![]() |
| From http://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" आज कार्तिकी एकादशी आहे.. उपवास आहे...त्यामुळे ही बटाटा भाजी बनवली होती.. साहित्यः- दोन बटाटे(उकडलेले), एक मिरची, एक चमचा तेल, एक छोटा चमचा जिरे,मीठ अंदाजे. शेंगदाणा कूट दोन चमचे. कॄती:- बटाट्याच्या फोडी करुन घ्या, कढईत तेल गरम करा, त्यात जिरे टाका- तडतडले की मिरची तुकडे घाला नंतर बटाटा फोडी घाला.चवीनुसार मीठ्, आवडत असल्यास चिमूटभर साखर घाला, चांगली परता, आता त्यात शेंगदाणा कूट घाला, परत चांगली खमंग होईपर्यंत परता...आणि गट्टम करा, ही नुसती सुद्धा चांगली लागते. |
वाचने
6278
प्रतिक्रिया
9
मिसळपाव

प्रतिक्रिया
आयला हे भारीये! पब्लिक
माझी भाजीची कॄती कुठे
In reply to आयला हे भारीये! पब्लिक by मेघवेडा
फोटोवरून पाकृ
वाईची साखर बी चालतीया.
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
वाईचीच का? सातारची का न्हाय
In reply to वाईची साखर बी चालतीया. by शुचि
डायबेटीक
In reply to वाईचीच का? सातारची का न्हाय by स्पंदना
ए गप ए! त्या
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
थोडी दुरूस्ती
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या