![]() |
| From https://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite"
आज कार्तिकी एकादशी आहे.. उपवास आहे...त्यामुळे ही बटाटा भाजी बनवली होती.. साहित्यः- दोन बटाटे(उकडलेले), एक मिरची, एक चमचा तेल, एक छोटा चमचा जिरे,मीठ अंदाजे. कॄती:- बटाट्याच्या फोडी करुन घ्या, कढईत तेल गरम करा, त्यात जिरे टाका- तडतडले की मिरची तुकडे घाला नंतर बटाटा फोडी घाला.चवीनुसार मीठ्, आवडत असल्यास चिमूटभर साखर घाला, चांगली परता, आता त्यात शेंगदाणा कूट घाला, परत चांगली खमंग होईपर्यंत परता...आणि गट्टम करा, ही नुसती सुद्धा चांगली लागते. |
वाचने
6297
प्रतिक्रिया
9
मिसळपाव

प्रतिक्रिया
आयला हे भारीये! पब्लिक
आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज?
माझी भाजीची कॄती कुठे
In reply to आयला हे भारीये! पब्लिक by मेघवेडा
माझी भाजीची कॄती कुठे गेली...................
फोटोवरून पाकृ
माझा अंदाज -
१) बटाटे उकडून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करा.
३) तुपात जिरे घाला.
४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला.
५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला.
६) झालं!
बरोबर है ना तै?
वाईची साखर बी चालतीया.
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
वाईची साखर बी चालतीया.
वाईचीच का? सातारची का न्हाय
In reply to वाईची साखर बी चालतीया. by शुचि
वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन?
डायबेटीक
In reply to वाईचीच का? सातारची का न्हाय by स्पंदना
खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ?
ए गप ए! त्या
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
ए गप ए! त्या खाताहेत.
डिस्टर्ब नको करु.
थोडी दुरूस्ती
In reply to फोटोवरून पाकृ by सुनील
१) बटाटे उकडून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करा.
३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला.
४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला.
५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला.
६) थोडी वाफ येउ द्यावी.
७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी.
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत..
हिर्वी मिर्ची हविच..
साखर घालते अर्धा चमचा.