✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अनंतमुखी मुशर्रफ

स
सुधीर काळे यांनी
Sun, 11/14/2010 - 16:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7611 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

माहिती

चिरोटा
Sun, 11/14/2010 - 16:54 नवीन
अतिशय माहितीपूर्ण लेख.
या लोकप्रिय जर्मन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत या त्यांच्या पापांची स्वतःच कबूली दिली आहे. त्यांनी सांगितले कीं पाकिस्तानी लष्कराने आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये शिरून आतंक व हाहाकार माजविण्याचे प्रशिक्षण नक्कीच दिले
हे असे सांगण्यामागे त्यांचा काय हेतु आहे? आणि हे सांगूनही ओबामा/अमेरिका आपले धोरण (उघडपणे) तरी बदलत नाहीत. काळेसाहेब, पाकिस्तानपेक्षा अमेरिका मोठा शत्रु नाही वाटत का?
  • Log in or register to post comments

हळू-हळू अमेरिका पाकिस्तानपासून दुरावत आहे व आपल्या जवळ येत आहे

सुधीर काळे
Tue, 11/16/2010 - 07:38 नवीन
चीन आणि पाकिस्तान हेच आपले खरे शत्रू आहेत असे माझे मत आहे. पाकिस्तानची तर निर्मितीच आपल्या द्वेषापोटी झालेली आहे. अमेरिकेने आपल्याला मदत केली असती पण आपण त्यावेळी वेगळ्याच कळपात वावरत होतो. गुन्हेगारीच्या विश्वात शिरणे सोपे पण तिथून बाहेर पडणे महाकठीण असे मानले जाते! अमेरिकेची परिस्थिती कदाचित् अशीच झाली असावी! पाकिस्तानबरोबर सोयीची (किंवा गरजेपोटीची) मैत्री तर केली पण गरज सरली तरी आता वैद्य हटत नाहींय्! म्हणून अमेरिकेला "शुगरडॅडी"च्या भूमिकेत पाकिस्तान या 'द्वाड' बाळावर 'पॉकेटमनी'चा वर्षाव अद्यापही करावाच लागतोय्. अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान ही एक "धरले तर चावते व सोडले तर पळते" या जातीची समस्या झाली आहे. अमेरिका अगतिकपणे पाकिस्तानशी मैत्री चालू ठेवत आहे, पण हळू-हळू ती पाकिस्तानबरोबरचे अंतर वाढवून आपल्या जवळ येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

हे

श्रावण मोडक
Tue, 11/16/2010 - 09:46 नवीन
अमेरिका अगतिकपणे पाकिस्तानशी मैत्री चालू ठेवत आहे, पण हळू-हळू ती पाकिस्तानबरोबरचे अंतर वाढवून आपल्या जवळ येत आहे.
भारतासाठी ­­इशारा? ;­)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

हे हे हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/16/2010 - 11:02 नवीन
अमेरिकेने आपल्याला मदत केली असती पण आपण त्यावेळी वेगळ्याच कळपात वावरत होतो.
आपण वेगळ्या कळपात वावरत होतो का आपल्याला वेगळ्या कळपात जावं लागलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आपण स्वतंत्र झाल्यापासून अलिप्ततावादाचा पाठपुरावा करत होतो

सुधीर काळे
Tue, 11/16/2010 - 13:20 नवीन
अदिती, मला १०० टक्के आठवत नाहीं पण माझ्या आठवणीनुसार आपण स्वतंत्र झाल्यापासून अलिप्ततावादाचा पाठपुरावा करत होतो! नेहरू, नासर आणि मार्शल टीटो अशी ती त्रिमूर्ती होती! त्यात आपण लोकशाहीचा वसा घेतलेला! अमेरिकेला स्वत:च्या देशात लोकशाही प्रिय असली तरी इतरांच्या देशातील लोकशाहीचे तिला वावडेच होते. फ्रान्समधील लोकशाहीमुळे ज. द गोल यांच्याशी अमेरिकेचे फाटले. इटलीत कम्युनिस्ट निवडून आल्यावर नाटोतील सर्व रहस्ये त्यांना कशी सांगायची हाही त्यांना प्रश्न पडला होता असे TIME मध्ये वाचल्याचे स्मरते! पण 'डावे' मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तोवर अमेरिका निवळली होती. पाकिस्तानमध्ये नाटो आणि सेंटो या संघटनांत पाकिस्तान सामिल झाला त्यावेळी अयूबखान अजून राज्यावर यायचे होते पण लगेच नंतर आले. रशियाच्या कळपात आपण गेलो कारण रशिया काश्मीर प्रश्नावर व्हेटो वापरून आपल्य्याला पाश्चात्यांच्या आणि पाकिस्तानच्या तिढ्यातून सोदवायचा. या सर्व घटनांवरून आपणच कळप निवडला असावा असे वाटते, कारण अमेरिका आपल्याला तिच्या कळपात घ्यायला फारशी राजी नसावी. मी जरा वाचन करून सांगेन. सध्या लिहिले ते माझ्या आठवणीनुसार! इतरांनीही यात भार घालावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण रशियाच्या कळपात ओढलो गेलो

