लेखनप्रकार
हाय मि पियुशा पहिलच प्रयत्न आहे माझा ,लिखनतिल चुका बद्दल साम्भालुन घ्या,
एक होती म्हातारी .............
खूप खूप वर्षापूर्वी आट-पाट नगर होते , त्यात एक खावून पिवून सुखी असे कुटुंब राहत होते ,नवरा बायको आणि ४ मुले ,थोडीशीच शेती त्यावर संसार अवलंबून होता , मुले मोठी होऊ लागली तशा-तशा गरजा वाढू लागल्या ,त्यांची शाळा वही पुस्तके ,यांचा खर्चामुळे घरच्या माऊलीला शेतात मजुरी करावी लागायची ,आईबापाने जणू चंगच बांधला होता कि आपण अडाणी राहिलो पण मुलांना शिकवून मोठे साहेब करायचे , म्हणून मायबाप रात्रीचा दिवस करू लागली मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मोठा मुलगा दहावी पास झाला आणि काळाने बापावर घाला घातला ,स्वप्न डोळ्यात साठवून बापाने जगाचा निरोप घेतला ,माउली ओक्साबोक्शी रडली ,धाय मोकलून रडली आम्हाला उघड्यावर टाकून काय मिळाले रे देवा तुला ?
घास गोड लागेना
दुख सरता सरत नव्हते आईबाप शेजारी पाजारी समजावून गेले " चार पोर हैत पदरी त्यंच्या कडे बघ बायो, माझे असा नग करू ग" बाय तुझ्याशिवाय कोण ग पिलांना ? माउलीने केविलवाण्या तोंडाकडे बघितले पदर खोचला ,कामाला लागली ,दिवसरात्र काम करू लागली ,धुनी भांडी ,मोलमजुरी ,खुरपणी ,जे मिळेल ते काम करू लागली ,"म्या माझ्या धन्याच सपान पूर करणार" माझ्या मुलांना शिकीवाणार मोठा साहेब बनविणार,
मुलगी मोठी झाली आई बरोबर कामालां जाऊ लागली ,दोन पैसे घरात अनु लागली पण लोकांच्या नजरा,बिन बापाची पोर जीवाला घोर ,म्हणून आईने तिचे दोनाचे चार करून दिले मुलगी नांदायला गेली,तेवढेच समाधान माऊलीला,
आता ती एकटीच कष्ट करू लागली मोठा मुलाचा नंबर D .e.d ला लागला धाकटा १० वी चांगल्या मार्कांनी पास झाला दिवस सरत होते मुंगीच्या पावलांनी , एक एक दिवस फार कठीण, हातपाय दुखयाचे,
अंग ठाणकायचे दवापाणी करायला पैसे कुठून आणायचे ?
सांगणार तरी कुणाला?
एक दिवस तिच्या आयुष्यातला सोनेरी दिवस आला मुलगा शिक्षक झाला ,
कष्टाचे चीज झाले आई चे डोळे समाधानाने भरून आले त्याला रुद्याशी गच्च गच्च कवटाळले
पण मुलाची नोकरी तालुक्याच्या ठिकाणी लागली छातीवर दगड ठेऊन त्याला निरोप दिला , आईला वाटले चला ,मुलगा
सोयीला लागला दुसर्या मुलाने रेलेवेचा फोर्म भरला तो पण परीक्षा पास होऊन नोकरीला लागला तालुक्याच्या गावी , शेजारी पाजारी माउलीचे तोंडभर कौतुक करू लागले पण छोट्याचे काय ? त्याचे अभ्यासात डोके चालत नव्हते म्हणून शेतीत डोके घातले ,लोक आता सुनबाई आण म्हणू लागले ,
आता डोळ्यात सुख स्वप्ना तरळत होती ,आता कुठे आराम मिळणार होता,
पण पण ,मुलाने तर लग्न उरकून टाकले ,आईला न सांगता ,वाईट वाटले तिला पण जाऊ दे मुलाचे सुख तेच आपले सुख ,बायको नोकरी करणारी मिलाली ,खेड्यात
राहणे शक्य नव्हते ,म्हणून त्याचे बिर्हाड नोकरीच्या ठिकाणी
हलविले दुसरयानेही भावाच्या पावलावर पावुल टाकले,माय ने डोळ्यातले पानी डोळ्यात ठेवले , वर्षे गेली नातवंडे
झाली पण
संबध तेवढ्यापुरते तेवढे ठेवले मुलांनी ,आईला money order पाठवायचे , एखाद दुसर पत्र बस ,
लट्ठ पगार ,गाडी बंगला , त्यामुळे मुलांना हाय फाय जगण्याची सवय ,
खस्ता खालेल्या आईची काय माया राहिली, पैशापुढे भुते नाचतात बाकी काय ?
