Skip to main content

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 21/10/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच. राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे. आणि तो बिहारी कष्टकर्‍यांच्या अथक प्रयत्नाने झालाय हे आणखी नवीन. पण त्यांनी सांगितले म्हणजे खरेच असणार. मला त्यांच्या बोलण्याच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही. महाराष्ट्रातील काही कोत्या विचारांची मंडळी आजकाल मराठी मराठी करून टुईटुई करत असतात त्यांचा महाराष्ट्राचा विकास थांबावा असा काही कावा आहे का? कष्टाळू बिहारी लोकांचा लोंढा थांबवून आपल्याच पायावर कुर्‍हाड का मारत आहेत हे लोक? निदान राहुलजींसारख्या अभ्यासू, व्यासंगी नेत्याचा तरी विचार करावा?

वाचने 29195
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

राहूलजी असे नवनविन सिद्धांत मांडण्याबद्दल 'मशहूर' आहेत. बिहारी लोकांमूळे महाराष्ट्राचा विकास झालाही असेल. पण 'फक्त' बिहारी लोकांमूळेच का? तर नक्कीच नाही. आणि हे बिहारी लोक जर खरोखरच एवढे कार्यक्षम असतील तर बिहार आज देशातले सर्वात प्रगत राज्य असावयास हवे होते. तसे ते असते तर, 'बिहार एवढा प्रगत झालाय एवढा प्रगत झालाय, की आता बिहारी लोक बाकीच्या राज्यांचा विकास करावयास सरसावले आहेत' हे तर्कट राहूलजींना मांडता आलं असतं. असो. सुकोबारायांनी सांगून ठेवलेच आहे की- 'पिकतं तिथे विकत नसतं म्हणूनच महाराष्ट्रात बिहारी जास्तं' बोला पांडूरंग हरी! भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

'पिकतं तिथे विकत नसतं म्हणूनच महाराष्ट्रात बिहारी जास्तं' हा हा हा हा हा हा .. खल्लास ... मेलो वारलो खपलो. या बाबतीत अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते ती म्हणजे. आमच्या रत्नांग्रि, सिंधूदूर्गातील कोकणी मुलं सेंट्रींगची कामे करायला बंगळूर ला जातात. दिवाळीच्या अगोदर १ महीना गावी येतात व दिवाळी झाल्यानंतर परत जातात. आताशा चांगले पैसे कमावलेली या लोकांची पहीली पिढी (वय अंदाजे ३०-३५ वर्ष) गावी परत येऊन गावात घर बांधून आणि कमांडर(जीप सारख्या कोणत्याही गाडीला तिकडे कमांडर म्हणतात) घेऊन गावी स्थिर झाली आहे. दुसरी पिढी (वय १७-२४) सध्या बंगळूरात वास्तव्यास आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या आसपासच्या गावातील पुष्कळ लोक अहमदाबादला हिरे कापायला जाऊन राहीले आहे. १०-१५ वर्ष मेहनत करून परततात. चला मग त्या न्यायाने बंगळूरचा आणि अहमदाबादच्या हिरे उद्योगाचा विकास मराठी माणसांमुळे झाला असे म्हणायला हरकत नाही. :)

In reply to by आंबोळी

'युवराज' राहुल रामायणातील लक्ष्मणाचा नवा अवतार असावा! त्यांची त्यांच्या पुढच्या कामगार स्त्रीच्या पावलांकडे लागलेली नजर पाहून "हीच राघवा हीच पैंजणे" या भालचंद्र खांडेकर लिखित व गजानन वाटवे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यातील खालील ओळी आठवल्या. ज्या चरणांस्तव देह वाहिला त्याविण ठाउक काही न मजला मुखचंद्र तिचा कधि न पाहिला कसे ओळखू अन्य दागिने हीच राघवा हीच पैंजणे.....

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हिरे उद्योगाचा विकास मराठी माणसांमुळे झाला असे म्हणायला हरकत नाही :) तसेच अमेरीका, युरोपीयन देश, ऑस्ट्रेलीया आणि इतर देश जिथे भारतीय व्यक्ती टॅक्सी चालवतात त्या देशांचा विकास भारतीयांमुळे झाला असे म्हणायला हरकत नाही :)

In reply to by भारी समर्थ

एकदा एक जपानी नेता बिहारला आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री श्रीश्री लालुजीना भेटला. त्याने लालुंना विनंती केली," तुम्ही मला बिहार ताब्यात द्या दोन वर्षात त्याचा जपान बनवतो." लालुजी उवाच,' तुम्ही जपान माझ्या ताब्यात द्या दोन महिन्यात त्याचा बिहार करुन दाखवतो."

In reply to by आप्पा

असाच एक विनोद वाचनात आला होता. आग्र्याची मिटींग का उधळली गेली. लालुजींनी अटलबिहारींना सांगीतले की काश्मीरप्रश्ण चुटकी सारखा सुटेल. परवेजसाहेब येतील तेंव्हा चर्चेला मला बोलवा. चर्चेचे वेळी लालुप्रसादांना बोलावणे आले. काश्मीरचामुद्दा आल्यावर लालुजी म्हणाले "देखिये जनरलसाब. पुरा का पुरा कश्मीर हम आपको दे देंगे. बस एक शर्थ है. उसके साथ पुरा बिहारभी लेना पडेगा". हे ऐकताच जनरल साहेबांना घाम फुटला आणि ते मिटींग सोडुन बाहेर पडले. >:D =)) :D

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी >>> व्हय !!!

=)) =)) =)) =)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))

बातमी वाचली. त्यात खालील वाक्ये आहेत. बिहारी लोक हुशार आहेत आणि कष्टाळू देखील सहमत वा असहमत पण मुद्दा इथे गैरलागू. महाराष्ट्र आणि पंजाबसारख्या राज्यांचा विकास होत आहे तो तेथे काम करणा-या बिहारींमुळे मूळ बतमीत बिहारीमुळे असा शब्द आहे, बिहारींमुळे असा नाही. तेव्हा सहमत. जेव्हा अख्खी दिल्ली झोपलेली असते तेव्हा तेथील बिहारी मंडळी मेट्रो प्रकल्पावर काम करीत असतात मला ठाऊक नाही पण मुद्दा इथे गैरलागू. बिहारींशिवाय आपले काहीच चालणार नाही, याची या राज्यांना पूर्ण जाणीव आहे राज्याचे ठाऊक नाही पण भैय्याशिवाय माझे तरी मुंबईत फार अडेल, याची मला स्वतःला जाणीव आहे. या कष्टाळू बिहारींना त्यांच्या स्वत:च्या राज्यात मात्र नोक-या मिळत नाहीत हा खरा राहुलच्या भाषणाचा मुख्य मुद्दा (मटाने भलताच भाग उचलला). हे खरे का खोटे ते मला माहित नाही पण ही स्थानिक राजकीय टीका असल्यामुळे मुद्दा इथे गैरलागू. मूळ भाषण मिळाले तर द्या तर, चर्चा पुढे सुरू करू, अन्यथा आमचा रामराम!

In reply to by सुनील

मूळ भाषण मिळाले तर द्या तर, चर्चा पुढे सुरू करू, अन्यथा सहमत. फक्त असेच कायम सर्वांबाबत सर्वांनी वागले पाहीजे. (बाकी "रामराम" म्हणत नाही नाहीतर धागा मी असे म्हणले म्हणत भलतीकडे जायचा. ;) )

In reply to by सुनील

राज्याचे ठाऊक नाही पण भैय्याशिवाय माझे तरी मुंबईत फार अडेल, याची मला स्वतःला जाणीव आहे. कै च्या कै बोलताय तुमी भौ साहेब.पुर्वी बालु/कोकणी होते. मग "अण्णा"लोक आले. त्यांची जागा भैयालोकानी घेतली. बदल हा होत असतोच. घाबरायचे कारण नाय. कोणीतरी ती जागा घेइलच.

