मी मिसळपाव ची सभासद होते त्याची गोष्ट
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी,
मी प्रभा. मिसळपाव ची नवी सभासद. माझे मेहुणे श्री सुधीर काळे यांच्या प्रयत्नांमुळे व मी नक्कीच लिहू शकेन
या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे मी "मिपा" ची सभासद झाले. श्री काळे यांचे "मिपा" वर खूपच लिखाण
आहे. ते मध्यंतरी ठाण्यात आले असताना त्यांनी माझ्या "मिपा" च्या सभासदत्वासाठी प्रयत्न केले.
पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत, अगदी लहान लहान गोष्टीतही सारखी माशी शिंकत असते. आता ही माशी कशी
शिंकते हे मला माहित नाही. तिचा शिंकण्याचा आवाज कसा असतो? तिचे नाक कोठे असते? हे कोणालाच माहित
नाही. मुळात माशीला सारखी सर्दी होतेच कशी? " माशी शिंकणे" या वाक्प्रचाराचा अर्थ मला नक्कीच माहित आहे.
पण माझे म्हणणे असे की माशी च का? तूपात पडून चांदोबाला उपाशी ठेवणारी माशीच असते. रिकामटेकड्यांना
उद्द्योग म्हणून माशांनाच मारावे लागते. इतर कोणी कीटक मंडळी म्हणजे डास, कोळी वगैरे का नाही?
असो.
तर मी सांगत होते की ३०-९-२०१० ला आम्ही सभासदत्वासाठी मेल पाठवली पण त्याच दिवशी अयोध्येच्या
निकाला साठी खबरदारी म्हणून सगळी (निदान आमचीतरी) इंटरनेट सेवा बंद पडली. इथे पहिल्यांदा माशी शिंकली. काही वेळानंतर सभासदत्वासाठी मेल पाठवली गेली. त्यांच्याकडून लवकरच कळवितो असे उत्तर आले. नंतर माझे मेहुणे परत जाकार्ताला गेले. इकडे जोरदार पावसामुळे आमची टेलीफ़ोन सेवानं मृत झाली. इथे दुसर्यांदा माशी शिंकली. टेलीफ़ोन ची दुरूस्ती करताना आमची broadband ची केबल त्यांनी चुकून बंद केली. टेलीफ़ोन चालू झाला तर इंटरनेट झोपले. इथे तिसर्यांदा....
परत तक्रारी करणे, टेलीफ़ोन एक्स्चेंज चे खेटे सुरू झाले. "तुम्हारा टेलीफ़ोन ठीक हुवा है न? मगर हमारा broadband
बंद हो गया है न" ही आमची प्रश्नोत्तरे चालू झाली. शेवटी एकदाचे broadband चालू झाले व आमची प्रश्नोत्तरे संपली.
मला वाटले निदान १०-१०-१० च्या मुहूर्तावर सभासदत्व मिळाले तर फ़ार चांगले. पण नाही जमले. पण त्यानंतर
दोनच दिवसात मेहुण्यांचा मला सभासदत्व मिळाल्याचा फ़ोन आला. म्हटल आता दसर्याचा मुहूर्त चुकवायला नको.
पण आमच्या माशीची सर्दी अजून बरी झाली नाही बहुतेक. एकच दिवस पुण्याला जाण्याचे निमित्त झाले आणि पुण्याने
मोठ्या प्रेमाने मला viral infection ची भेट देऊन माझी पाठवणी केली. आपले शरिर किती अगणित सांध्यांपासून बनले
आहे याची प्रथमच मला जाणीव झाली. दुखत नाही असा एकही सांधा शिल्लक नव्हता. भरपूर गोळ्या औषधे खाऊन
आज कोजागिरीच्या मुहूर्तावर खरडायला सज्ज झाले. शेवटी गंगेत घोडं न्हायलं एकदाच!
ह्या घोडयांच्या गंगेत नहाण्याचे पण मला नवल वाटते. याचा अर्थ असा धरायचा का, की घोडे पाण्याला घाबरत होते? की त्यांना पाणी आवडत नव्हते? पण असे कसे म्हणता येईल? शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप यांची नुसती नावे आठवली तरी उमद्या घोडयांवर विराजमान झालेली त्यांची चित्रे डोळ्यापुढे येतात. त्यांच्या पराक्रमाचे मी वेगळे वर्णन करायला नको. पण त्यांच्या या पराक्रमात त्यांच्या घोडयांनीही त्यांना नद्या-नाले, दर्या-खोर्या पार करण्यात मोलाची साथ दिली आहे. राणीच्या तर तिच्यासारख्याच शूर घोडयाने/घोडीने तटावरून थेट खाली उडी मारली होती. संताजी धनाजी च्या तर घोडयांनाही मुसलमान सैनिक घाबरत असत. इतके शूर, लढवय्ये घोडे असताना त्यांना एकदम degrade करून त्यांचे " घोडं " होऊन त्यांना गंगेत नहाण्याची जबरदस्ती का करावी लागली असेल?
अगदी आत्ताच्या जमान्यात रेसकोर्सवर पळणारे उमदे घोडे बघताना डोळ्यांचे पारणे फ़िटते.(मी रेसकोर्स T.V. वरच पाहिले आहे.) त्यांचे जलद गतीत पण लयबध्द पडणारे चारी पाय आपली नजर खिळवून ठेवतात किंबहुना त्यावर नजर ठरत नाही असे म्हटले तर जास्त योग्य होईल इतक्या अफ़ाट वेगाने ते पळत असतात. अर्थात माणसे त्यांच्यावर
पैसे लाऊन श्रीमंत(किंवा कंगाल) होतात याची त्या घोडयांना कल्पनाही नसेल. अगदी साधा टांगेवालाही फ़ावल्या वेळात घोडयाच्या पाठीवरून फ़डके फ़िरवून त्यांची कांती(चामडी) चमकवित असतो. चमकदार कांती ही तर घोडयांची खासियत आहे.
ही "अश्वशक्ती" इंजिनची शक्ती मोजण्याचे परिमाण आहे. किती Horsepower चे इंजिन आहे? हे विचारण्यातच अश्वशक्ती चे निर्वीवाद श्रेष्ठत्व सिध्द होते. मग असा हा घोडा गंगेत का नहात नसावा? का याचा संबंध थेट पानिपताशी आहे? गंगानदी पानिपताच्या जवळ येत असेल न? पण तिकडे जरी मराठ्यांचे पानिपत झाले असले
तरी घोडयांचा पराक्रम निर्वीवाद आहे.
जाऊदे! "माशी शिंकणे" व " अखेर गंगेत घोडं न्हायल" हे वाक् प्रचार का पडले असतील याचा मला सताविणारा
कीडा तुमच्यावर सोपवून तुम्ही,
होण्या आधी जास्त बोअर
घालते माझ्या विचारांना आवर
"मिपा" चे अस्तित्व राहो निरंतर
त्याच्या संगे चालायची वाट दूरवर
जरी नाही लिहीले मी वरचेवर
वाचेन इतरांचे विचार वरचेवर
वाचने
6428
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
मी एक माश्यामारणारा घोड्यावरील वीर !;) कुनी शिंकायच्या आधी टंकून रिकामा झालो :)
तुमचा १०० हॉ.पॉ. चा लेख आवडला! आणि कुठलीही माशी शिंकण्यापूर्वी (लाईट जाणे इ.) वाचून संपला!
पहा असं होतं कधी कधी!
तुमच्या स्वागताचा भलामोठा प्रतिसाद टंकला आणि कुठेतरी माशी शिंकली. मला स्पष्ट ऐकू आलं हो! :-)
त्यामुळे सध्या नुसत्याच 'वेलकम' वर भागवतोय.
बाकी लेखात आभारप्रदर्शन आलं नाही कुठे! ती इथली प्रथाच आहे असं मला वाटायचं बुवा! ;-)
तुमच्याकडून भरपूर आणि छान वाचायला मिळेल अशी साधीसुधी अपेक्षा!
--असुर
आपले स्वागत!
लेख चांगला झालाय.
श्री. काळेकाका हे आमचे जुने स्नेही आहेत. त्यांच्या पुढाकाराने आपण इथे आलात, हे पाहून छान वाटले.
In reply to स्वागत by मिसळभोक्ता
वेलकम टू मिपा कुटुंब.
तुमचे अनुभव इथे लिहा.
काय करता ते लिहा . इथे वाचण्यासारखे पुष्कळ आहे.
एक मात्र आहे इथले सदस्य थोडे गम्मतशीर आहेत. सुरवातीला त्याना एकदम बिचकू नका.
हळूहळु सवय होईल. आणि त्यातली गम्मत कळेल.
In reply to वेलकम टू मिपा कुटुंब. तुमचे by विजुभाऊ
मिपा हे एक कुटुंब असेल, तर जगातले सर्वात डिस्फंक्शनल कुटुंब म्हणून नोंद करावी लागेल.
मिपावर स्वागत!
In reply to मिपावर स्वागत! by प्रभो
(स्वागतोत्सुक)बेसनलाडू
आधी लेखकाचे नाव प्रभो असे चुकून वाचले. म्हटले हा आपल्या कोणा मैत्रिणीचे मनोगत लिहितोय की काय ;)
(खट्याळ)बेसनलाडू
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
मी पण चुकून प्रभो वाचले सुरुवातीला. पुढे लेख वाचताना कळलं, लेखक कोण ते. शिवाय प्रभो एवढे मोठे लेख कुठे लिहितोय हल्ली?
