Skip to main content

..मी गरुडभरारी घेता...

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 13/11/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मी गरुडभरारी घेता... मी गरूडभरारी घेता.. तु हो आकाश निळे.. मी सुर्य कदाचित होता.. तु हो किरण कोवळे.. मी खट्याळा वारा होता.. तु हो सुगंध धुंद करणारा.. मी भरलेले नभ मग होता.. तु हो पाऊस कोसळणारा.. मी मिटली पापणी होता.. तु हो सुंदर स्वप्ने सारी.. मी प्रवास सुंदर मोठा तु हो वाट गुणगुणणारी.. मी कधी कंटाळवाणा होता.. तु हो आठवण हुरहुरणारी.. मी कोरा कागद उलगडलेला.. तु होऊनि ये कविता स्फुरणारी.. मी राकट मनगट होता.. तु हो मूठ ताकदवानी.. मी उचकी शेवटची होता.. तु हो पवित्र गंगेचे पाणी.. -------योगेश.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1786
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कविता आवडली. (आस्वादक)बेसनलाडू शेवटची 'उचकी' नसते, 'आचका' असतो. 'उचकी'ला गंगेचे पाणी कशाला? नळाचे चालते ;) (ह. घ्या.) (छिद्रान्वेषी)बेसनलाडू

मी मिटली पापणी होता.. तु हो सुंदर स्वप्ने सारी.. मी प्रवास सुंदर मोठा तु हो वाट गुणगुणणारी.. >>>> आवडेश !!

मी कधी कंटाळवाणा होता.. तु हो आठवण हुरहुरणारी.. मी कोरा कागद उलगडलेला.. तु होऊनि ये कविता स्फुरणारी..
सुरेख.