In reply to by चिंतामणी

अहो ज्यांना स्वत:चे काम करायलाही नोकर ठेवावासा वाटतो त्यांचे अडते. ज्यांनी आपापली कामे स्वतः करण्याची सवय असते त्यांचे अडत नाही. आणि याची अजून एक भीषणता माहीत आहे का तुम्हाला? मुंबईतल्या (विशेषतः अंधेरी, लोखंडवाला) मधे हेच जे हुच्चभ्रू आणी आळ्शी लोक आहेत त्यांनी स्वत:च्या घरी (फ्लॅटमधे बंगल्यांमधे नाही) जे नोकर ठेवले आहेत त्यांना रहायला -झोपायला हे लोक घरात जागा देत नाहीत. म्हणून हे सगळे नोकर लोक जिन्यामधे राहतात - झोपतात. कधी कधी सपरीवार राहतात. लिफ्ट असल्याने जिने वापरतात नसतात त्यामुळे हे चालून जाते. कधी जर जिन्यानं जाण्याची वेळ आली तर मात्र जाववत नाही. आता याच्या पुढे प्रगती झाली आहे. हे नोकर एका घरची नोकरी सोडून दुसरीकडे कामाला गेले तरी जिन्यातली जागा सोडत नाहीत. यालाच आताच्या व्याख्येनुसार बहुमजली झोपडपट्टी म्हणावे का? भैय्ये नाहीत म्हणून अमेरीकेचे काही अडलेले नाही. हीच सगळी मंडळी अमेरीकेत गेल्यावर आपापली कामे स्वतः करताना पाहीले आहे. असो.

In reply to by सुनील

>> बिहारींशिवाय आपले काहीच चालणार नाही, याची या राज्यांना पूर्ण जाणीव आहे राज्याचे ठाऊक नाही पण भैय्याशिवाय माझे तरी मुंबईत फार अडेल, याची मला स्वतःला जाणीव आहे. पुर्णपणे असहमत! बिहारी लओकांमुळे मुंबईत मराठी माणसाच्या रोजगराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिथे जाउ तिथी बिहारी दुकान मांडुन किंवा गाद्या उभ्या करुन असतात च. मग मराठी माणसाला संधी मिळणार कशी?

In reply to by स्वैर परी

संधि सारखी सारखी मिळत नसते. एकदा आली की सोडायची नसते. जेंव्हा बिहारी लोकांनी धंदे बळकावले तेंव्हा मराठी लोक कुठ झोपले होते?

In reply to by रन्गराव

>>जेंव्हा बिहारी लोकांनी धंदे बळकावले तेंव्हा मराठी लोक कुठ झोपले होते? बिहारी लोक आले तेव्हा मराठी लोक झोपले नव्हते.. फक्त शान्त बसले होते. पण बिहारई लोक इत्क्या झपात्याने वाढले, कि नक्कि काय होते आहे हे कळलेच नाही!

In reply to by स्वैर परी

त्यालाच झोपले होते म्हणजे गाफील होते अस म्हणायच असत. ते कितीही झपाट्याने वाढले तरी त्यांच्या करता संधी इथ होत्या पण मराठी माणसासाठी नव्ह्त्या हे थोडं हास्यास्पद आहे. कारण अस आहे- हातच सोडून पळ्त्याच्या पाठी लागला की अस होत. वीस तीस वर्षापूर्वी मराठे माणसाने (म्हणजेच राजकारणी लोकांनी) रोजगार, शिक्षण, आरोग्य, उर्जा आणि उद्योग असल्या गोष्टींसाठी झगडायच सोडून "बेळ्गाव आम्हाला पाहिजे" असली लढाई लढण्यात शक्ती वाया घालवली. आहेत ते जिल्हे नीट चालवता येत नाहीत. नवीन जबाबदारी कशाला हवी होती? आणि अजूनही अशीच दिशाभूल चालू आहे. मुंबई मध्ये सर्वांसाठी चांगल शिक्षण आणि बाकीच्या सुविधा ह्यांची जी बोंब झाली आहे त्याच्यापासून लोकांच लक्ष वेधून घ्यायला म्हणून बिहारी लोकांचा मुद्दा उठवला जातो आहे. आणि ज्यांनी त्याचा बाजार मांडलाय असे लोक आपापली पोर ईंग्रजी शाळेत घालून ऐश करतायेत. आणि बाकिच्या शाळा कॉलेजात जाणार्या पोरांना भडकावून सेना चालवतायत. आता हे सेनेतले लोक शिकलेच नाहीत आणि काम मिळवायचा प्रयत्न केला नाही तर बेकार रहाणारच की!

In reply to by रन्गराव

>> ते कितीही झपाट्याने वाढले तरी त्यांच्या करता संधी इथ होत्या पण मराठी माणसासाठी नव्ह्त्या हे थोडं हास्यास्पद आहे. याचा अर्थ संधी आपल्या ईथे होत्या व आतादेखील आहेत. याचा दुसरा अर्थ असाही होतो कि रोजगाराच्या अश्या संधी युपी-बिहार मध्ये तेंव्हाही नव्हत्या व आताही नाहीत. आता हे लोक संधी साधण्यात पटाईत आहेत म्हणून देशात जिथे जिथे संधी निर्माण होतील तिथे तिथे यांनी लोंढ्यानेच जायचे का ? अगदी तिथल्या मुळ भूमीपुत्रांपेक्षाही जास्त लोकसंख्या यांची होऊन द्यायची का? हेच लोंढे तिकडे युपी-बिहारमध्येच थोपवले तर ४-५ वर्षे त्रास होइल पण नंतर झक मारून त्यांना तिकडेच संधी निर्माण करून देणे त्यांच्या षंढ नेत्यांना भाग पडेलच ना ? *यला यांना स्वतःच्या घरी दोन वेळच्या जेवणाची खात्री नसते अन चाललेत महाराष्ट्र घडवायला... राहूल गांधीच्या कानाखाली आवाज काढावासा वाटतो...

In reply to by सुनील

मूळ बतमीत बिहारीमुळे असा शब्द आहे, बिहारींमुळेच असा नाही. तेव्हा सहमत भारतीयांमुळे जपानचा / अमेरिकेचा / इंग्लंडचा / स्वित्झर्लंडचा उत्कर्ष झाला आहे हे वाक्य कसे वाटते? इथे पण "च" नाही. केशवकुमार खरेच बोलुन गेले आहेत. "च" खुप'च' महत्वाचा आहे ब्वॉ

In reply to by सुनील

राज्याचे ठाऊक नाही पण भैय्याशिवाय माझे तरी मुंबईत फार अडेल, याची मला स्वतःला जाणीव आहे.
माझे काहीही अडणार नाही. इतर चर्चेत फारसा विंटरेस्ट आत्ता नाही, नंतर आल्यस पिंका टाकुच

सगळे बिहारी लोक राहुल गांधींच्या नेतृत्वा खाली इटली ला जाऊद्या, माझा फुल पाठींबा आहे राहुल्जीना

आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत.
भारतीय राज्यघटना आणि राज्यपध्दतीत राजपुत्र असा कोणताही हुद्दा नाही.त्याचप्रमाणे उद्याचे पंतप्रधान असाही कोणताही हुद्दा नाही. जर कोणाला स्वत:स भावी पंतप्रधान म्हणवून घ्यायचे असेल किंवा त्यांच्या समर्थकांना आपला नेता भावी पंतप्रधान आहे असे वाटत असेल तर तसे त्यांना खुशाल वाटू दे. असे वाटण्याला राज्यघटनेच्या चौकटीत अजिबात आडकाठी नाही.मात्र लोक जोपर्यंत राहुल गांधींना आपला नेता मानणाऱ्या खासदारांना लोकसभेत बहुमत देत नाहीत तोपर्यंत त्यांना (किंवा इतर कोणालाही) पंतप्रधान बनता येणार नाही हे साधे सोपे गणित असूनही राहुल गांधीचा भावी पंतप्रधान म्हणून नामोल्लेख का केला जातो हे समजत नाही.आणि अगदी उद्या जरी मनमोहन सिंहांनी राजीनामा देऊन कॉंग्रेस खासदारांनी राहुल गांधींना आपला नेता नेमले आणि युपीएच्या इतर घटकपक्षांच्या खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला तर त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. याचे कारण त्या परिस्थितीत: १. राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत. २. ते लोकसभेचे सदस्य आहेत म्हणजेच त्यांनी वय वर्ष २५ पूर्ण करणे आणि दिवाळखोर नसणे या अटी पूर्ण केल्या आहेत. ३. लोकसभेत त्यांना बहुमताचे समर्थन आहे. आणि या कारणामुळे राहुल गांधी पंतप्रधान बनले आणि त्यामुळे तुमच्या पोटात दुखत असेल तर त्याला आपल्या राज्यपध्दतीत २०१४ पर्यंत काहीही इलाज नाही. हवा असल्यास जरूर त्रागा करून घ्या. असा त्रागा करायला कोणाचीही आडकाठी असायचे कारण नाही पण अशा त्राग्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही. याचे कारण तेच: जेव्हा जेव्हा गांधी घराण्यातील व्यक्ती पंतप्रधान झाली तेव्हा तेव्हा लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असल्यामुळे. ती व्यक्ती गांधी घराण्यातील होती म्हणून नव्हे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी, १९८९ मध्ये राजीव गांधी आणि १९९८-९९ मध्ये सोनिया गांधी त्या घराण्यातील असूनही पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत याचे कारण त्यांच्यामागे बहुमत नव्हते. आणि त्यावेळी गांधी घराण्यातील असणे हे क्वालिफिकेशन त्यांना उपयोगी पडले नव्हते. तेव्हा गांधी घराण्यातील असणे हे पंतप्रधानपदासाठीचे क्वालिफिकेशन आहे असे तुम्हाला जरी वाटत असले तर जरूर वाटू दे पण ते सत्य परिस्थितीला अजिबात धरून नाही. मी कॉंग्रेस पक्ष किंवा राहुल गांधी या दोघांपैकी कोणाचाच समर्थक नाही. तरीही वारंवार ’भावी पंतप्रधान’,’युवराज’,’राजपुत्र’ आणि तत्सम विशेषणांनी राहुल गांधींचा उल्लेख केला जातो ते पण मला पटत नाही म्हणून हा प्रतिसादाचा अट्टाहास. बाकी भाषणासंबंधीच्या मुद्द्यांचा परामर्श सुनील यांनी केला आहेच तेव्हा त्याची पुनरावृत्ती टाळतो. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

माननीय क्लिंटन साहेब, आपल्या विचारांशी सहमत, पण आज बरीच वर्तमानपत्रे, TV मध्ये बातम्या देणारे वार्ताहर राहुल गांधी यांचा उल्लेख 'युवराज' असाच करतात. त्यामुळे त्यांना हे विशेषण लागू झालेले आहे. आपण घटनेचं बोलत आहात, त्याबाबत मला एक शंका आहे. घटनेप्रमाणे, एखद्या व्यक्तिला 'महात्मा' हे विशेषण लागू करण्याची पद्धत आहे काय ? घटनेतील कोणत्या कायद्याप्रमाणे आपण "मेरा भारत महान" असे बोलतो ?

In reply to by गांधीवादी

आपल्या विचारांशी सहमत, पण आज बरीच वर्तमानपत्रे, TV मध्ये बातम्या देणारे वार्ताहर राहुल गांधी यांचा उल्लेख 'युवराज' असाच करतात. त्यामुळे त्यांना हे विशेषण लागू झालेले आहे. क्लिंटन यांचा मुद्दा तत्वतः जरी बरोबर असला आणि त्या अर्थाने त्याच्याशी सहमती असली, तरी वास्तवात, राहूल गांधी हे युवराज अथवा क्राउन प्रिन्स आहेत असे सातत्याने (आणि पद्धतशीरपणे) जनतेच्या डोक्यात प्रसिद्धी माध्यमे बिंबवत आहेत. सकाळ, म.टा. देशोन्नती, टाईम्स ऑफ इंडीया, रीडीफ, इंडीया टुडे, वगैरे... जेंव्हा सतत असे माथी मारले जाते तेंव्हा त्रागा झाला तर त्यात आश्चर्य नाही. क्लिंटन म्हणतात तसे गांधी घराण्याविना देखील पंतप्रधान या देशात होऊन गेले आहेत, आजही (तत्वतः) आहे आणि पुढेही होतील. तरी देखील या संदर्भात आठवण होते, ते "नेहरूं नंतर (देशाचे) काय?" असले प्रश्न विचारले गेले त्याची, तसेच मार्क टलीने त्याच्या "डिफीट ऑफ अ काँग्रेसमन" मधे सांगितलेली "राजीव गांधी गेले म्हणजे भारत संपला" असल्या खुळचट कल्पना करणार्‍या पाश्चात्य माध्यमांची आठवणही झाली. त्यावेळचे गोविंद तळवळकरांसारख्या माझ्या आवडीच्या आणि आदरणीय संपदकांनी देखील ज्या पद्धतीने देशाचे काय होणार, जणू काही सगळे संपलेच असे लिहीले होते त्यावर आता विचार केला तर कुठेतरी खेद वाटल्याशिवाय राहवत नाही. तेच सोनीया गांधींच्या राजकारणात न येण्यावरून आणि आल्यावर केलेली तथाकथीत विचारवंतांची वक्तव्ये ही खरेच नक्की यांच्यात काय पहात होते हे वाटते. थोडक्यात गांधी घराण्यात असणे हे क्व्लाईफिकेशन आहे का नाही यापेक्षा सातत्याने तसे ते सांगितले आणि बिंबवले जात आहे असे म्हणायला मात्र नक्की जागा आहे असे वाटते. जेंव्हा गांधी घराण्यातील निवडून येतात आणि सर्वोच्चपदी जातात तेंव्हा त्यात घटनेप्रमाणे असल्यास काहीच गैर नाही पण त्यांची जी पद्धतशीर प्रतिमा केली जाते त्या विरुद्ध बोलूच नये असे देखील कुणाला वाटू नये इतकेच वाटते.

In reply to by विकास

पण त्यांची जी पद्धतशीर प्रतिमा केली जाते त्या विरुद्ध बोलूच नये असे देखील कुणाला वाटू नये इतकेच वाटते.
चर्चेचा मूळ प्रस्ताव ’प्रसार माध्यमे राहुल गांधींची युवराज म्हणून प्रतिमा तयार करतात आणि ते चुकीचे आहे’ असा नाही तर चर्चेचा रोख राहुल गांधी नालायक आहेत, राहुल हे गांधी असल्यामुळेच पंतप्रधान बनणार वगैरे वगैरे आहे, बरोबर? त्यावर माझे म्हणणे असे की राहुल गांधी तुमच्या दृष्टीने नालायक असतील तर तुम्ही त्यांच्या पक्षाला मते देणार नाही. तुमच्यासारख्यांची मते राहुल गांधींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायला पुरेशी असतील तर ते पंतप्रधान बनणार नाहीत आणि पुरेशी नसतील तर ते पंतप्रधान बनतील. आणि जर का ते पंतप्रधान बनले तर त्यांना लोकांचे मॅंडेट मिळाले म्हणून ते पंतप्रधान बनले हे मान्य करावे. उगीच गांधी घराण्याचा त्याच्याशी संबंध जोडू नये. अवांतर: मध्यंतरी राहुल गांधी आणंदच्या Institute of Rural Management मध्ये येऊन गेले. त्यांना आमच्या आय.आय.एम मध्येही यायचे होते पण त्यांना आमच्या डायरेक्टरने येऊ दिले नाही अशी वदंता विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे.खरेखोटे समीर बरूआ (डायरेक्टर) आणि राहुल गांधी जाणोत.

