशीही खात्री तो देतो.
"मीसुद्धा एक तात्पुरती सोय म्हणूनच पंतप्रधान राहीन आणि गांधी घराण्यातला पुढचा मोहरा राज्यावर बसायला तय्यार झाला कीं ताबडतोब मी हे पद सोडेन" असेही वचन तो देतो. "तुमच्याचप्रमाणे मीही जगातल्या सगळ्या मोठ्या-मोठ्या नेत्यांना भेटून अर्धे लोक भुकेले असलेल्या, प्राथमिक शिक्षणाची ऐपत नसलेल्या व रस्ते नसलेल्या या आपल्या देशाला अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे विकायला प्रवृत्त करेन. मी त्यांच्याबरोबर मणीभवजाईनआणि राजघाटावर जाईन आणि मीही गांधींचा खरा अनुयायी असल्याचे सांगेन. "नरोवा कुंजरोवा" नात्याने 'कुठला गांधी?' याचा अर्थ ऐकणार्याने काय तो घ्यावा!
“ZERO TOLERANCE TO CORRUPTION” या प्रणालीनुसार कोट्यावधी रुपये कांहीं सहस्त्र लोकांच्या खिशात जायच्या ऐवजी कांहीं सहस्त्र रुपये कोट्यावधी लोकांच्या खिशात जायला हवेत. पण मी असे करून कसे चालेल? मग माझे अनुयायी कुठे जातील? शिवाय स्विस बँकांचे दिवाळे वाजेल त्याचे काय?
शेवटी ताजा कलममध्ये "पंतप्रधान महाराष्ट्रासाठी एक चारित्र्यवान नेता शोधत आहेत असे क़ळल्यावरून हा उंदीर लिहितो की मला एक कुमारी वेश्या दाखवा म्हणजे मी तुम्हाला स्वच्छ नेता दाखवतो!
शेवटी हा धिटुकला आपले नांव, पत्ता व सेल फोन नं देऊन पत्र संपवतो!
जय हिंद!!
मूळ पत्र जसेच्या तसे खाली दिलेले आहे!
AT LEAST MAKE ME PRIME MINISTER, MR. PRIME MINISTER
Typical mouse from Mumbai
15 Nov 2010
Dear Mr. Prime minister
I am typical mouse from Mumbai. For last sixty years I am tired of travelling in local train compartment meant for 100 with 500 more mice. For a change please allow me to join Congress. CON-GRACE, Where every CON man is GRACE fully accepted. Although just now I am not a conman, but mouse learns everything very fast.
I request you to make me President of India. I assure you that like former president Abdul Kalam I will not behave like president of India, I will be a perfect rubber stamp. Only thing you have to assure me that my pay is increased three times, my son should be given ticket to fight election and my huge extended family is allowed to travel with me whenever I go for official picnic.
If not president at least make me home minister. Even when there is serious terrorist attack I will be more concerned with my dress. Just make sure that even if I have to resign in disgrace because my incompetency at least I will be made governor. Only qualification a governor requires is loyalty to Gandhi family and that will automatically flow in my blood once I join congress.
If not home minister at least allowed me to conduct CWG games. I will conduct the game with total dishonesty. I will buy toilet paper at least at hundred times the cost not only to wipe out my hole at back but even the image of nation. Please assure me that even if I am asked to resign keeping CLEAN image of congress in mind, I will be allowed to keep 70,000 Crore rupees with me.
If you cannot place me in Delhi at least make me revenue minister of some state. I will grab the land of poor fisherman and give it to rich business house. I will be totally honest. Out of 100 rupees I earn I will keep only 70 Rs for me and my family. Out of 30 rupees you can give 3 rupees to buy one kilo rice to starving millions. Even if high court passes stricture against me, I am sure you will not ask me to resign and will keep on advising me to strengthen the CON-GRACE party with all the revenue collected.
If you feel that Congress is full of conman and there is no place for one more crook, than at least communicate to DMK to make me minister of communication. Even when 80 crore people earn less than 100 rupees a day, I will show you how to make 1,70,000 crore rupee out of this poor idiots. Just assure me that “CBI” Congress bureau of investigation is kept engaged in chasing home minister of opposition party and they have no time to follow me.