नगरीनिरंजन
Tue, 11/16/2010 - 13:34 नवीन
आपण रशियाच्या कळपात ओढलो गेलो कारण रशियाने व्हेटो वापरून आपल्याला पाकिस्तान आणि काश्मीर प्रश्नी मदत केली होती असे ऐकले आहे (तपशील उपलब्ध नाही) . शिवाय आज अमेरिका भारताशी संबंध जोडायला उत्सुक असली तरी १९७१ च्या युद्धात बंग्लादेश स्वतंत्र झाल्यास तिथे असलेल्या गरीबीमुळे कम्युनिस्टांचा शिरकाव सहज होईल या भीतीने भारत ते युद्ध हारावा म्हणून अमेरिकेने आकाशपाताळ एक केले होते. अगदी चीनचे पाय धरून डिसेंबर १९७१ मध्ये चीनने भारतावर हल्ला करावा म्हणून उघडपणे चीनला आवाहन केले होते. चीनने ते नाकारले. :-) निक्सनचे इंदिरा गांधींबद्दलचे उद्गार आपल्याला माहितीच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

शिवाय आज अमेरिका भारताशी

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/16/2010 - 13:44 नवीन
शिवाय आज अमेरिका भारताशी संबंध जोडायला उत्सुक असली तरी १९७१ च्या युद्धात बंग्लादेश स्वतंत्र झाल्यास तिथे असलेल्या गरीबीमुळे कम्युनिस्टांचा शिरकाव सहज होईल या भीतीने भारत ते युद्ध हारावा म्हणून अमेरिकेने आकाशपाताळ एक केले होते. अगदी चीनचे पाय धरून डिसेंबर १९७१ मध्ये चीनने भारतावर हल्ला करावा म्हणून उघडपणे चीनला आवाहन केले होते. चीनने ते नाकारले.
काळे काकांची हरकत नसल्यास ह्याविषयी अजुन विस्ताराने लिहाल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

विस्ताराने लिहायला हरकत नाही

नगरीनिरंजन
Tue, 11/16/2010 - 14:19 नवीन
विस्ताराने लिहायला हरकत नाही पण चीनने हल्ला करायचे नाकारले याचे कारण त्यांचे भारताबद्दलचे प्रेम हे नसून सोविएत युनियनचा दबाव हे आहे. भारत-पाकिस्तान युद्ध असले तरी पाकिस्तानच्या बाजूने अमेरिका आणि भारताच्या बाजूने सोविएत युनियन हेच अप्रत्यक्ष युद्ध होते. जरी चीन तेव्हा अमेरिकेचा मित्र असला तरी सोविएत युनियनचा प्रभाव आणि दबाव त्याना झुगारून चालण्यासारखे नव्हते. चीनने हल्ला केला असता तर सोविएत युनियन ही उतरले असते. अमेरिकन नौदल तर निघालेच होते. भयंकर पेटापेटी झाली असती म्हणूनच इंदिरा गांधी आणि त्यांच्या सेनापतींचे कौतुक की कोणी काही करायच्या आत युद्ध संपवून टाकले. विशेष म्हणजे आज इराणच्या जीवावर उठलेल्या अमेरिकेने त्यावेळी इराणकडेही त्यांची लढाऊ विमाने पाकिस्तानला देण्याची विनंती केली होती म्हणे.यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो हेच फक्त पुन्हा सिद्ध होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यु हो ननि

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/16/2010 - 18:38 नवीन
धन्यु हो ननि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

माझी हरकत कशी असेल?

