रोएंतजेनने पहिला एक्स रे त्याच्या बायकोच्या हाताचा काढला होता.. तिच्या बोटात वेडिंग रिंग होती... ( बहुतेक वेडिंग रिंगचा एक्स रे काढला की लग्नाबाबत काही निदान करता येते का, हे त्याला बघायचे असणार.. ) :) एक्स रे फिल्मला त्यामुळे रोएन्टजेनोग्राम असेही म्हणतात...
http://formaementis.files.wordpress.com/2008/11/anna_berthe_roentgen.gif हा तो पहिला एक्स रे. त्यात बोटावर लग्नाची 'गाठ' दिसत आहे.. :)
>>शिवाय CT scan, MRI इ. साठीही क्ष-किरण वापरले जातात
MRI मध्ये क्ष किरण नव्हे तर चुंबकीय क्षेत्राचा वापर करण्यात येतो. म्हणूनच याला CT scan पेक्षा जास्त सुरक्षित तपासणी पद्धत मानले जाते.
अवांतरः क्ष किरण हे आपल्या त्वचेतून आरपार जातात परंतु हाडासारख्या घन पदार्थातून पूर्णपणे आरपार जात नाहीत.
हेच तत्व हाडाचे चित्र काढण्यासाठी वापरले जाते. परंतु याच गुणधर्मामुळे क्ष किरण तपासणीमध्ये सांध्याना किंवा स्नायूंना किंवा तत्सम soft tissues ना झालेली इजा दिसून येत नाही. अशा प्रकारच्या इजा शोधण्यासाठी sonography, MRI scan अशा पद्धतींचा वापर होतो.
गर्भवती महीलांकरता क्ष किरणे धोकादायक असतात वाटतं. कारण दातांचा वगैरे एक्स्-रे काढायचा असतो तेव्हा डॉक्टर विचारतात किंवा आधी भरून दिलेल्या माहीतीमध्ये तो प्रश्न विचारलेला असतो.
लेख आवडला. एवढा महत्त्वाचा शोध ११५ वर्षांपूर्वीचा आहे, हे त्यातही महत्त्वाचं. हा शोध लावताना रॉन्टजेनला किती अभ्यास करावा लागला असेल, तेव्हाच्या अपुर्या साधनांनिशी त्याने कसं काम केलं असेल, याबद्दल कोणी लिहील का? (विशेषतः अदिती)
खुप पुर्वि क्ष करण असलेले चश्म्यांची जाहिरात वाचनात आली होति..
ते चष्मे लावुन एखाद्या व्यक्ति कडे पाहिले कि कपडे असले तरी ति व्यक्ति नैसर्गिक अवस्थेत असल्या सारखी दिसते असे जाहिरात दाराचे म्हणणे होते..
चांगली माहिती. दीर्घिका समूह म्हणजे अनेक ग्यालेक्स्यांचा समूह असं गृहीत धरतो.
चित्रातले लाल निळे रंग हे केवळ व्हिज्युअल इफेक्टसाठी आहेत की रेड शिफ्ट - ब्लू शिफ्ट दाखवतात? (नसावेत - तप्त वायू म्हटलं आहे...)
बाकी तुम्ही रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीवाले आणि ते क्ष किरणवाले म्हणजे 'वर्णव्यवस्थेच्या' दोन टोकांचे झाले की! तुमच्यात शिवाशीव वगैरे पाळतात का? (ह. घे.)
>> दीर्घिका समूह म्हणजे अनेक ग्यालेक्स्यांचा समूह असं गृहीत धरतो. <<
आता फुल्टॉस आलाच आहे, तर पट्टा फिरवून घेते! ;-)
ग्यालेक्स्यांचे छोटे समूह (groups) आणि मोठे समूह (clusters) असतात. इथला उल्लेख clustersचा आहे. दोन्हीतला फरक म्हणे groups मधे साधारण ४-५ दीर्घिका असतात आणि clusters मधे यापेक्षा जास्त, अगदी १० पासून कितीही जास्त दीर्घिका असू शकतात. विस्तारानेही clusters खूप मोठी असतात आणि clusters मधे हा X-ray bright वायू असतो.
>> चित्रातले लाल निळे रंग हे केवळ व्हिज्युअल इफेक्टसाठी आहेत की रेड शिफ्ट - ब्लू शिफ्ट दाखवतात? (नसावेत - तप्त वायू म्हटलं आहे...) <<
योग्य प्रश्न! हा रेड्/ब्लू शिफ्ट नसून वायूचं तापमान दाखवण्यासाठी रंग वापरला आहे. निळा रंग = हार्ड एक्स रेज (जास्त उर्जेचे, तरंगलांबी ०.१ - ०.०१ नॅनोमीटर) आणि लाल रंग = सॉफ्ट एक्स रेज (कमी उर्जा, तरंगलांबी १० - ०.१ नॅनोमीटर) अशी विभागणी आहे.
>> रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीवाले आणि ते क्ष किरणवाले म्हणजे 'वर्णव्यवस्थेच्या' दोन टोकांचे झाले की! <<
:-D
दोन टोकं कुठे? गामा रे दुसरं टोक झालं. गुर्जींची चूक काढली. पण बर्यापैकी दोन टोकं झालीच. गंमत म्हणजे मायक्रोक्वेझार्स, दीर्घिकांच्या clusters च्या अभ्यासासाठी अगदी कमी वारंवारितेच्या रेडीओ लहरी आणि क्ष किरणांचाच उपयोग होतो.
स्वानंद, माझ्या माहितीतली चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि शानबा यांनी माहितीपूर्ण लेख टाकल्याबद्दल त्यांचेही आभार.
प्रतिक्रिया
एक्स रेटेड
+१
सहमत
सहमत,
+ n
या क्रांतिकारी शोधासाठी
रोएंतजेनने पहिला एक्स रे
एक छोटीशी चूक
गर्भवती महीलांकरता क्ष किरणे
माहिती
छान माहिती. भविष्यात मोबाईल
सध्या आयफोन मध्ये हे अॅप आहे
छान माहिती!. लेख आवडला.
असेच म्हणतो
छान माहिती.
खुप पुर्वि क्ष करण असलेले
धन्यवाद!
मस्त माहिती!!
उत्तम, माहितीपूर्ण लेख.
चांगली माहिती. दीर्घिका समूह
हा हा हा