Even if that is not possible give me few acre of land in Mumbai for 10 paisa a square feet to make me flats measuring 400 square feet for poor people and I will make sure no poor person can ever buy these flats. I will convert three flats into a one big flat. Construction cost will be Rs 15 lakhs but I will be able to sell it for one Crore. I will make total profit of 3000 crore which will be equally divided among me, politician and bureaucrats. Only thing you have to assure me that if courts asks to pay fine of 1200 Crore for cheating, your government will reduce it to 300 Crore.
If that is not possible than give me flat in Adarsh Society. If highly decorated army generals can be given flat meant for widows of soldiers, then why not flat for me. A mouse can never be worse than those army generals.
If not for me than at least give flat to my mother in law. I swear by God that she is not my relative.
If nothing is possible, then at least give me most POWERLESS position of Prime minister. Like Gandhiji’s monkey I will see nothing, hear nothing and speak nothing. Even I will keep my mind and conscious blocked. I will allow my representative to loot poorest of the poor but I will keep my image sparking clean.
I will be a perfect stop gap arrangement. As soon as next generation of Gandhi family is ready to take over I will not hesitate even for a second to relinquish my post.
Like you I will also keep on calling world leaders to sell billions of arms to this country where millions go half hungry, who cannot afford even primary school and there is no road for them to go anywhere. I will accompany them to Mani Bhavan and Rajghat and tell them that I am also true follower of Gandhi, only thing I will not tell them which GANDHI.
Just one simple action “ZERO TOLERANCE TO CORRUPTION” will allow few thousand of rupees to flow into home of crores instead of crores of rupees flowing into pocket of few thousand. This will change face of India and it will become joy to live in. But I will not make this mistake otherwise where my followers will go? Swiss bank will become bankrupt.
PS. I understand you are looking for clean politician in Maharashtra. If you show me virgin prostitute then I will show you clean politician in Maharashtra.
With warm regards
Prakash B Bajaj
Chandralok “A”, Flat No 104
95 Nepean Sea Road
Mumbai 400036
Mobil: 098210-71194
Email: prakashbbajaj@gmail.com
याद्या
5429
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
क्लास ...
माझे लिखाण दुर्बोध असते हे आजच कळले
In reply to क्लास ... by छोटा डॉन
>>दोन्ही पत्रे मूळ इंग्रजीतली
In reply to माझे लिखाण दुर्बोध असते हे आजच कळले by सुधीर काळे
गल्लत होते आहे ...
In reply to माझे लिखाण दुर्बोध असते हे आजच कळले by सुधीर काळे
जय हो, प्रकाश बजाज!
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
काय कळल नाय बा ?
In reply to जय हो, प्रकाश बजाज! by सुधीर काळे
कोण प्रकाश बजाज?
"धन्यवाद," लिहायचं राह्यलं का
In reply to कोण प्रकाश बजाज? by नितिन थत्ते
Nepean Sea Road ला रहतो तो?
ते व्यावसायिक (Businessman) आहेत
In reply to Nepean Sea Road ला रहतो तो? by मनिष
रेल्वे नावाचा नरक
निषेध निषेध निषेध
In reply to रेल्वे नावाचा नरक by यकु
>>महात्मा गांधीजींच्या तीन
येडी
In reply to >>महात्मा गांधीजींच्या तीन by गांधीवादी
हे नुतृत्वाचेच कर्तव्य आहे कि
In reply to येडी by daredevils99
पार्टी विथ द डिफरन्स
In reply to हे नुतृत्वाचेच कर्तव्य आहे कि by गांधीवादी
कोणत्याही एका पक्षाचे
In reply to पार्टी विथ द डिफरन्स by daredevils99
कठपुतळीवर हल्ला करू नका!
In reply to >>महात्मा गांधीजींच्या तीन by गांधीवादी
पंतप्रधान सोनिया नाट्कीच आहेत
पंतप्रधान सोनिया नाट्कीच आहेत