क्षण मन फुलवा
क्षण मन झुलवा..
क्षण क्षणातच बंद
क्षणाचा हा धुंद ठेवा!
सुख साखर-पेरणी
क्षण-क्षणाची करणी..
नसे दुःखाचा संग
तुझे आकाश-धरणी!
आता भरार-भरार
व्हावे क्षणात फरार..
जरी क्षणाचा आनंद
त्याही क्षणाचे आभार!!
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1204
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हावे क्षणात फरार.. चोर फरार
अतिशय सुंदर कविता विषेश करुन
पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं.