Skip to main content

शोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला

शोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला

Published on मंगळवार, 16/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
*हे प्रवासवर्णन नाही, माझ्या आवडत्या शहराविषयीचा कृतज्ञतालेखच म्हणा हवे तर*
एका मुठीत लॅटपॉटची बॅग, दुसर्‍या मुठीत जीव आणि पोटाने सामानाची ट्रॉली ढकलत नेताजी सुभाषचंद्र विमानतळाच्या बाहेर आलो तेव्हा समोर गच्च गर्दीमधून भरधाव वेगाने पिवळ्या टॅक्सी जात होत्या, आणि एक टॅक्सी ड्रायवर तिथे माणसांना एका हाताने थोपवून गाड्यांना पुढे सोडत होता. मी ह्याचा अर्थ लावत असतानाच त्याचे शब्द कानावर पडले "जोल्दी जोल्दी जोल्दी... जोल्दी चोलो.. दो चार मर गया तो भी प्रोब्लेम नोई.. जोल्दी चोलो" माझं भारतातलं दुसरं सर्वात आवडतं शहर म्हणजे कोलकोता. मला हे शहर नक्की कशामुळे आवडतं ते कदाचीत माझं मलाही सांगता येणार नाही. भरभरून बोलणारी माणसं, बाराही महिने चालणारे सांस्कृतीक महोत्सव, वाहत्या रस्त्यात स्थितप्रज्ञपणे चालणारी ट्राम, शहराचा अजूनही एकाच साच्यात न बसण्याचा अट्टाहास, विवीध प्रकारची आणि आकाराची अवीट गोडीची बोंगॉली मिष्टी, आणि त्या मिष्टीहुनही गोड बंगाली भाषा... की ह्या सगळ्या पलिकडे असणारा राजकीय आणि सांस्कृतीक वारसा... खुब भालो.. खुब भालो.. कधी बंगालात प्रवचनाची संधी आली की मी अजिबात ती सोडत नाही, आणि प्रत्येक वेळेला वेगळं कोलकोता समोर येतं. एखादा तरी बंगाली बाबू.. दादा दादा म्हणत जवळीक साधतोच. दिवसभराचं काम आटोपून मी नेहेमीच शहर अनुभवायला बाहेर पडतो, प्रत्येक वेळेला वेगळं गारूड, वेगळा रंग.. एकंदरीतच बंगाली लोक व्यवहारी नव्हेत, दादा दादा म्हणुन लाडात तरी येतील किंवा फटकन काहीतरी तोडून तरी बोलतील, मला पहिल्या प्रकारचेच जास्त भेटतात. या वेळी जिथे प्रवचन होतं तिथल्या बंगाली बाईला माझ्या पुण्याच्या टीममधल्या कुणीतरी सांगितलं होतं की मला मिष्टी आवडते म्हणुन.. ती प्रत्येक दिवशी दुपारी येउन विचारायची. सर लोंच? मिष्टी? यावेळेलाही नेहेमीचा अजेंडा होताच.. चार दिवस संध्याकाळच्या जेवणा ऐवजी केवळ आणि केवळ मिष्टी मिष्टी आणि मिष्टी... केळीच्या पानात गुंडाळलेला शोंदेष, अप्रतीम चोमचोम, आंबटगोड मिष्टीदोही आणि लाडू इतक्या आकाराचे रोशोगुल्ले.. पोट भरतं पण मन भरत नाही.. असो.. येताना एक मोठं खोकं भरून मिष्टी आणली होती. पण मित्रांनी (आणि त्यांच्या नावाखाली मी) केव्हाच संपवली, त्यामुळे फोटो काढायलाही शिल्लक राहिली नाही.. क्षमस्व.. पुढच्या वेळेला कोलकत्यामधेच मिष्टीचे फोटो काढुन या लेखाचा पुढचा भाग म्हणुन डकवले जातील. ( लाळेने कीबोर्ड भिजल्याने लेख इथेच संपवावा लागतोय )
लेखनप्रकार

याद्या 3620
प्रतिक्रिया 22

ह्याला प्रवासाचं वर्णन म्हणू की प्रवासरंग म्हणू की कोलकोत्याच्या खाद्यभंडाराला भरल्यापोटी दिलेली दाद म्हणू? :) पण हात फारच आखडता घेतलाय दादा..ए चॉलबे नॉय.. :)

In reply to by धमाल मुलगा

पण हात फारच आखडता घेतलाय दादा..ए चॉलबे नॉय.. :) हेच म्हणतो. (बाबूमोशाय)बेसनलाडू

सविस्तर वाचायला आवडलं असतं. मिष्टी दोईची आठवण करून दिल्याबद्दल निषेध! मी कलकत्त्यात असताना ५/६ जणाना तरी त्याची कृती विचारली होती. पण कोणीच नीटशी सांगितली नाही!

