अस मला आजकाल म्हणावसं वाटत आहे. आता तुम्ही विचारलं की का बुआ, असं विशेष काय झालं. नाही म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून वाटायला काहीतरी घडावाच लागतं असं आहे का ? असो. तसं आहे खरं. आता बघा, मी राहतो पुण्यात. कामानिमित्त. तसा मी मुळचा मुंबईचा, पण पुणं तसं मला नवीन कधीच नव्हतं. बरेच नातेवाईक राहतात माझे इथे. लहानपणापासून येतोय मी इथे. आवडतं ही मला पुणं.
विद्येच माहेरघर म्हणतात ह्याला. एकेकाळी इकडच्या सर्व शाळांना आपापला माज होता. एक गर्व, आता तो दुराभिमान कि अभिमान ह्या वादात मी आत्ता जात नाही. पण हा गर्व आज मला कुठे दिसत नाही. मराठीची गळचेपी होतेय वगैरे असं अगदी आपल्याला घसा खरवडून ओरडता येतं, पण तसा होऊ नये ह्यासाठी आपण काही विशेष केलं का आजतागायत ?
मी 'मराठी' व्हावं म्हणून मला आई-वडिलांनी मराठी शाळेत घातलं. तो त्यांचा निर्णय मला अजूनही मनापासून आवडतो. त्यांच्या कृपेने मी आज, 'मी ना a little late होईन आज, तुम्ही start करा dinner' अशी मराठी तर बोलत नाही. आणि आजपर्यंत, पुण्यातही कोणी बोलत नव्हतं. पण परिस्थिती बदलत आहे हे खरं. आज पुण्यातल्या मोठ्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत शाळा, semi-english नाहीतर पूर्ण English च्या सावलीत बदलत्या काळाची गरज, अशी फुटकळ कारण देऊन जात आहेत. ज्या पुणेरी पाट्यांचा उपरोधिक स्वर खोचक असला तरी एक आनंद देऊन जातो, त्या खाली येऊन लवकरच, तिथे, may I help you? अश्या प्रकारचे ग्राहकाभिमुख फलक लागतील.
काहीजण असं म्हणतील की मराठी अजूनही आहे की, म्हणजे भारतातली चवथी आणि जगातली पंधरावी बोलली जाणारी भाषा आहे ही. मी त्यांना असं विचारू इच्छितो की 'बदलता काळ' पाहता, त्याच लोकांना अशी कितपत खात्री देता येईल की हे असंच राहील ? माझा दुसरा छोटासा प्रश्न. आता इथे पुणे Infosys मध्ये बरेच मराठी लोक आहेत. त्यातले बरेच ब्लॉगही लिहितात. त्यातले किती मराठीतून काही लिहितात ? फक्त मराठी नाही म्हणत मी, पण कधीतरी, थोडंतरी ? ह्याउलट, मी अनेक दक्षिणात्य लोकांचे blog पाहतो ते त्यांच्या मातृभाषेत लिहितात. बरेच जण लिहितात. प्रश्न असं की आपण लिहू शकत नाही ? की आपल्याला लिहावसं वाटत नाही ? की मी write केलेलं मराठी कितपत readable असेल अशी fear वाटते आपल्याला ?
मी इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा वाचत नाहीये, तसं म्हणता हा माझाही पहिलाच मराठी blog आहे त्यामुळे तसा मलाही फारसा बोलायचा अधिकारही नाहीये. इथे कोणालाही दुखवायचा हेतू नाही. जे वाटलं ते आपला टाकलं इथे. मी स्वतः माझ्या मित्रांना हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आम्ही CCD आणि Pizza Hut सारख्या ठिकाणी सरळ मराठी बोलायला सुरुवात केली. एक छान आहे की, त्यांच्या साठी ग्राहक हा राजा असतो, जेंव्हा ग्राहक coffee कशी दिलीरे विचारतो तेंव्हा तो पण, should I suggest you, वरून 'तुम्ही हे का नाही घेऊन बघत' वर येतो.
अजून एक गम्मत म्हणजे, जनमानसांना संस्कृत कळत नाही, म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती भाषा आज आपल्याला जड वाटते. ज्ञानेश्वर सोडा, टिळकांचं गीतारहस्य, विनोबांची गीताई, रामदासांचे मनाचे श्लोक, ते काल सावरकरांनी लिहिलेलं १८५७ चा स्वातंत्र्यसमर नाही वाचता येत आपल्याला धडाधड. आज ग दि मां इतकी चांगली गीतं लिहिणारे शोधून सापडणार नाहीत, काल ज्यांचा सत्कार झाला ते जगदीश खेबुडकर. त्यांच्या नंतर त्यांचा वारसा टिकवणारा मला तरी कोणी दिसत नाही.
ह्या सगळ्यासाठी मी काय करतोय ? काही नाही. सध्या तरी फक्त मराठी माणसाशी मराठी बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. लता, अशा, बाबूजींची गाणी ऐकतोय... गीत रामायणातल्या रामाकडे आशेने पाहतोय....
ता. क. : हा जुना लेख आहे, ह्यात तक्रारवजा सूर जरी असला, तरी मला वाटलं म्हणून तसं लिहिलेलं आहे. कुणाला माझी मतं पटत नसतील तर त्यांना दुखावण्याचा माझा हेतू मुळीच नाही.
वाचने
5532
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक गम्मत म्हणजे,
+१००
In reply to अजून एक गम्मत म्हणजे, by अवलिया
शिवकाळात तुम्ही नव्हतात हे
In reply to अजून एक गम्मत म्हणजे, by अवलिया
टिळकांनी माझ्या कोणत्या मताचे
In reply to शिवकाळात तुम्ही नव्हतात हे by विश्वनाथ मेहेंदळे
>>भाषा बदलत असते. सतत बदलत
In reply to टिळकांनी माझ्या कोणत्या मताचे by अवलिया
ट्रेझरी --> तिजोरी मास्टर -->
In reply to >>भाषा बदलत असते. सतत बदलत by विश्वनाथ मेहेंदळे
>>आज डीनरला कूठे जायचे? लंचला
In reply to ट्रेझरी --> तिजोरी मास्टर --> by अवलिया
चिअर्स ऐवजी
In reply to ट्रेझरी --> तिजोरी मास्टर --> by अवलिया
तुझ्या वर मांडलेल्या मतांशी
स्वतः प्रत्येक माणूस जेंव्हा
In reply to तुझ्या वर मांडलेल्या मतांशी by स्वैर परी
माझं मत
ऋशी सर्व बाबतीत सहमत.
In reply to माझं मत by ऋषिकेश
सगळ्या
मिपावरील व्यक्तींचे लेख वाचून
In reply to सगळ्या by चिरोटा
अरे वा!
धन्यवाद ! :)
In reply to अरे वा! by सहज
आपल्या ईथे बरेच मिपाकर ब्लॉग
http://www.मिसळपाव.कॉम