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 11:28 नवीन
माझी अजीबात हरकत नाहीं. उलट स्वागतच आहे. कारण या विषयावर मला खूपच रस आहे व या वियवावर 'योग्य-अयोग्य' वाचनही केले आहे. पण तरीही याबाबत खूप कुतुहल आहेच! खरं तर असे प्रतिसाद वाचल्यावर या विषयाचा कंटाळा न आलेलेही बरेच 'मिपा'कर आहेत याची जाणीव होते. ('व्यनि'मुळेही होतेच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

संदर्भ

प्रदीप
Tue, 11/16/2010 - 18:40 नवीन
(अमेरिकेने) अगदी चीनचे पाय धरून डिसेंबर १९७१ मध्ये चीनने भारतावर हल्ला करावा म्हणून उघडपणे चीनला आवाहन केले होते.
ह्याविषयी काही संदर्भ द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

१० डिसेंबर १९७१ ला हेन्री

नगरीनिरंजन
Tue, 11/16/2010 - 20:05 नवीन
१० डिसेंबर १९७१ ला हेन्री किसिंजर आणि चायनीज डेलिगेशनच्या मीटींगचा वृत्तांत आणि अमेरिकेने तयार केलेल्या पॉसिबल कोर्स ऑफ अ‍ॅक्शन मध्ये चीन ला हल्ला करण्याचे आवाहन करणे या संबंधीची कागदपत्रे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ह्ज मध्ये आहेत. त्याचा दुवा. शिवाय यावर बरेच लेख लिहिले गेले आहेत. http://www.infowars.com/articles/world/nixon_plotted_war_against_india_1971.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/4633263.stm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

निक्सन-रेगन यांच्या कारकीर्दीत पाकप्रेम आणि भारतद्वेष पराकोटीला!

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 11:22 नवीन
धन्यवाद, नगरीनिरंजन-जी. निक्सन-रेगन यांच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत पाकप्रेम आणि भारतद्वेष अगदी पराकोटीला पोचला होता. अयूब खानांच्या वेळेपासून पाक-अमेरिका प्रेम जोरात होतेच. मध्यंतरी कार्टर यांच्या काळात जरा बदल होईल असे वाटत होते पण ते राष्ट्रपती या नात्याने अगदीच निष्प्रभ ठरले. बांगलादेश युद्धात निक्सन यांनी अमेरिकेच्या सातव्या आरमाराला बंगालच्या उपसागरात जायचा हुकूम दिला होता. पण 'न्यूक्लियर डिसेप्शन'मध्ये जरा वेगळी माहिती आहे ती म्हणजे भारताने चीनच्या अण्वस्त्रांच्या शस्त्रागारावर प्रक्षेपणांचा उपयोग करून हल्ला करण्याची धमकी दिल्याने चीन 'गुमान' बसला! खरे-खोटे माहीत नाहीं. ही माहिती लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी कुठून मिळविली ते त्यांच्या 'संदर्भ-सूची'त (References) पाहून तुम्हाला लिहीन. (सध्या ते पुस्तक एका मित्राने वाचायला नेले आहे.) तुम्ही दिलेले इतर दुवे वाचून वाटले तर नंतर प्रतिक्रिया देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

असेच

प्रदीप
Tue, 11/16/2010 - 18:44 नवीन
म्हणतो. अमेरिका आपल्या जवळ येत असेल तर ती आपल्या दृष्टिने काळजी करण्याची बाब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

माझे वैयक्तिक मत: अमेरिकेबरोबर दोस्ती करणे आपल्या हिताचे!

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 16:19 नवीन
मोडकसाहेब, एक म्हण आहे कीं कांहींच्या बरोबर न दोस्ती करावी न दुष्मनी! परराष्ट्रीय धोरणात आपल्या देशाला जे चांगले ते करावे. पण आपले राजकारणी इतके भ्रष्ट आहेत कीं वैयक्तिक स्वार्थासाठी आईला विकायला मागे-पुढे पहाणार नाहींत. त्यामुळे कधी यशाच्या जबड्यातून पराभवाला खेचून काढतील (Pulling defeat from the jaws of success) हे सांगता येत नाहीं. पण माझे वैयक्तिक मत असे आहे कीं अमेरिकेबरोबर दोस्ती करण्यात-खास करून चीनकडून यणारे संकट पहाता-आपला नक्कीच फायदा आहे. पण डोळे उघडे हवेत. आज अमरिकेलाही आपली गरज आहे व आपल्यालाही वेळ आल्यास चीनशी टक्कर देऊ शकेल असा शक्तिवान मित्र हवाच! चीनशी मैत्री आज तरी अशक्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मैत्री

प्रदीप
Wed, 11/17/2010 - 20:06 नवीन
दोघांशीही नको. त्या दोघांनाही दूर ठेऊन आपण आपला कार्यभाग साधत राहिले पाहिजे. सध्या इंडोनेशिया हे फारच चांगल्या तर्‍हेने करीत आहे. बाकी भारतीय राजकारण्यांवरील आपली टिपण्णी पटते. त्यापुढे जाऊन मी म्हणतो की आपले राजकारणी एकवेळ परवडले (कारण काहीही म्हटले तरी त्यांना अकांउटेबलिटी आहे), पण आपल्या नोकरशहांनी आपले जे नुकसान आतापर्यंत केले आहे व ह्यापुढेही ते करत रहातील, त्याचे काय? त्यांना कसलीही अकाउंटेबलिटी नाही, कसलाही धरबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अगदी सहमत