In reply to by क्लिंटन

आणि जर का ते पंतप्रधान बनले तर त्यांना लोकांचे मॅंडेट मिळाले म्हणून ते पंतप्रधान बनले हे मान्य करावे. उगीच गांधी घराण्याचा त्याच्याशी संबंध जोडू नये. ते गांधी घराण्याचे आहेत म्हणुन त्यांन मॅनडेट मिळते आहे ना ? ते जर गांधी नसले असते तर त्यांना कोणी झक मारायला मते दिली असती? जनता गांधी आडनावामागे खंबीरपणे उभी आहे हे आपल्याला अमान्य करताच येणार नाही.

In reply to by मृत्युन्जय

ते जर गांधी नसले असते तर त्यांना कोणी झक मारायला मते दिली असती?
जनतेने १९७७ मध्ये जनता पक्षाला, १९८९ मध्ये जनता दल-भाजपला, १९९८-९९ मध्ये वाजपेयींना मते दिली (या सगळ्यांत ’गांधी’ कोणी नाही) तेव्हा केवळ ’गांधी’ असण्याचा उपयोग नाही तर लोकांना त्या पक्षाविषयी/नेत्याविषयी विश्वास वाटला पाहिजे तरच लोक मते देतील. हे आता परत लिहिणार नाही.तीच तीच गोष्ट परत लिहायचा कंटाळा आला आहे. जनता गांधी आडनावामागे खंबीरपणे उभी आहे हे आपल्याला अमान्य करताच येणार नाही. नाही जनता ज्या पक्षाचे नेते ’गांधी’ अडनावाचे आहेत त्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी आहे. पण त्यामुळे जनता गांधी अडनावामागेच खंबीरपणे उभी आहे असे भासविण्यात येते. आणि आपला नेता म्हणून कोण हवा हे ठरवायचा अधिकार त्या पक्षातल्या लोकांचा आहे. ते इतरांनी सांगायची गरज नाही.जर उद्या कोणी ’भाजपमध्ये रा.स्व.संघाची पार्श्वभूमी नसलेला एकही अध्यक्ष होत नाही आणि ते त्या पक्षाला कसे चालते’ असे म्हटले तर त्यावर उत्तर आपला नेता म्हणून कोण हवा हे त्या पक्षातल्या लोकांनी ठरवायचे इतरांनी नाही. तशीच गोष्ट कॉंग्रेसबद्दल.

In reply to by क्लिंटन

एक छोटासा बदल सुचवू इच्छितो, केवळ लोकसभेत जाण्यासाठी लोकांच्या मतांची गरज असते. लोकसभेतून पंतप्रधान होण्यासाठी लोकांच्या मतांची काडीचीही गरज नसते. (हे तरी मान्य कराल ना ? ) तिथे कशाची गरज असते ? ह्या बद्दल नागरिकशास्त्राच्या पुस्तकात काय लिहिले आहे हे समजेल काय?

In reply to by गांधीवादी

पंतप्रधान बनायला डायरेक्ट नाही तर इंडायरेक्ट पध्दतीने लोकांचे समर्थन पाहिजे असते. समजा राहुल गांधी पंतप्रधान झाले आणि त्यांच्या नेतृत्वाविरूध्द चिदंबरमनी बंड केले आणि बहुसंख्य खासदारांचा पाठिंबा त्यांना असेल तर तेच पंतप्रधान बनतील आणि राहुल गांधींना बाजूला व्हावे लागेल.असेच बंड चंद्रबाबू नायडूंनी एन.टी.रामारावांविरूध्द केले आणि त्यात त्यांना यश आले.असे राज्य पातळीवर होऊ शकते तर केंद्र पातळीवर होऊ नये असा कोणताही दंडक नाही.राजीव गांधींविरूध्दही वि.प्र.सिंह, अरूण नेहरू, आरिफ मोहम्मद खान यांनी बंड केले होतेच की. समजा १९८७ मध्येच लोकसभेत बहुमताचा पाठिंबा वि.प्र.सिंहांना मिळाला असता तर ते तेव्हाच पंतप्रधान झाले असते. आता त्यांना तेव्हा पुरेसे समर्थन का मिळाले नाही याचे उत्तर म्हणजे बहुसंख्य खासदार तेव्हाही राजीव गांधींनाच आपला नेता मानत होते. आणि खासदारांनी कोणाला नेता मानावे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन पक्षांतर करणे असा Spirit of the constitution चे उल्लंघन करणारा प्रकार तेव्हा घडलेला नव्हता.अशा परिस्थितीत खासदारांनी राजीव गांधींना आपला नेता मानूच नये हे इतरांनी सांगायचे कारण नाही तो त्या खासदारांचा विशेषाधिकार झाला.

In reply to by क्लिंटन

>>खासदारांनी कोणाला नेता मानावे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. हा विशेषाधिकाराचा (गैर)वापर करून खासदारांनी ठरविलेला (ऐन वेळी घोडेबाजार करून) नेता हा जर का जनतेला मान्य नसेल तर जनता घटनेप्रमाणे (विधायक मार्गाने) कोणती ठोस कारवाई करू शकते ? (आंदोलने, मोर्चे, उपोषण ह्याला सध्याचे राज्यकर्ते भिक घालत नाही.) जनतेला मत देण्याचा अधिकार आहे, दिलेले मत मागे घेण्याचा अधिकार नाही. तसा मात्र खासदारांना कोणत्याही नेत्याला पाठींबा देण्याचा आणि तो केव्हाही काढून घेण्याचा अधिकार आहे. हे कितपत योग्य. जनतेने एकदाका मत दिले कि पुढे होणारा घोडेबाजार कितीही चुकीचा / योग्य असेल तरी जनतेला फक्त हातात हात घालून बघावे लागते. प्रत्याखा त्यात कुठेही बह्ग घेता येत नाही. हि आपल्या लोकशाहीची मर्यादा आहे. आणि ह्याच मर्यादेचा शेकडो वेळा गैर वापर करून लोकशाहीची अनेकदा हत्या झालेली आहे.

In reply to by गांधीवादी

ह्याच मर्यादेचा शेकडो वेळा गैर वापर करून लोकशाहीची अनेकदा हत्या झालेली आहे.
आणि मी पण शेकडो वेळा म्हणत आहे की निवडणुकीतील गुंडगिरी, लाच देऊन मते खरेदी करायचा प्रयत्न करणे, नंतर होणारे घोडेबाजार या सगळ्या गोष्टी नि:संशय वाईट आहेत.माझा मुद्दा तथाकथित घराणेशाहीविषयीचा आहे.राहुल गांधी पंतप्रधान व्हायला अयोग्य आहेत असे वाटत असेल तर त्यांना नेता मानणाऱ्या खासदारांना मत जरूर देऊ नका पण त्यामागे राहुल गांधींची योग्यता/अयोग्यता हा मुद्दा असावा त्यांचे अडनाव कोणते हा नको हाच तर माझा मुद्दा आहे.

