रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं. तसंच आजही काहीतरी धुंडाळताना 'सर्च रिझल्ट्स'च्या डाव्या बाजूला वर गुगलचा चमत्कारिक लोगो दिसला. आज क्ष-किरणांच्या शोधाचा ११५वा वाढदिवस आहे हे गुगलबाबाकडून समजलं.
क्ष-किरण सर्वप्रथम शोधले ते जर्मन शास्त्रज्ञ विल्हेम कॉनराद राँतजेन याने, आजचीच तारीख, साल १८९५. आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्काराची फार वर्ष वाट पहावी लागली नाही, १९०१ साली राँतजेनही नोबेल लॉरिएट झाला.
क्ष-किरणही विद्युतचुंबकीय लहरींपैकी एका प्रकारच्या लहरी आहेत, दृष्य प्रकाशाचा अधिक उर्जावाला भाऊ (का बहिण?) आहेत अतिनील किरण (ultraviolet rays), क्ष-किरण (X-rays), आणि गामा किरण (Gamma rays). दृष्य प्रकाशाची तरंगलांबी ४०० (निळा) ते ७०० (लाल) नॅनोमीटर्सच्यामधे असते तर क्ष-किरणांची ०.०१ ते १० नॅनोमीटर्स. १ नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा १००००००००० (एकावर नऊ शून्य) एवढा भाग, किंवा १० चा -९ वा घात किंवा ०.०००००००००१.
क्ष-किरणांचा उपयोग वेगळा सांगायची गरज नसावीच. हाडं मोडली आहेत का नाहीत, कुठे, कितपत दुखापत आहे हे शोधण्यासाठी सर्रास क्ष-किरण वापरले जातात. शिवाय CT scan, MRI इ. साठीही क्ष-किरण वापरले जातात. प्रत्यक्ष रुग्णोपचारासाठीही क्ष-किरणांचा उपयोग होतो तो कर्करोगाच्या उपचारांपैकी रेडीओथेरपीमधे; या पद्धतीसाठी तपासणीपेक्षाही जास्त उर्जा असणारे क्ष-किरण वापरले जातात. पण चुकीच्या प्रमाणात मिळालेला क्ष-किरणांचा डोस कर्करोगास निमंत्रण ठरू शकतो.
अवकाशस्थ वस्तूंकडून येणारे क्ष-किरण आपल्या वातावरणात शोषले जातात आणि आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत. अवकाशस्थ वस्तूंचा क्ष-किरणांमधे अभ्यास करण्यासाठी विशेष उपग्रह सोडावे लागतात, असेच दोन उपग्रह किंवा दुर्बिणी आहेत, रोझॅट आणि चंद्रा. या दुर्बिणींनी घेतलेल्या चित्रांमधून दीर्घिकांच्या समूहातल्या तप्त वायूचा, गॅमा रे बर्स्ट्स, एका तार्याने दुसर्या तार्याला गिळणे इ. अवकाशस्थ घटनांचा अभ्यास शक्य झाला.
प्रगत अशा क्ष-किरण दुर्बिणीला 'चंद्रा' हे नाव सुब्रमण्यन चंद्रशेखर या दुसर्या नोबेल मानकर्यावरून दिलं गेलं आहे. चंद्राने घेतलेली काही चित्रं (नासाच्या वेबसाईटवरून):
3C 186 नावाच्या क्वेझारभोवती असणार्या दीर्घिकासमूहातला निळ्या रंगात दाखवलेला हा तप्त वायू क्ष-किरणांमधेच दिसतो.
दोन दीर्घिकासमूहांच्या एकत्र येणं ही विश्वातला महास्फोटाखालोखालचा सगळ्यात जास्त उर्जा-उत्सर्जन करणारी घटना आहे. वरच्या चित्रात लाल आणि निळ्या रंगात क्ष-किरणांत घेतलेलं चित्र दिसत आहे, तर पिवळट रंगात दृष्य प्रकाशात घेतलेलं चित्र दिसत आहे. या अतिप्रचंड दीर्घिका समूहाला 1E 0657-56 किंवा 'बुलेट क्लस्टर' असं नाव आहे.
माहितीचा स्रोत: अर्थातच विकीपिडीया आणि पुन्हा एकदा गुगल-इमेज-सर्चवरून नासाचं संकेतस्थळ.


वाचने
5431
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक्स रेटेड
+१
In reply to एक्स रेटेड by सहज
सहमत
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत,
In reply to सहमत by सूर्य
+ n
In reply to सहमत, by प्रशु
या क्रांतिकारी शोधासाठी
रोएंतजेनने पहिला एक्स रे
एक छोटीशी चूक
गर्भवती महीलांकरता क्ष किरणे
माहिती
छान माहिती. भविष्यात मोबाईल
सध्या आयफोन मध्ये हे अॅप आहे
In reply to छान माहिती. भविष्यात मोबाईल by गांधीवादी
छान माहिती!. लेख आवडला.
असेच म्हणतो
In reply to छान माहिती!. लेख आवडला. by रेवती
छान माहिती.
खुप पुर्वि क्ष करण असलेले
धन्यवाद!
मस्त माहिती!!
उत्तम, माहितीपूर्ण लेख.
चांगली माहिती. दीर्घिका समूह
हा हा हा
In reply to चांगली माहिती. दीर्घिका समूह by राजेश घासकडवी