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 20:46 नवीन
अगदी सहमत. आपली नोकरशाही हा एक वेगळा आणि लिहिण्याजोगा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

:-)

सहज
Sun, 11/14/2010 - 18:13 नवीन
मुशर्रफ सैनिक कमी, राजकीय नेता जास्त वाटतात. भारतात असते तर मोठ्ठे राष्ट्रीय नेते असते. अमेरिकेची पाकला मदत ही नक्की किती मदत व किती पुढच्या विमान, शस्त्रे विक्रीतुन परत येणारी रक्कम आहे त्याचा हिशेब कुठेतरी मिळला पाहीजे बॉ.
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Tue, 11/16/2010 - 07:37 नवीन
अमेरिकेची पाकला मदत ही नक्की किती मदत व किती पुढच्या विमान, शस्त्रे विक्रीतुन परत येणारी रक्कम आहे त्याचा हिशेब कुठेतरी मिळला पाहीजे बॉ. एक १०१% भांडवलशाही देश दानधर्मापोटी लाखो डॉलर खर्ची घालतोय हे पट्त नाही बॉ! काका, बाकी तुमचे चालू द्या ... आम्हाला कंटाळा आलाय आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

Doing what one like is freedom!

सुधीर काळे
Tue, 11/16/2010 - 08:56 नवीन
Doing what one like is freedom.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

+१ लिहीत रहा. प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/16/2010 - 10:48 नवीन
+१ लिहीत रहा. प्रतिक्रिया आल्या नाहीत तरी वाचणारे लोक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

'व्यनि'वर बरेच प्रतिसाद येत असतात

सुधीर काळे
Tue, 11/16/2010 - 12:04 नवीन
कल्पना आहे, कारण 'व्यनि'वर बरेच प्रतिसाद येत असतात. नाहीं तरी आम्ही आता 'गॉन' केस आहोत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

छे छे "गॉन" वगैरे काही

अवलिया
Tue, 11/16/2010 - 12:29 नवीन
छे छे "गॉन" वगैरे काही नाही. एखाद्या विषयाचा असा पाठपुरावा करण्याची अनेकांना सवय नसते त्यामुळे तुमच्याबद्दल वेगवेगळी मते तयार होतात. तुम्ही तुमचे कार्य जोमाने चालु ठेवा. :) मध्यंतरी वेगळे विषय हाताळले होते तसे रुचीपालट म्हणुन करुन बघा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

+२

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/16/2010 - 13:07 नवीन
पुप्याशी सहमत. माहितीपुर्ण लेखन असेच चालु ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

लेख वाचला.. बाकी प्रतिसाद

शाहरुख
Mon, 11/15/2010 - 23:42 नवीन
लेख वाचला.. बाकी प्रतिसाद देण्याइतकी माझी समज नाही :-)
  • Log in or register to post comments

वाचले, गंभीर आहे सारे.

गांधीवादी
Tue, 11/16/2010 - 06:54 नवीन
वाचले, गंभीर आहे सारे. पुढच्या पिढीस काळ सुखावह नाही. आजची पिढी 'लोकल' मधून बॉम्ब फुटेल ह्या भीतीने वावरते, तर उद्याची पिढी 'शहरावरच' बॉम्ब पडेल ह्या भीतीने वावरणार. अवघड आहे.
  • Log in or register to post comments

चला क्रमशः चालू तेच तेच ते तेच ते

कापूसकोन्ड्या
Tue, 11/16/2010 - 18:02 नवीन
चला क्रमशः चालू तेच तेच ते तेच ते आता या विषयाचा कंटाळा आला. आता बास की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

दुर्दैवाची गोष्ट अशी कीं

यशोधरा
Tue, 11/16/2010 - 13:53 नवीन
दुर्दैवाची गोष्ट अशी कीं त्यांचा दुतोंडीपणा अमेरिकेचे राष्ट्रपती, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळातील नेते यांच्यासारख्या-म्हणजे ज्यांना माहीत असायला हवे त्यांना-सोडून सार्‍या जगाला माहीत आहे.
मला वाटते, असे नसावे. अमेरिकेला व तेथील थिंक टॅंकला निश्चित माहीत असावे, पण ते स्वतःचे हित पाहणार, त्यामुळे जर पाकिस्तानच्या कारवाया व दुतोंडीपणा त्यांच्या पथ्यावर पडत असेल तर ते दुर्ल़क्ष करत असावेत. रशियन राजवट आणि आक्रमण ह्याला तोंड देण्यासाठी बिन लादेनचे पिल्लू ह्यांनीच सोडले होते की एके काळी, आता तोच ह्यांच्या डोक्यावर मिरे वाटत आहे, हे अलाहिदा. तसेच पाकिस्तानला अमेरिका वापरत आहे, आणि थोडाफार स्वतःचा वापर करवून ( पाकिस्ताने नेत्यांकडून) घेत आहे. वाचत आहे लेख...
  • Log in or register to post comments

तीच चूक १९८० ते २०१० अशी तब्बल तीस वर्षे?

