नमस्कार मंडळी,
मी प्रभा. मिसळपाव ची नवी सभासद. माझे मेहुणे श्री सुधीर काळे यांच्या प्रयत्नांमुळे व मी नक्कीच लिहू शकेन
या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे मी "मिपा" ची सभासद झाले. श्री काळे यांचे "मिपा" वर खूपच लिखाण
आहे. ते मध्यंतरी ठाण्यात आले असताना त्यांनी माझ्या "मिपा" च्या सभासदत्वासाठी प्रयत्न केले.
पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत, अगदी लहान लहान गोष्टीतही सारखी माशी शिंकत असते. आता ही माशी कशी
शिंकते हे मला माहित नाही. तिचा शिंकण्याचा आवाज कसा असतो? तिचे नाक कोठे असते? हे कोणालाच माहित
नाही. मुळात माशीला सारखी सर्दी होतेच कशी? " माशी शिंकणे" या वाक्प्रचाराचा अर्थ मला नक्कीच माहित आहे.
पण माझे म्हणणे असे की माशी च का? तूपात पडून चांदोबाला उपाशी ठेवणारी माशीच असते. रिकामटेकड्यांना
उद्द्योग म्हणून माशांनाच मारावे लागते. इतर कोणी कीटक मंडळी म्हणजे डास, कोळी वगैरे का नाही?
असो.
तर मी सांगत होते की ३०-९-२०१० ला आम्ही सभासदत्वासाठी मेल पाठवली पण त्याच दिवशी अयोध्येच्या
निकाला साठी खबरदारी म्हणून सगळी (निदान आमचीतरी) इंटरनेट सेवा बंद पडली. इथे पहिल्यांदा माशी शिंकली. काही वेळानंतर सभासदत्वासाठी मेल पाठवली गेली. त्यांच्याकडून लवकरच कळवितो असे उत्तर आले. नंतर माझे मेहुणे परत जाकार्ताला गेले. इकडे जोरदार पावसामुळे आमची टेलीफ़ोन सेवानं मृत झाली. इथे दुसर्यांदा माशी शिंकली. टेलीफ़ोन ची दुरूस्ती करताना आमची broadband ची केबल त्यांनी चुकून बंद केली. टेलीफ़ोन चालू झाला तर इंटरनेट झोपले. इथे तिसर्यांदा....
परत तक्रारी करणे, टेलीफ़ोन एक्स्चेंज चे खेटे सुरू झाले. "तुम्हारा टेलीफ़ोन ठीक हुवा है न? मगर हमारा broadband
बंद हो गया है न" ही आमची प्रश्नोत्तरे चालू झाली. शेवटी एकदाचे broadband चालू झाले व आमची प्रश्नोत्तरे संपली.
मला वाटले निदान १०-१०-१० च्या मुहूर्तावर सभासदत्व मिळाले तर फ़ार चांगले. पण नाही जमले. पण त्यानंतर
दोनच दिवसात मेहुण्यांचा मला सभासदत्व मिळाल्याचा फ़ोन आला. म्हटल आता दसर्याचा मुहूर्त चुकवायला नको.
पण आमच्या माशीची सर्दी अजून बरी झाली नाही बहुतेक. एकच दिवस पुण्याला जाण्याचे निमित्त झाले आणि पुण्याने
मोठ्या प्रेमाने मला viral infection ची भेट देऊन माझी पाठवणी केली. आपले शरिर किती अगणित सांध्यांपासून बनले
आहे याची प्रथमच मला जाणीव झाली. दुखत नाही असा एकही सांधा शिल्लक नव्हता. भरपूर गोळ्या औषधे खाऊन
आज कोजागिरीच्या मुहूर्तावर खरडायला सज्ज झाले. शेवटी गंगेत घोडं न्हायलं एकदाच!
ह्या घोडयांच्या गंगेत नहाण्याचे पण मला नवल वाटते. याचा अर्थ असा धरायचा का, की घोडे पाण्याला घाबरत होते? की त्यांना पाणी आवडत नव्हते? पण असे कसे म्हणता येईल? शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप यांची नुसती नावे आठवली तरी उमद्या घोडयांवर विराजमान झालेली त्यांची चित्रे डोळ्यापुढे येतात. त्यांच्या पराक्रमाचे मी वेगळे वर्णन करायला नको. पण त्यांच्या या पराक्रमात त्यांच्या घोडयांनीही त्यांना नद्या-नाले, दर्या-खोर्या पार करण्यात मोलाची साथ दिली आहे. राणीच्या तर तिच्यासारख्याच शूर घोडयाने/घोडीने तटावरून थेट खाली उडी मारली होती. संताजी धनाजी च्या तर घोडयांनाही मुसलमान सैनिक घाबरत असत. इतके शूर, लढवय्ये घोडे असताना त्यांना एकदम degrade करून त्यांचे " घोडं " होऊन त्यांना गंगेत नहाण्याची जबरदस्ती का करावी लागली असेल?
