Skip to main content

क्षण..

लेखक अथांग
Published on शनीवार, 16/10/2010
क्षण मन फुलवा क्षण मन झुलवा.. क्षण क्षणातच बंद क्षणाचा हा धुंद ठेवा! सुख साखर-पेरणी क्षण-क्षणाची करणी.. नसे दुःखाचा संग तुझे आकाश-धरणी! आता भरार-भरार व्हावे क्षणात फरार.. जरी क्षणाचा आनंद त्याही क्षणाचे आभार!!
लेखनविषय:

वाचन संख्या 1204
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर कविता विषेश करुन हे खुप आवडले सुख साखर-पेरणी क्षण-क्षणाची करणी.. नसे दुःखाचा संग तुझे आकाश-धरणी! आता भरार-भरार व्हावे क्षणात फरार.. -------------- भरारी .. भुर्र उडुन जाणे असे शब्दप्रयोग जास्त प्रचलीत आहेत . खुप दिवसानी 'भरार' हा शब्द पुन्हा वाचायला मिळाला म्हणुन आनंद वाटला त्या ओळी वाचताना ..