माशीला सर्दी झाल्यास येथे "रुमालांची" नक्की सोय होते.
काळे काकांचे लेख मला आवडतात आणि त्यावरच्या "प्रतिक्रिया" ( ज्यांचा परस्पर संबध काय? हा प्रश्न नाही ) विशेष आवडतात.
त्याचा अभ्यास कारावा.
"इष्ट कंपू वती भव"
नेमाने लेखन करा.
लिहित रहा असेच वरचेवर. :)
इतर घटनांचा व मिपासदस्या होण्याचा फारसा संबंध दिसला नाही. असो. स्वागत.
छान झालाय पहिलाच लेख. स्वागत!
In reply to छान झालाय पहिलाच लेख. by अनामिक
प्रभामावशी, मिपावर स्वागत.
स्वागत. मिपावर बहुसर्जक लोक येत आहेत हे पाहून आनंद झाला.
व्वा, प्रभा! लेख छान, खुसखुशीत झालाय्.
तुझ्या आगामी लेखनप्रवासाला शुभेच्छा. तुझे लेखन इथे बहरेल याची खात्री आहे!
>>>>>>व्वा, प्रभा! लेख छान, खुसखुशीत झालाय्.>>>>>>>
अगदी.. दिवाळीच्या खमंग, खुसखुशीत चकल्यांची आठवण होऊन डोळे पाणावले..................... ;)
असो.. मिपावर स्वागत (करण्याएवढा मी आता जुना मेम्बर झालेलो आहे)
वा वा प्रभाआत्या,
मिपावरचं पहिलंवहिलं लिखाण मस्तच झालंय!
मिपावर हार्दिक स्वागत!!!
त्यातच तुम्ही आमचे स्नेही जाकार्ताकर श्री. सुधीरकाकांच्या भगिनी हे वाचून तर अत्यानंद झाला!!
असंच इथे वरचेवर लिखाण करीत जा....
आतुरतेने वाट पहात आहे....
In reply to हार्दिक स्वागत! by पिवळा डांबिस
मी प्रभा. मिसळपाव ची नवी सभासद. माझे मेहुणे श्री सुधीर काळे
त्यातच तुम्ही आमचे स्नेही जाकार्ताकर श्री. सुधीरकाकांच्या भगिनी हे वाचून तर अत्यानंद झाला!!
अहो पिडाकाका, हा काय तिढा लावताय?
संबंधितांनी कृ. ह. घ्या.
...स्वागतम, सुस्वागतम..
मिपावर तुमच स्वागत आहे प्रभातै.
अजुन लेख येउद्यात.
मिपावर स्वागत आहे.........!
-दिलीप बिरुटे
स्वागत.
लिहीत रहा.
मनापासून स्वागत.. खूप लिहा, छान लिहा अशीच शुभेच्छा..
आपल्यासारखे उत्साही लेखक/लेखिका मिपाला नेहमी मिळत राहोत. तेच खरे मिपाचे आणि मिपाकरांचे टॉनिक आहे..
(संस्थापक) तात्या.
मिपावर स्वागत आहे...असंच लिहित राहा.
आपले स्वागत आहे.
स्वागत !!
वाह !
शेवटी इंचाइंचाने तुम्ही मिपाकडे सरकलातच :)
सुस्वागतम.
काश्मीर स्पेशालिस्ट ?
तुमच स्वागत आहे... :)
तत्तर..तत्तर तत्तर..धत्तर तत्तर..
धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...
धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...
धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...
तुमचे मिपावर स्वागत........
[गुगलवरुन...]
[गुगलवरुन...]सुतावरुन स्वर्ग म्हणाव तस शब्दा वरुन लेख अशी झट्क्यात मजल मारलीत अन तीही अगदी रवाळ खुसखुशीत भाषेत.
स्वागतम, सुस्वागतम !
स्वागतम !!
अवांतर : शिंच्या* सुहाश्या !! तुलाच कस कोणी मिपा रेकमेन्ड नाय केल !!
शिंच्या * हा शब्द एक किमी त्रिज्येच्या आत असलेल्या आमच्या सदाशिवपेठी मित्रांकडुन !! आणी त्या त्रिज्येला धन्यवाद
पन्नास किमी त्रिज्येच्या बाहेरचा,
खवचट पुणेकर
लोहगाववासी
सुहास
मिसल् पाव वर आप्ले स्वागत
होण्या आधी जास्त बोअर
घालते माझ्या विचारांना आवर
हे सर्वात आवडले. काय आहे की, हेच हल्ली बर्याच जणांना ठाऊक नसते. सुधीर काळे यांच्या तोडीचे लेखन वाचायला आवडेल.
सुस्वागतम