ऐनेकोई कोरिबो नालागे... आणखी लिवा की राव. हा लेख तर रोशोगुल्ला तोंडात विरघळायच्या आत संपतोय..

लेख आवडला. खरच डायबेटीक माणसाला किती कठीण वाटत असेल कलकत्त्यामध्ये? की मिळते सॅकरीन-स्वीट मिष्टी?

भीषण भालो :), अजून सविस्तर सचित्र वर्णन येऊ द्या राव.

In reply to by नंदन

भीषण भालोच! आणि अजून येऊ द्याच! बाकी एका मुठीत लॅटपॉटची बॅग, दुसर्‍या मुठीत जीव आणि पोटाने सामानाची ट्रॉली ढकलत नेताजी सुभाषचंद्र विमानतळाच्या बाहेर आलो हे वाचून "शिवाजी महाराज" आठवले! ;)

पैसा ही घ्या रेसिपी : Mishti Doi is a popular Bengali sweet dish. Here is Mishti Doi recipe. Ingredients: 1 liter full cream milk 3-4 tbsps yoghurt 250 gms sugar Method: Boil the milk in a heavy-bottomed pan, on a medium flame till it is reduced to half its original volume. Stir frequently to prevent the milk from sticking. When it is complete, cool the milk till it is just warm. Put the sugar in another pan and heat it over a low flame to melt. Allow the sugar to caramalise (brown). Remove from the fire when done, add the reduced milk to this caramalised sugar and mix well till it blend. Mix milk and sugar thoroughly now add the yoghurt to the mixture and stir gently to mix. Pour into the desired container and keep in a warm dark spot for the Mishti Doi to set. The best taste results are achieved by setting the Mishti Doi in a earthenware pot. When the Mishti Doi has set and is firm, chill for a few hours and serve. रेसिपी इंग्रजीत आहे त्याबद्दल क्षमस्व!

मस्त ! पळ सगळे म्हणत आहेत तसे अजुन सविस्तर लिहाच राव ! हलकट अवांतर :- लेखाचे शिर्षक वाचून आमच्या एका उगाच बंगाली बोलुन आपल्याला बंगाली येते हे दाखवण्याच्या प्रयत्न करणार्‍या मैत्रिणीची आणि एका बंगाली मुलीच्या मागे बळचकर हात धुवुन लागलेल्या मित्राची आठवण झाली ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

खूब छोटो लिखे छो, एटा चॉलबे ना। तुई भीषॉण मिष्टि लिखछी। पुण्यात रहाणार्‍या बंगाली मिठाईप्रेमींसाठी: खडकी स्टेशनकडून ब्रेमन सर्कलकडे जाणार्‍या रस्त्यावर 'बाबूमोशाय' नावाचं एक दुकान आहे. आमच्या बंगाली मित्रांच्या मते तिथे प्रचंड महाग आणि ठीक्ठाक चवीचे बंगाली पदार्थ मिळतात. मलातरी त्यांची किंमत आणि चव दोन्ही आवडतात. (क्वचितच) शोंगितापिशी अवांतराचे उत्तर: आपल्याला मैत्रीण आणि मित्र आहेत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>शोंगितापिशी म्हणजे? बंगालीतही पिशी म्हणजे वेडी असंच असतं काय?

In reply to by धमाल मुलगा

>>शोंगितापिशी म्हणजे? बंगालीतही पिशी म्हणजे वेडी असंच असतं काय?
ते बहुदा बंगालीतले 'पाशवी' असावे.

छान भापो........ एक सुखद कल्पना : " केवळ आणि केवळ मिष्टी मिष्टी आणि मिष्टी... केळीच्या पानात गुंडाळलेला शोंदेष, अप्रतीम चोमचोम, आंबटगोड मिष्टीदोही आणि लाडू इतक्या आकाराचे रोशोगुल्ले.. पोट भरतं पण मन भरत नाही.."

लेख सुरु झाला असे वाटत असतानाच अचानक संपला.. आहो सविस्तर लिहा की... तो पर्यंत आम्ही बंगाली मिठायांचे फोटो बघत बसतो