Skip to main content

CWG झाले म्हणून देशाची आन बाण शान उंचावली गेली, जर खेळ झाले नसते तर मात्र हीच आन बाण शान पार रसातळाला गेली असती.

शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 656
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कृपया मतांची जास्तीत जास्त नोंद व्हावी. ह्या माहितीच्या आधारे एक (सविस्तर नाही निदान एक छोटासा) लेख लिहिण्याचे ठरवीत आहे.

In reply to by प्रिया देशपांडे

CWG झाले म्हणून देशाची आन बाण शान उंचावली गेली, जर खेळ झाले नसते तर मात्र हीच आन बाण शान पार रसातळाला गेली असती. >>> आकाशी झेप घे रे पाखरा, सोड सोन्याचा पिंजरा सोड सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या,घेसी आसरा, सोड सोन्याचा पिंजरा सोड सोन्याचा पिंजरा

In reply to by गांधीवादी

कृपया मतांची जास्तीत जास्त नोंद व्हावी. ह्या माहितीच्या आधारे एक (सविस्तर नाही निदान एक छोटासा) लेख लिहिण्याचे ठरवीत आहे.
नsssssssssssssहीsssssssssssssssss !! नका हो नका असे काही करु. जगु द्या की सुखाने ;)

गां.वा., बरोबर ला मत दिलय.

In reply to by नावातकायआहे

कृपया सर्वांनी गांधीवादी यांना गां.वा. असे संबोधु नये. मला फुस्सकन हसु येते. कारण खाली दिले आहे. नाजुक मनाच्या लोकांनी वाचु नये. * आमचे एक मित्र "का रे माजलास का? गांवा झाला का? "असे विचारत असे. जाणकारांना गांवा म्हणजे काय ते माहित असे. नवखे गोंधळत असत. मग त्यांना खुलासा करावा लागे... *डीत वात. *

दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे मत देता आले नाही. माझ्या देशाची आन बाण शान हे केवळ खेळावर अवलंबून नसून प्रामुख्याने तिच्या ११० करोड नागरिकांच्या जीवनावर अवलंबून आहे हे खरे आहे पण खेळ आयोजित केल्यामुळे मान उंचावली हे ही खरेच आहे. विशेषतः खेळ होणार की नाही असा प्रश्न निर्माण केल्यावर खेळ सुरळित आणि शानदार झाल्यामुळे.

"इतर" (प्रतिक्रीया लिहा) हा पर्याय नसल्याने मत दिले नाही. (एवढ्याश्या भांडवलावर विस्तृत लेख होणे नाही)

सविस्तर लेख लिहिण्याचा विचार होता पण १०/१२ प्रतिक्रिया ह्या आधारावर काय कोण लेख लिहिणार आणि काय त्याची विश्वासाहर्ता असणार. असो. प्रतिक्रिया देणार्याचे/ न देणार्यांचे, सर्वांचे आभार. परंतु ह्या निमित्ताने जे काही लिहायचे होते ते थोडक्यात देत आहे. एक मनात आलेले आहे ते मांडू इच्छित आहे. कृपया वाचावे आणि सर्वांनी विचार करावा, हि नम्र विनंती. CWG दिमाखात पार पडून आपण जगाला काय संदेश द्यायचा आहे तो एकदाचा दिला. आता इथून पुढे जग, त्या संदेशामुळे जे काही भारताच्या बाबतीत निर्णय घेईल ते एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही तयार आहोत. 'जागतिक दर्जाच्या स्पर्धा आम्ही भरवू शकतो, त्यामुळे जागतिक दर्जाचे उत्पादन देखील आमच्याकडून करू शकतो.' हा एक संदेश कदाचित मला वाटते जगाला भारताकडून गेलेला असावा. असे ह्या खेळाचे समर्थन करणारे करतील. ठीक आहे. आमच्या मते ह्यातून जग कदाचित असाही संदेश घेऊ शकेल. भारतातूनच काम करून घायचे आहे ना, मग काही काळजी करू नका. २/४ सरकारी कर्मचारी हाताला धरा. यांच्यावर थोडे फार पैसे खर्च करा, ब्बस. तुमचे काम फत्ते म्हणून समजा. ते कर्मचारी लोकांना देशप्रेमाचे बुटुक तोंडी देऊन गप्प करतील. मग एकदाका आपल्या स्वार्थाचा देशप्रेमाशी संबंध जोडला कि मग सगळं अलहिदा. खिश्यात पैसा, परत गाठीला देशप्रेमाची थोरवी. एकदम सही फार्मुला.

In reply to by नीतु

खर्च करण्यापूर्वी तुम्हाला विचारून खर्च केला आहे. तुम्ही कॉमनवेल्थवर खर्च करा असे मंजूर केले होते. :)

In reply to by नितिन थत्ते

थत्ते काका, जितका खर्च करण्याची परवानगी दिली होती त्याच्या १०० पटीपेक्षा जास्त खर्च झालेला आहे. http://www.misalpav.com/node/14938#comment-249185 http://www.misalpav.com/node/14938#comment-249260 http://www.misalpav.com/node/14938#comment-249307 http://www.misalpav.com/node/14938#comment-249296 http://www.misalpav.com/node/14938#comment-249299 http://www.misalpav.com/node/14938#comment-249916 'खेळ खेळले जाऊ नयेत' असे मी म्हणतच नाही.: http://www.misalpav.com/node/14938#comment-249499 http://www.misalpav.com/node/14938#comment-249515 ह्या CWG खेळणार्यांना बोट दिले तर अख्खा हातच घेतला कि हो त्यांनी. सुरुवातीला ६०० कोटी खर्च येईल असे सांगितले होते, पण नंतर प्रत्यक्षात ७०,००० कोटी खर्च आला आणि हा खर्च केवळ देशाची आन बाण शान वाचावी म्हणून बळजबरीने केला गेला. एवढा खर्च करण्याच्या अगोदर एकदातरी जनमत घेतले होते का ? अवांतर : >>खर्च करण्यापूर्वी तुम्हाला विचारून खर्च केला आहे. विचारांची पुनर्वृत्ती टाळण्याचा एक चांगला प्रयत्न.

In reply to by गांधीवादी

७०००० कोटी रु खर्च नक्की कशाकशावर झाला हे पहायला हवे. दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च झाला असेल तर तो कॉमनवेल्थवरचा खर्च म्हणता येईल का? जरी तो कॉमनवेल्थच्या निमित्ताने झाला असला तरी.... असो. वरचा प्रतिसाद तुम्हाला दिला नव्हता. मुळात ७०,००० कोटी हा आकदाच कल्पनेची भरारी असावा. येथे १०००० कोटी खर्च (स्टेडियम आणि फ्लायओव्हरवगैरे धरून) असल्याची बातमी मार्चमधली आहे.

In reply to by नितिन थत्ते

>>दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च झाला असेल तर तो कॉमनवेल्थवरचा खर्च म्हणता येईल का? ७०,००० कोटि पैकि १५,००० कोटि दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च झाला. म्हणुन उरलेला (५५,००० कोटि) कॉमनवेल्थवरचा म्हणता येईल. आणि हो दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काही केलेले आहे त्यासाठी १५००० कोटी हा खर्च सुद्धा खूप जास्त आहे. पण तो वेगळा मुद्धा आहे. असो.

In reply to by गांधीवादी

माझ्या प्रतिसादातला दुवा पाहिलेला दिसत नाही. शिवाय जो खर्च झाला आहे त्यातला काही वसूल झालाच नाही असे समजले जात आहे असे दिसते. उदा. तिकिट विक्री, स्पॉन्सरशिप, टीव्ही प्रसारणाचे हक्क, जाहिराती वगैरे मधून पैसा परत आला असेल की नाही? नुसता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by नितिन थत्ते

>>माझ्या प्रतिसादातला दुवा पाहिलेला दिसत नाही. पहिला , अनेकदा पहिला >>शिवाय जो खर्च झाला आहे त्यातला काही वसूल झालाच नाही असे समजले जात आहे असे दिसते. उदा. तिकिट विक्री, स्पॉन्सरशिप, टीव्ही प्रसारणाचे हक्क, जाहिराती वगैरे मधून पैसा परत आला असेल की नाही? पाहूया, कधी हिशोब मांडला जातो आहे ते ? >>नुसता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे? चर्चा संयमित पणे चालू असताना हा आरडाओरडीचा भास आपणास का व्हावा, ह्याचे आश्चर्य वाटते आहे. जाहीर चर्चा करायची नसेल तर तसे सांगा.

In reply to by गांधीवादी

>>चर्चा संयमित पणे चालू असताना हा आरडाओरडीचा भास आपणास का व्हावा, ह्याचे आश्चर्य वाटते आहे. चूक झाली. क्षमस्व.

In reply to by नितिन थत्ते

कोणतेही आकडे घ्या, १०,००० घ्या कि, १५००० घ्या, कि ६०,००० घ्या. खेळासाठी बोली लावली त्यावेळेस ६०० कोटी चा अंदाज व्यक्त केला गेला होता. ( हे तरी नक्की ना ?) आता अशा प्रकारे अंदाजाची धूळधाण उडाली असेल तर काय म्हणावे असे अंदाज सादर करण्याला. म्हणजे हवा तो अंदाज बांधून खेळ पदरात पडून घायचे, आणि नंतर 'देशकी इज्जत/ आब्रू' चा हवाला देऊन वाट्टेल त्या किमतीत खेळ खेळायचे ?