✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चार्वाक - एक न-दर्शन

आ
आळश्यांचा राजा यांनी
Wed, 11/17/2010 - 15:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5824 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

खंडन-मंडनासाठी अर्धरथी / रथी

वारकरि रशियात
Wed, 11/17/2010 - 17:00 नवीन
खंडन-मंडनासाठी अर्धरथी / रथी / महारथी आहेतच..... पण याचा समावेश षड्दर्शनांत होतो असे आहे ते कां? पण (बव्हंशी) सर्व मुद्दे (व्यवस्थित) आले आहेत.
  • Log in or register to post comments

मी शिर्षक काहीतरी वेगळेच

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/17/2010 - 17:27 नवीन
मी शिर्षक काहीतरी वेगळेच वाचले. असो...
  • Log in or register to post comments

उत्तम आढावा. माझ्या मनातले

अवलिया
Wed, 11/17/2010 - 17:37 नवीन
उत्तम आढावा. माझ्या मनातले बरेच मुद्दे आपण घेतले आहेत. बाकीचे जाणकार जे काही खंडन मंडन करायचे असेल ते करतीलच. थोडी माहिती माधवाच्या सर्वदर्शन संग्रहातील चार्वाक दर्शन या भागाविषयी - माधवाने चार्वाकाचे मत म्हणुन जे श्लोक दिले आहेत ते बदलुन दिले आहेत यावर अनेक जण अनेक ठिकाणी बोलत असतात. माझ्याकडे जी प्रत आहे तिच्या नुसार त्यात दोन्ही श्लोक दिले आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार काही पाठभेद आढळतात. काही जुन्या हस्तलिखित प्रतींमधे फक्त नास्ति मृत्युर्गोचर असा उल्लेख आढळतो तर काहींमधे दोन्ही ठिकाणी ऋणं ...पिबेत असा उल्लेख आढळतो. माधवाच्या पुर्वीच्या काही वेगळ्या ग्रंथामधे सुद्धा ऋणं..पिबेत असा उल्लेख आढळतो. त्यामुळे "विशिष्ट हेतुसाठी श्लोक बदलला" असे उल्लेख करुन त्याचे कर्तृत्व माधवाकडे दिले.जे योग्य असावे असे मला वाटत नाही. यावर अजुन संशोधन व्हायला हवे. @वारकरी रशियात चार्वाक दर्शन षडदर्शंनांमधे धरले जात नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

चूक मान्य !

वारकरि रशियात
गुरुवार, 11/18/2010 - 10:55 नवीन
नानाजी, अवांतर१) एकूण सोळा दर्शने आहेत असे वाचले होते. अवांतर २) माझ्या अभ्यासात तसेच मला मान्य असलेल्या विचारधारेनुसार षड्दर्शने: जैमिनीय पूर्वमीमांसा, बादरायण व्यासांची उत्तरमीमांसा, कणादांचे वैशेषिकशास्त्र, गौतमांचे न्यायशास्त्र कपिलमहामुनींचे सांख्यशास्त्र व पतंजलींचे योगशास्त्र. हीच आहेत. अवांतर ३) पण एका अन्य विचारधारेप्रमाणे''षड्दर्शनसमुच्चया' त वरील सहांचे मिळून तीन व अन्य तीन (पैकी एक चार्वाक) अशी विभागणी केली आहे असे वाचले होते. त्यामुळे माझा उगाचच गोंधळ झाला होता! असो. चार्वाकाच्या विचारसरणीबाबत आणखीही लिहिण्यासारखे कांही आहे, बघुया वेळ कसा होतो ते. तोवर जाणकार ज्ञानात भर घालत राहतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाचत आहे..