In reply to by क्लिंटन

भाजपमध्ये रा.स्व.संघाची पार्श्वभूमी नसलेला एकही अध्यक्ष होत नाही : "हे" विधान भा.क.प व इतर डाव्या पक्षांना ही लागू आहे. कारण हे काही तत्वाची पाठराखण करणारे पक्ष आहेत ( ही तत्वे चूकीची / बरोबर ही ज्याच्या त्याच्या विचरांचा भाग झाला.) त्यामुळे ह्या संघटनांचे पदाधिकारी त्या त्या संघटनांशी निगडीत असणे "स्वाभाविक" आहेच. कॉग्रेस मध्ये "गांधी " असणे आवश्यक आहे. राजीव गांधी ना १९८४ साली " त्यावेळच्या" युवकांनी " भरघोस पाठिंबा दिला. पण ४ वर्षात "त्याचा" पूर्ण भ्रमनिरास झाला.ईतिहासाची पुनरावृत्ती न होवो.

In reply to by क्लिंटन

चर्चेचा मूळ प्रस्ताव ’प्रसार माध्यमे राहुल गांधींची युवराज म्हणून प्रतिमा तयार करतात आणि ते चुकीचे आहे’ असा नाही तर चर्चेचा रोख राहुल गांधी नालायक आहेत, राहुल हे गांधी असल्यामुळेच पंतप्रधान बनणार वगैरे वगैरे आहे, बरोबर? म्हणूनच तर तत्वतः सहमती आहे असे म्हणले होते. बाकी माझा वरील प्रतिसाद हा आपल्या खालील वाक्यांसंदर्भात होता:
भारतीय राज्यघटना आणि राज्यपध्दतीत राजपुत्र असा कोणताही हुद्दा नाही.त्याचप्रमाणे उद्याचे पंतप्रधान असाही कोणताही हुद्दा नाही. .....मात्र लोक जोपर्यंत राहुल गांधींना आपला नेता मानणाऱ्या खासदारांना लोकसभेत बहुमत देत नाहीत तोपर्यंत त्यांना (किंवा इतर कोणालाही) पंतप्रधान बनता येणार नाही हे साधे सोपे गणित असूनही राहुल गांधीचा भावी पंतप्रधान म्हणून नामोल्लेख का केला जातो हे समजत नाही.
आता त्यात म्हणल्याप्रमाणे माध्यमे समर्थक म्हणून तसे म्हणत असतील असे म्हणणे असले तरी हरकत नाही, टिकाकार विरोधक म्हणून उपरोधाने बोलू शकतात. असो.

In reply to by गांधीवादी

घटनेप्रमाणे, एखद्या व्यक्तिला 'महात्मा' हे विशेषण लागू करण्याची पद्धत आहे काय ?
जनतेने ज्योतिबा फुले, मोहनदास गांधी यांना प्रेमाने दिलेले बिरूद आहे.. हे काहि पद नाहि.. युवराज हे पद आहे (होते) बाकी क्लिंटन व सुनील यांच्याशी सहमत

In reply to by ऋषिकेश

>>जनतेने ज्योतिबा फुले, मोहनदास गांधी यांना प्रेमाने दिलेले बिरूद आहे..हे काहि पद नाहि.. ह्यात तुम्ही काय नवीन सागितले ? >>युवराज हे पद आहे (होते) आहे कि होते ? हे आपल्या विधानावरून स्पष्ट झाले नाही. किमान आमच्या माहितीवरून आज भारतात 'युवराज' हे पद नाही. असेल तर त्याबद्दल माहिती देऊन आमच्या अज्ञानविश्वात, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करावा. तसेच, आम्ही आमच्या 'राजमेतेच्या' पुत्राला 'युवराज' म्हणून प्रेमाने संबोधले तर तुमच्या पोटात का दुखते हे देखील स्पष्ट करावे. बाकी आमचे प्रश्न अजून अनुत्तरीतच. घटनेच्या चौकडीतच राहून (प्रेम / द्वेष,ईर्ष्या यांच्या आहारी न जाता) आमच्या शंकेचे समाधान होईल काय ? 'हो' किव्वा 'नाही' ह्या स्वरुपात त्याची उत्तरे मिळतील काय ?

In reply to by क्लिंटन

>>१९७७ मध्ये इंदिरा गांधी, १९८९ मध्ये राजीव गांधी आणि १९९८-९९ मध्ये सोनिया गांधी त्या घराण्यातील असूनही पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत याचे कारण त्यांच्यामागे बहुमत नव्हते ईंदिरा गांधी १७ वर्षे, राजीव गांधी ५-६ वर्षे पंतप्रधान होते.. सोनिया गांधी गेली १० वर्षे पंतप्रधानपद "चालवत" आहेत. ईतकं सगळं हि मंडळी करू शकली ती केवळ भक्कम लोकमतामुळेच हो ! गांधी नावात काही दम नाही, ईंदिरा 'सिंग' असत्या वा राजीव 'कुर्‍हाडे' अन सोनिया 'क्रुश्चेव्ह' वगैरे कोणीतरी असत्या तरीही हि मंडळी त्यांचे असामान्य कर्तुत्त्व दाखवु शकल्या असत्याच. काय? बरोबर ना क्लिंटनराव ? काँग्रेसतर्फे भावी पंतप्रधान म्हणून राहूल गांधींनाच पुढे केले जाणार हे ढळढळीत सत्य आहे. राजीव गांधींनंतर काँग्रेसची हालत काय होती हे आपण जाणून असालच, काँग्रेस वाचवण्यासाठी सोनियांना पुढे केले गेले ते केवळ "गांधी" नाममहात्म्यामुळे.. बाकी त्यांचे कर्तुत्त्व काय होते ? ऊद्या भविष्यात राहूल गांधी पंतप्रधान झालेच तर ते खालील पात्रता असल्यामुळे : १. राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत. २. ते लोकसभेचे सदस्य आहेत म्हणजेच त्यांनी वय वर्ष २५ पूर्ण करणे आणि दिवाळखोर नसणे या अटी पूर्ण केल्या आहेत. ३. लोकसभेत त्यांना बहुमताचे समर्थन आहे. पण याबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाचा निकष त्यांच्या बाजूने असेल तो म्हणजे : ४. राहूल हे "गांधी" आहेत. बाकी चालू द्या..

In reply to by पंख

>>सोनिया गांधी गेली १० वर्षे पंतप्रधानपद "चालवत" आहेत कठोर असहमत. मॅडम स्वतः पंतप्रधान आहेत. सिंग नावाचे कोणीतरी एक गृहस्थ ते पद चालवीत/सांभाळत आहे. ते पद त्यांना केवळ सांभाळण्यासाठी दिलेले आहे, त्यावर ते हक्क दाखवू शकत नाही.