अडाणी भाऊ आणि आई नको ,अडानी गावंडळ आई ,कष्टाने रापलेली ,
पायांना भेगा पडलेली आई ,
दोघ नोकरी ला नातू छोटा म्हणून आईला नेले सांभाळायला ,
सुनेला हवा होता नवरा पण सासू नको होती,
हळू हळू सुनेच्या छोट्या छोट्या कुरबुरिंचे
रुपांतर मोठ्या भांडणात व्हयाला लागले , आईने नमते घेतले सुनेच्या मर्जिप्रमाने वागू लागली कारन नातू जीव की प्राण जाला होता ,राहणी आपली साधी नौ वारी साड़ी,वर चोलिची गाथ ,
पायात वाहणा,
नातवाला खूप खेळवायची,काऊ मौ च्या गोष्टी सांगायची
त्याला कडेवर घेउन सोसयटित फिरवायची, इतर बायकंशी गप्पा मारायची तेवढाच विरुंगळा!पण सुनेला का कोण जाने ते कमिपनाचे वाटायचे आपल्या
अडाणी सासूमुले आपली चव जाते आहे असे सारखे सारखे वाटायचे शेवटी रोज रोज काही न काही खुस्पट काढून सासूला परत गावी पाठविले , मुलगा पण काही बोलला नाही बायको पुढे !
दुसर्याने तर आधीच बदलीची नोकरी म्हणून हात वर केले होते,
गावी बायाबापड्यांनी विचारले का गो परतलीस? पोरांनी लैई जीव लावला पण गाव सोडून करमना म्हणून आली माघारी , काय सांगणार होती बिचारी या वयात प्रेम हवे होते , नातवाना खेळवायचे होते , खूप खूप लाड करायचे होते पण पण सर्वे अधुरेच ,तेच कमी होते कि काय मुलिला माहेरी सोडून गेला जावई कायमचा , मुल होत नाही म्हणून !
दोघी मायलेकी गळ्यात पडून रडल्या रात्रभर , आता दोघी आणि त्यांचा अडाणी भाऊ ,शेतात जेमतेम पिकायचे त्यावरचं गाडा चालू होता ,आता पुन्हा दोघीही जुंपल्या ,माउलीची दृष्टी कमी झाली हळू हळू , दातही पडले , पण तिला मासे फार आवडायचे म्हणून लेक पैसे साचवून आणायची ,एक एक तुकडा फार चवीने चघलयाची ,तुप्त व्हायची , (शहरात सुनेकडे एकदा म्हणाली होती आज मासे कर ना मला लैई आवडतात, " अहो आई या वयात कुठे खाता मासे गरम आणि पचायला जड असतात ते ,पुन्हा पोट-बिट बिघडायचे तुमचे , उत्तर अपेक्षित होते )
वर्षे सरली नातू डॉक्टर झाला ,आणि एकदा आजी ला भेटायला गावी आला आजीची दशा पहिली स्वतावरच चरफडला ,आजी अधू झाली होती दृष्टी कमी झाली होती पलंगावर पडून असायची मुलगी मनाने सेवा करत होती ,नातवाला रडू फुटले हीच का ती आपली लाडकी आजी आपले लाड पुरविणारी ,आपल्याला अंगाखांद्यावर खेळवणारी ,गोष्टी सांगणारी चोरून खाऊ देणारी
त्या क्षणी ठरविले आजीला घेऊन जायचे आपल्याबरोबर, उपचार करायचे ,आई वडिलांचा प्रचंड राग आला पण आवरते घेतले , सासुबैंची सेवा नको म्हणून नंदेला पण बरोबर घेतले सुनेने! आता त्यांना स्वतंत्र खोली दिली,दोघीच गप्पा मारायच्या नातू फार गुणी खूप काळजी घ्यायचा ,हाताने औषधपाणी द्यायचा आजीशी खूप बोलयच,आजी बोटे मोडायची त्याच्या गोड चेहऱ्यावरून दृष्ट लागू नये म्हणून