यशोधरा
Wed, 11/17/2010 - 17:45 नवीन
वाचत आहे..
  • Log in or register to post comments

योग्य विचार

विसुनाना
Wed, 11/17/2010 - 18:00 नवीन
लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे.
-माझेही याच दिशेने सुरू होते. नव्हे! आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. पण प्रत्यक्षात मात्र 'चारुवाक' लोकायत आचारपद्धती अवलंबतो असे माझे मत आहे. चारुवाक = Hypocrisy. या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही. *अपवादांचे स्वागत आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह

आळश्यांचा राजा
Mon, 11/22/2010 - 07:34 नवीन
या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही.
सहमत आहे. चारुवाक = Hypocrisy हे समीकरण पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

आपण भारतीय*/ पक्षी हिंदू

अवलिया
Mon, 11/22/2010 - 11:50 नवीन
आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. बराचसा सहमत आहे. आणि म्हणुनच जे खरोखरच असे अध्यात्मिक होते, आहेत किंवा असतील त्यांचे अनेकांना सुप्त आकर्षण असावे. आणि असे अध्यात्मिक होते, आहेत, असतील म्हणुनच त्यांचे खोटे अनुकरण करुन तुंबड्या भरणारे ढोंगी पण समा़जात होते, आहेत, असतील. म्हणुनच सर्वसाधारण मनुष्याचा दृष्टिकोन बहुधा दुर्योधनाच्या तोंडुनच वदवला गेला आहे जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर्जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति | केनापि देवेन हृदि स्थितेन यथानियुक्तोऽस्मि तथा करोमि ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

बापरे! दोन्ही बाजूंचे मुद्दे

धमाल मुलगा
Wed, 11/17/2010 - 17:55 नवीन
बापरे! दोन्ही बाजूंचे मुद्दे पटतायत मला (ऑफकोर्स, ह्या विषयाच्या अज्ञानापोटीच.). पण वाचतो आहे. आवडीनं वाचतो आहे. जमेल तसं, समजेल तितकं उमजुन घेतो आहे.
  • Log in or register to post comments

श्री. रा. रा. आ. रा. जी, आपला

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/17/2010 - 18:08 नवीन
श्री. रा. रा. आ. रा. जी, आपला लेख वाचला. त्यातल्या पहिल्या परिच्छेदामुळे आपले पहिले अभिनंदन करतो. दुसर्‍या परिच्छेदामुळे दुसरे अभिनंदन. नुसतीच गंमत न बघता किंवा एखादा प्रतिसाद देऊन बाजूला न होता, आपण नीट असे लेखन करून धागा टाकलात. बरेच लोक इथे असे आहेत की त्यांनीही असेच वर्तन ठेवल्यास मिपावरील लेखनाच्या दर्ज्याची काळजी करायची गरज भासणार नाही. असो. ;) बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
Wed, 11/17/2010 - 21:33 नवीन
बिकाशी सहमत. वाचतो ­आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बाकी, या विषयावर काही

चांगभलं
Wed, 11/17/2010 - 21:39 नवीन
बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद. नशिब माझ....मान्य केलत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

टाळ्या.... एकदम मुद्देसूद

स्वानन्द
Wed, 11/17/2010 - 18:47 नवीन
टाळ्या.... एकदम मुद्देसूद लिहीले आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चांगला विषय

विकास
Wed, 11/17/2010 - 19:49 नवीन
दोन्ही लेख आत्ताच वाचले. विषय श्री. शरद यांच्या मूळ माहितीलेखाप्रमाणेच चांगला हाताळला आहे. माझे या संदर्भात डिटेल वाचन नाही, पण या दोन्ही लेखांमुळे उत्सुकता चाळावली गेली आहे. काही प्रश्नः लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे. मला कल्पना आहे की हे आपले मत आहे. तरी देखील केवळ उत्सुकतेपोटी विचारत आहे (not questioning) गैरसमज नसावा, हे पण केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे? आपण लिहीलेले मधूरवाणीचे - चार्वाक आणि विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy, यात काही फरक आहे का? Hypocrisy मधूर वाणीने होऊ शकते म्हणून हा प्रश्न! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

