टु पेंट ऑर मेक लव्ह
अनेक दिवसांनी चित्रपट ओळख सादर करतो आहे.
जमेल तसे अजून वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांच्या ओळखी टाकण्याचा मानस आहे.
-निनाद
फ्रेंच चित्रपट टु पेंट ऑर मेक लव्ह
मॅडेलीन (सबीन अझेमा) ही एक मध्यमवयीन हौशी चित्रकार आहे. शिवाय ती स्वतःचा व्यवसायही चालवते. तीच नवरा विलियम (डॅनियल अत्वाल) हा हवामान खात्यात नोकरी करतो. पण त्याने आता मुदतपूर्व निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
या दांपत्याला एक मुलगी आहे. ती ला आता शिष्यवृत्ती मिळाल्याने ती इटलीमध्ये रोमला जाते आहे. आता हे दोघेच आहेत.
व्यवसायातल्या ताणातून निवांतपणा मिळवण्यासाठी मॅडेलीन फ्रांसच्या ग्रामीण भागात भटकत असते आणि आवडलेल्या ठिकाणांची चित्रे काढत असते.
अशाच एका भटकंतीमध्ये आल्प्स च्या सुंदर पर्वराजीतल्या ग्रामीण भागात असलेल्या एक जुन्या घराचे चित्र काढायला ती जाते. निवांत जागा आणि चांगला व्ह्यु पाहून ती आपले रंग आणि साहित्य काढते. सुरुवात करते तोच ती ला दुरून एक माणूस तिच्याकडे येतांना दिसतो. हा माणूस म्हणजे ऍडम (सर्जी लोपेझ). हा अंध असतो आणि रंगांच्या वासाने मॅडेलीनला शोधतो. चौकशी अंती मॅडेलीनला तो सांगतो की ती ज्या घराचे चित्र काढत आहे ते विकायला आहे. हे सुंदर पर्वतराजीत वसलेले घर मॅडेलीनला आवडते. मॅडेलीन विलियम सोबत ते घर विकत घेण्याचा निर्णय घेते. ऍडम आता त्यांचा शेजारी बनतो. घर घेतल्यावर ऍडम त्याच्या बायको इव्हा (अमीरा कॅसर) सह जेवायला येतो. संगीत गाणी आणि चित्र आणि फ्रेंच वाईन अश्या अनेक आवडी निवडी जुळतात. गप्पा रंगतात. एक प्रकारचा मोकळेपणा मॅडेलीन आणि विलियम अनुभवू लागतात. आणि ऍडम आणि इव्हा पण त्यांना जेवणाचे आमंत्रण देतात. ऍडम आणि इव्हा कडचे जेवणही असेच संगीत गाणी आणि चित्र आणि फ्रेंच वाईन सोबत रंगते. जेवण झाल्यावर मॅडेलीन आणि विलियम घरी येतात. दुरून त्यांना ऍडम आणि इव्हा च्या घराला आग लागल्याचे दिसते. पटकन गाडी काढून ते तेथे पोहोचतात. पण घर भस्मसात झालेले असते. ऍडम आणि इव्हाला ते घरी घेऊन येतात.
आत चौघेजण एकत्रच राहू लागतात. अशाच एका धुंद जेवणानंतर ऍडम मॅडेलीनचा हात धरतो आणि तिला घेऊन वरच्या खोलीत जातो. इव्हा आणि स्तिमित विलियम दोघेच खाली राहतात. विलियम पुढे जाऊ लागताच इव्हा त्याला हात धरून सोफ्यावर ओढते. प्रणयाची एक धुंद रात्र संपून दुसरा दिवस सुरु होतो.
आता अचानकपणे आलेल्या शृंगारातील या नव्या घटनेला कसे सामोरे जावे हे मॅडेलीन आणि विलियम या दोघांनाही कळत नाही. यातून वेगळेच काही आकाराला येऊ लागते. आणि मॅडेलीन आणि विलियम दोघेही ऍडम आणि इव्हाच्या प्रेमात पडले आहेत असे त्यांच्या लक्षात येते. मध्यम वयात बुर्झ्वा आयुष्यात आणि कोणतेही थ्रिल नसलेल्या जीवनात, हे नवीनच शृंगारिक धाडस धरून ठेवण्यासाठी त्यांची नकळतपणे धडपड सुरू होते.