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 13:07 नवीन
"कळते आहे पण वळत नाहीं" असे मला तरी वाटते. न्यूक्लियर डिसेप्शनमध्ये "गाभा" या प्रकरणात "पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ’अल-कायदा’ या संघटनेला नष्ट करण्याचे, त्यांच्या नेत्यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्याचे व अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील दुर्गम व अवघड भागातील लपण्याच्या जागा उखडून टाकण्याचे टाकण्याचे वचन अमेरिकेला दिले होते. बुश-४३च्या सरकारने एक संभाव्य मित्रराष्ट्र असल्याचा फायदा एका बाजूला तर अण्वस्त्रांच्या निर्मितीच्या कार्यक्रमापासून उद्भवणारा धोका दुसर्‍या बाजूला अशा तर्‍हेने पाकिस्तानच्या (व मुशर्रफच्या) उपयुक्ततेचे मूल्यमापन केले. असेच मूल्यमापन कार्टर व रेगन यांनीही केले होते. पाकिस्तानच्या विरुद्ध एका बाजूने अतिरेक्यांना लपवून ठेवून अमेरिकेपासून वाचवणारे व दुसर्‍या बाजूला याच अतिरेक्यांना अण्वस्त्रनिर्मितीची माहिती गुप्तपणे देणारे असे दुटप्पी धोरण राबविणारे राष्ट्र असल्याचा भरपूर पुरावा असूनही अमेरिकेने याबाबत कांहींच केले नाहीं. कारण अमेरिकेच्या विमानांना मुक्त संचार देऊन, अतिरेक्यांबद्दलच्या गुप्त बातम्या अमेरिकेला पुरवून व जिथे पाश्चात्य सैन्य जाऊही शकणार नाहीं अशा दुर्गम डोंगराळ विभागात स्वत:चे सैन्य पाठवून मुशर्रफ (व पाकिस्तान) अमेरिकेच्या सुरक्षानीतीतील एक अव्वल मोहराच बनला होता. " असा कुत्सिततापूर्ण उल्लेख आलेला आहे. पण परिणाम आज जो दिसत आहे तो हा कीं पाकिस्तान आजही अल-कायदा/तालीबानच्या संदर्भात अमेरिकेशी "तळ्यात कीं मळ्यात" खेळतोय् आणि दरम्यान 'अल-कायदा'चे नेते पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना ताब्यात घेऊन ती अमेरिकेवरच डागायची तयारी करताहेत! (अल्-कायदा या संघटनेचे ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचे तिसर्‍या क्रमांकाचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले होते कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढे पहाणार नाहींत (http://www.misalpav.com/node/8315). कांहीं महिन्यांपूर्वी मुस्ताफा अबुल-याझीद द्रोणाचार्यांच्या शरसंधानात (Drone missile attack) मृत्युमुखी पडले.) पहिली चूक कुणीही करतो, पण तीच चूक १९८० ते २०१० अशी तब्बल तीस वर्षे दरम्यान Ground realities आता बदलेल्या असल्या तरी करावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

म्हणजे अमेरिकेने नक्की काय करायचे?

सहज
Wed, 11/17/2010 - 13:19 नवीन
>पहिली चूक कुणीही करतो, पण तीच चूक १९८० ते २०१० अशी तब्बल तीस वर्षे दरम्यान Ground realities आता बदलेल्या असल्या तरी करावी? म्हणजे अमेरिकेने नक्की काय करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सोप्पं आहे.... काही निर्णय

नितिन थत्ते
Wed, 11/17/2010 - 15:18 नवीन
सोप्पं आहे.... काही निर्णय घेण्यापूर्वी जकार्ताला conference Call करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पाकिस्तानच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करणे!

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 15:53 नवीन
सोप्पं आहे! पाकिस्तानच्या पृष्ठभागावर अमेरिकेने लत्ताप्रहार करणे! यासाठी जकार्ताला फोन करून पैसे खर्चायची गरज नाहीं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

??