केवळ आपलेच मत आहे का कुठे

आळश्यांचा राजा
Mon, 11/22/2010 - 08:34 नवीन
केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे?
एकूणच असा निष्कर्ष काढणे फार अवघड नाही. आणि असे वाचनातही आलेले आहे. वाचनात दोन्ही बाजू आल्यात, दर्शन असावे, आणि दर्शन नव्हते, अशा दोन्ही. दर्शन नव्हते हे मत विचारांती पटण्यासारखे वाटते. विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy मला पटत नाही. चार्वाकांची मते प्रामाणिक आहेत असे वाटते. खोडता येतात. म्हणजे ढोंगी होत नाहीत. त्यांना म्हणायचे असावे, तोंडाने भज गोविंदम म्हणायचे, पण त्यात अपेक्षित असलेली साधना करायची नाही, ही हिपोक्रसी. चार्वाकांना ढोंगी म्हणायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लोकायत, चार्वाक... दर्शन/न-दर्शन

धनंजय
गुरुवार, 11/18/2010 - 05:01 नवीन
लोकायत, चार्वाक ... अशिक्षित विचारसरणी, प्रतिष्ठित विचारसरणी असेही मत वाचले आहे, की दोन्ही प्रकार होते. प्रतिष्ठित विचारसरणी लुप्त झाल्यानंतर त्यातील काही तत्त्वे अशिक्षित विचारसरणीशी समांतर असल्यामुळे त्या दोहोंची गल्लत झाली... स्रोत परामर्श प्रकाशनाच्या निबंधसंग्रहापैकी एक निबंध. नेमके शीर्षक, प्रकाशनवर्श बगैरे पुस्तक तपासून मग देईन. (एक-दोन आठवड्यांच्या विलंबानंतर. क्षमस्व.)
  • Log in or register to post comments

थँक्स!

आळश्यांचा राजा
Mon, 11/22/2010 - 08:38 नवीन
थँक्स! तुम्ही मनावर घेतले तर या विषयावर बराच प्रकाश पडू शकेल. ज्याप्रमाणे अणुवादाचे खंडन लिहिलेत तसेच याही विषयावर लिहावे ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

थोडी भर..

अवलिया
गुरुवार, 11/18/2010 - 12:51 नवीन
चार्वाकमताने वेदऋचा ह्या अर्थहीन असल्याचे प्रतिपादन केले जाते त्यात अनेकदा उल्लेख केलेला जर्फरीतुर्फरी ऋचा ऋग्वेदातील दशम मंडलातील १०६ व्या सुक्तातील ६ वी ऋचा (१०.१०६.६) (उदात्तअनुदात्त स्वर दिलेले नाहीत) सृण्येव जर्भरी तुर्फरीतू नैतोशेव तुर्फरी पर्फरिका | उदन्यजेव जेमना मदेरु ता मे जरय्वजरं मरायु || ( हे अश्विनीकुमारांनो) तुम्ही अंकुश (सृणि) लावावयास योग्य अशा मत्त हत्तींप्रमाणे शरिर झुकवणारे (जर्भरी) मारणारे (तुर्फरी) संतोष देणार्‍या मनुष्याच्या पुत्रांसारखे (नैतोशेव) विनाश करणारे (तुर्फरी) धनाची भर करणारे (पर्फरिका) जलातुन उत्पन्न होणार्‍या वस्तुंप्रमाणे निर्मल (उदन्यजेव) विजय प्राप्त करणारे (जेमना) मदाने युक्त (मदेरु) आहात, तेव्हा तुम्ही माझ्या जरेने युक्त (जरायु) आणि मरणशील (मरायु) अशा शरीराला जरारहीत करावे. *** माधवाने सर्वदर्शसंग्रहात एकुण १६ दर्शनांची माहिती दिली असुन एकेका दर्शनाची एकेका अध्यायात अशी माहिती दिली आहे. दर्शनांचा क्रम माधवाच्या मताने विचार करण्यास योग्य अशा क्रमाने दिला असुन चार्वाक दर्शन पहिले आणि अद्वैत दर्शन शेवटी दिले आहे. यानुसार माधवाचा अद्वैताकडे असलेला ओढा स्पष्ट दिसत असला तरी प्रत्येक दर्शनाची माहिती त्याने जणू काही त्या दर्शनाचा प्रणेताच देत आहे अशा व्यवस्थित पणे दिलेली आहे. अद्वैत दर्शनाकडे (शंकरमत) त्याचा असलेला ओढा हा त्या ग्रंथात अद्वैत दर्शनाच्या (शंकरमत) अध्यायाच्या शेवटी सकलदर्शनशिरोSलंकार रत्नं या शब्दांनी सुचित होतो. तर चार्वाक दर्शनाच्या शेवटी असलेली त्याची टीप अशी "तस्माद्बहुनां प्राणिनामनुग्रहार्थ चार्वाकमतमाश्रणीयमिती रमणीयम्". इतर कोणत्याही दर्शनाच्या अंतभागी त्याने कोणतेही मत दिलेले नाही.
  • Log in or register to post comments

