प्रेरणा - http://misalpav.com/node/15406
जय नावाचा इतिहास जो
घडले तसेच सांगत आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी
वचन गीतेत महान आहे
परंतु केवळ लालसेपायी
मानवधर्म तो गहाण आहे
पांडवास हरवण्या दान करुनी
सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे
दिसता सामोरा मृत्यु अटळ
त्याला धर्म आठवत आहे
रजस्वलेची फेडुनी वस्त्रे
अंकी बसण्या बोलवत आहे
अंधपुत्रा फोडीन तीच मांडी
भीम दरबारी गर्जत आहे
अजुनी नसे जो जन्मला
सुड त्याजवर उगवत आहे
अशा अधमांच्या कपाळी
अमरत्वाचा शाप आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1928
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!वा!
ओहो!
क्लासच!
In reply to ओहो! by धमाल मुलगा
क ड क !!!
In reply to क्लासच! by मेघवेडा
अशेंच म्हण्टां
In reply to क ड क !!! by असुर
मस्त!
मस्तं रे नान्या. झक्कास.
आज काय खर नाय
चर्चेत अवलियाजी, साहित्यात
कौल ईसरलात की काय?
In reply to चर्चेत अवलियाजी, साहित्यात by स्पंदना
मस्त. आवडले.