Skip to main content

(निशाण)

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 12/11/2010 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/15406 जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे परंतु केवळ लालसेपायी मानवधर्म तो गहाण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे दिसता सामोरा मृत्यु अटळ त्याला धर्म आठवत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे अंधपुत्रा फोडीन तीच मांडी भीम दरबारी गर्जत आहे अजुनी नसे जो जन्मला सुड त्याजवर उगवत आहे अशा अधमांच्या कपाळी अमरत्वाचा शाप आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
लेखनविषय:

वाचने 1938
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

क्लाऽऽस! क्या बात है! मस्त जुगलबंदी. खूप खूप दिवसांनी अशी मजा आली वाचायला. जियो नाना, जियो निरंजन :)

In reply to by धमाल मुलगा

क्या बात है! मस्त जुगलबंदी. खूप खूप दिवसांनी अशी मजा आली वाचायला. जियो नाना, जियो निरंजन + १. ऐसाच बोल्ताय.