In reply to by पंख

ईंदिरा गांधी १७ वर्षे, राजीव गांधी ५-६ वर्षे पंतप्रधान होते.. सोनिया गांधी गेली १० वर्षे पंतप्रधानपद "चालवत" आहेत. ईतकं सगळं हि मंडळी करू शकली ती केवळ भक्कम लोकमतामुळेच हो
हो अगदी बरोबर. इंदिरा गांधी १९६६-७७ आणि १९८०-८४ दरम्यान पंतप्रधान होत्या.दरम्यान १९६७,१९७१,१९७७ आणि १९८० या चार लोकसभा निवडणुका झाल्या.त्यात १९६७ मध्ये ५२० पैकी २८३, १९७१ मध्ये ३५१ आणि १९८० मध्ये ५४५ पैकी ३५० जागा त्यांच्या पक्षाला मिळाल्या होत्या म्हणजे लोकमत त्यांच्या बाजूने होते की. पण १९७७ मध्ये ५४५ पैकी १५४ जागा मिळून पराभव झाल्याने त्या पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत. तीच गोष्ट राजीव गांधींची. त्यांच्या पक्षाला १९८४ मध्ये पहिल्यांदा ४०४ आणि नंतर पंजाब-आसामातील निवडणुका झाल्यानंतर ४१५ जागा लोकसभेत होत्या. पण १९८९ मध्ये १९७ जागा मिळून पराभव झाल्यामुळे ते परत पंतप्रधान होऊ शकले नाहीत. तसेच २००४ मध्ये युपीए+कम्युनिस्ट आणि बाहेरून पाठिंबा देणारे पक्ष यांना बहुमत होते तर २००९ मध्ये कम्युनिस्ट वगळता जुन्याच कॉम्बिनेशनला बहुमत होते त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचेच सरकार आहे. आणि हे लोकमतावरच आहे. तुम्हाला म्हणायचे तर जरूर गांधी घराणे हे क्वालिफेकेशन म्हणा त्याबद्दल इतर कोणालाही अडचण असायचे काहीच कारण नाही.पण ते म्हणणे सत्य परिस्थितीला धरून नाही.
ईंदिरा 'सिंग' असत्या वा राजीव 'कुर्‍हाडे' अन सोनिया 'क्रुश्चेव्ह' वगैरे कोणीतरी असत्या तरीही हि मंडळी त्यांचे असामान्य कर्तुत्त्व दाखवु शकल्या असत्याच. काय? बरोबर ना क्लिंटनराव?
असामान्य कर्तुत्व तुमच्या दृष्टीने बघायला गेले तर या मंडळींनी दाखविलेले नाही पण त्यांना परतपरत मते देणाऱ्यांच्या दृष्टीने ते नक्कीच आहे. बाकी चालू द्या.

In reply to by क्लिंटन

केवळ गांधी नाव असल्यामुळेच ह्या लोकांना थेट फायनल मॅच खेळायला भेटते.. बाकिच्यांना पात्रता फेरीतून पुढे यावे लागते ...

In reply to by क्लिंटन

असामान्य कर्तुत्व तुमच्या दृष्टीने बघायला गेले तर या मंडळींनी दाखविलेले नाही पण त्यांना परतपरत मते देणाऱ्यांच्या दृष्टीने ते नक्कीच आहे. एक मिनिट. कर्तुत्व बघुन या देशात कोण मत देतं? कित्येक दशके निवडणुका जिंकणार्या माननीय पप्पु कलानी यांनी नक्की कोणते कर्तुत्व दाखवले आहे? लालू म्हणतो की त्याने रेल्वेला न भूतो न भविष्यति फायदा कमावून दिला. ममतातै म्हणतात हे साफ खोटे आहे. रेल्वेची बॅलन्स शीट फुगवलेली आहे. आता मला सांगा एक कोणितरी खोटारडे आहे की नाही? कसले कर्तुत्व याच्यात मग? राहुल गांधींनी नक्की कुठले कर्तुत्व दाखवले आहे? नाही म्हणजे तुम्ही म्हणत आहात की त्यांना मत देणार्या लोकांना दिसले. नक्की काय दिसले ते कळेल का खरं? विनोद खन्ना, जयाप्रदा, दुसरी जया, सिद्धु यांनी नक्की काय कर्तुत्व दाखवले आहे शिंचे? अर्रे कर्तुत्ववान माणसाला मते मिळत असली असती तर भाटिया पुण्यातुन जिंकुन नसते का आले? त्यांना परतपरत लोकं मतं देत आहेत कारण त्यांच्या नावापुढे गांधी घराण्याची पदवी आहे. सोनिया गांधी सुद्धा काय त्याच्या कर्तुत्वामुळे काँग्रेस अध्यक्षा झाल्या का? राजीव गांधींची विधवा नसल्या असत्या तर काँग्रेसच्या चपराश्यानेसुद्धा भाव दिला नसता त्यांना. षंढ काँग्रेसींना बाइचा पदर धरुन चालायची सवय आहे बाकी काही नाही? नाही म्हणजे बाई जर इंदिरा गांधी असेल तर काहीच चुकीचे नाही त्यात. तिच्या काळात संपुर्ण मंत्रिमंडळात केवळ एकच पुरुष होता असे उगाच का म्हणतात? पण सोनिया गांधी? तिच्यापुढे पदर पसरावा असे का वाटले काँग्रेसींना? पक्षात तेव्हाही शरद पवार, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, मनमोहन सिंग, प्रणव मुखेर्जी होते ना? मग हे सगळे असताना सोनिया गांधी कशाला हव्या होत्या? कारण या सगळ्यांची मोट बांधायला कोंग्रेसला नेहेमीच गांधी घराण्याचा टेकु लागतो. आणि कोंग्रेसला लागतो म्हणुन तो पुर्ण देशाच्या माथी मारला जातो. राहुल गांधी आज ना उद्या पंतप्रधान होतील. म्हातार्या जेटली, मोदी, अडवाणींना मत देण्यापेक्ष तरुण, देखणा, ऐटबाज (महत्वाचे म्हणजे गोरा आणि गांधी खानदानातला) राहुल गांधी बरा म्हणुन बरेच लोक त्यला मत देतील. पण हे त्याचे कर्तुत्व नाही. ही गांधी घराण्याची किमया.

In reply to by मृत्युन्जय

इथे एक मुळातच गल्लत होत आहे आणि ती गल्लत तुम्ही-आम्ही सगळेच शिकले सवरलेले लोक करतो. आणि ती गल्लत म्हणजे "कर्तृत्व" या संकल्पनेची आपली व्याख्या आहे तीच सगळ्यांना थोड्याबहुत प्रमाणावर पाळावी असे आपल्याला वाटते. आपण शिकलेसवरलेले, बऱ्यापैकी नोकरी-व्यवसाय असलेले लोक आहोत.त्यामुळे आपल्याला infrastructure, वीज-पाणी पुरवठा, शिक्षण, माझ्याप्रमाणे अर्थशास्त्रात रस असलेल्यांना भारतीय अर्थव्यवस्था नीट सांभाळणे यासारखे मुद्दे ’कर्तृत्वाचा’ भाग वाटतात.पण हातावर पोट असलेल्यांना हे मुद्दे पूर्णपणे गैरलागू असतील.त्यांना ’अमुक एक नेता’ किंवा अमुक एक पक्ष आपल्याला दोन वेळच्या भाकरीची सोय करेल अशी (बऱ्याचदा खोटी) आशा वाटली तर ते त्या उमेदवाराला/पक्षाला मत देतात. अनेकदा मतदान हे पक्ष बघून होते, उमेदवार बघून नाही त्यामुळे दोन्हींचा उल्लेख इथे करत आहे. डेव्हिड धवन-गोविंदाचे चित्रपट का चालले?कारण अशा एखाद्या चित्रपटातील गोविंदाप्रमाणेच आपल्या प्रेमात एखादी करोडपतीची मुलगी पडेल, आपणही जगावर राज्य करू यासारखी स्वप्ने हे चित्रपट हातावर पोट असलेल्यांना विकतात. आणि त्या स्वप्नांच्या जोरावर असे लोक आपले जीवन सुसह्य बनवितात.आता अशा लोकांना ’एक डॉक्टर की मौत’ सारखे एका चांगल्या researcher ला आपल्या यंत्रणेने कसा त्रास दिला आणि त्याला आत्महत्या करायला कसे भाग पाडले हे दाखविणारे चित्रपट अजिबात भावणार नाहीत. त्याचप्रमाणे हातावर पोट असलेल्यांसाठी उमेदवार/पक्षाचे कर्तुत्व म्हणजे "त्यांचे जीवन सुसह्य बनवेल असे काहीतरी पक्ष/उमेदवार करेल ही आशा" अशी व्याख्या केली तर ती चुकीची ठरू नये. आजही हातावर पोट असलेल्या मतदारांची संख्याच कितीतरी जास्त आहे हे वेगळे सांगायला नकोच.आणि आपल्यासारखे शिकले सवरलेले लोक मतदानाच्या दिवशीची सुटी बघून खंडाळ्याला पळतात हे पण वेगळे सांगायला नको.तेव्हा निवडून येणारे आपल्या दृष्टीने कर्तृत्वहिन असतात पण त्यांना मते देणाऱ्यांच्या दृष्टीने नाही. यातूनच दुर्दैवाची गोष्ट अशी की असे राज्यकर्ते लोकांना नुसती खोटी आश्वासने देऊन भूलवतात आणि हातोहात फसवितात. पण तरीही विरोधी पक्ष जोपर्यंत ही फसवणूक effectively दाखवून देत नाही आणि आपणही तुमचे जीवन सुसह्य बनवू असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करत नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. पण असे करण्यापेक्षा आपल्या विरोधी पक्षाचा भर असतो घराणेशाहीवर आणि सोनियांच्या परदेशी मुळासारख्या प्रश्नांवर. आणि अशा प्रश्नांमध्ये सामान्य लोकांना खरोखरच इंटरेस्ट वाटावे असे काही आहे असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

