Skip to main content

(भांडणं..तिचं)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्रीताईंची सांज ही अशी थांबली आणि आम्हाला आमची लांबलेली (गुलाबी) सांज ही अशी आठवली - लांबलेली सांज, कातरवेळ... मनात तीच.. तशीच नेहमीसारखी ! तेच जीवघेणं मौन , तीच नजर करारी. त्या नजरेची दहशत, ते गर्भगळीत होणं...नकळत !! ते बहाणे, ती धडपड, ती धडधड... लवकर कल्टी मारण्यासाठी. मग कबुली, ते न पटणं, समजून न घेणं मी फिक्सर, ती हिटलर .... सार्‍या संध्येचा विसर ! बागेतलं भटकणं, पावसातलं भिजणं, बारमधलं रमणं, शर्टावरल्या गुलाबी खुणा.... ... .. अन् अचानक... अचानक तिचं प्रकटणं .. मग तिचं अस्तित्व, खरं, वास्तवातलं कानफटातलं, बुक्क्यांतलं ! तो पाऊस, ती बाग, त्या शर्टावरच्या खुणा, सारं काही पोरकं, तिच्यासमोर ! आता लाथ कमरेत, सामान बॅगेत आणि रात्र.... रात्र घराबाहेर अंगणात !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1382
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हा हा हा.. च्यायला... भारी हो! अवांतरः आता एक फर्मास कविता, रचना येऊं द्यात साहेब.. बरेच दिस झाले तुमची रचना वाचून! :)