सहज
Wed, 11/17/2010 - 19:51 नवीन
>सोप्पं आहे! पाकिस्तानच्या पृष्ठभागावर अमेरिकेने लत्ताप्रहार करणे! लत्ताप्रहार म्हणजे? सिनेमा, कथा, कादंबर्‍यात समजु शकतो पण अशी 'सोपी कृती' अमेरिका सरकारने कशी करावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

या 'अवलक्षणी बाळा'ला पॉकेटमनी देणे अमेरिकेने बंद केले पाहिजे!

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 20:59 नवीन
खरं तर अमेरिका इमानदारी विकत घेण्यासाठी पाकिस्तानात पैसे ओतत आहे आणि पाकिस्तान ओरपत गद्दारी करीत आहे इकडे अमेरिकेनेच पाहिले पाहिजे. आणि अशा 'अवलक्षणी बाळा'ला पॉकेटमनी देणे बंद केले पाहिजे. आणखी काय? अमेरिकेचे पैसे थांबले कीं पाकिस्तान आधीच दिवाळखोरीला आलाय तो रस्त्यावर येईल. आपल्याला एरवी त्याच्याशी काहींच देणे-घेणे नाहीं, पण हे ओतलेले पैसे तो आपल्याविरुद्ध वापरतो म्हणून अमेरिकेने ते दान बंद करायचा आग्रह आपल्या सरकारने देशहितासाठी धरला पाहिजे. 'मिपा' कुणी संत्री-मंत्री वाचत असतील असे नाहीं, पण लोकमत असेच संघटित होत असते, व्हायलाही पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पाकीस्तान रस्त्यावर

सहज
गुरुवार, 11/18/2010 - 06:11 नवीन
अफगणीस्तान मधले काम संपल्यावर अमेरिका निघून गेली होती तेव्हा तिथे काय झाले? आज अमेरिकेला तिथे अफगाणमधे, इराकमधे कायमस्वरुपी वास्तव्य करुन रहायला लागत आहे. खर्च केवढा होतो आहे? पैसे, मनुष्यबळ? परत लोकशाही आहे अमेरिकेत बुशच्या युद्धाला कंटाळून जनतेने निवडणूकीत धडा शिकवला रिपब्लीकन पक्षाला. उद्या आख्खा पाकीस्तान रस्त्यावर आला व तालीबान तत्वाच्या हातात गेल्यावर पुन्हा युद्ध, त्यात अण्वस्त्रांचा धोका. भारताच्या सुरक्षेला धोका. हॅलीबर्टन व तत्सम कंपन्यांची महीन्याची बिले, अमेरिकन सैनिक अनेक वर्षे पाकीस्तानमधे रहाणे इ खर्च ही पाकीस्तानमधे सध्या ओताव्या लागणार्‍या पैशापेक्षा कमी नाहीत का? जाउ द्या ना अमेरिकेचे २०० बिलीयन भारताच्या दृष्टीने अमेरिका पाकीस्तानमधे गुंतलेली असणे बरे आहे. आज पाकीस्तानशी मैत्रीपूर्ण संबध नसते तर ओसामा व गॅंग पाकीस्तानभर असती. वर तुम्ही उल्लेख केलेला नं ३ अधिकारी द्रोणचा शिकार झाला असता का? अमेरिकेने लत्ताप्रहार करावा असे म्हणणे अतिशय सोप्पं आहे पण त्याला खरचं काही अर्थ आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

'जैसे थे' चालू ठेवणे म्हणजे slow poisoning चा प्रकार नाहीं कां?

सुधीर काळे
गुरुवार, 11/18/2010 - 10:31 नवीन
तुम्ही म्हणताय् तीही एक बाजू आहेच, पण पैसे संपल्यावर पाकिस्तान किती गमजा करू शकेल? गेल्या वेळी त्याने अण्वस्त्रांचा बाजार मांडला आणि अमेरिकेने "आपलेच दात, आपलेच ओठ" या कारणाने गुपचिळी साधली होती! पण आता असे होणार नाहीं. आणखी एक मुद्दा असा कीं अमेरिका पैसे देवो अथवा न देवो, तालीबानचे राज्य तिथे आज ना उद्या येणारच! झियांनी स्वार्थासाठी लावलेल्या या विषवृक्षाला तिथल्या जवळ-जवळ सगळ्याच लष्करशहांनी आणि कांहीं मुलकी सरकारांनी खतपाणीच घातले आहे. बेनझीरबाईंनी याच मुशर्रफना पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी संघटना उभारायला व त्यांच्या प्रशिक्षणाचे तळ चालवायला अनुमोदन दिले व नवाझ शरीफ हे तर ISI चे पुरस्कृत उमेदवार होते ही माहिती आपण माझ्या न्यूक्लियर डिसेप्शनमधून वाचलीच असेल. तसेच मुशर्रफ यांनी सत्ता बळकावल्यावर ज्या कांहीं Top level नेमणुका केल्या त्या सार्‍या 'अल कायदा'बद्दल सहानुभूती असणार्‍यांच्याच होत्या! अमेरिकेचे मदतीपैकी मोठा वाटा आजही या संघटनांना सुदृढ करण्यात खर्च होत आहे. त्यामुळे आहे ती परिस्थिती चालू ठेवणे म्हणजे slow poisoning चा प्रकार नाहीं कां? असो. इथे आता थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

