Skip to main content

दिवाळीच्या फराळातले सर्वात जास्त काय आवडते....................? :)

लेखक स्पा
गुरुवार, 28/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1263
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

(कृपया प्रामाणिकपणे मते नोंदवावीत :)...... मला याविषयावर अभ्यास करून एक महाग्रंथ संपादित करायचा आहे आहे ;) (office मध्ये सध्या दुसरं काम नसल्याने ..............)

In reply to by स्पा

छे! सकाळी सकाळी ऑफिस मध्ये कौल उघडला आणि यात करंजीच नाही! आणि 'इतर' पण पर्याय नाही. आम्ही नाही मत देणार.. जा!

In reply to by आशिष सुर्वे

काय राव चेष्टा करता. दिवाळीच्या फराळाची लीस्ट इतकीच? अनरसे चिरोटे घेवर सुतरफेणी खारी पुरी गाठी हे पदार्थ कुठे गेले आमच्या कडे सुवाळी नामक तांदळाच्या पिठाची जिरे घालूनेक पात्तळ पुरी केली जाते त्याची चव अवर्णनीयच. खाजे ,ठोर , गुंजा ,कडाकण्या

In reply to by अविनाशकुलकर्णी

फराळ म्हणजे आपल्या हाताने घेउन भरपुर खा.......फराळाचे ताट मधे ठेवले जाते, त्यामुळे कोणी काय काय खाल्ले कळत नाही, आपले आवडणारे पदार्थ त्यातून उचलून खाता येतात. अल्पोपहार म्हणजे ठराविक मोजका जिन्नस प्लेट्मध्ये घालून आपल्याला दिला जातो, पुन्हा मागायचा नसतो. हा हा हा

In reply to by विजुभाऊ

बरोबर. अनारसे हे तर केवळ अप्रतिम लागतात. :) बाकी कडाकण्या वगैरे कोल्हापूर भागातल्या लोकांकडे जास्त करून होतात. पुण्यात कडाकण्या शक्यतो नसतात.

In reply to by स्पा

चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली, चकली!!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे हो विसरलोच......................... कृपया संपादक मंडळाने याची दाखल घ्यावी........................... :) जागू तै ................... स्वारी(sorry ) ......

इतर काही हा ऑप्शन नाही. मात्र आम्हाला दिवाळी असो वा दसरा किंवा कुठलाही दिवस, असले "कौल" वगैरे प्रकार खायला फार आवडतात. असली कौलं "कच्ची खाण्यातली मज्जा" काय सांगु तुम्हाला महाराजा ;)

आवडते.(अर्थात चांगले बनवले असेल तर!.)विकतचे शंकरपाळे ,रवा लाडू डोक्यात जातात.

शेवया आवडत नाहीत. शेव मात्र आवडते. चुकून शेवेचे शेवया झालेले दिसतेय. 'कडबोळी' मात्र उल्लेखलेली नाहीत. ती मला फार्फार आवडतात. अवांतरः कडबोळ्यांची पाकृ कुणीतरी द्या हो. विशेषतः जागूतै, गणपा कडून कडबोळे अपेक्षित आहे.

In reply to by प्रचेतस

कडबोळी हा प्रकार चकली सारखाच असतो न? फक्त त्याला काटे नसतात........ आणि थोडा काळसर रंग असतो........ जर तोच असेल तर ... फार जबरी लागतो तो, मस्त खमंग........

In reply to by स्पा

खरंतर चकली आणि कडबोळ्यांची भाजणी वेगळी असते असे म्हणतात. मला अतोनात फराळाचे पदार्थ करायची हौस नसल्याने कडब्प्ळीचा नंबर कधी लागतच नाही.;)

In reply to by प्रभो

हेच ते! आदिजोशीचा लेख वाया गेला असे म्हणायला हवे. लग्न होइतो आईच्या हातच्या पदार्थांचं कौतुक करून घे.;)

मी चकलीला मत दिलय. माझ्या इथे भाजणी वगैरे मिळत नाही. वेगळ्याप्रकारे करणारे. प्रभोला फक्त त्याच्या आईच्या हातची चकली आवडते म्हणून त्याला काही पाठवणार नाही. कारण मी त्याची आज्जी आहे, आई नव्हे!;)

In reply to by रेवती

तुझ्या हातचे रव्याचे लाडू आवडतात , त्याचं काय?? असो..व्यनीत उत्तर देणे..नाहीतर इथले बाकीचे खवीस तुझ्या मागे लागतील लाडवांसाठी.. ;)

आम्हाला चिवडा आवडतो... त्यालाच मत दिले...

तसं सगळंच आवडतं. पण दिवाळी सोडून इतर दिवशी! दिवाळीच्या दिवसात सगळ्यांकडे तेच तेच खाऊन हमखास आजारी पडायला होतं.

मुळात हे फराळाचे पदार्थ करायला दिवाळाचीच वाट का पहावी? इतर वेळी काय खाउ नये का? हे म्हणजे व्हॅलेंटाईनल डे साजरा करण्यासारखे आहे. द्यायचा तर रोज गुलाब द्या, रोज फराळ खा? मुहुर्त अरे रे चुकलो "डे" कशाला हवेत तुम्हाला, ऑ?

हे पदार्थ कधिही खायला आवडतातच. पण विषेत: रव्याचे, मुगाचे लाडु आणि ओल्या नारळाची करंजी (खुळ्खुळा नव्हे) आवडतात. बाकी पदार्थांचे (चिवडा-चकली इत्यादी) उपयोग आधीच लिहीले असल्याने द्विरुक्ती टाळत आहे.

In reply to by चिंतामणी

सदर कौलाच्या पर्यायात अनेक सन्माननीय मिपाकरांची नावे असल्याने मत देता येत नाहीये. क्षमस्व. असो. माझे मत सर्व पर्यायांना ;)