पण ऍडम आणि इव्हा फ्रांस सोडून पॅसिफिक महासागरातील एका बेटावर जाऊन राहण्याचा निर्णय घेतात. मॅडेलीन आणि विलियम ला हा विरह सहन होत नाही. ते ठरवतात की आपणही तेथेच जाऊन राहू. घर विकण्याचा निर्णय होतो.
जाहिरातीमुळे काही लोक घर पाहायला येतात. पण काही जमेल असे दिसत नसते. आता सगळे लोक येऊन गेले असे वाटत असतांनाच अजून एक तरुण जोडपे तेथे उगवते. त्यांना ते घर खूपच आवडते. पण पैसे मात्र तेव्हढे नसतात. विषय थांबतो. सायंकाळचा अंधार दाटून आलेला असतो. मॅडेलीन या नवीन जोडप्याला म्हणते की आता जेऊन जा. फारसे आढेवेढे न घेता तेही तयार होतात. परत एकदा वाईन सोबत गपा ताल धरू लागतात. आवडी निवडी संगीत आणि कला जुळत जाते. नकळतपणे परत 'तेच घडते'.
आता काहीसे सरावलेपण आलेले असल्याने सकाळ चांगली जाते! ते जोडपे निघून गेल्यावर विलियम मॅडेलीन ला विचारतो की, आपल्याला खरोखर बेटावर जायला हवे आहे का?
आता घर विकण्याची आवश्यकता संपलेली असते!
सुंदर चित्रण आणि साधी सोपी शृंगारीक कथा असा हा चित्रपट आहे. काही गोष्टी मात्र खटकल्या - काही खुप ढोबळपणे दिलेले क्ल्युज किंवा अतिसूचक गाण्यांचा वापर मला मठ्ठ वाटला, मजा घालवणारा वाटला. पण चित्रपट बटबटीतही नाही, हे मात्र तेव्हढेच खरे. चित्रण सुरेख आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही.
साध्या सरळमार्गी आणि निवृत्तीला आलेल्या (फ्रेंच?) लोकांच्या आयुष्यातही सेन्सेशनल गोष्टी घडू शकतात हे दाखवून देणारा चित्रपट.
चित्रपटाचे नाव - Peindre Ou Faire L'amour
भाषा - फ्रेंच
लेखक, दिग्दर्शक - अर्नाद लारौ आणि जीन मारी लारौ
कलाकार
मॅडेलीन - सबीन अझेमा
विलियम - डॅनियल अत्वाल
ऍडम - सर्जी लोपेझ (तोच अ पॉर्नोग्राफिक अफेयर मध्ये आपली ओळख झालेला)
इव्हा - अमीरा कॅसर
वर्ष - २००५
पुरस्कार - कान्स २००५ मध्ये पाम द् ओर साठी नॉमिनेशन
याद्या
3681
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
छान ...
तसे
In reply to छान ... by utkarsh shah
काय बोलू? काय माहीत! धन्यवाद.
अच्छा. मला वाटले की एखाद्या
उत्तम उपक्रम... उत्तम ओळख.
धन्यवाद
In reply to उत्तम उपक्रम... उत्तम ओळख. by बिपिन कार्यकर्ते
सुंदर चित्रण आणि गोष्ट/
?
In reply to सुंदर चित्रण आणि गोष्ट/ by Pain
रामा शिवा गोविंदा!
सुरेख
In reply to रामा शिवा गोविंदा! by सहज
'सुसंस्कृत' लोकांच्या मानाने
<<<अवांतरः "व्यभिचार हा
In reply to 'सुसंस्कृत' लोकांच्या मानाने by नगरीनिरंजन
पाहतांना
In reply to 'सुसंस्कृत' लोकांच्या मानाने by नगरीनिरंजन
<<<बाकी ढोंगीपणा बद्दल म्हणाल
In reply to पाहतांना by निनाद
शक्य आहे
In reply to <<<बाकी ढोंगीपणा बद्दल म्हणाल by शिल्पा ब
<<बाकी ढोंगीपणा बद्दल म्हणाल
In reply to पाहतांना by निनाद
गंमत की गंभीर?
:-)
In reply to गंमत की गंभीर? by चिंतातुर जंतू
थोडी भर
In reply to गंमत की गंभीर? by चिंतातुर जंतू