विवेचन छान आहे परंतू हे कागदावरच छान वाटतं :) कारण प्रत्यक्षात या पद्धतीने उमेदवार(बरेचसे) नाही निवडून येत. निवडणूका जिंकण्याचं समिकरण हे एवढं सरळ सोपं नाही :) आपण एकाद्या निवडणूकीत कोणा उमेदवाराकरीता प्रचार केला आहे का? मतदान होण्याच्या शेवटच्या २४-४८ तासात जे काही समिकरण राबवल्या जातं त्याचा अनुभव घेतला आहे का? नसल्यास घेउन बघा ;) [ अवांतरः अनुभवी ]

In reply to by समंजस

मतदान व्हायच्या २४-४८ तास आधी मोठ्या प्रमाणावर पैसे, दारू आणि इतर गोष्टी वाटून मते विकत घेतली जातात. आणि हा प्रकार सरळसरळ कायद्याचे उल्लंघन करणारा आणि अत्यंत अयोग्य आहे. असे घाणेरडे प्रकार आणि गुंडगिरी सज्जन माणसाला जमणार नाही म्हणून त्याच्यासाठी संसदेत पोहोचणे आणि म्हणूनच पंतप्रधान बनणे हे दुरापास्त आहे असे कोणी म्हणत असेल तर त्यात अमान्य करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही.पण या चर्चाप्रस्तावात आणि इतर काही प्रतिसादांमध्ये गांधी घराण्यात जन्माला येणे हेच मोठे क्वालिफिकेशन आहे आणि ते पंतप्रधानपदासाठी गरजेचे आहे हा जो सूर आळवला जात आहे त्याला मात्र माझा विरोध आहे म्हणूनच या चर्चेत मी प्रतिसाद लिहिले आहेत.

In reply to by क्लिंटन

>>मतदान व्हायच्या २४-४८ तास आधी मोठ्या प्रमाणावर पैसे, दारू आणि इतर गोष्टी वाटून मते विकत घेतली जातात. आणि हा प्रकार सरळसरळ कायद्याचे उल्लंघन करणारा आणि अत्यंत अयोग्य आहे. असे घाणेरडे प्रकार आणि गुंडगिरी सज्जन माणसाला जमणार नाही म्हणून त्याच्यासाठी संसदेत पोहोचणे आणि म्हणूनच पंतप्रधान बनणे हे दुरापास्त आहे असे कोणी म्हणत असेल तर त्यात अमान्य करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही सहमत >> पण या चर्चाप्रस्तावात आणि इतर काही प्रतिसादांमध्ये गांधी घराण्यात जन्माला येणे हेच मोठे क्वालिफिकेशन आहे आणि ते पंतप्रधानपदासाठी गरजेचे आहे हा जो सूर आळवला जात आहे त्याला मात्र माझा विरोध आहे म्हणूनच या चर्चेत मी प्रतिसाद लिहिले आहेत. गांधी घराण्यात जन्म घेतल्यामुळे जी प्रतिष्ठा, सुरक्षा, आर्थिक पाठबळ, राजकीय प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेण्याची जी सहजासहजी(इथे सहजासहजी हा शब्दच खूप महत्वाचा आहे) संधी मिळते, तिच्यामुळे त्यांना राजकीय व्युहात घुसणे सुककर असते. तसेच शेकडो वकील, वृत्तपत्रे, हाताशी ठेऊन कायदा कसा पाळायचा (कि न पाळून आपले इप्सित कसे सध्या करायचे) याचे सविस्तर शिक्षण यांना मिळते. त्यामुळे राजकीय पूर्वज क्वालिफिकेशन असेल तरच माणूस इथे टिकू शकतो. अन्यथा देश हितासाठी तो कुठे संपला तरी ती बातमी एका किरकोळ वृत्तपत्रात कोपर्यात सुद्धा येणार नाही. पण भक्कम राजकीय घराण्यातला एक माणूस गेला तरी त्याच्या नावाचे भांडवल करून पुढील शे दोनशे वर्षे तरी त्याच्या नावावर मते मागता येतात.

In reply to by विजुभाऊ

एकाच्या पित्याने हुशारीने मिळविले / टिकविले. दुसर्याचे पिता देश हितासाठी केवळ झिजले.

In reply to by गांधीवादी

एकाच्या पित्याने हुशारीने मिळविले / टिकविले. दुसर्याचे पिता देश हितासाठी केवळ झिजले.
तुमच्या या चर्चेतील प्रतिसादावरून तरी तुम्ही राजीव गांधी देशहिताकरता झिजले असे म्हटणार नाहीत याविषयी शंका नाही. सध्याच्या राजकारणात देशहिताकरता वगैरे कोणी झिजत नसते.आता माफक अपेक्षा इतकीच की पैसे खायचे असतील तर जरूर खा पण लोकांसाठी काहीतरी काम तरी करा. राजीव गांधी देशहिताकरता झिजले वगैरे माझ्यासारखा वरकरणी* राजीव समर्थक वाटणाराही म्हटणार नाही. तेव्हा संजय गांधी देशहिताकरता केवळ झिजले असे जर म्हणत असाल तर मात्र बोलणेच खुंटले. *: वरकरणी राजीव समर्थक वाटणारा का? कारण माझा मुद्दा इतकाच की प्रत्येक राज्यकर्त्याच्या कामाचे त्याचे अडनाव/पक्ष/चेहरा या गोष्टी सोडून देऊन वस्तुनिष्ठ विश्लेषण करावे आणि त्याने काही चांगले केले असेल तर त्याचे श्रेय त्याला जरूर द्यावे. पण मिपावर राजीव गांधी हे नाव ऐकताच त्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचेही श्रेय द्यायचे नाही असे वाटणारे सदस्य आहेतच. त्यांना मी कट्टर राजीव समर्थक वाटत असेलही. वस्तुस्थिती तशी नक्कीच नाही.