एकदा नातू घरी नव्हता , सुनेने मासे आणले होते पार्टी होती म्हणून ,पण सासूला नाही दिले ,खाऊन उरलेले fridge मध्ये ठेवले ,खाण्याची खूप इच्छा झाली पण पण ,मुलीला राहवले नाही गेली माशाचा एक तुकडा आणि भाकरी चोरून आणली माउली साठी ,सूनेन तांडव केले कारणच
हवे होते तिला "काय पद्धत आहे कि नाही तुम्हाला ?"
घास कडू झाला डोळे पाणावले , सगळे झोपी गेले आणि माऊलीही कायमची झोपी गेली ,मुलगी आणि नातू फार फार रडली ,गावी आले ,नातेवाईक आले ,क्रियाकरम झाले नातवाने केले सगळे ,त्याच्या जीवाला घोर लागला ,इतक्या जणांना वाचवले मी आणि माझ्या लाडक्या आजीसाठी काही करू शकलो नाही ,काय उपयोग माझा, अंतर्मन खात राहिले त्याला ,
लोकांना दिसावे म्हणून रडली मुले
सुना ,माया केव्हाच आटली होती ना? मुलांनी दहावा केला मोठा खर्च केला, समाधी बांधली मार्बलची ,फुलांच्या माळा,आवडते पदार्थ सगळे सगळे ठेवले पण कावळा नाही शिवला पिंडाला ,गावकरी हळहळले,काहून असे झाले ग बाय काय विच्छा होती म्हातारीची देव जाने ? माहिती होते ते फक्त नातवाला ,आनि लेकीला...
आटपाट नगरातील म्हातारीची हि कहाणी ..........
मिसळपाव
काय
छान आहे....
वाइट वाटले वाचुन
In reply to वाइट वाटले वाचुन by पर्नल नेने मराठे
सहमत..
छान आहे कथा. (हे बळच ! खरेतर
असल्या नालायक पोरांचा लय राग
छान ...
हि कथा कल्प् निक नाहि खरिच
असले डोकं हालतं हे असलं
In reply to असले डोकं हालतं हे असलं by नरेशकुमार
मुलांच्या , सुनांच्या दोन
मुलाने तुमच्या आईला सून
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हे
In reply to हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हे by स्पा
hE http://www.misalpav.com/no
In reply to hE http://www.misalpav.com/no by नरेशकुमार
धन्यवाद.......
उत्तम लिहलेत खरे परंतु लेखन
छान !!!
स्वागत!
In reply to स्वागत! by प्रियाली
सह्म्त...
पियुषा छान लिहिल आहेस.
च्छ्या.... मूड गेला राव...
छान लिहिलेय
In reply to छान लिहिलेय by ईन्टरफेल
सर्वांना सर्व
In reply to सर्वांना सर्व by प्रियाली
thanx priyali point to be
हं. चालायचच. जगरहाटी. जन्माला
In reply to हं. चालायचच. जगरहाटी. जन्माला by अप्पा जोगळेकर
पचवला?
हम्म...गोष्ट एकदम मराठी
In reply to हम्म...गोष्ट एकदम मराठी by शिल्पा ब
सहमत
पीयुषा, पु ले शु हे उपयोगी
वचुन वैत वतले.