वेदांची अर्थहीनता

आळश्यांचा राजा
Mon, 11/22/2010 - 09:01 नवीन
तुमच्याशी सहमत आहे. (काय म्हणता आहात ते गृहीत धरुन!) मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून. त्या अर्थाने त्याला चार्वाकच म्हटले पाहिजे. असो. वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे, आणि वेद अर्थहीन आहेत अशी दोन्ही विधाने करण्यालाच मुळात काही अर्थ नाही. अर्थहीन म्हणावे, तर या वेदांच्या पायावरच तर महत्त्वाची दर्शने उभी आहेत. मग ती दर्शने पण अर्थहीन म्हणावी का? वेदांगे पण अर्थहीन म्हणावी का? धनुर्वेद, आयुर्वेद इ. उपवेद पण अर्थहीन का? संगीत, नृत्य, नाट्य आदि कला ज्या दर्शनांच्या पायावर उन्नत झाल्या त्या सगळ्याच अर्थहीन का? अगदी अलीकडचे उदाहरण वैदिक गणिताचे आहे. त्याच्या निर्मात्याने, भारती कृष्णतीर्थांनी, या अजब गणिती पद्धतीचे दिलेले स्पष्टीकरण (रॅशनल!) बुद्धीला न पटणारे आहे. (वेदांतील – अथर्ववेदातील – काही सूत्रांचे ‘गूढ’ अर्थ त्यांच्या अंत:प्रज्ञेला दिसले, समजले.) तरीही ते गणित समोर आहे, उपलब्ध आहे, नाकारता येत नाही. म्हणजे वेदांमध्ये वरवर जर्फरी तुर्फरी अशी अर्थहीनता दिसली तरी त्याने गंडून जायचे कारण नाही. तसेच, वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सगळेच ज्ञान आहे, तर वापरा ना. कशाला नवीन शोध लावत बसताय, आणि पश्चिमेने नवीन तंत्र देण्याची वाट बघत बसताय?
  • Log in or register to post comments

>>>मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे

अवलिया
Mon, 11/22/2010 - 11:49 नवीन
>>>मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. हे बहुधा त्याने ब्राह्मण भागांविषयी व्यक्त केलेले मत आहे. मंत्रांबद्दल सुद्धा अनेक जणांचे विविध मते सापडतात. >>>त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून +१ >>वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सहमत आहे. म्हणुनच सुज्ञ माणसाने कुणाच्याही व्यक्त केलेल्या मतावर संपूर्णपणे विसंबुन न रहाता स्वतः काय आहे हे जाणुनच मग त्याप्रमाणे योग्य अयोग्य असे प्रतिपादन करणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा