Skip to main content

पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!

पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!

Published on 19/10/2010 - 15:28 प्रकाशित मुखपृष्ठ
वरील फोटो 'डॉन' वृत्तपत्रातील असून तो 'AFP'ने 'डॉन'ला पुरवला आहे. पाकिस्तानी तालीबान आणि इतर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे व त्यांच्या कुकर्मात सक्रीय असलेले लोक पोलीस व सैन्यासारख्या सुरक्षादलात आहेत हाच या जवळिकीचा अर्थ आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'डॉन' हे कराचीहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पाकिस्तानी सरकारच्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतातील शस्त्रागारांतून तीस लाख शस्त्रास्त्रे नाहींशी झाली आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली आणि वाटले कीं आता आपल्या पोलिसांनी किंवा सैनिकांनी दहशतवादी पाकिस्तानी शस्त्रे वापरत आहेत असे सिद्ध केले तरी पाकिस्तान कानावर हात ठेवणार! आजकाल पाकिस्तानच्या कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते! नाहींशा झालेल्या शस्त्रांत सुमारे ३५०० ग्रेनेड्स आहेत तर ४५०० 'कॅलिश्निकोव्ह' स्वयंचलित बंदूकाही (AK-47) आहेत. अशा बातम्या वाचल्यावर "पाकिस्तानी सैन्य आता एकसंध राहिले नसावे" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम पाकिस्तानी सरकार (मुलकी अथवा लष्करी) एका बाजूला, सैन्य दुसर्‍या बाजूला, त्यांची ISI ही गुप्तहेरसंघटना तिसर्‍या बाजूला आणि शेवटी सैन्याशी व ISI शी खास जवळीक असलेले अतिरेकी/दहशतवादी चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो! भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दोन बाबी सगळीकडे ठळकपणे दिसतात! याची अनेक उदाहरणे Nuclear Deception या लेखमालेत आलेली आहेत. यातली कांहीं शस्त्रें पोलिसांनी वैयक्तिक दहशतवाद्यांकडून व दहशतवादी टोळक्यांकडून जप्त केल्यावर शस्त्रागारांत जमा न केलेली शस्त्रेही आहेत, पण त्याही पुढे म्हणजे बाँब निष्क्रीय करणार्‍या अधिकृत तुकड्यांनी (bomb disposal squad) अधिकृतपणे जिल्हापातळीवरील व प्रांताच्या पातळीवरील शस्त्रागारात अधिकृतरीत्या जमा केलेली तीस लाखांहून जास्त व वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रेही आहेत. याचा अर्थ एक तर पैशाच्या मोबदल्यात अशी शस्त्रे या शस्त्रागारांवरील सुरक्षा कर्मचारी ती विकत तरी आहेत किंवा दहशतवाद्यांबाबत सहानुभूती असलेले लोक सैन्यात, ISI मध्ये आहेत व ते अशी शस्त्रे धर्मांधतेपायी या दहशतवाद्यांना फुकट प्रदान तरी करत आहेत! अलीकडेच मुशर्रफसाहेबांनी "पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांना काश्मीरमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिले होते" अशी स्पष्ट कबूली एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेच! त्याचाच भाग म्हणूनही हे शस्त्रास्त्रांचे वाटप झाले असेल! पाकिस्तानात कांहींही होऊ शकते! इमानदार अधिकार्‍यांनी सचोटीने सर्व हिशेब बरोबर ठेवले होते हीच कांहींशी जमेची बाजू. पण इतके चोख हिशेब ठेवले जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे चोरीला जावी ही गोष्ट कुठल्याही सरकारला काळजीत टाकेल. भारतापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या शस्त्रांपैकी बरीचशी शस्त्रे आपल्यावरच चालविली जातील व ती पकडून जर आपण ती पाकिस्तानी असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पाकिस्तान सरकार "ती चोरीला गेलेल्या शस्त्रांपैकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे! संपूर्ण वृत्त वाचायचे असेल तर पहा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspaper/editorial/missing-weapons-500 हा दुवा!
लेखनप्रकार

याद्या 7793
प्रतिक्रिया 66

भारतातुन मधे काही शस्त्रं गायब झाली होती ती कुठे गेली? उद्या पाकिस्तानात काही झाले तर पाकिस्तान सुद्धा हे भारताचे कारस्थान आहे असे म्हणु शकते म्हणजेच - पाकिस्तानपुरते बोलायचे म्हणजे या गायब शस्त्रांपैकी बरीचशी शस्त्रे पाकिस्तानवरच चालविली जातील व ती पकडून जर त्यांनी ती भारतीय असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर भारत सरकार "ती गायब शस्त्रांपैकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!

In reply to by अवलिया

काही शस्त्र नाही, तब्बल १६४ स्फोटक भरलेले trucks गायब झालेले आहेत. कधी कधी असे वाटते कि हा देश सोडून दुसरीकडे दूर कुठेतरी जाऊन राहावे. काय कोण जबाबदार असणार आहे लोकांच्या जीवाला इथे ? सरकार काय भरपूर निषेद खलिते घेऊन बसलेली आहे.

In reply to by गांधीवादी

अहो आम्ही भारतात साधा नवीन flat घेऊ शकत नाही..... देश काय सोडून जाणार???? कप्पाळ :) ((((( I .T . मध्ये Career करायला हवा होतं , आत्ता USA मधून मस्त मजा बघत बसलो असतो..... ))))))))))

In reply to by गांधीवादी

नाव बदला ते आधी. आता जीवंत असते तर तुमचा कान पकडून सांगितल असतं त्यानी -" अहिंसा परमो धर्मः! मुंबई मध्ये एक २६/११ झाल म्हणून चिडायच नाही. सीमा उघडी करायची. येवू द्यात त्यांना आणि कुठ पाहिजे तिथ रक्तपात करू देत. एक ना एक दिवस पश्चाताप होवून सुधरतील ते! " ;) >>कधी कधी असे वाटते कि हा देश सोडून दुसरीकडे दूर कुठेतरी जाऊन राहावे. काय कोण जबाबदार असणार आहे लोकांच्या जीवाला इथे ? सरकार काय भरपूर निषेद खलिते घेऊन बसलेली आहे. आपणच जबाबदार, आपण शिकलेले लोक मतदान करत नाही. जबाबदारी घेत नाही. वर मिपा सारख्या व्यासपीठावर बोंब मारून स्कोर करण्यात एक नंबर. कुठ तरी एक चांगला वाक्या वाचल होत- "Democracy makes sure that you never get leaders better than you deserve!"

दुर्दैवाने भारतातून शस्त्रे चोरीला गेल्याचे माझ्या वाचनात आलेले नाहीं. कदाचित २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरच्या दरम्यान असल्यास शक्य आहे कारण मी प्रवासात होतो. दुवा दिल्यास ही बातमीही वाचायला आवडेल.

In reply to by सुधीर काळे

http://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/Licence-of-90-explosives-dealers-cancelled/articleshow/6471152.cms http://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/103-more-trucks-with-explosives-from-RECL-missing-cops-in-tizzy/articleshow/6442623.cms

In reply to by गांधीवादी

धन्यवाद! मी रोजच टाइम्स वाचतो. तरी ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते. या काळात मी खरे तर जकार्तालाच होतो.

In reply to by सुधीर काळे

कदाचित ही शस्त्रेही पाकिस्तानातच जायची! हे सर्व ट्रक राजस्थानमधून पूर्वेला मध्यप्रदेशात जायच्याऐवजी पश्चिमेला पाकिस्तानलाही गेले असतील.

पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?! स्वात व्हॅली, वायव्य सरहद्द, पाकीस्तानात इतरत्र, इराक, मुख्य म्हणजे अफगणिस्तान, थोडी येमेन, थोडी सोमालिया वगैरे वगैरे मधे अशी बर्‍यापैकी वाटणी झाली की मग थोडीशी कश्मीरकडे. म्हणजेच उत्तर आहे - नाही, तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार नाहीत.

खरंच कीं! पाकिस्तानला गिर्‍हाइके कमी नाहींत!! What a relief!

In reply to by सुधीर काळे

अवांतरः
एक देशभक्त भारतीय या नात्याने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला!
१. मी चीनी वस्तुंवर बहिष्कार घातला तर माझी भारतीय म्हणून देशभक्ती कशी दिसून येते? २. चीनी वस्तु म्हणजे काय? चिन मधे असेंबल झालेल्या वस्तु? ज्याचा कच्चा माल चीन मधे बनतो त्या वस्तु ? की ज्याचे वितरक चीनी आहेत त्या वस्तु? की ज्याचे विक्रेते चीनी आहेत त्या वस्तु? आणि जर याचे उत्तर "ह्या सगळ्या वस्तु चीनी आहेत" असेल तर हल्लीच्या ग्लोबल व्हीलेजमधून विकत घेण्यासारखे काय उरेल?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नसेल तर 'अश्रुंची झाली फुले' किंवा 'आंसू बने अंगारे' ह्यातले एक काहितरी होईपर्यंत वाट पहावी.

In reply to by ऋषिकेश

असेच म्हणतो. . . . . नोकियाचा चीनमध्ये बनलेला मोबाईल चिनी समजायचा की फिन्निश? बजाजने चीनमधून आणून आपली म्हणून विकलेली इस्त्री चिनी समजायची की भारतीय?

स्वात व्हॅली, वायव्य सरहद्द, पाकीस्तानात इतरत्र, इराक, मुख्य म्हणजे अफगणिस्तान, थोडी येमेन, थोडी सोमालिया वगैरे वगैरे मधे अशी बर्‍यापैकी वाटणी झाली की मग थोडीशी कश्मीरकडे. >>> पुर्व पॅलेस्टाईन ?

एक अतिशय तळमळीने लिहिल्या गेलेल्या विषयावर काही प्रस्थापित सदस्यांनी नेहमीप्रमाणे केलेली हुल्लडबाजी पाहून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

In reply to by नितिन थत्ते

मी काळे काकांच्या धाग्यावर सिरिअस व्हायचे नाही असे ठरवले आहे >>> फक्त काळे काका ? का ? का ? असा अन्याय का बरं करावा प्रस्थापितांनी ? (गांधीवादी,ईन्दरचाचा व Pain च्या प्रतिक्षेत) सुहास..

अ रे रे रे काय चालवलयत लेको. धाग्याचा पार काश्मिर करायला घेतलाय. काळेकाकांनी दिलेलेई बातमी जरी चिंताजनक असली तरी आपल्या बुडाखाली काय आणि किती जळतय ही खरी काळजीत टाकणारी बाब आहे. तब्बल १६४ स्फोटक भरलेले ट्रक गायब झाले त्याचा मिडियाने बाजार मांडला होता. आता सगेळे सोईस्कर रित्या विसरले आहेत.

In reply to by गणपा

धाग्याचा पार काश्मिर करायला घेतलाय.
हरकत नाही ना, इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! मग धागा टवाळमुक्त होईल!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला. :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(अवांतर: शंका खर्‍या ठरतात, खात्र्या नव्हे!)
हे बघ.. प्रस्थापित आहेस म्हणून उगाच वाद घालु नकोस. तिथे पर्‍या शरमेने (लाजून?) चूर होईल. आणि आधीच इंचा इंचाने माघार घेणार्‍या काश्मिर मधे ३० लाख शस्त्रास्त्रे पोचत आहे आणि तु खात्री खरी ठरते का शंका करत बसली आहेस...छे छे छे! इतक्या अभ्यासात्मक धाग्याचे काश्मिर झाले आहे हेच खरे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्याकडे चिनी कंपनीने आफ्रिकेतील कारखान्यात बनविलेले भारतात विकलेले रुमाल आहेत.. ते इथे चालणार नाहित बहुदा!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छे.. कच्चा माल धारावीतील चिंधी बाजारातून गेला असावा असे "शांताराम" ह्या गोर्‍या लेखकाच्या पुस्तकवरून वाटते.. :P चाल्तील का मग हे रुमाल?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(अनुप्रास पहा, अनुप्रास!!) हा कसला अनुप्रास? काळे काकांनी कळवळून काढलेल्या काथ्याकुटाचा काश्मिर केलात की कारट्यांनो! ह्याला म्हणतात अनुप्रास!!

अ रे रे रे कंपुबाजांनी मिळुन एका ज्येष्ठ्य सभासदाच्या धाग्यावर केलेला अतिरेकी हल्ला पाहुन एक मिपाकर म्हणवौन घेताना मला लाज वाटत आहे. त्यांच प्रायश्चित्त म्हणुन आम्ही मौन व्रत घेत आहोत. :(

In reply to by ऋषिकेश

असले जाहिररीत्या खाजगीतले फोटु मागु नये. जरी पुणेरी नसलो तरी खास पुणे ३० स्टाईलने अपमान केला जाईल. (17:56 वाजता चालु केलेल मौनव्रत संपलेल आहे याची नोंद घेण्यात यावी)

कंपुबाजांनी मिळुन एका ज्येष्ठ्य सभासदाच्या धाग्यावर केलेला अतिरेकी हल्ला पाहुन एक मिपाकर म्हणवौन घेताना मला लाज वाटत आहे. >>. वाक्य चुकले आहे !! योग्य वाक्य हवे असल्यास व्यनी करावा !!

पाकड्यांकडुन काय अपेक्षा ठेवायच्या ? अमेरिका शस्त्रात्रांचा दानधर्म करायला बसली आहे आणि पाकडे दरवेळी झोळीत कमीच दान आले असे दानी अमेरिकेला सांगतात... भोळी बिचारी अमेरिका ( याच अमेरिकेनेच तालिबान्यांना प्रशिक्षण देले होते ना ? ;) आधीचे मुजाहिदीन तेच आत्ताचे तालिबान बनुन उलटले आहेत एव्हढचं... ;) ) मग परत नवीन शस्त्रात्रांचा तोहफा पाकड्यांना वेळोवेळी देत राहते.त्यात अशी छोटी मोठी चोरी झाली तर काय बिघडले ? ;) नविन शस्त्रे मागण्याची संधी उपलब्ध झाली नाही का ? मागा भिक अमेरिकेकडुन !!! ते आहेच लाड पुरवायला तयार... जरा हे देखील वाचा :--- http://news.yahoo.com/s/afp/20101006/wl_afp/pakistanunrestnato जाता जाता :--- अमेरिकेने वॉर अगेन्स्ट टेररिझमची घोषणा केली आणि त्यांचा या मोहिमेत सगळ्यात महत्वाचा साथीदार कोण ? तर पाकडे !!! याच्या सारखा मोठा विनोद अमेरिकेने जगाला या आधी सांगितला नसावा !!! असे मला वाटते. ;) जो देश दहशदवाद्यांच्या फॉक्टर्‍या लावतो, पोसतो,सशस्त्र करतो तोच वॉर अगेन्स्ट टेररिझम मधे अमेरिकेला साथ देतो म्हणे !!! ;) वा काय गुणी पार्टनर अमेरिकेने निवडला आहे नाही ? ;) असो... हे असेच चालणार. हिंदुस्थानचे रक्त पिणारे हे पाकरुपी गोचीड अमेरिका पोसतो आहे, हे मी नेहमीच लक्षात ठेवतो...

मी तर म्हणतो ह्याचा सामना करायला समस्त मराठी संस्थळावरील भारतीय आयटीतल्या लोकांना सिमेवर धाडावे, त्यांच्या नेतृत्व-कला-गुणांवर आमचा पुर्ण विश्वास आहे. (जाता जाता दोनचार आध्यात्मिक धागे लिहणार्‍यांनाही घेउन जावे, अधुन मधुन बरे असते प्रार्थनेला) ;-) चला देशाचा प्रश्न सुटला, आता कशी शांत झोप लागेल.

दसर्‍याला साहेबांनी डरकाळी फोडली आहे. त्यामुळे सारे जग जरी भारताच्या विरुध्द गेले तरी काळजी नसावी. ते मर्द, ते वाघ, ते ज्वालामुखी, ते गरम डोक्याचेच, आपलं रक्षण करतील.

Nero Fiddled while Rome burned. अशी एक म्हण आहे , त्याची आठवण झाली . (नीरो कोण? लगे रहो.....)

In reply to by तर्री

निरो पहिल्या शतकातील तर फिडलचा शोध दहाव्या शतकातील. तेव्हा रोम जळत असताना निरो फिडल वाजवणे शक्य नाही (मात्र शिट्या वाजवीत असणे शक्य आहे!)

भारतात १७६० ट्रक शस्त्रास्त्रे चोरी जाऊ देत ना... त्यामुळे या ३० लाख पाकिस्तानी शस्त्रांच्या बातमीचे गांभीर्य कमी होत नाहि. ३० लाख हा आकडा हिमनगाचे टोक असणार... (शस्त्रधारी) अर्धवटराव

मुंबईनंतर होते 'टार्गेट दिल्ली' हेडली म्हणतो. त्यापैकी एनडीसीभोवतालची सुरक्षा व्यवस्था अगदीच कुचकामी होती तर पंतप्रधान निवासाभोवतीचे सुरक्षा कवच भेदणे कठीण होते, हे सांगायला हेडली कशाला पाहिजे ? (इथे हेडली एक विसरला, 'माझे नाव य्याव त्याव' ह्या चित्रपट गृहात सुद्धा एकदम कडेकोट सुरक्षा असते हे त्याने नमूद केले नाही.) कोणी मुंबईकर असतील तर त्यांनी कृपया 'श्री छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावरील' सध्याच्या सुरक्षेबद्दल सांगावे. (इतर स्थानकांवरील सांगितले तरी चालेल.) मी आज स्वतः पुण्याच्या रेल्वे स्थानकावर एक चक्कर मारून येतो.