Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शानबा५१२ on Mon, 11/08/2010 - 20:42
श्री.अदीती ह्यांनी लिहलेला 'क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस' हा लेख वाचुन त्यात थोडी भर घालवशी वाटली.जेव्हा आपण क्ष-कीरणांच्या वाढदीवसाबद्दल बोलतो तेव्हा क्ष-कीरणांचा जन्म नक्की कसा झाला ही माहीती देण्याचा ईथे उद्देश आहे. माझ्याकडे 'Rays And Radiations' नावाचं पुस्तक आहे,लेखक आहेत Robert Scharff,पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख आहे, ५ एप्रील १९६०(ईथे ) .ह्या पुस्तकात काही मनोरंजक कीस्से वाचले होते,पण आज कारण मिळाले म्हणुन लिहत आहे. _________________________________________ काही दशकांपुर्वी एका विनम्र वैज्ञानिकाने,अगदी अपघातरीत्या,एका रहस्यमय,अदृश्य कीरणाचा शोध लावला,ज्याला त्याने 'क्ष' असे नाव दीले.ह्या 'क्ष कीरणांमुळे आता माणुस शरीरात खोलवर बघतो व आजाराचे मुळ कारण शोधतो.औद्योगिक क्षेत्रात स्टील व लोखंडामधे लपलेल्या त्रुटी क्ष-कीरण शोधते.व असे अनेकविविध उपयोग जरी आज आपल्याला माहीत असले तरी त्यांच्या रहस्यमयतेमुळे 'क्ष' हे नाव त्यांना आजही लागु होते. ज्या विनम्र समजल्या जाणा-या वैज्ञानिकाने 'क्ष' कीरणांचा शोध लावला त्याचे नाव होते Wilhem Konard Roentgen,साल होते १८९५.जर्मनीत Roentgen त्याच्या Wurtzburg विद्यापिठाच्या प्रयोगशाळेत Crookes Tube मधुन निघालेल्या अतिनील कीरणांचा आभ्यास करत होता.Crooke Tube ही एक ईलेक्ट्रॉन ट्युब होती,जी लंडनच्या सर विलीयम क्रुक्स ह्यांनी १८७० मधे तयार केली.ह्या Crooke Tube म्हणजे दोन धातुच्या पट्ट्या एका ट्युबमधे बंद केल्या गेल्या होत्या.जर ह्या दोन धातुच्या पट्ट्यातुन विद्युतप्रवाह पुरवला गेला,तर ही ट्युब काही प्रकाश कीरणे ट्यूबच्या ग्लासच्या आवरणाला छेदुन बाहेर फेकत असे व ट्यूबच्या आतमधे विविध सुंदर रंगांचा प्रकाश होत असे. Crookers Tubeमधे तयार होणारी कीरणे ट्युबच्या बाहेर जाउ नयेत म्हणुन Roentgenने ट्युबला काळ्या कपड्याने झाकले.त्याने अतिशय काळजी घेतली की कोणतेही दृश्य प्रकाशकीरणे(visible light) ट्युबच्या बाहेर जाणार नाहीत वा बाहेरुन आत येणार नाहीत.त्याने एकदा एक फोटोग्राफीक प्लेट सहज त्या ट्युबच्या बाजुला ठेवली व तो आपले काम करत होता,त्याने पाहीले की फोटोग्राफीक प्लेट प्रज्वलित होत आहे.त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना, ट्युबमधुन एखादे कीरण तयार होउन ते काचेप्रमाणे कपड्यांनाही छेदुन बाहेर येत असावे,असे Roentgen ला वाटले. खात्री करावी म्हणुन Roentgen ने दोन धातुंमधला विद्युतप्रवाह बंद केला व त्याबरोबर फोटोग्राफीक प्लेट प्रज्वलित होणे थांबले,म्हणजे ह्या नवीन व विशिष्ट कीरणांचा उगम ट्युबमधेच असावा हे त्याच्या लक्षात आले. आपला प्रयोग पुढे चालु ठेवताना एकदा त्याने आपला हात ट्युब व फोटोग्राफीक ह्यांमधे ठेवला व आश्चर्य म्हणजे त्याला सावलीमधे फक्त हाताची हाडे दीसत होती व हात हलवल्यावर फक्त हाडांची सावलीही हलत होती.म्हणजे हे कीरणे मानवाच्या मांसाला छेदुन आरपार जाउ शकत होती,पण हाडांना नाही.मग पुढे Roentgen च्या असे लक्षात आले की क्ष-कीरणे पेपर्,प्लॅस्टर ऑफ पॅरीस ,लाकुड व जाड्या पुस्तकालाही छेदु शकत होती.पण ही कीरणे होती तरी काय? Roentgen कडेही ह्याचे उत्तर नव्हते म्हणुन त्याने ह्याला 'क्ष' अर्थात 'अज्ञात' हे नाव दीले.हे नाव त्या कीरणांना एवढे चिकटले की पुढे जेव्हा संशोधकाच्या सन्मानार्थ ह्या कीरणांना 'Roentgen rays' हे नाव दीले गेले तरी त्यांना 'क्ष-कीरण' ह्याच नावाने ओळखले जाते.वैद्यकीय क्षेत्रात क्ष-कीरणांच्या आभ्यासाला Roentgenology म्हटले जाते. Roentgen ने आपल्या 'On A New Kind Of Ray' नामक ऐतोहासिक प्रकाशनात आपल्या शोधाबद्दल जगाला सांगितले,विज्ञानजगात ही बातमी लगेच पसरली.काहीजणांनी क्ष-कीरणे ही मानवी जीवाला धोकादायक आहेत असा दावा केला,तर काहींनी ही कीरणे मानवाच्या वैयक्तीक आयुष्यावर आक्रमण करतील अशी भीती दर्शवली.अनेक उत्पादकांनी 'क्ष-कीरणप्रतिरोधी अंतवस्त्र' अशा जाहीराती केल्या,व शेवटी न्यु जर्सी विधानसभेत क्ष-कीरणांच्या खाजगी वापरावर निर्बंध घालण्यात आले. काही काळाने जेव्हा समाजाला क्ष-कीरणांच्या वापराचे फायदे व महत्व कळले तेव्हा क्ष-कीरणांचे सर्वांकडुन स्वागत झाले.पुढेल संशोधनात असे आढळले की क्ष-कीरणांची शक्ती ही त्यांच्या तरंगदैर्ध्य(wavelength) अतीनील कीरणांपेक्षाही कमी आहे म्हणुन आहे,क्ष-कीरणांची तरंगदैर्ध्य ईतकी लहान आहे की एका इंचात अडीचशे करोड क्ष-कीरणे मावतात. क्ष-कीरणांचे पुढील संशोधनामुळे क्ष-कीरण मानवाच्या जीवनात खुप मदत करु लागले व आजही करत आहे. _____________________________________________________________________
  • Log in or register to post comments
  • 4102 views