महाराष्ट्र राज्य एक प्रगत राज आहे हे हुप्य्या सारख्या माननीय सदस्यांना माहित नाही हे एक आश्चर्याच म्हणावे लागेल. शेकडो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चितेवर शेकून, लाखो उपाशी बालके टाहो फोडत आहेत, त्यांचा टाहोपेक्षा मोठी गर्जना CWG मध्ये करून, गरीबाच्या पोटाला दोन घास, राहायला दोन फुट जमीन कशी मिळेल, ह्यापेक्षा सडलेल्या भारतीय लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या, विचारवंताच्या जीवावर जी नेत्रदीपक प्रगती झाली आहे त्यामुळे कदाचित माननीय हुप्य्या यांचे डोळे दिपून गेले असतील. किती प्रगती झाली हे मोजण्यासाठी खेडेगावात, झोपडपट्टीत जाऊ नका हो. एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यावर जावा, पंचतारांकित हॉटेल मध्ये जावा, एखाद्या BMW / MERC मधून फिरा. भाकरी नाही तर रोज पिझ्झा खावा, गोल्फ क्लब मध्ये रोज चक्कर मारा, हिंजेवाडीतील एखाद्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये ३/४ BHK घर घ्या. मगच तुम्हाला कळेल कित्ती कित्ती प्रगती झालेली आहे. आणि ह्या प्रगतीचे द्योतक म्हणजे लवकरच मुंबयीचे शांघाई , पुण्याचे मुनिक, बेंगलोरचे बीजिंग, कलकत्याचे कॅलीफोर्निया आणि दिल्लीचे हॉगकॉग होणार आहे.

राहुल गांधीला तिकडे बरीच मते मिळवायची अहेत. निवडणूक आहे ना तिकडे?तो इकडे मुंबईत आला तरी असेच काहीसे मराठी माणसासाठी बोलेल.

In reply to by प्रिया देशपांडे

चला हो, काहीही काय? मराठी मतांसाठी मराठी माणसाची स्तुती करण्याची राहुलला काहीही गरज पडली नाही. त्यांनी आपल्या **वर जोरकस लाथ मारली तरी आपण त्यांनाच निवडून देतो दर वेळी. उगाच स्तुती करण्याच्या भानगडीत का पडतील? बाकी मुंबईतल्या इतक्या मतदारसंघात भय्यांची मते निर्णायक आहेत की तो इथे येऊन पण त्यांचेच गुणगान गाईल.

आमाला तर वाटते म्हाराश्ट्राची प्रगती झाली नाय........पन म्हाराश्ट्रातल्या ऊधोगपतींची प्रगती जरुर झाली!

In reply to by ईन्टरफेल

तू आजच्या काळात कम्युनिस्टासारखा का बोलतोस? पश्चिम महाराष्ट्रातले अनेक शेतकरी सधन आहेत्.अनेकांकडे मर्सेडिस आहे त्याचे काय? शेतकर्‍यांना करमाफी असते त्याचे काय?

In reply to by प्रिया देशपांडे

हॅहॅहॅ त्या मर्सिडिझा त्यांना शेती करून मिळालेल्या नाहीत. :) बाकी मूळ धाग्याबाबत : हुप्प्या यांनी आपल्या चष्म्याचा "राहुल गांधी" हा फिल्टर काढून जगातल्या इतरही गोष्टींकडे बघावे.

In reply to by नितिन थत्ते

आपल्याकडून अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली हे बघून आनंद झाला.

In reply to by प्रिया देशपांडे

http://www.prahaar.in/columns/summary/30296.html शेतक-यांनी कर्जफेड केली नाही तर सहकारी संस्थांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली. एरव्ही परस्परांची खुस्पटे काढणारे एका सुरात बोलताना पाहिल्यावर कुणाचाही असा समज होऊ शकतो की, शेतकरी कर्जबुडवा आहे. सरकार शेतक-यांवर कर्जमाफीची उधळण करीत आहे आणि त्याला कर्ज बुडवण्याची सवय लागली आहे. शेतक-यांचे तारणहार म्हणवून घेणारे नेतेच असे बोलताहेत म्हणजे पाणी डोक्यावरून चालले असावे. एवढा स्पष्टवक्तेपणा दाखवल्यामुळे हे नेते शहरी पांढरपेशांच्यादृष्टीने पुरोगामी ठरू शकतात. पण शेतक-यांना सल्ले देणा-यांनी शेतक-यांचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कोणती पावले उचलली याचे उत्तर त्यांच्याकडे आहे का ? शेतक-यांना भिकेला लावायला यांचीच धोरणे कारणीभूत नाहीत का ? यंदा विदर्भात अतिवृष्टीमुळे पिके हातची गेल्याच्या बातम्या येत आहेत, त्या त्यांच्या कानावर आल्या नाहीत का? त्यामुळे कर्जफेड दूर राहिली, शेतक-यांना यंदा किमान जगता येईल अशी स्थिती आहे का? मग कशाच्या बळावर शेतक-यांना कर्जफेडीचे सल्ले देत आहेत?

परमपूज्य राहुलजी हे निव्वळ आपल्या कर्तृत्वाने पुढे आले आहेत. अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तळागाळातून आपली कारकीर्द सुरु करुन निव्वळ कर्तबगारीवर भावी पंतप्रधान या पदी पोचले आहेत असे मिसळपावच्या काही सदस्यांना वाटत असेल तर त्यांना माझा दंडवत आणि कोपरापासून नमस्कार. भारतात पुरेसे मूर्ख लोक आहेत आणि पुरेसे संधीसाधू, हलकट नेते आहेत जे कुठलीही लायकी नसलेल्या, निव्वळ अमक्या एका घराण्याचा कुलदीपक आहे म्हणून एखाद्याला डोक्यावर घेतील आणि त्याच्या हातात आपल्या देशाच्या नाड्या देतील. कागदोपत्रीच्या लायकीला काही अर्थ नाही. अमके वय, दिवाळखोर नाही असल्या पात्रतेवर कोट्यावधी लोक लायक ठरतील. परंतु राहुलजींचे गांधी आडनाव हेच एकमात्र क्वालिफिकेशन आहे. भारतात कागदोपत्री लोकशाही असली तर जनमानसात राजेशाहीच आहे. लोकांना अमक्या एका घराण्याच्या पिढ्यानपिढ्या निवडून द्यायलाच आवडतात ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या कसोटीवर राहुलजी राजपुत्र ह्या पदाला १००% लायक आहेत. हे महारथी उद्या पंतप्रधान होऊन देशाचा गाडा हाकू लागतील ह्याविषयी मलातरी शंका नाही. थत्ते काका, मी राहुलजींची दुर्बीण तेव्हाच काढीन जेव्हा राहुलजी असले तारे तोडणे बंद करतील. तुमची वट असली तर त्यांना निरोप पोचवा की असे भलतेसलते बोलू नका. माकडाच्या हाती आयतेच कोलित मिळते!

In reply to by हुप्प्या

हुप्प्या यांच्याशी अंशतः सहमत आणि असहमत. असहमती यासाठी की घराणेशाही मधे मला तरी वैयक्तीक काहीही वाईट वाटत नाही. कोण म्हणतं घराणेशाही वाईट म्हणून? सातवहनांनी ४०० वर्षे राज्यं केलं. कुठे नुकसान झालं घराणेशाहीमुळे? भारतातच नव्हे तर जगात घराणे शाही मोठा प्रमाणात होती आहे. आणि त्यात तथ्यंही आहे. दत्तोवामन पोतदारांनी लग्नं न करता ब्रम्हचारी राहील्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले असे सावरकरांनी म्हटले होते. त्यांनी जर लग्न करून प्रजोत्पत्ती केली असती तर त्या हुषार संतानांची समाजाला गरज होती असे म्हटले होते. त्या न्यायाने चांगली घराणेशाही चालली असती एकवेळ. त्यामुळे गांधी-नेहरू (सॉरी नेहरूच म्हणायला पाहीजे. म. गांधीबाबांचा काही संबध नाही यात. हे सगळे नतद्र्ष्ट नेहरूंचेच प्रताप आहेत(आता नेहरूभक्त अन्य नेहरूभक्तांनी लिहीलेल्या नेहरुस्तुतीसुमनांचे ढिगाने पुरावे देतील. पण असो त्याने काहीच फरक पडत नाही))घराण्यापेक्षा एखादे एतद्देशीय घराणे चालले असते. बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.