पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!
वरील फोटो 'डॉन' वृत्तपत्रातील असून तो 'AFP'ने 'डॉन'ला पुरवला आहे.
पाकिस्तानी तालीबान आणि इतर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे व त्यांच्या कुकर्मात सक्रीय असलेले लोक पोलीस व सैन्यासारख्या सुरक्षादलात आहेत हाच या जवळिकीचा अर्थ आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'डॉन' हे कराचीहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पाकिस्तानी सरकारच्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतातील शस्त्रागारांतून तीस लाख शस्त्रास्त्रे नाहींशी झाली आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली आणि वाटले कीं आता आपल्या पोलिसांनी किंवा सैनिकांनी दहशतवादी पाकिस्तानी शस्त्रे वापरत आहेत असे सिद्ध केले तरी पाकिस्तान कानावर हात ठेवणार!
आजकाल पाकिस्तानच्या कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते!
नाहींशा झालेल्या शस्त्रांत सुमारे ३५०० ग्रेनेड्स आहेत तर ४५०० 'कॅलिश्निकोव्ह' स्वयंचलित बंदूकाही (AK-47) आहेत.
अशा बातम्या वाचल्यावर "पाकिस्तानी सैन्य आता एकसंध राहिले नसावे" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम पाकिस्तानी सरकार (मुलकी अथवा लष्करी) एका बाजूला, सैन्य दुसर्या बाजूला, त्यांची ISI ही गुप्तहेरसंघटना तिसर्या बाजूला आणि शेवटी सैन्याशी व ISI शी खास जवळीक असलेले अतिरेकी/दहशतवादी चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो! भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दोन बाबी सगळीकडे ठळकपणे दिसतात! याची अनेक उदाहरणे Nuclear Deception या लेखमालेत आलेली आहेत.
यातली कांहीं शस्त्रें पोलिसांनी वैयक्तिक दहशतवाद्यांकडून व दहशतवादी टोळक्यांकडून जप्त केल्यावर शस्त्रागारांत जमा न केलेली शस्त्रेही आहेत, पण त्याही पुढे म्हणजे बाँब निष्क्रीय करणार्या अधिकृत तुकड्यांनी (bomb disposal squad) अधिकृतपणे जिल्हापातळीवरील व प्रांताच्या पातळीवरील शस्त्रागारात अधिकृतरीत्या जमा केलेली तीस लाखांहून जास्त व वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रेही आहेत. याचा अर्थ एक तर पैशाच्या मोबदल्यात अशी शस्त्रे या शस्त्रागारांवरील सुरक्षा कर्मचारी ती विकत तरी आहेत किंवा दहशतवाद्यांबाबत सहानुभूती असलेले लोक सैन्यात, ISI मध्ये आहेत व ते अशी शस्त्रे धर्मांधतेपायी या दहशतवाद्यांना फुकट प्रदान तरी करत आहेत!
अलीकडेच मुशर्रफसाहेबांनी "पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांना काश्मीरमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिले होते" अशी स्पष्ट कबूली एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेच! त्याचाच भाग म्हणूनही हे शस्त्रास्त्रांचे वाटप झाले असेल! पाकिस्तानात कांहींही होऊ शकते!
इमानदार अधिकार्यांनी सचोटीने सर्व हिशेब बरोबर ठेवले होते हीच कांहींशी जमेची बाजू. पण इतके चोख हिशेब ठेवले जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे चोरीला जावी ही गोष्ट कुठल्याही सरकारला काळजीत टाकेल.
भारतापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या शस्त्रांपैकी बरीचशी शस्त्रे आपल्यावरच चालविली जातील व ती पकडून जर आपण ती पाकिस्तानी असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पाकिस्तान सरकार "ती चोरीला गेलेल्या शस्त्रांपैकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
संपूर्ण वृत्त वाचायचे असेल तर पहा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspaper/editorial/missing-weapons-500 हा दुवा!
याद्या
7793
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
चांगली माहिती
काही शस्त्र नाही, तब्बल १६४
In reply to चांगली माहिती by अवलिया
गांधीवादी
In reply to काही शस्त्र नाही, तब्बल १६४ by गांधीवादी
गांधीवाद ;)
In reply to काही शस्त्र नाही, तब्बल १६४ by गांधीवादी
बापरे...
भारतातून शस्त्रे चोरीला गेल्याचे वाचनात आलेले नाहीं.
http://timesofindia.indiatime
In reply to भारतातून शस्त्रे चोरीला गेल्याचे वाचनात आलेले नाहीं. by सुधीर काळे
ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते
In reply to http://timesofindia.indiatime by गांधीवादी
चष्म्याला "पाकिस्तान" असा
In reply to ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते by सुधीर काळे
धन्यवाद
In reply to चष्म्याला "पाकिस्तान" असा by अवलिया
आपल्याला आनंद झाला हे वाचुन
In reply to धन्यवाद by सुधीर काळे
कदाचित ही शस्त्रेही पाकिस्तानातच जायची!
In reply to ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते by सुधीर काळे
नॉट नेसेसरीली
What a relief!
अवांतर
In reply to What a relief! by सुधीर काळे
अवांतरावर अवांतर प्रतिसाद
In reply to अवांतर by ऋषिकेश
अपेक्षित
In reply to अवांतरावर अवांतर प्रतिसाद by अवलिया
....डोळे पाणावले.
In reply to अपेक्षित by ऋषिकेश
अरेरे
In reply to ....डोळे पाणावले. by अवलिया
रूमाल भारतीय
In reply to अरेरे by ऋषिकेश
नसेल तर 'अश्रुंची झाली फुले'
In reply to रूमाल भारतीय by ३_१४ विक्षिप्त अदिती
चीनी रुमाल वापरुन डो़ळ्यात
In reply to रूमाल भारतीय by ३_१४ विक्षिप्त अदिती
पत्र लिहून निशेध करावा.
In reply to रूमाल भारतीय by ३_१४ विक्षिप्त अदिती
तर
In reply to रूमाल भारतीय by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे
In reply to अवांतर by ऋषिकेश
सेलफोन
In reply to प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे by सुधीर काळे
श्श ... काहीही काय प्रश्न
In reply to सेलफोन by मिसळभोक्ता
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे
In reply to अवांतर by ऋषिकेश
असेच म्हणतो. . . . .
In reply to अवांतर by ऋषिकेश
स्वात व्हॅली, वायव्य सरहद्द,
फक्त नाहीशी झालेलीच का?
इंचा इंचाने दोनशे तर तीस
एक अतिशय तळमळीने लिहिल्या
?
In reply to एक अतिशय तळमळीने लिहिल्या by परिकथेतील राजकुमार
रहिम थत्ते चाचा, तुम्ही देखील
In reply to ? by नितिन थत्ते
रहिमथत्ते चाचा, तुम्ही देखील टिंगल उडवायला लागलात :(मी काळे काकांच्या धाग्यावर
In reply to रहिम थत्ते चाचा, तुम्ही देखील by परिकथेतील राजकुमार
वेळीच काळाची (शब्द निट
In reply to मी काळे काकांच्या धाग्यावर by नितिन थत्ते
ती ओळखूनच सिरिअस व्हायचे नाही
In reply to वेळीच काळाची (शब्द निट by परिकथेतील राजकुमार
मी काळे काकांच्या धाग्यावर
In reply to मी काळे काकांच्या धाग्यावर by नितिन थत्ते
कोण कोणाला प्रस्थापित
In reply to मी काळे काकांच्या धाग्यावर by सुहास..
अ रे रे रे काय चालवलयत लेको.
धाग्याचा पार काश्मिर करायला
In reply to अ रे रे रे काय चालवलयत लेको. by गणपा
तुमच्याकडून असेच कांहीं तरी
In reply to धाग्याचा पार काश्मिर करायला by ३_१४ विक्षिप्त अदिती
....डोळे पाणावले.
In reply to तुमच्याकडून असेच कांहीं तरी by गणपा
हे बघ
In reply to ....डोळे पाणावले. by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रिय ऋषीकेश तुमच्याकडून
In reply to हे बघ by ऋषिकेश
तू रूमाल द्यायचे सोडून
In reply to हे बघ by ऋषिकेश
हा हन्त हन्त
In reply to तू रूमाल द्यायचे सोडून by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला चालतील, आण इकडे! कच्चा
In reply to हा हन्त हन्त by ऋषिकेश
छे
In reply to मला चालतील, आण इकडे! कच्चा by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा कसला अनुप्रास?
In reply to तू रूमाल द्यायचे सोडून by ३_१४ विक्षिप्त अदिती
सॉरी शक्तिमान. सुरवात माझ्या
In reply to हा कसला अनुप्रास? by सुनील
अ रे रे रे कंपुबाजांनी मिळुन
गणपा यु टु? लाजणार्या गणपाने
In reply to अ रे रे रे कंपुबाजांनी मिळुन by गणपा
असले जाहिररीत्या खाजगीतले
In reply to गणपा यु टु? लाजणार्या गणपाने by ऋषिकेश
कंपुबाजांनी मिळुन एका
ह्या धाग्यावर असेच कांहीं तरी
अरेरे काळेंचा सामंतकाका न
अरेरे काळेंचा सामंतकाका न
यात काय नवल ?
मी तर म्हणतो ह्याचा सामना
काळजी नसावी
Nero Fiddled while Rome burned.
शक्य नाही!
In reply to Nero Fiddled while Rome burned. by तर्री
गांभीर्य !!
मुंबईनंतर होते 'टार्गेट