अगदी आत्ताच्या जमान्यात रेसकोर्सवर पळणारे उमदे घोडे बघताना डोळ्यांचे पारणे फ़िटते.(मी रेसकोर्स T.V. वरच पाहिले आहे.) त्यांचे जलद गतीत पण लयबध्द पडणारे चारी पाय आपली नजर खिळवून ठेवतात किंबहुना त्यावर नजर ठरत नाही असे म्हटले तर जास्त योग्य होईल इतक्या अफ़ाट वेगाने ते पळत असतात. अर्थात माणसे त्यांच्यावर
पैसे लाऊन श्रीमंत(किंवा कंगाल) होतात याची त्या घोडयांना कल्पनाही नसेल. अगदी साधा टांगेवालाही फ़ावल्या वेळात घोडयाच्या पाठीवरून फ़डके फ़िरवून त्यांची कांती(चामडी) चमकवित असतो. चमकदार कांती ही तर घोडयांची खासियत आहे.
ही "अश्वशक्ती" इंजिनची शक्ती मोजण्याचे परिमाण आहे. किती Horsepower चे इंजिन आहे? हे विचारण्यातच अश्वशक्ती चे निर्वीवाद श्रेष्ठत्व सिध्द होते. मग असा हा घोडा गंगेत का नहात नसावा? का याचा संबंध थेट पानिपताशी आहे? गंगानदी पानिपताच्या जवळ येत असेल न? पण तिकडे जरी मराठ्यांचे पानिपत झाले असले
तरी घोडयांचा पराक्रम निर्वीवाद आहे.
जाऊदे! "माशी शिंकणे" व " अखेर गंगेत घोडं न्हायल" हे वाक् प्रचार का पडले असतील याचा मला सताविणारा
कीडा तुमच्यावर सोपवून तुम्ही,
होण्या आधी जास्त बोअर
घालते माझ्या विचारांना आवर
"मिपा" चे अस्तित्व राहो निरंतर
त्याच्या संगे चालायची वाट दूरवर
जरी नाही लिहीले मी वरचेवर
वाचेन इतरांचे विचार वरचेवर
वाचने
6438
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुस्वागतम
मिपावर स्वागत!
वेलकम वेलकम!!!
आपले स्वागत! लेख चांगला
स्वागत
वेलकम टू मिपा कुटुंब. तुमचे
In reply to स्वागत by मिसळभोक्ता
कुटंब ?
In reply to वेलकम टू मिपा कुटुंब. तुमचे by विजुभाऊ
मिपावर स्वागत!
असेच म्हणतो
In reply to मिपावर स्वागत! by प्रभो
+१
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
फोटू
In reply to +१ by पैसा
+१ पैसा.
In reply to +१ by पैसा
सुस्वागतम.
स्वागत
लिहित रहा असेच वरचेवर.
हम्म्म
छान झालाय पहिलाच लेख.
अगदी मस्तच
In reply to छान झालाय पहिलाच लेख. by अनामिक
स्वागत. मिपावर बहुसर्जक लोक
लेख छान, खुसखुशीत झालाय्.
>>>>>>व्वा, प्रभा! लेख छान,
हार्दिक स्वागत!
अरेच्चा...
In reply to हार्दिक स्वागत! by पिवळा डांबिस
मिपावर तुमच स्वागत आहे
मिपावर स्वागत
मिपावर
मनापासून स्वागत.. खूप लिहा,
मिपावर स्वागत आहे...असंच
स्वागत
स्वागत !!
वाह ! शेवटी इंचाइंचाने तुम्ही
मिपावर स्वागत..!
तुमच स्वागत आहे...
तुमचे मिपावर स्वागत........
सुतावरुन स्वर्ग म्हणाव तस
स्वागतम !!अवांतर : शिंच्या*
स्वागत
स्वागत