प्रतिक्रिया

Submitted by यकु on Mon, 11/08/2010 - 20:55

Permalink

कुठल्याही जार्गनशिवाय

कुठल्याही जार्गनशिवाय लिहिलेला सहज सोपा लेख शानबा! आवडला! आणखी मोठा केला असतास तर जास्त मज्जा आली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on Mon, 11/08/2010 - 21:05

Permalink

क्ष

क्ष
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 11/08/2010 - 22:23

Permalink

अतिशय सोपी भाषा

धन्यवाद शानबा! अतिशय सोप्या पण मनोरंजक भाषेत क्ष किरणांची आणि त्याच्या शोधाच्या कथेची माहिती करून दिल्याबद्दल!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Mon, 11/08/2010 - 22:55

Permalink

मस्तच

माहिती शानबा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 11/08/2010 - 23:22

Permalink

छान माहीती.

छान माहीती.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 11/09/2010 - 00:01

In reply to छान माहीती. by शुचि

Permalink

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशु on Tue, 11/09/2010 - 00:06

Permalink

मस्त..

मस्त छान माहिती...
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 11/09/2010 - 01:16

Permalink

आमच्या रेडिऑलॉजीच्या

आमच्या रेडिऑलॉजीच्या गुरुवर्यांनी दिलेली माहिती आठवली... १९९५ साली हाच विषय शिकताना त्यांनी हे क्ष किरणांचे शतकमहोत्सवी वर्ष असल्याचा उल्लेख केला होता हे स्मरते... अजून एक वाचलेली रोचक आठवण म्हणजे जोपर्यन्त या डॉक्टर / शास्त्रज्ञांना क्ष किरणांचे दुष्परिणाम माहित नव्हते , तोवर याचा प्रचंड वापर करून स्वतःची बोटे खराब केली त्यांनी.... मी रोज लेडचा संरक्षण करणारा झगा घालून आज अनेक एक्स रे काढतो त्यावेळी आद्य रोण्ट्जेनबाबाची याद करायला हवी असे वाटते.... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 11/09/2010 - 10:45

In reply to आमच्या रेडिऑलॉजीच्या by भडकमकर मास्तर

Permalink

ऐकलेली गोष्ट

चपलांसाठी पायाचा आकार पहाण्यासाठी साधारणपणे आपण एका ठराविक प्रकारच्या मोजपट्टीवर पाय ठेवतो आणि चपलांचा कोणता साईझ आपल्याला चालेल हे समजतं. एका दुकानदाराने त्याऐवजी क्ष-किरण वापरायला सुरूवात झाली आणि अर्थात दुकानातली गर्दी, पर्यायाने खप, वाढला. पुढे जेव्हा क्ष-किरण कार्सिनोजेनिक ठरू शकतात हे लक्षात आलं तेव्हा अर्थातच गर्दी कितीतरी पटीने कमी झाली. शानबा, माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. मास्तर, 'स्मायली' फेस आवडला! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Tue, 11/09/2010 - 11:17

Permalink

सुंदर लेख

शनबा, लेख चंगला अणि माहितीपोर्ण आहे. अवडला. पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Wed, 11/10/2010 - 10:35

Permalink

मी लहानपणी या शोधासंदर्भात

मी लहानपणी या शोधासंदर्भात दुसरीच गोष्ट वाचली होती. अंगठी आणि निगेटीव्जची. बहुदा संदर्भः सृष्टीविज्ञान गाथा- जयंत नारळीकर. तपासायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Wed, 11/10/2010 - 11:01

In reply to मी लहानपणी या शोधासंदर्भात by Pain

Permalink

Many Crookes tubes stood at

Many Crookes tubes stood at the base of further discoveries like the X-ray tube... http://members.chello.nl/~h.dijkstra19/page7.html वेळ मिळाल्यास सविस्तर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 11/11/2010 - 11:44

Permalink

मस्त

मस्त माहिती रे शानबा. Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com