म्हणूनच

सहज
Sun, 11/21/2010 - 15:01 नवीन
अमेरीकेलाच हा घोळ निस्तरायला लावणे महत्वाचे आहे. तुम्ही अमेरिकेला दूर व्हायला कशाला सांगत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अगदी जवळून जोरदार लत्ताप्रहार करायला सांगतोय्

सुधीर काळे
Sun, 11/21/2010 - 15:06 नवीन
छे, छे! मी उलट अमेरिकेला पाकिस्तानच्या पृष्ठभागावर अगदी जवळून जोरदार लत्ताप्रहार करायला सांगतोय्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

प्रकाटाआ

सुधीर काळे
Wed, 11/17/2010 - 16:01 नवीन
प्रकाटाआ (Duplicated)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ओबामा का ओसामा? संपादनासाठी

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/16/2010 - 13:40 नवीन
ओबामा का ओसामा? संपादनासाठी प्रतिसाद पाचर मारलेले नाही.
  • Log in or register to post comments

तसेही ओबामा हे पण पिल्लूच आहे

अवलिया
Tue, 11/16/2010 - 13:50 नवीन
तसेही ओबामा हे पण पिल्लूच आहे वेगळ्या हेतुसाठी वेगळ्या लोकांनी सोडलेले... विठ्ठल ! विठ्ठल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पटेश.

यशोधरा
Tue, 11/16/2010 - 13:55 नवीन
पटेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पाचर न मारल्याबद्दल धन्यवाद.

यशोधरा
Tue, 11/16/2010 - 13:54 नवीन
पाचर न मारल्याबद्दल धन्यवाद. लिहिण्याच्या नादात टंकले. चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा माणूस

आंसमा शख्स
Wed, 11/17/2010 - 04:36 नवीन
हा माणूस खरा नाहीच! याला वेळीच ठेचले पाहिजे.
  • Log in or register to post comments

प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी

chipatakhdumdum
Wed, 11/17/2010 - 22:54 नवीन
प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी जे उपदव्याप करतो, त्यात त्याला फायदा झाला आणि आपल्याला तोटा झाला, तर त्याला शिव्या किंवा दोष का द्यायचा ? मी माझ्या कुटंबाच्या उदरनिर्वाहा करता जो व्यवसाय करतो, त्यात दोन पक्ष असतात आणि मला एका पक्षाची बाजू घ्यावी लागते. अनुभव असा आहे की, जेंव्हा आमची बाजू जिंकते तेंव्हा विरुध्द पक्ष माझी **** काढतो आणि आम्ही हरतो तेंव्हा माझा माणूस माझ्या counterpart ची **** काढतो. आम्हाला तोंडावर कोणी दोष देत नाही. पाठीमागे आमची ****मोजतात ते माझ्या व्यवसायातल्या सगळ्याना माहीत असत. Musharraf is not an indian, he is pakee, then he is bound to do everything against india and if he suceceedes , then whats's game in blaming him here on Misalpav. अगदी खर सांगा, कसाब आणि त्याचे साथी ज्याकरता आले होते त्यात ते यशस्वी झाले की नाही ? ( फक्त एकच गोष्ट सोडून , ती म्हणजे हाताला भगवा दोरा गुंडाळून त्याना ही हिंदूनी केलेली कृती आहे, अस दाखवायच होत). समजा कसाब सुध्दा मेला असता, तर आणखी किती साध्वी सडल्या असत्या? पाकीस्तानी द्रुष्टीकोनातून कसाब बरोबर आहे आणि माझ्या द्रुष्टीकोनातून तो क्रूरकर्मा आहे. हलकट आहे, ***** आहे, माझ्या घरातली माणस त्या ####### ने मारली आहेत. पण जेंव्हा तो मादरचोद पाकीस्तानी आहे ही गोष्ट मी विचारात घेतो तेंव्हां मी त्याच कौतुकच केल पाहीजे. का असे चार पाच कसाब हा देश निर्माण करू शकत नाही ? Human Management & planning of human resourses बध्दल आपण सगळे बोलतो, दाउद इब्राहीम पेक्षा भारी कोण तुम्हाला माहीत आहे का? मिसळपाववर आपण ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रीया देतो, त्याच एकच वर्णन... Intelectual masturbation.
  • Log in or register to post comments

