Skip to main content

उपवासाची बटाटा भाजी

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 17/11/2010 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
From http://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" आज कार्तिकी एकादशी आहे.. उपवास आहे...त्यामुळे ही बटाटा भाजी बनवली होती.. साहित्यः- दोन बटाटे(उकडलेले), एक मिरची, एक चमचा तेल, एक छोटा चमचा जिरे,मीठ अंदाजे. शेंगदाणा कूट दोन चमचे. कॄती:- बटाट्याच्या फोडी करुन घ्या, कढईत तेल गरम करा, त्यात जिरे टाका- तडतडले की मिरची तुकडे घाला नंतर बटाटा फोडी घाला.चवीनुसार मीठ्, आवडत असल्यास चिमूटभर साखर घाला, चांगली परता, आता त्यात शेंगदाणा कूट घाला, परत चांगली खमंग होईपर्यंत परता...आणि गट्टम करा, ही नुसती सुद्धा चांगली लागते.

वाचने 6282
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

माझा अंदाज - १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला. ६) झालं! बरोबर है ना तै?

In reply to by शुचि

वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन?

In reply to by स्पंदना

खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ?

In reply to by सुनील

१) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला. ६) थोडी वाफ येउ द्यावी. ७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी.