काय राव चेष्टा करता.
दिवाळीच्या फराळाची लीस्ट इतकीच?
अनरसे चिरोटे घेवर सुतरफेणी खारी पुरी गाठी हे पदार्थ कुठे गेले
आमच्या कडे सुवाळी नामक तांदळाच्या पिठाची जिरे घालूनेक पात्तळ पुरी केली जाते त्याची चव अवर्णनीयच.
खाजे ,ठोर , गुंजा ,कडाकण्या
फराळ म्हणजे आपल्या हाताने घेउन भरपुर खा.......फराळाचे ताट मधे ठेवले जाते, त्यामुळे कोणी काय काय
खाल्ले कळत नाही, आपले आवडणारे पदार्थ त्यातून उचलून खाता येतात.
अल्पोपहार म्हणजे ठराविक मोजका जिन्नस प्लेट्मध्ये घालून आपल्याला दिला जातो, पुन्हा मागायचा नसतो. हा हा हा
मात्र आम्हाला दिवाळी असो वा दसरा किंवा कुठलाही दिवस, असले "कौल" वगैरे प्रकार खायला फार आवडतात.
असली कौलं "कच्ची खाण्यातली मज्जा" काय सांगु तुम्हाला महाराजा ;)
मी चकलीला मत दिलय.
माझ्या इथे भाजणी वगैरे मिळत नाही.
वेगळ्याप्रकारे करणारे.
प्रभोला फक्त त्याच्या आईच्या हातची चकली आवडते म्हणून त्याला काही पाठवणार नाही.
कारण मी त्याची आज्जी आहे, आई नव्हे!;)
मुळात हे फराळाचे पदार्थ करायला दिवाळाचीच वाट का पहावी? इतर वेळी काय खाउ नये का? हे म्हणजे व्हॅलेंटाईनल डे साजरा करण्यासारखे आहे. द्यायचा तर रोज गुलाब द्या, रोज फराळ खा? मुहुर्त अरे रे चुकलो "डे" कशाला हवेत तुम्हाला, ऑ?
प्रतिक्रिया
कृपया
(कृपया प्रामाणिकपणे मते नोंदवावीत :)...... मला याविषयावर अभ्यास करून एक महाग्रंथ संपादित करायचा आहे आहे ;)
(office मध्ये सध्या दुसरं काम नसल्याने ..............)
करंजी कुठे आहे ???
In reply to कृपया by स्पा
छे!
सकाळी सकाळी ऑफिस मध्ये कौल उघडला आणि यात करंजीच नाही! आणि 'इतर' पण पर्याय नाही.
आम्ही नाही मत देणार.. जा!
चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण
In reply to करंजी कुठे आहे ??? by रुपी
चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण उपयोगी पडते
चकली
In reply to चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण by अविनाशकुलकर्णी
चकली .. चकली ..
माझी सर्वात आवडती!!
काय राव चेष्टा
In reply to चकली by आशिष सुर्वे
काय राव चेष्टा करता.
दिवाळीच्या फराळाची लीस्ट इतकीच?
अनरसे चिरोटे घेवर सुतरफेणी खारी पुरी गाठी हे पदार्थ कुठे गेले
आमच्या कडे सुवाळी नामक तांदळाच्या पिठाची जिरे घालूनेक पात्तळ पुरी केली जाते त्याची चव अवर्णनीयच.
खाजे ,ठोर , गुंजा ,कडाकण्या
फराळ व अल्पोपहार ह्यात नेमका
In reply to काय राव चेष्टा by विजुभाऊ
फराळ व अल्पोपहार ह्यात नेमका फरक काय????
फराळ म्हणजे आपल्या हाताने
In reply to फराळ व अल्पोपहार ह्यात नेमका by अविनाशकुलकर्णी
फराळ म्हणजे आपल्या हाताने घेउन भरपुर खा.......फराळाचे ताट मधे ठेवले जाते, त्यामुळे कोणी काय काय
खाल्ले कळत नाही, आपले आवडणारे पदार्थ त्यातून उचलून खाता येतात.
अल्पोपहार म्हणजे ठराविक मोजका जिन्नस प्लेट्मध्ये घालून आपल्याला दिला जातो, पुन्हा मागायचा नसतो. हा हा हा
बरोबर. अनारसे हे तर केवळ
In reply to काय राव चेष्टा by विजुभाऊ
बरोबर. अनारसे हे तर केवळ अप्रतिम लागतात. :) बाकी कडाकण्या वगैरे कोल्हापूर भागातल्या लोकांकडे जास्त करून होतात. पुण्यात कडाकण्या शक्यतो नसतात.
अगदी................
In reply to चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण by अविनाशकुलकर्णी
अगदी................
:)
कृपया प्रामाणिकपणे मते नोंदवावीत
In reply to कृपया by स्पा
चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली!!!!
अरे रे ! ह्यात करंजी नाही
अरे रे ! ह्यात करंजी नाही ?
जागुतैच्या मनाला किती यातना होतील बरे.
अरे हो
In reply to अरे रे ! ह्यात करंजी नाही by परिकथेतील राजकुमार
अरे हो विसरलोच.........................
कृपया संपादक मंडळाने याची दाखल घ्यावी........................... :)
जागू तै ................... स्वारी(sorry ) ......
इतर काही ...
इतर काही हा ऑप्शन नाही.
मात्र आम्हाला दिवाळी असो वा दसरा किंवा कुठलाही दिवस, असले "कौल" वगैरे प्रकार खायला फार आवडतात.
असली कौलं "कच्ची खाण्यातली मज्जा" काय सांगु तुम्हाला महाराजा ;)
सगळेच
..
सगळेच
आवडते.(अर्थात चांगले बनवले असेल तर!.)विकतचे शंकरपाळे ,रवा लाडू डोक्यात जातात.
सगळेच
शेवया आवडत नाहीत. शेव मात्र आवडते. चुकून शेवेचे शेवया झालेले दिसतेय.
'कडबोळी' मात्र उल्लेखलेली नाहीत. ती मला फार्फार आवडतात.
अवांतरः कडबोळ्यांची पाकृ कुणीतरी द्या हो. विशेषतः जागूतै, गणपा कडून कडबोळे अपेक्षित आहे.
कडबोळी हा प्रकार चकली सारखाच
In reply to सगळेच by प्रचेतस
कडबोळी हा प्रकार चकली सारखाच असतो न?
फक्त त्याला काटे नसतात........ आणि थोडा काळसर रंग असतो........
जर तोच असेल तर ... फार जबरी लागतो तो, मस्त खमंग........
खरंतर चकली आणि कडबोळ्यांची
In reply to कडबोळी हा प्रकार चकली सारखाच by स्पा
खरंतर चकली आणि कडबोळ्यांची भाजणी वेगळी असते असे म्हणतात.
मला अतोनात फराळाचे पदार्थ करायची हौस नसल्याने कडब्प्ळीचा नंबर कधी लागतच नाही.;)
आम्हाला आवडतील तुम्ह्च्या
In reply to खरंतर चकली आणि कडबोळ्यांची by रेवती
:)
आम्हाला आवडतील तुम्ह्च्या हातची कडबोळी........
हो, हो! स्पा, मलाही आवडतील
In reply to आम्हाला आवडतील तुम्ह्च्या by स्पा
हो, हो! स्पा, मलाही आवडतील तुमच्या हातची कडबोळी!
कडबोळे
कडबोळे?
येथे पहा
In reply to कडबोळे by नावातकायआहे
कडबोळे येथे पहा.
वरील सर्व. फक्त शेवया
वरील सर्व. फक्त शेवया सोडुन.
करंजी मला सुदधा खुप आवडते.
शंकरपाळे.............
शंकरपाळे.............
आईच्या हातची चकली...
आईच्या हातची चकली... :)
हेच ते! आदिजोशीचा लेख वाया
In reply to आईच्या हातची चकली... by प्रभो
हेच ते!
आदिजोशीचा लेख वाया गेला असे म्हणायला हवे.
लग्न होइतो आईच्या हातच्या पदार्थांचं कौतुक करून घे.;)
मी चकलीला मत दिलय. माझ्या इथे
मी चकलीला मत दिलय.
माझ्या इथे भाजणी वगैरे मिळत नाही.
वेगळ्याप्रकारे करणारे.
प्रभोला फक्त त्याच्या आईच्या हातची चकली आवडते म्हणून त्याला काही पाठवणार नाही.
कारण मी त्याची आज्जी आहे, आई नव्हे!;)
तुझ्या हातचे रव्याचे लाडू
In reply to मी चकलीला मत दिलय. माझ्या इथे by रेवती
तुझ्या हातचे रव्याचे लाडू आवडतात , त्याचं काय??
असो..व्यनीत उत्तर देणे..नाहीतर इथले बाकीचे खवीस तुझ्या मागे लागतील लाडवांसाठी.. ;)
चिवडा...
आम्हाला चिवडा आवडतो... त्यालाच मत दिले...
सगळंच
तसं सगळंच आवडतं. पण दिवाळी सोडून इतर दिवशी! दिवाळीच्या दिवसात सगळ्यांकडे तेच तेच खाऊन हमखास आजारी पडायला होतं.
मुळात हे फराळाचे पदार्थ
मुळात हे फराळाचे पदार्थ करायला दिवाळाचीच वाट का पहावी? इतर वेळी काय खाउ नये का? हे म्हणजे व्हॅलेंटाईनल डे साजरा करण्यासारखे आहे. द्यायचा तर रोज गुलाब द्या, रोज फराळ खा? मुहुर्त अरे रे चुकलो "डे" कशाला हवेत तुम्हाला, ऑ?
हे पदार्थ कधिही खायला
हे पदार्थ कधिही खायला आवडतातच.
पण विषेत: रव्याचे, मुगाचे लाडु आणि ओल्या नारळाची करंजी (खुळ्खुळा नव्हे) आवडतात.
बाकी पदार्थांचे (चिवडा-चकली इत्यादी) उपयोग आधीच लिहीले असल्याने द्विरुक्ती टाळत आहे.
अर्र...
In reply to हे पदार्थ कधिही खायला by चिंतामणी
सदर कौलाच्या पर्यायात अनेक सन्माननीय मिपाकरांची नावे असल्याने मत देता येत नाहीये. क्षमस्व.
असो. माझे मत सर्व पर्यायांना ;)
अहो या मंदीच्या काळात थोडतरी
अहो या मंदीच्या काळात थोडतरी काम करत जा हापिसात...काय उगं कौलं काढताय?