अशा तर्‍हेच्या चर्चा उपयुक्त आहेत हे मात्र मला मनापासून वाटते

सुधीर काळे
गुरुवार, 11/18/2010 - 10:13 नवीन
पूर्णपणे सहमत! अशा लबाड मुशर्रफना त्यांच्या बेगमसह २१ तोफांची सलामी देत आग्रा परिषदेला बोलावून वाजपेयींनी त्यांना भाव कां दिला हे मला कधीच समजले नाहीं. त्यांच्याकडे जर वाजपेयींनी दुर्लक्ष केले असते तर तो इतका 'मोठा' झालाच नसता असे मला फार वाटते. तसे पहाता पाकिस्तानी हुकुमशहांना दैवाची साथ नेहमीच लाभली आहे. झियांना रशियन स्वारीने हात दिला तर मुशर्रफना ९/११ ने आणि वाजपेयींनी. हे लबाड मुशर्रफ काश्मीरमधल्या अतिरेक्यांना 'स्वातंत्र्यवीर' म्हणतात व त्यांची गाडी बाँबने उडवू पहाणार्‍यांना अतिरेकी! काश्मीरमध्ये आपल्या पोलीसांच्या गोळ्यांना बळी पडतात ते निरपराधी, निष्पाप लोक पण त्यांचे सैन्य (आणि अमेरिकेचे द्रोणाचार्य) मारते ते फक्त अतिरेकी! पण यात कांहीं नवीन आणि आश्चर्य करण्यासारखे नाहीं. वासुदेव बळवंतांसारख्या आपल्या आद्य क्रांतिवीरांना 'काळ्या पाण्या'वर आणि लोकमान्यांनाही गुन्हेगार म्हणून 'मंडाले'ला पाठवलेच ब्रिटिशांनी! एक गोष्ट लक्षात येते ती ही कीं काश्मीरबाबत सर्व पाकिस्तानी जितके एकसंधपणे बोलतात तितके आपण भारतीय बोलत नाहीं. का असे चार पाच कसाब हा देश निर्माण करू शकत नाही? अगदी खरे आहे! मला आशा आहे कीं असे 'कसाब' आपणही निर्माण करत असूच! बाकी 'मिसळपाव'वरील या व अशा चर्चांच्या आणि या प्रतिसादांच्या तुम्ही केलेल्या 'वर्णना'चे समर्थन करण्याइतके धैर्य माझ्यात दुर्दैवाने नाहीं! पण अशा तर्‍हेच्या चर्चा उपयुक्त आहेत याबाबत मात्र माझे मत पक्के अनुकूल आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात हे लेख मस्तच झालाय

निनाद मुक्काम …
Tue, 12/07/2010 - 07:36 नवीन
क्या बात हे लेख मस्तच झालाय . पण त्यांचे गुरु हमीद गुल हे खरे तर भारताचे खरे दुश्मन आहेत . मूष सत्तेसाठी तडजोडी करतील तरवेळप्रसंगी त्यांच्या धोरणापासून यु टर्न सुद्धा घेतील .पण हा ७५ वर्षाचा थेरडा अजूनही जोमाने तालिबान ला सहकार्य व भारतविरोधी कारवाया काश्मिर व अफगाण मध्ये करत आहे .
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणे उत्तम.

चिंतामणी
Tue, 12/07/2010 - 10:00 नवीन
वेगळे सांगायलाच नको. बाकी मोठी प्रतिक्रीया लिहीण्याएव्हढी माझी योग्यता नाही.
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणे उत्तम.

चिंतामणी
Tue, 12/07/2010 - 10:00 नवीन
वेगळे सांगायलाच नको. बाकी मोठी प्रतिक्रीया लिहीण्याएव्हढी माझी योग्यता नाही.
  • Log in or register to post comments

कोणी जात्यावरची गाणी देण्यास

टारझन
Tue, 12/07/2010 - 10:05 नवीन
कोणी जात्यावरची गाणी देण्यास मदत करेल काय ? काय पण च्यायला एकेक चर्चा चालु असतात अलिकडे :) घेतला किबोर्ड की बडव .. घेतला किबोर्ड की बडव :) जणु काही भारताचे परराष्ट्र आणि अंतरराष्ट्रीय धोरण मिपावरील चर्चांवरुन ठरते :) बोळा निघण्याच्या हार्दिक शुभेच्छा :) यातुन काही एंटरटेनमेंट पण होत नाही हो आता :( -(वैतागग्रस्त) दळण दळे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा